Login

प्रिया आज माझी भाग ५८

Lovestory
प्रिया आज माझी भाग ५८

डिसेंबर- जानेवारी 2025-26
दीर्घकथा लेखन स्पर्धा


"तिचा नवरा तू आहेस?"

"हो.

"मला तर रागिणीने सांगितले होते की तिचे लग्न झाले नाही. पण रागिणी अधूनमधून तिच्या दुसऱ्या एका मैत्रिणीबद्दल कायम बोलत असायची... तिचे नाव सांगायची नाही पण तिच्या नवऱ्याचा काय सॉलिड उद्धार करायची...म्हणायची इतकी सुंदर बायको त्याला मिळाली पण त्याला तिची कदर करता आली नाही...आणि हे ही म्हणायची की तिची ती मैत्रीण सुद्धा त्या मूर्ख माणसावर अजून प्रेम करते .
शेखर तुला सांगू...या जगात जितक्या सोफिस्टिकेटेड शिव्या आहेत त्या सर्व ती त्याला द्यायची.

ओह् माय गॉड म्हणजे रागिणी त्या सर्व शिव्या तुला द्यायची."

राहुलला जोरात हसू आले.

"बिनडोक...इनह्युमन....स्टुपिड... ब्रेनलेस, हार्टलेस्... यूजलेस, .....इमोशनलेस.... वर्थलेस... होपलेस...

माझ्या बायकोने तुझ्या नावे इतक्या लेस लावल्या आहेत ना
त्याची जर खरोखरच लेस केली ना तर अख्खी पृथ्वी सजवता येईल. "

हे बोलतानाही तो हसत होता. जास्त हसल्यामुळे त्याच्या डोळ्यांत पाणी जमा झाले होते.

"झाले....आता जरा शांत होऊन ऐकशील?"

"हो...हो..बोल."

डोळ्यांतले पाणी रुमालाने पुसून राहुल म्हणाला.

शेखरने त्याला सुरुवातीपासून सविस्तर सांगितले.

"ओह्... म्हणजे आता तुझे रुठे सनम को मनाना है. ठीक आहे...मला होईल तितकी सर्व मदत मी तुला करतो. "

"तुला फक्त आज प्रिया माझ्याबरोबर प्रवास कशी करेल तितके पहायचे आहे. रागिणी वहिनींना बहुतेक सर्व माहीत आहे...कारण त्या आल्यापासून मला रागीट लुक देत आहेत...तुला सर्व माहीत आहे हे तू त्यांना कळू देऊ नकोस..कारण मिहिकाला जर समजले की प्रिया हीच माझी बायको आहे तर ती कुठल्याही थराला जाऊ शकते..म्हणून तुला काही माहित नाही असेच वाग. "

"ओके बॉस...तू जसे म्हणशील तसे करेन.
अजूनपर्यंत मला वाटत होते की माझ्या बायकोला मनवणे टफ आहे पण प्रिया वहिनींनी या बाबतीत रागिणीला मागे टाकले...तुझा जॉब तर अजून टफ आहे.. मित्रा तुला ऑल द बेस्ट..."..

"थँक्स यार... आय नीड इट. "

"अँड सॉरी पण."

"ते कशाला..."

"माझ्या बायकोने तुला लेस लावल्या त्यासाठी."

शेखर नकारार्थी मान हलवत हसला.

*****

कार्यक्रम झाल्यावर सर्वजण तिथे रिसॉर्टवरच स्टे करणार होते. त्यामुळे सर्वांनी आपापले स्टे करण्यासाठी लागणारे सामान, कपडे सोबत घेतले होते. प्रिया, मिहिका, रागिणी आणि राहुल आपापले सामान घेऊन बाहेर आले.

मिहिकाला पाहताच तिचे ड्रायव्हर आणि बॉडीगार्ड तिच्या समोर आले.

"मॅडम, द्या मी बॅग कारमध्ये ठेवतो."
"तुम्ही यायची गरज नाही...मी शेखरबरोबर जाईन."

"नको मॅडम.. त्यांच्या गाडीचा थोडा प्रॉब्लेम आहे...उगाच कोणाला ठोकली बीकली तर त्यांच्याबरोबर तुम्हालाही पोलिस स्टेशनची हवा खायला लागेल."

पोलिस स्टेशनचे नाव काढल्याबरोबर... मिहिकाच्या डोळ्यासमोर तिच्या मग्रूरपणाबद्दल लेडी इन्स्पेक्टरने तिला मारलेली चपराक आठवली आणि तिचा हात लगेच आपल्या गालाकडे गेला.

"नको नको... डॅनियल..तू माझे लगेज गाडीत ठेव..मी तुमच्याबरोबरच येते. "

शेखर आपले लगेज घेऊन बाहेर आला. मिहिकाला तिच्या गाडीने जाताना पाहून तो भलताच खुश झाला. प्रियाने ते नोटीस केले.

"शेखर
बेबी तू आमच्याबरोबर चल ना."

"नको...मला माझी कार सर्व्हिसिंग करून आणायची आहे ...मी मागून येतो. "

मिहिकाची कार पुढे गेली.

रागिणीच्या ड्रायव्हरने त्यांचे सामान आत लोड केले.

"विशाल, प्रियाचे लगेच सुद्धा लोड कर."

"रागिणी...तुझ्या मैत्रिणीला शेखर घेऊन येईल ना...तसेही तो एकटाच आहे. "

"तिला असे त्यांच्याबरोबर कसे पाठवू..ती आपली गेस्ट आहे..."
रागिणीने पुन्हा गुश्यात पाहिले...शेखरने तिला नजरेनेच विनंती केली.

"रागिणी माझ्या मित्रावर विश्वास ठेव...तो खूप चांगला आहे...तुझ्या मैत्रिणीची तो चांगलीच काळजी घेईल. "

"पण त्यांची तर कार सर्व्हिसिंग करायची आहे ना...मघाशी मिहिकाला ते तसेच तर म्हणाले ना."

"फक्त हवा चेक करायची आहे इतकेच..आणि वहिनी आज तुमच्यासाठी स्पेशल डे आहे...तुम्ही दोघे एन्जॉय करा...मी तुमच्या मैत्रिणीला घेऊन येतोच आहे."
शेखर म्हणाला.

"प्रिया जर तयार असेल तरच मी तुमच्याबरोबर तिला पाठवेन.

पियू...तू काय म्हणत आहेस."

प्रिया थोडी गोंधळली...मनातून तिलाही शेखरबरोबर जायचे होते...पण तिच्या मनावर दडपण आले होते.

ती काही बोलत नाही असे पाहून रागिणी म्हणाली.

"विशाल, पियूचे लगेच सुद्धा लोड कर."

"नको..मी शेखर... यांच्याबरोबर जाते..तू जा जीजूंसोबत."

"नक्की ना पियू."

"अगं ती म्हणाली आहे ना जाते म्हणून तू आता कशाला परत परत विचारत राहतेस. तीन तासांचा तर प्रश्न आहे."

राहुलने तिचा हात पकडला आणि तिला कारमध्ये बसवले आणि शेखरकडे पाहून डोळे मिचकावले.

त्यांचीही कार निघून गेली. शेखरने तिच्यासाठी कारचा दरवाजा उघडला तशी ती आत बसली तो ही ड्रायव्हिंग सीटवर येऊन बसला.


क्रमशः

सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevourite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही.


0

🎭 Series Post

View all