प्रिया आज माझी भाग ६५ अंतिम भाग
डिसेंबर- जानेवारी 2025-26
दीर्घकथा लेखन स्पर्धा
दीर्घकथा लेखन स्पर्धा
दुसऱ्या दिवशी सकाळी प्रिया आणि शेखर अश्विनला भेटायला हॉस्पिटलमध्ये गेले.
अश्विनचा डावा हात गळ्यात अडकवलेला होता. त्याच्या मोबाईलवर मंद आवाजात गाणे सुरू होते...
"ओ साथी रे , तेरे बिना भी क्या जीना
तेरे बिना भी क्या जीना."
प्रियाने सोबत आणलेला पिवळ्या रंगाच्या ट्युलिप फुलांचा गुच्छ त्याच्या बाजूच्या साईड टेबलवर ठेवला.
त्यांना पाहताच त्याने आपला मोबाईल बाजूला ठेवला.
शेखरने त्याला हँडशेक केले.
"आशू..कसा आहेस तू?"
प्रियाने विचारले.
प्रियाने विचारले.
"एकदम फाईन
तुला ठीक बघून अजून फाईन झालो. "
तुला ठीक बघून अजून फाईन झालो. "
"आशू, मी आयुष्यभर तुझी ऋणी राहीन...तुझ्यामुळे शेख..."
"पियू...तू कधीपासून अशा फॉर्मलिटीस करायला लागलीस...एवढे मी काहीही केले नाही हा. "
"हा तुझ्या मनाचा मोठेपणा म्हणून तू असे बोलत आहेस... स्वतःच्या जीवाची पर्वा न करता तू यांची मदत केलीस ."
"तुझे शेखरवर किती प्रेम आहे हे माझ्यापेक्षा अजून जास्त कोणाला माहीत असणार.."
काहीसे गंभीर होत व नंतर पुन्हा नॉर्मल होत तो पुढे म्हणाला,
"शेखर, जेव्हापासून तिच्याकडे तुमचा फोटो आला आहे ना तेंव्हापासून तुमचेच गीत गात असायची . तुमचे फेशियल फिचर्स मला इतके तोंडपाठ आहेत की मी डोळे झाकून तुमचे चित्र काढू शकेन. "
"हे मी नवीनच ऐकत आहे."
प्रियाकडे पाहत शेखर म्हणाला.
प्रियाकडे पाहत शेखर म्हणाला.
"आशू..तू जास्त बोललास ना तर ज्या हाताला लागले आहे ना त्या हातालाच फटका मारेन. "
प्रिया लटक्या रागाने म्हणाली.
प्रिया लटक्या रागाने म्हणाली.
"आता तुला जे काही माऱ्यामाऱ्या करायच्या आहेत ना त्या मिस्टर परांजपेनबरोबर कर..."
"सिरीयसली हिला राग आला ना की हिचा हात खूप चालतो...तुम्ही हवे तर रागा...आय मीन रागिणीला विचारा.
शेखरकडे पाहून अश्विन म्हणाला.
"आता लवकर बरा हो...आरोहिला शिकवून ठेवेन मग ती तुला चांगलीच वठणीवर आणेल."
प्रिया म्हणाली.
प्रिया म्हणाली.
"तुझी तिची गाठभेटच होऊ देणार नाही...मिस्टर परांजपे तुम्ही हिला लवकर इथून घेऊन जा...आता हा तुमच्या डोक्याचा ताप आहे. "
अश्विन म्हणाला.
"तू असे म्हणत असशील तर मला विचार करावा लागेल असे वाटतेय. "
"शेखर..."
प्रियाने त्याच्याकडे रागावून पाहिले.
प्रियाने त्याच्याकडे रागावून पाहिले.
"बाय द वे जर माझे फेशियल फिचर्स तुला तोंडपाठ आहेत तर मग काल तू मला ओळखले कसे नाहीस. "
"आता बोल आहे उत्तर तुझ्याकडे...काहीही बोलत असतो उगाच."
प्रिया नाक मुरडून म्हणाली.
प्रिया नाक मुरडून म्हणाली.
"एक मात्र मानले हा...तुम्ही दोघेही म्युझिक चे फॅन आहात... ही सुद्धा सकाळी मराठी गाणी ऐकत असते."
शेखर म्हणाला.
शेखर म्हणाला.
"याच्यामुळेच लागली...
तुम्हाला माहित आहे शेखर, हा कॉलेजमध्ये नुसता सॅड गाणी ऐकत बसायचा..आम्ही त्याला बैजू बावरा बोलायचो."
शेखरने अश्विनकडे पाहिले...त्याच्या डोळ्यांत पाणी आले आहे असे त्याला वाटले. पण तो लगेचच हसला.
"रागिणी आणि हिच्यामुळें सर्व कॉलेज मला याच नावाने बोलवायचे....मिस्टर परांजपे तुमची बायको दिसते इतकी साधी नाही. पक्की खोडकर आहे...हळू हळू तुम्हाला समजेल."
"तुम्ही याचे काही ऐकू नका...हा काहीही बोलतो."
त्यांच्यातली ही निखळ मैत्री पाहून शेखरही खुलून हसला.
"बरे बरे आता मी काही बोलू का?"
"तुम्ही बोला....नाहीतर हिची टीवटिव बंद होणार नाही..."
"मला हे विचारायचे होते की तुझी बाईक ठीक झाली का?"
"काल मेकॅनिक कडे दिली ...अजून आणली नाही...आणि आश्चर्य म्हणजे मेकॅनिक म्हणाला याचे तो चार्जेस घेणार नाही... कमाल आहे. आजच्या युगात असे बिनपैशाचे कोण काम करते का?"
प्रियाने सूचकपणे शेखरकडे पाहिले.
"अब...ते मला वाटते तुझ्या नव्या कोऱ्या बाईकबरोबर त्यांना इन्स्टाग्रामसाठी रील बनवायचे असतील..."
"ओके...चल प्रिया आता आपल्याला घरी जायचे आहे...आई वाट पाहत आहे. "
अजून थोडे थांबले तर प्रिया पोल खोलेल असे त्याला वाटले म्हणून त्याने तिथून काढता पाय घ्यायचे ठरविले.
अजून थोडे थांबले तर प्रिया पोल खोलेल असे त्याला वाटले म्हणून त्याने तिथून काढता पाय घ्यायचे ठरविले.
अश्विनचा निरोप घेऊन ती दोघेही तिथून निघून गेली.
अश्विनने प्रियाने आणलेला पुष्पगुच्छ हातात घेतला...
"आजही यात लाल फुल नाही."
त्याने एक दीर्घ श्वास घेतला आणि तो स्वतःशीच हसला.
"आजही यात लाल फुल नाही."
त्याने एक दीर्घ श्वास घेतला आणि तो स्वतःशीच हसला.
***
प्रिया शिफॉनची साधी पण सुंदर साडी नेसली होती.
ती दोघेही परतीच्या प्रवासाला निघाले. वाटेत त्यांना
नाशिकचे प्रसिद्ध असणारे पैठणीचे गाव लागले...
येवला.
तो प्रियाला घेऊन तिथल्या एका प्रसिद्धच दुकानात गेला आणि त्याने तिच्यासाठी सोन्याचे जरीकाम असलेली एक भरजरी पैठणी घेतलीं . त्याने तशीच एक पैठणी आपल्या आईसाठी आणि सुधामावशीसाठी सुद्धा घेतली.
नवीन नाती स्वीकारताना शेखरला जुन्या नात्यांचा विसर पडला नाही या गोष्टीचे तिला कौतुक वाटले.
*****
दरम्यानच्या काळात शेखरने प्रियाच्या मामा आणि मामीना ते घर प्रियाचे आहे आणि ते तिथे राहिले तरी त्या घरावर मालकी हक्क प्रियाचा आहे असे सांगणारी लीगल नोटीस पाठवली. प्रियाच्या मामींचे तर धाबेच दणाणले. त्यांना वठणीवर आणण्यासाठीच शेखरने कायद्याचे कडू औषध त्यांना चाखवले.
*****
*****
शेखरने सुमन ताईंना ती दोघं घरी येत असल्याची खबर आधीच कळविली होती.
घरी परतायच्या आधी त्या दोघांनीही जाऊन त्यांच्या बेडरूम समोरून दिसणाऱ्या महालक्ष्मी मंदिरात जाऊन देवीचे दर्शन घेतले.
घरी परतायच्या आधी त्या दोघांनीही जाऊन त्यांच्या बेडरूम समोरून दिसणाऱ्या महालक्ष्मी मंदिरात जाऊन देवीचे दर्शन घेतले.
रात्रीचे दहा वाजले होते.
सुमनताईंनी त्यांच्या अंगावरून घास ओवाळून टाकला. मनिषाने आरती केली आणि ती दोघं घरात शिरले.
सुमनताईंनी त्यांच्या अंगावरून घास ओवाळून टाकला. मनिषाने आरती केली आणि ती दोघं घरात शिरले.
सुमनताईंना जो आनंद झाला होता तो अवर्णनीय होता.
कधीच काही न बोलणारा सुधाकरचा चेहराही खुलला होता.
कधीच काही न बोलणारा सुधाकरचा चेहराही खुलला होता.
खरी गंमत त्याच्या पुढे होती.
सुधाकरने खालून त्यांचे लगेज आणले पण ते त्याने त्यांच्या बेडरूमच्या दाराजवळच ठेवले.
शेखरने त्याच्याजवळ थोडे रागानेच पाहिले.
सुधाकरने खालून त्यांचे लगेज आणले पण ते त्याने त्यांच्या बेडरूमच्या दाराजवळच ठेवले.
शेखरने त्याच्याजवळ थोडे रागानेच पाहिले.
"सुधाकर...बेडरूममध्ये ठेवले असते तर काय बिघडले असते?"
पण यावर सुधाकर गालातल्या गालात हसला आणि मागे झाला.
शेखर लगेज घेऊन आत शिरला आणि त्याच्या बरोबर प्रियाही आत गेली... मनीषाने बाहेरून दरवाजा लावून घेतला.
"अगं मनिषा..."
"वहिनी आता हा दरवाजा सकाळीच उघडणार. "
बाहेर ती खुदखुदत होती.
बाहेर ती खुदखुदत होती.
इकडे बेडरूममध्ये आत शिरल्यावर शेखरचे आणि प्रियाचे बेडकडे लक्ष गेले.
संपूर्ण बेडरूम फुलांनी सजवलेला होता. बेडवर गुलाबाच्या पाकळ्यांनी हार्ट काढला होता. साइड टेबलवर दुधाचे ग्लास होते...त्याच्या बाजूला पाण्याच्या बाटल्याही होत्या. ती दोघे बाहेर येऊ नये म्हणून मनिषाने सर्वतोपरी प्रयत्न केले होते.
"मनिषाचे प्रयत्न वाया कसे घालवायचे? "
शेखर म्हणाला.
प्रिया लाजली आणि त्याच्यापासून दूर जाऊ लागली तसे त्याने पुढे होऊन तिला उचलले आणि बेडवर अलगद ठेवले.
तिने आपला चेहरा ओंजळीत लपवला तसा त्याच्या ओठांचा स्पर्श तिला आपल्या हातावर जाणवला आणि तिचे सर्वांग मोहरले ....आज सर्वार्थाने प्रिया त्याची झाली... सात जन्मासाठी.
तिने आपला चेहरा ओंजळीत लपवला तसा त्याच्या ओठांचा स्पर्श तिला आपल्या हातावर जाणवला आणि तिचे सर्वांग मोहरले ....आज सर्वार्थाने प्रिया त्याची झाली... सात जन्मासाठी.
जसे पैठणीचे वसन भरजरी
तुझा सहवास मज अमृतापरी
उशिरा उशिरा बरसल्या जरी
तुझ्या सोबतीच्या सुखाच्या सरी
तुझ्या सोबतीच्या सुखाच्या सरी
समाप्त
मी इथे इरावर पहिल्यांदाच लिहित आहे. इथे लिहिण्याआधी बरेच प्रश्न मनात होते. माझी कथा इथल्या वाचकांना आवडेल की नाही...कुणी वाचेल की नाही....पण लिहित गेले. काही वाचकांनी खूप सुंदर समीक्षा लिहून कथा आवडत असल्याचे सांगितले आणि मग लिहायला हुरूप आला. काहींनी समिक्षा जरी दिल्या नसतील तरी views वरून समजत होते की थोड्या प्रमाणावर का होईना पण काही वाचकाना तरी कथा आवडत आहे.
आता कथा समाप्त झाली आहे. रोज भेटणे होईल की नाही माहित नाही पण तुमच्या जर छान छान समीक्षा आल्या तर दुसरी कथा लवकरच सुरू करेन.
आता कथा समाप्त झाली आहे. रोज भेटणे होईल की नाही माहित नाही पण तुमच्या जर छान छान समीक्षा आल्या तर दुसरी कथा लवकरच सुरू करेन.
टीप: काव्यरचना माझी आहे. कशी वाटली ते ही सांगा.
