Login

प्रिया आज माझी भाग ६२

Lovestory
प्रिया आज माझी भाग ६२

डिसेंबर- जानेवारी 2025-26
दीर्घकथा लेखन स्पर्धा


त्याने तिला अलगद बेडवर ठेवले. लगेजवर ठेवलेला फर्स्ट एड बॉक्स घेऊन तो तिच्याशेजारी बसला.

"शेखर, या स्टाफला मिस्टर अँड मिसेस परांजपे नावाने बुकिंग करायला कोणी सांगितले?"

त्याने फर्स्ट एड बॉक्स खोलला आणि त्यातून कापूस बाहेर काढून त्यावर अँटीसेप्टिक लोशन घेतले.

"प्रिया ...आपण आहोत ना मिस्टर अँड मिसेस परांजपे. म्हणून रुम आपल्याच नावाने बुक आहे..."

"मी रागिणीलाच विचारते.
आपला फोन घेण्यासाठी ती आपल्या बेडवरून उठणारच होती इतक्यात त्याने तिला खांद्याला धरून तिथेच थांबवले.


"तुझ्या मैत्रिणीला जसे माहित आहे ना की मी तुझा नवरा आहे तसे माझ्या मित्राला सुद्धा माहीत आहे की तू माझी बायको आहेस. आता थोडी शांत बस. तुला लागले आहे मला जखम पाहू दे. "

त्याने तिची सलवार पायापासून वर सरकवली...पण तिने आपला पाय लगेचच वर ओढून घेतला.


"मी ..मी स्वतः लावते"

पण त्याने तिच्याकडे दुर्लक्ष केले आणि तिचा पाय पुन्हा सरळ केला व पुन्हा तिचा सलवार वर केला.
पायाच्या घोट्याजवळ थोडे खरचटले होते. त्याने तिथली जखम साफ केली आणि अँटिसेप्टिक क्रीम लावले.
तिला थोडे चुरचुरले तसे तिने डोळे गच्च मिटले.
एखाद्या लहान मुलासारखी निरागस वाटत होती ती.
तिच्याकडे पाहताना त्याच्या ओठांच्या कडा रुंदावल्या.
तिचा सलवार तो पुन्हा सरळ करायला जातच होता इतक्यात त्याचे लक्ष तिच्या गोऱ्या पायावरच्या काळसर डागाकडे गेले.

खूप जुना चटक्याचा डाग होता तो.

त्याने तिचा सलवार थोडा वर केला आणि त्या जखमेवरून अलगद हात फिरविला.

"कुणी केले हे?"

त्याच्या डोळ्यांत चिड होती.
जुन्या गोष्टी आठवल्यामुळे तिचेही डोळे भरले.
पण ती काही बोलली नाही..फक्त मुक्याने त्याच्याकडे पाहत राहिली. ती न बोलताच त्याला सर्व समजले.

"तुझ्या मामींनी केले ना?"

तिचे डोळे भळभळून वाहू लागले.

या जखमेबद्दल ती कधीच कुणाला बोलली नव्हती.

त्याने तिचा पाय आपल्या मांडीवर घेतला.

"का केले त्यांनी असे...तुला चटका देताना त्यांना काहीच कसे वाटले नाही?"
त्याचे हृदय रडत होते.


"त्यावेळेस मी अकरा वर्षांची होते. मावशी कामानिमित्त नागपूरला गेली होती.. माझ्या परीक्षेचे दिवस होते...अभ्यासात गुंतलेले असले की मला सगळ्या गोष्टींचा विसर पडायचा. मामांच्या ऑफिसमधल्या कुणाचे तरी लग्न होते...लग्न आटोपल्यावर रात्री ते सर्व जेवायला परत येणार होते...अभ्यासाच्या नादात त्यांच्यासाठी जेवण बनवायचे आहे ही गोष्ट मी पार विसरून गेले.
शिक्षा म्हणून मामींनी गरम पळीत्याचा चटका दिला. "


"त्यांच्या मुलीला सुद्धा त्या अशीच वागणूक द्यायच्या का?"
शेखरला त्यांचा खूप राग आला होता.

"याची शिक्षा त्यांना मिळालीच पाहिजे. "
तो म्हणाला .

"प्रिया मी जरा बाहेर जाऊन येतोच...मला एक महत्त्वाचा कॉल करायचा आहे. "
******


दुपारी त्या दोघांनी रुममध्ये जेवणे पसंत केले.

थकल्यामुळे ती दोघेही थोडावेळ झोपली. पण तो तिच्याबाजूला न झोपता सोफ्यावरच झोपला. तिला आवडणार नाही असे त्याला काहीही करायचे नव्हते.

""**

संध्याकाळच्या पार्टीसाठी तयार व्हायचे होते म्हणून प्रिया आपल्या बॅगेतला ड्रेस बाहेर काढू लागली तितक्यात त्याने तिच्यासमोर दुपारी घेतलेल्या ड्रेसची बॅग धरली.

"हे तुझ्यासाठी."

त्याने पहिल्यांदाच तिच्यासाठी ड्रेस घेतला होता...त्यापेक्षा तो ड्रेस त्याने तिच्यासाठी घेतला होता हे तिला जास्त आवडले आणि तिचा चेहरा खुलला.
******


रिसॉर्टच्या लांबलचक कम्युनिटी हॉलमध्ये पार्टी आयोजित करण्यात आली होती. सगळ्या प्रकारचे ड्रिंक ठेवण्यात आले होते. रागिणी आणि राहुल वेस्टर्न आऊटफिट मध्ये खूपच छान दिसत होते. मिहिका मात्र संपूर्ण हॉलमध्ये फिरून फिरून हॉलमध्ये शेखरलाच शोधित होती.
आणि आणि आणि

शेखर आणि प्रिया एकत्रित पार्टीत आले ते पाहून मिहिकाचे डोळे मोठे झाले. तिच्या मनात जी शंका होती ती खरी होती
ही प्रिया तीच होती... शेखरची बायको.
तिच्या अंगाची लाही काही झाली. ती रागाने बाहेर निघून गेली आणि काही वेळाने परत देखील आली.

"शेखर अँड मिसेस शेखर... ग्लॅड टू मिट यू."
त्या दोघांना पाहून शेखरचे जुने मित्र मैत्रिणी पुढे येऊन त्यांना ग्रीट करीत होते.

राहुल आणि रागिणीने त्या दोघांना एकत्र पाहिले आणि ती दोघेही त्यांच्याजवळ आली.

"तुम्हा दोघांना असे एकत्र पाहून खूप बरे वाटत आहे. "
राहुल म्हणाला. एव्हाना त्याने रागिणीला शेखरची बाजू नीट समजावून सांगितली होती त्यामुळे ती थोडी शांत होती.
तरीही तिला प्रियाकडून या गोष्टीची हमी घ्यायची होती.

"पियू...तू ठीक आहेस ना?"
रागिणीने प्रियाला एक बाजूला नेले.
पण शेखरचा जीव मात्र कासावीस झाला.

"राहुल...गाडी जरा रुळावर येत आहे..तू जरा वहिनींना समजव..."

"तिला काय समजव...पहिला मला सांग...तुझ्या प्रेमाचा जो त्रिकोण झाला आहे त्याचा तिढा कसा सोडणार आहेस... मिहिकाचे काय?"

"राहुल...लग्न तर मी तिच्याशीच करत होतो..पण ऐन लग्नाच्या दिवशी ती फॉरेनला गेली आणि माझे लग्न प्रियाशी झाले. मला ते अजिबात मान्य नव्हते म्हणून मी लग्नाच्या रात्रीच तिला घटस्फोटाचे पेपर दिले..पण तिच्या सोबतीत हळू हळू मला ती आवडू लागली....आणि मिहिकाचे तकलादू प्रेम आणि तिचे खरे प्रेम यातला फरक अधिक ठळक झाला...

पण लग्नाच्या पहिल्या रात्री आमच्यात जे बोलणे झाले होते ते प्रियाने मनावर घेतले होते नि ती घर सोडून इथे आली....आणि पुढचे तर तुला ठाऊक आहेच ना..."


"ऑल द बेस्ट यार पण मिहिका पासून सांभाळून ...ती काहीही करू शकते... कॉलेजमधले आठवतेय ना...आपले मार्केटिंगचे प्राध्यापक गिरीश मेहता तिला ओरडले म्हणून त्यांना आपली वट चालवून सस्पेंड करायला लागले होते तिने...."

"हो..त्याचीच तर काळजी वाटत आहे. म्हणून इतके दिवस तिला काही कळू दिले नाही पण आता मात्र सावध राहायला पाहिजे."

***

इकडे रागिणी आणि प्रिया बोलत होत्या तेव्हा शेखरच्या जुन्या वर्ग मैत्रिणी त्याच्याबद्दलच बोलत होत्या.

"ए शेखरने लग्न केले ते पण कुणा दुसरशीच
.. मिहिकाशी नाही...याचे आश्चर्य नाही वाटत तुला?"

"नाही...खरेतर शेखर सारख्या चांगल्या मुलाला ती मुलगी योग्यच नव्हती... एकदम घमेंडी मुलगी आहे ती. "

"या उलट शेखर...एकदम आयडियल मॅन...त्या दोघांमध्ये रिलेशन होते तरी कधी त्याने तिला स्पर्शही केला नव्हता. "

"हे तुला कसे माहित?"

"अगं एकदा ही मिहिकाच बोलत होती...आपली सेंड ऑफ पार्टी होती त्या दिवशी ती भरपूर प्यालेली होती....आता पण बघ ती पितच आहे...(वाइनचे ग्लास तोंडाला लावलेल्या मिहिकाकडे त्या पाहू लागल्या) ...
त्यात ती शेखरला बोलत होती...तू कसा बॉयफ्रेंड आहेस...साधा टच पण करू देत नाहीस..."

"हो चांगलेच आठवते तिने किती तमाशा केला होता."


रागिणीने प्रियाला बाजूला घेतले.

"प्रिया...त्या जे काही बोलल्या ते ऐकलेस का?
याचा अर्थ मिहिका जे तुला बोलली ते सर्व खोटे बोलली.

"आणि मी तिच्यावर विश्वास ठेवला. मी शेखरना चुकीचे समजले..."

दूर उभ्या असलेल्या शेखरकडे पाहत ती म्हणाली.

क्रमशः


सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevourite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही.


0

🎭 Series Post

View all