प्रिया आज माझी भाग ५७
डिसेंबर- जानेवारी 2025-26
दीर्घकथा लेखन स्पर्धा
दीर्घकथा लेखन स्पर्धा
तो बाहेर गेला. आत डायनिंग टेबलवर अश्विन ज्याप्रकारे प्रियाशी सलगीने वागत होता ते त्याला अजिबात आवडते नव्हते...किंबहुना ते त्याच्या सहन करण्यापलीकडे गेले होते .
त्याच्या जाण्याने मिहिकाला फारसा फरक पडला नसला तरी प्रियाचे लक्ष विचलित झाले.
आपल्यावर रागावल्यामुळे त्यांनी नाश्ता केला नाही का?
तिच्या मनात विचार आला.
तिच्या मनात विचार आला.
इकडे तो बाहेर आला. गार्डन मध्ये माळी बागकाम करीत होता. झाडांची अनावश्यक पाने आणि फांद्या तोडण्यात तो गुंतलेला होता. बाहेर गुलमोहराच्या झाडाखाली मिहिकाचा ड्रायव्हर आणि बॉडीगार्ड गप्पा मारत उभे होते.
काय करावे म्हणजे मिहिका माझ्यापासून दूर राहील आणि अश्विन प्रियापासून....तो विचार करीत होता. मग कसल्यातरी इराद्याने तो दीपक आणि डॅनियलजवळ गेला.
"दीपक, दीपकच नाव आहे ना तुझे?...आणि तुझे डॅनिअल?..."
"हो सर. "
"मला मघाशी मिहिकाच्या बाबांचा .. श्री कोठारे साहेबांचा फोन आला होता. ते मला म्हणाले काहीही झाले तरी दीपक आणि डॅनियलला मिहिका सोबतच राहायला सांग. ते हल्लीच आजारपणातून उठले आहेत ना... अशा परिस्थितीत आपल्या लेकीची काळजी वाटणे साहजिकच आहे.
तुम्हाला एक किस्सा सांगतो...आम्ही कॉलेजमध्ये असताना तिचा एक बॉडीगार्ड असायचा...मला वाटते त्याचे नाव जॉन होते... दीपक तुला आठवत असेलच ना...तू तर त्यांच्याकडे गेली वीस वर्ष काम करीत आहेस."
शेखर म्हणाला.
शेखर म्हणाला.
"हो सर मला चांगलेच आठवत आहे...एकदा जॉनच्या गर्लफ्रेंडचा त्याला कॉल आला आणि तो फोनवर बोलत राहिला... मी त्यावेळेस मोठ्या साहेबांच्या गाडीवर असायचो...त्यावेळेस मिहिकामॅडमचा संतोष नावाचा ड्रायवर असायचा..."
दीपक सांगत होता.
"मग आता ते दोघं साहेबांसाठी काम का करीत नाहीत? काय झाले त्या दोघांचे?"डॅनियलला टेन्शन आले.
"जॉनचे लक्ष नव्हते आणि मॅडमला घरी जायचे होते म्हणून त्याला सोडून मॅडम संतोषला घेऊन घरी निघाल्या...वाटेत एक टवाळ पोरांची गँग त्यांच्या मागे लागली आणि त्यांना
चुकवायसाठी संतोषने गाडी वेगात चालवली, त्यामुळे स्पीड लिमिट क्रॉस झाली आणि गाडी सांभाळता न आल्यामुळे एका म्हाताऱ्या बाईला ठोकली गेली ..ती बाई वाचली ..पण ट्रॅफिक पोलिसांनी मॅडमना आणि संतोषला अटक केली. "
चुकवायसाठी संतोषने गाडी वेगात चालवली, त्यामुळे स्पीड लिमिट क्रॉस झाली आणि गाडी सांभाळता न आल्यामुळे एका म्हाताऱ्या बाईला ठोकली गेली ..ती बाई वाचली ..पण ट्रॅफिक पोलिसांनी मॅडमना आणि संतोषला अटक केली. "
"बापरे!!मग काय झाले?
"मग काय ...पोलिसांनी संतोषला मार दिलाच...पण कोठारी साहेबांनी जॉन आणि संतोषला आपल्या हिशोबाने सजा दिली. ...ते दोघेही महिनाभर हॉस्पिटलमध्ये होते. "
दीपक म्हणाला.
दीपक म्हणाला.
"मी तुम्हाला या साठी आठवण करून दिली कारण आता काही वेळातच आम्हाला तीन तासाचा प्रवास करून एका रिसोर्टवर जायचे आहे. मिहिका माझ्याबरोबर यायला आग्रह करेल पण माझ्या कारचा थोडा प्रॉब्लेम आहे... ब्रेक नीट चालत नाही...त्यामुळे तुम्ही मिहिकाला माझ्याबरोबर येऊ देऊ नका...बघा मी तुम्हाला आधी वॉर्न केले आहे...पुढचे तुम्ही ठरवा. "
शेखर म्हणाला.
शेखर म्हणाला.
दीपक आणि डॅनियल एकमेकांकडे गंभीरपणे पाहू लागले कारण मिहिकाला काही सांगणे म्हणजे सुद्धा नोकरीवर गदा आणण्यासारखेच होते.
शेखर शीळ घालीत तिथून निघाला...त्याचे काम झाले होते...तो बंगल्यात पुन्हा जाणार इतक्यात त्याचे लक्ष त्याच्या कारच्या जवळ उभ्या असलेल्या मेटॅलिक गोल्ड रंगाच्या जीटी 650 ह्या नव्या कोऱ्या बाईककडे गेले.
"ही बाईक नक्कीच त्या अश्विनची असणार त्याने अंदाज लावला..."
त्याने आजुबाजूला पाहिले, माळी आपले साहित्य ठेवून कुठेतरी गेला होता. शेखरने त्यातले प्रूनर आणले आणि ती बाईक पंक्चर करून पुन्हा ते प्रूनर होते तिथेच ठेवले आणि तो साळसूदपणे आपल्या रूममध्ये निघून गेला.
त्याने आजुबाजूला पाहिले, माळी आपले साहित्य ठेवून कुठेतरी गेला होता. शेखरने त्यातले प्रूनर आणले आणि ती बाईक पंक्चर करून पुन्हा ते प्रूनर होते तिथेच ठेवले आणि तो साळसूदपणे आपल्या रूममध्ये निघून गेला.
*****
नाश्ता झाल्यावर प्रिया आणि अश्विन बाहेर आले. पण अश्विनची बाईक पंक्चर आहे हे त्याच्या लक्षात आले.
" पियू, मी आलो तेंव्हा बाईक चांगली होती गं."
"इथे एखादा खिळा वैगरे घुसला असेल बहुतेक. "
"पण इथे तर सर्व ठीकच दिसतेय.... एकदम क्लीन आहे सर्व."
"काय झाले आशू?"रागिणी आली.
"माझी बाईक पंक्चर झाली. "
"एक काम कर. ही बाईक इथेच राहू दे मी मेकॅनिकला फोन करते तो बघेल काय ते. "रागिणी म्हणाली.
"हो आणि माझी बाईक घेऊन जा ...तुझे अर्जंट काम आहे ना." राहुल म्हणाला.
शेखर खिशात हात घालून मागे उभा होता. राहुलच्या वाक्याबरोबर तो मनातल्या मनात चिडला.
"या राहुलला राजा हरिश्चंद्र बनायची हुक्की आताच यायची होती?"
"मग ठीक आहे."
अश्विन म्हणाला.
अश्विन म्हणाला.
"थांब मी विशालला चावी घेऊन यायला सांगतो...राहुलने फोन अनलॉक केला आणि तो नंबर डायल करणार तितक्यात त्याला काहीतरी आठवले आणि तो म्हणाला,
"पण अश्विन...त्याच्या सीटचा थोडा प्रॉब्लेम आहे. "
"ओके..मग मी पियूला नाही नेत...पण मग मी गिफ्ट कसे सिलेक्ट करणार?"
"आशू तू मला फोनवर दाखव मग मी सांगेन."
प्रिया म्हणाली.
प्रिया म्हणाली.
"That's good. "
अश्विन खुश झाला .
काही वेळाने विशालने..राहुलच्या हाऊसहेल्प ने त्याला चावी आणून दिली.
काही वेळाने विशालने..राहुलच्या हाऊसहेल्प ने त्याला चावी आणून दिली.
"बाय आशू... संध्याकाळी वेळेवर पोहोच."
रागिणी म्हणाली.
रागिणी म्हणाली.
"Ofcourse."
अश्विन निघून गेला.
"हाश म्हणजे हा निदान प्रवासात आमच्या बरोबर नाही...नाहीतर तिथेही याने प्रियाला सोबत नेले असते. "
शेखरने सुटकेचा निःश्वास टाकला.
पण आता पुढचा प्रश्न होता
प्रियाला काय सांगून त्याच्याबरोबर कारने यायला
मनवायचे...
यासाठी राहुलला सर्व सांगणे गरजेचे होते.
पण आता पुढचा प्रश्न होता
प्रियाला काय सांगून त्याच्याबरोबर कारने यायला
मनवायचे...
यासाठी राहुलला सर्व सांगणे गरजेचे होते.
त्याने राहुलला मेसेज केला आणि त्याला त्याच्या खोलीत भेटायला सांगितले.
"याला काय झाले...हा माझ्या समोर उभा आहे आणि मला मेसेज करून आत का बोलावत आहे?"
राहुलला शंका वाटली.
राहुलला शंका वाटली.
शेखरने नजरेने त्याला काहीही न बोलण्याचा इशारा दिला.
****
"हां...आता बोल." शेखरच्या रुममध्ये शिरत राहुलने अधीरपणे विचारले.
शेखरने दरवाजा लावून घेतला.
"इतके कॉन्फिडेंशियल आहे का?"
"शु...जरा हळू बोल."
"यार तू सस्पेन्स वाढवू नको..लवकर काय ते बोल...माझी महामाया मला कधीही फोन करेल एकतर संध्याकाळी घालायचे कपडे मी ट्राय सुद्धा केले नाहीत त्यात काय गडबड झाली की ती माझे डोके खाईल."
राहुल वेगळ्याच टेन्शन मध्ये होता.
राहुल वेगळ्याच टेन्शन मध्ये होता.
"ऐक जरा
....प्रिया मला हवी आहे. "
....प्रिया मला हवी आहे. "
"ए तू काय बोलतोस...माझी बायको माझा जीव घेईल...तो गोष्टीतला राक्षस माहित आहे ना त्याचा जीव पोपटात अडकलेला असतो..तसा हिचा जीव तिच्यात अडकलेला आहे..."
"माझाही."
"शेखर...तुला हे शोभत नाही... मान्य आहे ती प्रिया खूप सुंदर आहे...कोणाच्याही मनात भरण्यासारखी आहे...पण म्हणून काय तू म्हणशील तसे मी नाही करणार बाबा. त्यापेक्षा मी इथून जातो."
"राहुल्या...जरा ऐकशील?"
शेखर चिडला.
शेखर चिडला.
"ऐकेन...पण तू ते प्रिया बद्दल काय उलट सुलट बोलू नकोस. आणि हे राहुल्या बिवल्या इथे बोललास ते ठीक आहे पण माझ्या बायकोसमोर बोलू नकोस...आधीच ती माझी इज्जत करत नाही. "
या ही परिस्थितीत शेखरला हसू आले.
"ऐक...प्रियावर माझे प्रेम आहे."
"शेखर...तू तर हाईट करत आहेस हा...तुझ्या लग्नाच्या बायकोला सोडून तू मिहिकाबरोबर इथे आलास...आय ॲम सॉरी पण हे बोलायला मला तू भाग पाडतो आहेस...आणि आता तिच्याशी..."
"माझ्या लग्नाच्या बायकोला घ्यायलाच इथे आलो आहे. "
"तिला तर तू मुंबईला सोडून आलास ना...ती इथे कशी?"
बोलताना राहुलच्या डोक्यात लखकन प्रकाश पडला नी त्याचे डोळे विस्फारले गेले.
बोलताना राहुलच्या डोक्यात लखकन प्रकाश पडला नी त्याचे डोळे विस्फारले गेले.
"प्रिया..." त्याच्या डोळ्यांत शांतपणे पाहत शेखर म्हणाला.
"व्हॉट द फ"
शेखरने त्याचे तोंड दाबले.
राहुल अजूनही शॉक मध्येच होता.
शेखरने त्याचे तोंड दाबले.
राहुल अजूनही शॉक मध्येच होता.
"ती माझी प्रिया आहे...माझी बायको."
राहुलचे डोळे अजून मोठे झाले.
राहुलचे डोळे अजून मोठे झाले.
****
क्रमशः
सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevourite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा