प्रिया आज माझी भाग ६३
डिसेंबर- जानेवारी 2025-26
दीर्घकथा लेखन स्पर्धा
दीर्घकथा लेखन स्पर्धा
"देर आए दुरुस्त आये."
"तुम्ही दोघी माझ्याबद्दल बोलत आहात का?"
अश्विन त्यांच्याजवळ येत म्हणाला.
त्याला पाहून शेखरचा जीव खालीवर झाला. आपल्या मित्रांशी बोलताना त्याचे पूर्ण लक्ष त्या तिघांकडे होते.
"आशू तू केव्हा आलास?"रागिणीने विचारले.
"हा काय आताच आलो. मला तुम्हा दोघींना एक सरप्राइज द्यायचे आहे. "
"काय?"
प्रियाने उत्सुकतेने विचारले.
प्रियाने उत्सुकतेने विचारले.
"आरोही..."
त्याने हाक मारताच एक सुंदर तरुणी पुढे आली.
त्याने हाक मारताच एक सुंदर तरुणी पुढे आली.
"मिट माय फियान्सी आरोही . सकाळी गिफ्ट घ्यायचे होते असे म्हणालो होतो ना...ते हिच्यासाठीच."
"ओह् व्हॉट अ प्लिझन्स्ट सरप्राइज. थांब मी राहुल आणि शेखरला बोलावते."रागिणी म्हणाली.
तिने राहुलला इशारा करून शेखरलाही सोबत घेऊन यायला सांगितले.
रागिणीने अश्विनच्या गर्लफ्रेंड ची ओळख करून दिली.
"ही आशू ची होणारी बायको... आरोही ...."
हे ऐकताच शेखरला जास्त आनंद झाला.
हे ऐकताच शेखरला जास्त आनंद झाला.
"हॅलो."
दोघांनीही तिला ग्रीट केले.
दोघांनीही तिला ग्रीट केले.
"आणि आशू...हा शेखरचा मित्र..."
"हो सकाळी ओळख झाली आमची."
रागिणीला पूर्ण बोलू न देता अश्विन म्हणाला.
रागिणीला पूर्ण बोलू न देता अश्विन म्हणाला.
"पूर्ण ऐकतर ... हे राहुलचे बेस्ट फ्रेंड आणि पियूचे मिस्टर...शेखर परांजपे."
"व्हॉट...हे खरे सरप्राइज होते."
अश्विन प्रियासाठी खुश झाला होता.
अश्विन प्रियासाठी खुश झाला होता.
"पियू...तुमच्या दोघांत खरोखरच पॅचअप झाले हे ऐकून खूप बरे वाटले.
मिस्टर शेखर माझ्या बेस्ट फ्रेंडला कायम हॅप्पी ठेवा. "
मिस्टर शेखर माझ्या बेस्ट फ्रेंडला कायम हॅप्पी ठेवा. "
"जसा मी रागिणीला ठेवतो..."
राहुल म्हणाला.
राहुल म्हणाला.
"हो...मोठे आले...."
रागिणी.
रागिणी.
"मोठे आले काय...हे रिसॉर्ट... हे अँनिवर्सरी सेलिब्रेशन..तुझ्यासाठीच करत आहे ना..."
अश्विन आणि आरोही च्या ओळखीचे काहीजण त्यांना भेटले तसे ती दोघं सर्वांचा निरोप घेऊन तिथून निघून गेली...आता तिथे प्रिया रागिणी राहुल आणि शेखरच होते.
"प्रिया... सॉरी आता प्रिया वहिनी म्हटले पाहिजे ना.."
राहुल.
राहुल.
"तुम्ही प्रियाच म्हणा..."
"चालेल ना.."
राहुलने शेखरकडे पाहत विचारले तसे शेखरने त्याच्या पाठीवर मस्करीने थोपटले.
राहुलने शेखरकडे पाहत विचारले तसे शेखरने त्याच्या पाठीवर मस्करीने थोपटले.
"चल आता तुझ्या नवऱ्याकडून तुला प्रिया म्हणायची परमिशन घेतली आहे ...आता सांग मी बेस्ट हजबंड आहे की नाही?"
"हो जीजू...तुम्ही एकदम बेस्ट हजबंड आहात."
"हा...घे तू त्यांचीच बाजू घे..."
लटक्या रागाने रागिणी म्हणाली.
लटक्या रागाने रागिणी म्हणाली.
"ती घेणारच माझी बाजू ....तिला आणि शेखरला इथे एकत्र कोणी आणले...
मी!!!"
राहुल आपल्या शर्टची कॉलर वर करून म्हणाला.
मी!!!"
राहुल आपल्या शर्टची कॉलर वर करून म्हणाला.
"म्हणजे तसे आम्ही अजून एकत्र येण्याचे बाकी आहोत. "
प्रियाकडे पाहत शेखर म्हणाला आणि तिला कुठे तोंड लपवू असे झाले.
प्रियाकडे पाहत शेखर म्हणाला आणि तिला कुठे तोंड लपवू असे झाले.
इतक्यात पार्टी ऑर्गनायझरने रागिणी आणि राहुलला स्टेजवर बोलावले तसे ते दोघेही पोडियमवर गेले आणि केक कटिंगला सुरुवात झाली.
"तुम्ही असे त्यांच्या समोर काहीही कसे बोललात?"
"काहीही कुठे?...जे खरे आहे तेच तर बोललो...आपले अजून सर्व बाकी आहे ना.."
केवळ तिलाच ऐकू जाईल इतक्या हळू आवाजात तो तिच्याजवळ झुकत बोलला आणि इतक्या गर्दीतही त्याने तिला आपल्या जवळ ओढून घेतले.
केवळ तिलाच ऐकू जाईल इतक्या हळू आवाजात तो तिच्याजवळ झुकत बोलला आणि इतक्या गर्दीतही त्याने तिला आपल्या जवळ ओढून घेतले.
"शेखर...सगळे बघतील."
"सर्वांचे लक्ष केक कटिंगकडे आहे."
तिने आजुबाजूला पाहिले तर खरंच सगळ्यांचे लक्ष केक कटिंगकडे होते.
केक कट करून झाला होता . लाईट ऑफ होऊन ... सॉफ्ट लाईटमध्ये रोमँटिक साँग सुरू झाले आणि सर्व कपल्स आपापल्या पार्टनर सोबत नाचू लागले.
केक कट करून झाला होता . लाईट ऑफ होऊन ... सॉफ्ट लाईटमध्ये रोमँटिक साँग सुरू झाले आणि सर्व कपल्स आपापल्या पार्टनर सोबत नाचू लागले.
ओ माही.. ओ माही.. ओ माही ओ माही
ले मे कयामत तक हुआ तेरा.
ले मे कयामत तक हुआ तेरा.
ती आधीपासूनच त्याच्या मिठीत होतीच ..पण आता त्यांच्या भावनांच्या आवेगाला वातावरणाची आणि मंद संगीताची साथ मिळाली..आणि आधीच प्रेमात बुडालेल्या त्या युगुलाला एकमेकांच्या डोळ्यांत हरवायला वेळ लागला नाही...त्यांच्यासाठी जणू आजुबाजूच्या जगाचे अस्तित्वच संपले होते...
"शेखर परांजपे.... मस्त खेळ खेळलास....प्रेम माझ्याशी केलेस आणि लग्न त्या गावंढळ मुलीबरोबर...माझ्या पायातल्या नखाचीही बरोबरी करू शकणार नाही तुझी ती सो कॉल्ड लो क्लास बायको...."
सर्व जण स्तब्ध झाले...
मिहिका नशेच्या अमलाखाली माईकवर बोलत होती...
मिहिका नशेच्या अमलाखाली माईकवर बोलत होती...
"ती क्लासलेस अग्ली गर्ल तुला माझ्यापेक्षा ब्युटीफुल वाटते का...आता तिला मिठीत घेऊन कसा नाचत आहेस...मला तर साधा किसही केला नाहीस...आणि तिला ओढून ओढून...
शेखरने तिच्या हातातून माइक ओढून घेतला.
ती धडपडत होती म्हणून एका हाताने तिला धरले.
ती धडपडत होती म्हणून एका हाताने तिला धरले.
"मिहिका...काय बोलत आहेस...तुला भान नाही..."
"मला भान नाही असे बोलत आहेस...आता बघ तुझे भान कसे जाईल जेव्हा.... मिहिकाला उचकी लागली...
हिकss....
हिकss
जेव्हा .... हिकss...
तुला समजेल की तुझी बायको गायब आहे...मला माझे प्रेम मिळाले नाही तर तुला तुझे प्रेमही भेटणार नाही...
हिकss..."
हिकss....
हिकss
जेव्हा .... हिकss...
तुला समजेल की तुझी बायको गायब आहे...मला माझे प्रेम मिळाले नाही तर तुला तुझे प्रेमही भेटणार नाही...
हिकss..."
ऐकल्याबरोबर त्याचा जीव खालीवर झाला आणि त्याने मिहिकाला आधार दिलेला हात काढला तशी ती जमिनीवर पडली...पण तिथे पडूनही ती मोठ्याने हसू लागली..
"उशीर केला आहेस मिस्टर परांजपे...तुझी बायको तुला कधीच भेटणार नाही.... हिकss."
क्रमशः
सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevourite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही.
