Login

प्रिया आज माझी भाग ६०

Lovestory
प्रिया आज माझी भाग ६०

डिसेंबर- जानेवारी 2025-26
दीर्घकथा लेखन स्पर्धा


तिच्या भरल्या स्वरांनी त्याला सांगितले होते...तिने किती सोसले आहे ते! त्याला वाटले तिला मिठीत घेऊन तिचे सर्वच दुःख इथल्या इथे संपवून टाकू...पण त्याने स्वतःला रोखले.

"नंतर मामानी सोलापूरला जाणे सोडले.... आणि ते झाडही माझ्यापासून दुरावले. त्याच्या स्मृती आजही माझ्या आठवणीत दरवळतात. "

ती आपल्या भूतकाळात हरवली होती.

"मॅडम, तुमचे सँडविच
"
"ती कॉफी मला द्या आणि ते सँडविच सराना. "

"माझ्यासाठी?"

"हो...तुम्ही नाश्ता कुठे केलात?"

"इतके नोटीस करतेस मला?"

तिचे डोळे भिरभिरले.

"खाऊन घ्या...नाहीतर तुम्हाला ऍसिडिटी होते."

"हो..
तू सांगशील ते सर्व करेन हे मघाशी मी म्हटले होते...मग खाल्लेच पाहिजे. आपला हुकूम सर आँखो पर. "

ती लाजली असे वाटले त्याला ...तिचे गाल थरथरताना पाहिले त्याने.
भूक तर लागलीच होती.
पण तिच्या सोबतीत आपण नाश्ता केला नाही हे तो विसरूनच गेला होता....त्याने भुकेच्या लाटेबरोबर ते सँडविच संपवले.

ती मात्र इकडे तिकडे पाहत कॉफी थंड व्हायची वाट पाहत होती.

तिच्याकडे पाहतच तो पाणी पित होता..जणू त्याला तिला क्षणभरासाठीही नजरेपासून दूर करायचे नव्हते...त्याच्या या एकटक पाहण्याने तिच्या जीवाचे मात्र हाल होत होते.
आणि त्याला ठसका लागलाच. तिने चटकन उठून त्याच्या पाठीवरून हात फिरविला.

"इतकी काय घाई आहे...जरा हळू प्यायचे ना.."
ठसका त्याला लागला होता आणि कासावीस ती झाली होती. तिच्या बोटांच्या मऊ मुलायम स्पर्शाने त्याचे अंग शहारले....पुन्हा वाटले ... अवतीभोवतीचे जग विसरून तिला मिठीत घ्यावे . पण याही वेळेस त्याने स्वतःवर आवर घातला.

"आय ॲम ओके...तू कॉफी पी."
रुमालाने तोंड पुसत तो म्हणाला.


कॉफीचा एक सिप पिऊन तिने मग खाली ठेवला. तिने ज्या बाजूने मगला तोंड लावलेले होते ती बाजू स्वतःकडे करीत
त्याने तो मग आपल्या तोंडाला लावला.....ती डोळे विस्फारून पाहतच राहिली.

"ओह्...खूप टेस्टी आहे. "

तिच्याकडं बघण्याचे टाळून तो म्हणाला आणि तिथून उठला.

"प्रिया तू पाहिजे तर दुसरी कॉफी मागव...कारण आता मी ती उष्ठवली आहे ना. मी जरा येतोच. "

तो उठला आणि थोडे पुढे गेला आणि तिने तो कॉफीचा मग पुन्हा आपल्या तोंडाला लावला...त्यानं पाहिले ....त्याच्या चेहऱ्यावर मंद स्मित आले.

तो रेस्टॉरंटच्या बाहेर तिथल्या गावकऱ्यांशी बोलत होता आणि काचेच्या पारदर्शक भिंतीआडून ती त्याला पाहत होती. त्याच्या बाजूने आत येणाऱ्या तरुण मुली त्याच्याकडे पाहत आत येत होत्या...आत आल्यावरही त्या पुन्हा पुन्हा त्यालाच वळून पाहत होत्या....दिसतच होता इतका छान... प्लेन व्हाईट रंगाचे शर्ट...ग्रे ट्राउझर...त्याच्या गोऱ्या रंगाला अजूनच खुलवत होते.

हा हायफाय..कॉर्पोरेट पर्सनलिटीचा हँडसम...खरोखरच माझ्यावर प्रेम करू लागला आहे का?
तिला प्रश्न पडला.

बोलून झाल्यावर त्याने मॅनेजरला सांगून तिथे उभ्या असणाऱ्या सर्व गावकऱ्यांना आईसक्रीम दिले ...त्या मोकळ्या मनाच्या कष्टकऱ्यांनी ते घेण्यास नकार दिला पण शेखरने त्यांना मनवलेच आणि हॉटेलचे बिल चुकते करून वेटरला टिप सुद्धा दिली.

त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद तिने पाहिला.


"हे त्या गावकऱ्यांबरोबर नेमके काय बोलत होते? "
तिला प्रश्न पडला.

गाडीत बसल्यावर त्याने GPS वर कुठला तरी ॲड्रेस टाकला...तो त्यांच्या व्हेन्युचा तर नक्कीच नव्हता.

"शेखर...तुम्ही चुकून दुसरा ॲड्रेस टाकला का?
रिसॉर्टचे नाव नील पॅरडाईस असे आहे.

"हो आपल्याला तिथेच जायचे आहे.
पण मी रूट जरा बदलला आहे. आपण मुख्य रस्त्यावरून न जाता गावातून जाणार आहोत. तुझ्यासाठी ऑरगॅनिक रूट शोधलाय."

"म्हणजे इतका वेळ ते त्या गावकऱ्यांबरोबर हे बोलत होते तर. ..आणि त्यासाठी दोन हजार रुपयांचे आइस्क्रीम आणि पाचशे रूपये टिपही दिली."
त्याच्या वेडेपणावर ती मनातच हसली.

गावातला रस्ता तसा अरुंदच होता. रस्त्याच्या बाजूला दुतर्फा लावलेली फुला फळांची झाडे... त्यावर मधूनच चढलेल्या वेली, रस्त्यावरून आजुबाजूला पळत जाणारी कोंबडीची पिल्ले....आणि गळ्यात घुंगरू बांधलेल्या गाई वासरे...आणि नव्या कोऱ्या गाडीमागून धावणारी लहान लहान मुले...आजुबाजूला पाहताना प्रियाला खरोखरच मजा वाटली.
तिने आनंदून त्याच्याकडे पाहिले पण त्याचे लक्ष या कशाकडेही नव्हते...तो काहीतरी शोधत चालला होता.

पुढे एका ठिकाणी त्याने गाडी थांबवली आणि एका विशिष्ट घराची चौकशी केली...ते घर उजवीकडे पुढे आहे असे त्याला समजले.

शेखरचा gps डेस्टिनेशन दाखवत होता.
प्रियाला अचंबा वाटला. छानशी रंगरंगोटी केलेले ते बंद घर गावात मध्यभागी होते. तरी आजुबाजूला फारशी वस्ती नव्हती. शेखरने गाडी पार्क केली.

"आपण इथे का आलो आहोत?"

तो बाहेर आला आणि त्याने तिच्या बाजूचा दरवाजा बाहेरून खोलला.

"ये...तुला काहीतरी दाखवायचे आहे. "
ती बाहेर आली.

"तुमच्या ओळखीचे इथे कुणी राहते का?"

"नाही...तुझ्या ओळखीचे आहे .."

"माझ्या?"

"हो..पण त्यासाठी तुला डोळे बंद करावे लागतील."

त्याने तिच्या डोळ्यांवर आपला रुमाल बांधला आणि तिचा हात धरून त्याने तिला एका विशिष्ट ठिकाणी आणले आणि हात सोडला.

"हां...आता डोळ्यावरची पट्टी काढ. "

तिने डोळ्यांवर बांधलेला रुमाल बाजूला केला आणि दुसऱ्याच क्षणी तिच्या अंगावर अनंताच्या फुलांची बरसात झाली...तिने जमिनीवर पाहिले व आनंदून त्यातली काही फुले हातात घेतली आणि वर पाहिले... अनंताचे झाड होते ते!!
झाडाजवळ उभ्या असलेल्या शेखरकडे तिने पाहिले आणि तिच्या डोळ्यांत आनंदाश्रु आले.


क्रमशः


सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevourite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही.