प्रिया आज माझी भाग ५९
डिसेंबर- जानेवारी 2025-26
दीर्घकथा लेखन स्पर्धा
दीर्घकथा लेखन स्पर्धा
आज त्याचे मन बागडत होते. गेले सहा महिने शक्य होतं त्या सर्व ठिकाणी तिला शोधले. जवळपासची सर्व ऑफिस आणि कार्यालये धुंडाळून काढली. सोशल नेटवर्किंग साईडस पालथ्या घातल्या, पण पदरी निराशाच आली. समीरने शोधलेल्या त्या एका दुव्यामुळे नाशिक मध्ये आलो काय आणि आल्या आल्या तिची भेट झाली काय...सर्वच अगदी स्वप्नवत वाटत होते.
"ती आता या क्षणी रागावली आहे हे खरे पण जास्त काळ तीही माझ्यापासून दूर राहू शकणार नाही हे मला माहीत आहे. "
कार चालवताना त्याच्या मनात विचार आलें. मधूनच तिचा लोभस मुखडा पाहण्याचा मोहही होत होताच...आणि आज तो त्याच्या मनाचे सर्व हट्ट बिनदिक्कत पुरवत होता...तिची नजर जरी खिडकी बाहेर असली तरी तिच्या मनात त्याचेच विचार चालू असतील हे त्याला ठाऊक होते.
खिडकीतून बाहेर पाहणाऱ्या तिचा साइड फेस दिसत होता आणि तिच्या कुरळ्या केसांच्या बटा ते बघण्यात त्याला अडथळा आणीत होत्या.
पण असा कितीवेळ तो तिला अर्धेमुर्धे पाहणार होता...अशाने तीन तासाचा प्रवास नुसता पाहूनच संपेल.
"प्रिया..."
तिने त्याच्या एका हाकेबरोबर त्याच्याकडे पाहिले... उफ् अपेक्षा नव्हती केली त्याने!
हृदय टुणकन उडाले. त्याच्या चेहऱ्यावर हसू आले.
हृदय टुणकन उडाले. त्याच्या चेहऱ्यावर हसू आले.
"आशुची बाईक पंक्चर कोणी केली?"
तिच्या आवाजात नाराजी होती.
तिच्या आवाजात नाराजी होती.
"अब.. म... मी कशाला करू...मी नाही केली."
"म्हणजे तुम्हीच केली ना. का केलेत असे..गेल्या तीन वर्षात पैसे साठवून त्याने आपले स्वप्न पूर्ण केले होते..."
तिने चोर पकडला होता.
तिने चोर पकडला होता.
"त्या बाईकवरून तो तुला बाहेर नेणार होता...माझ्यापासून लांब...म्हणून."
"तो माझा फक्त मित्र आहे"
"म्हणूनच.."
तिच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह होते.
"तो तुझा मित्र आहे आणि मी नाही म्हणून...म्हणून मी असे केले. "
तिने आपली मान पुन्हा बाहेर वळविली.
"प्रिया...मी त्याची नुकसानभरपाई करून देईन... त्याला सॉरी सुद्धा म्हणेन. तू जे सांगशील ते करेन फक्त तू माझ्यावर विश्वास ठेव."
"शेखर प्लीज...मला या टॉपिकवर नाही बोलायचे आहे. "
"ओके...मी म्हटले ना.
तुला नाही आवडत तर नाही बोलणार. "
तुला नाही आवडत तर नाही बोलणार. "
ती काहीच बोलली नाही पण गंभीर चेहऱ्याने समोर पाहू लागली.
"प्रिया...माझ्याशी मैत्री करशील"
तिने चमकून त्याच्याकडे पाहिले.
तिने चमकून त्याच्याकडे पाहिले.
"आश्चर्य वाटले...पण बघ ना आपण एकमेकांना भेटलो ते अनोळख्यासारखे... ना तुला माझा स्वभाव माहीत होता, ना मला तुझा...काहीच माहीत नव्हते...तुला काय आवडते काय नाही आवडत..."
"मला तुमच्याबद्दल प्रत्येक गोष्ट ठाऊक आहे..."
ती त्याच्या डोळ्यांत पाहत पटकन बोलली आणि तिने पुन्हा खिडकीच्या बाहेर तोंड वळवले.
ती त्याच्या डोळ्यांत पाहत पटकन बोलली आणि तिने पुन्हा खिडकीच्या बाहेर तोंड वळवले.
प्रिया... मला तुला जाणून घ्यायचे आहे... आपल्यात काय नाते आहे ...आपल्यातले मनमुटाव सर्व विसरून जाऊया
आणि निदान या तीन तासांच्या प्रवासादरम्यान आपण दोन मित्र जसे वागतात तसे वागूया का..."
आणि निदान या तीन तासांच्या प्रवासादरम्यान आपण दोन मित्र जसे वागतात तसे वागूया का..."
त्यानं स्टिअरिंग व्हील वरचा आपला उजवा हात हँडशेक साठी तिच्या पुढे केला
..आणि तितक्या समोर एक बस आली...तिने सावध होऊन स्टिअरिंग सांभाळले..."
..आणि तितक्या समोर एक बस आली...तिने सावध होऊन स्टिअरिंग सांभाळले..."
"शेखर...काय करीत होतात..."
"तुझ्याशी मैत्री!!!!
थोडी कठीणच आहे नाही. "
थोडी कठीणच आहे नाही. "
त्याचा हात अजूनही हँडशेक साठी तिच्या समोरच होता तिने गोड हसून त्याला शेख हॅण्ड केले.
"थँक्यू. आता आपण फ्रेंड झालोच आहोत तर आपल्या फ्रेंडशिपच्या नावे एक कॉफी होऊन जाऊ दे.."
त्याने नाश्ता केला नाही हे तिला माहीत होते.
"चालेल." ती म्हणाली.
शेखरने हॉटेल समाधान येथे आपली कार थांबवली.
वेटर त्यांच्याजवळ ऑर्डर घेण्यासाठी आला.
"प्रिया...तुला काय मागवायचे असेल तर मागव. मी माझ्यासाठी एक कॉफी सांगतो"
"एक ग्रील सँडविच विधाउट चिझ आणि एक कॉफी."
वेटर निघून गेला.
"तुला अनंताची फुले इतकी आवडतात!!!!"
"हो. खूप आवडतात. "
"आईबाबांचे अँक्सिडेंट झाले तेंव्हा मी लहानच होते....नऊ दहा वर्षांची असेन मी..अभ्यास करण्यात... मामीला मदत करण्यात दिवस निघून जायचा...पण रात्र आली की आईबाबांची खूप आठवण यायची.
..... मग मावशीच्या मांडीवर डोके ठेवून मी झोपायचे.
..... मग मावशीच्या मांडीवर डोके ठेवून मी झोपायचे.
मे महिन्याच्या सुट्टीत मी मामा मामी आणि त्यांच्या मुलांबरोबर सोलापूरला जायचे. मावशीचे ऑफिस असायचे म्हणून ती यायची नसे.तिथे मामांच्या घराजवळच अनंताचे सहा सात फुटाचे भरपूर फांद्या असणारे झाड होते...आमच्या घराच्या भोवती त्याच्या फुलांचा सडा पडलेला असायचा. मी ती सर्व फुले वेचून एका कापडाच्या पिशवीत भरायचे आणि झोपताना माझ्या उशाजवळ ठेवायचे. त्या फुलांच्या सुगंधात मला रात्री खूप शांत झोप यायची. असे वाटायचे आपलेच कुणी सोबतीला आहे. "
हे सांगताना तिचे डोळे भरून आले होते.
क्रमशः
सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevourite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा