Login

लेखिका प्रियंका शिंदे बोरुडे : संघर्षाच्या निखा-यात बहरलेली लेखनकला

प्रेरक जीवनप्रवास

स्रीला संघर्ष काय नवा नाही. पदोपदी आणि संघर्षाच्या ठिणग्या झेलणारी स्री तितकीच कणखर व जिद्दी बनलेली आहे. या संघर्षाच्या काळात ती कधीच खचली नाही तर नव्या उमेदीने तिने जीवनाचे शिवधनुष्य पेलले आहे. याकाळात तिची सकस मानसिकता हिच तिची सक्षमता आहे. या सगळ्या संकटातून तिच्या चेह-यावरील हसू हेच जीवनाची नवी आशा आहे. अशा स्रीयांच्यामुळे जीवन केवळ बहरत नाही ते सदाबहार होते. अशाच बिकट परिस्थितीला नामोहरण करणा-या लेखिका म्हणजे प्रियंका शिंदे बोरुडे …!!

शालेय जीवनात शिक्षणाचा ध्यास घेवून याच शिक्षणाने जीवनाचा पाया रचला गेला. प्राथमिक, माध्ममिक नंतर अभियांत्रिकी पदवीमध्ये धवल यश मिळवले या दरम्यान भरपूर अडचणी आल्या परंतू धीराने तोंड देवून पुढील शिक्षण पुर्ण केले. आपल्याच कॉलेजमध्ये अॕसीस्टंट प्रोफेसर म्हणून काम करताना मुलांना सुयोग्य संस्कार व मार्गदर्शन केले.

पुढे लग्न झाले. अभियांत्रिकी पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला. प्रचंड जिद्दीने व कष्टाने हे शिक्षण पूर्ण केले.नंतर लहान बाळाला जन्म दिला पण दुर्देवाने हे बाळ गमवावे लागले. यावेळी प्रियांकाजी यांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला यातून त्यांनी स्वतःला सावरले. आनंद व आशेचा नवा किरण घेऊन त्यांनी पुढील जीवनप्रवास सुरु ठेवला.

पुढील जीवन जगत असताना लहान बाळाला जन्म दिला. इथेही त्यांची नियतेने पाठ घेतली. मुलग्यावर योग्य उपचार करुन त्याला सक्षम बनवले यावेळी पतीची व कुटुंबाची साथ मोलाची होती.

जीवनाचा हा प्रवास चालूच होता यामध्ये प्रियांकाजी यांनी लेखनाच्या छांदाला आपलेसे केले. विविध व्यासपीठावर त्यांचे लेखन बहरु लागले. ईरा, मॉम्सप्रेसो, प्रतिलिपी या व्यासपीठावर त्यांचे लेखन नविन ढंगात दिसून आले. आपल्या जीवनाचे पडसाद त्यांच्या लेखनाचे प्रतिबिंब बनले. गुणी सूना, जीवनाचे विधिलिखित, डॕशिंग दांडेकर, प्रेमबंध, कानामागून आली आणि तिखट झाली, डु आर डाय खेळ मृगजळाचा, तो एक राजहंस, सकारात्मतेची परिभाषा, आस्तीत्वावासाठी लढा, चांदण्याचा बहर, कल्की एक अनावृत रहस्य अशा अनेक कथा व कथामालिकातून त्यांनी वाचकांना समृद्ध केले आहे. हाच गतिमान लेखनप्रवास त्यांनी प्रतिलिपी व मॉम्सप्रेसो व्यासपिठावर कायम ठेवला त्यामुळे एक दर्जेदार लेखिका म्हणून त्यांची ख्याती सर्वदूर पसरली.

ईराच्या विविध स्पर्धामध्ये त्यांनी भाग घेऊन आपले लेखनकौशल्य दाखवले आहे. चॕम्पियन ट्राॕफीमध्ये ईरा शब्दरत्न पुरस्कार, आॕन द स्पाॕट लेखन व सर्वोत्कृष्ट लढवय्या हे पुरस्कार त्यांच्यातील प्रतिभेची चुणूक दाखवतात.

अशा गुणी, हुशार , तत्पर, प्रेमळ, आदरणीय लेखिका प्रियांकाजी यांना पुढील आरोग्यदायी जीवनप्रवासाठी खूप - खूप शुभेच्छा…!! तुमची लेखनकला व आयुष्य सदैव बहरावे हिच सदिच्छा …!!