Login

प्रोफाइल पिक -२

vitual friendship between two adults.

प्रोफाइल पिक _२ #मखमली  कवडसा

©®स्वाती  बालूरकर देशपांडे,सखी


२-३ महिने हे छोटे मोठे मेसेंजरचे मेसेज किंवा कवितेवर चारोळ्यांवर प्रतिक्रिया चालत राहिल्या.
चांगली वर्चुअल मैत्री झाली होती म्हणा ना! तिची कमेंट काहितरी वेगळी असते म्हणून तो वाट पहायचा.
साधारणतः ३ महिन्यानंतर -
 बिरला मंदिर प्रांगण ,हैदराबाद!
मित्रांसोबत दर्शन घेवून विहान बाहेर पडला व सर्वजण मंदिराच्या बाहेर डाव्या बाजूला बसण्यासाठी वळले, ही अशी जागा आहे  जिथून संध्याकाळी हैदराबाद  शहर खूप सुंदर  दिसतं.
संध्याकाळची वेळ , ते लाइट्स ,मंदिराचे पवित्र तरंग ,रम्य वातावरण , चौघे मित्र बसलेले , समोरच्या पायरीवर  काही मुली बसलेल्या होत्या . बर्‍यापैकी गर्दी होती पण लोक थोडाथोडावेळ बसून उठून जायचे.
आसपासच्या जवळ जवळ सगळ्याच बायका सुंदर साड्या नेसून शिवाय काही मुली पारंपरिक वेशाताही.
लांब लांब वेण्या किंवा केस मोकळे सोडलेले अन मस्त गजरे माळलेले, रोहित खूप अप्रूपाने हे पाहत होता .


"काय झालं रे सगळी कड़े वळून वळून पाहतोयस ?" अरूण ने विचारलं.

"अरे पाहतोय की. . . कसा बदल आहे वातवरणार. तू काहीही म्हण अरूण पण या दाक्षिणात्य राज्यांमधे अजुनही त्यांची संस्कृति जपतात बघ बायका.
आपल्याकडे कम्फर्टेबल म्हणून सारखे ड्रेसेस घालतायत ना आपल्या बायका. फुले वगैरे तर सोडूनच दया. इथे त्यांना काही समारंभ लागत नाही बघ . ाशंच सहज नाही का?  किती छान वाटतंय हे सगळं असे सोज्ज्वळ अन साधं!"

"बरे मग वहिनीला कळवावे लागेल" दत्ता आणि अरूण ने टाळी दिली.
"काहीही काय यार ? काही मनाला बारे वाटले तर सांगुच नये का मित्रांजवळ ?" रोहित चिडला.

"छोड़ ना यार, इथे बघा किती मस्त वाटतय."  विहान बोलला.

दत्ता अरूणच्या जवळ सरकत म्हणाला, "मघाशी विहानही म्हणत होता की हैंडलूम, कॉटन किंवा सिल्कचे साड्यांचे काही व किती प्रकार असतात ते पाहावे तर एकडेच. हैदराबाद किंवा मद्रास वगैरे. त्यातले आपल्याला कही कळत नाही पण नजरेला फार भारी आणि क्लास वाटतं ."

"तो हळवा भावनिक माणुस बाबा त्याला बरेच कळते यातले. वहिनीची तालीम आहेच त्यात दोन दोन मैत्रिणी मग काय ?" आता रोहितही त्यांच्यात मिसळला.

"दोन मैत्रिणी ? काय सांगतोयास ? कधी? आता की , कॉलेजात ?" अरूणला उत्सुकता.

त्यांच्या समोरच्या बसलेल्या मुली त्यांच्या तेलुगु भाषेत काहीतरी बोलत व हसत निघून गेल्या.
मग त्याच समोरच्या पायरीवर  २-३ लेडिज बसण्यासाठी जागा शोधत होत्या. तय बसणारच होत्या तितक्यात  त्यातली एक मागे वळली.

विहानच्या हृदयावरून जणू थंड साप सरपटला! ह्रदयात धडधड झाली .

ती ……… जी. विशाखा! प्रत्यक्षात. 

तेलुगु भाषेत मैत्रिणींशी काही बोलत होती, किती गोड बदामी रंगाची सिल्क टिश्यु ची साड़ी आणि त्याला साजेशी ज्वेलरी व हेअरस्टाइल !

त्याचे विस्फारलेले डोळे पाहून तिचं लक्ष गेलं पण तिने दुर्लक्ष  केलं कदाचित ओळखलं ही नसावं.
पण विहान कशी चूक करेल ओळखण्यात!
तिला इतक्यांदा फोटोत पाहिले होते की ती मनाच्या खूप जवळची झाली होती. 

एखादी देवी प्रत्यक्ष पहावी तसा श्रद्धेनं तो पहात होता.  मित्रांनी म्हणजे रोहितने त्याला पाहिलं व तिला  पहिलं आणि ओळखलं. ..

रोहित उभा ठाकला , अन डायरेक्ट -
"एक्सक्युज  मी, यू मिस विशाखा!" रोहितने आवाज दिला.
"येस , विशाखा! एम आईंदी(काय झालं)? चप्पंडी(सांगा)?"
तो थंडच . 
"मैडम नो तेलुगु. . .हिन्दी ऑर मराठी!"रोहित 
"नो प्रॉब्लेम  , बोला ना !"
"विहान ने तुम्हाला ओळखलं आणि आवाज दिला. तुम्ही जी. विशाखाच ना?"

"ओहो ! हो, मिस्टर  विहान ,कवी महाशय कसे आहात? आणि चक्क इथे ? आमच्या हैदराबादला ?"
विहान लाजत, "ऑफिशिअल  मिटिंग  होती , रविंद्रभारतीला,  म्हणून मित्रांसोबत  सहजच!" तो जुजबी बोलला. 
"कुठे थांबलात?"
"नामपल्ली स्टेशनजवळ, हॉटेलवर!"
"ओके. हॅव अ गुड टाईम!"

खरं तर तिला खूप काही विचारायचं होतं , बोलायचं होतं पण तो तिला पाहून थक्कच झाला आणि बोलू शकला नाही 

एकतर ती फोटोपेक्षा  प्रत्यक्षात जास्त सुंदर  होती आणि हिच्या प्रत्येक हालचालीत तिची झलक होती.  

"ओके देन , यु गायिज कॅरी ऑन!"

त्या समोर बसल्या , तेलुगुत मस्त गप्पा चालल्या होत्या . तिने एक दोनदा डोळ्याच्या कोपर्‍यांतून विहान ला पाहिले .

सर्वजणी 10 मिनिटाने उठल्या .
तिने एक कटाक्ष सर्वांवर टाकला विशेषतः विहान वर आणि स्माईल देवून निघाली . तिला कदाचित बोलावे वाटले असेलही पण  सोबतच्या तेलुगु मैत्रीणी तिला निघण्यासाठी घाई करीत होत्या.

"ओके वेल्दामु. नडू (ओके जाउयात ,चला)"

ती समोरून दिसेनाशी होईपर्यंत विहान पाहत राहिला . दोन व्यक्तीत इतके समय कसे असू शकते?
वासवीला विसरलेला तो. . आज पुन्हा तिची तीव्रतेने आठवण झाली.
"कशी गायब झालीय यार ती , कुठे गेली असेल ? तेव्हा  माजी कहानी अर्धीच सोडून गेली ." विहान मनात पुटपटला.

"चला यार. जेवायचे आहे अजुन." दत्ताने घाई केली.

"उठ रे विहान ,ती जी. विशाखा घरी पण पोचली असेल ,हा अजुन पाहतोच आहे तिकडे ." अरूण बोलला.

मित्र  हवे तसे चिडवत होते पण विहान मात्र मनातून हळवा झाला होता. त्याला कहीही फरक पडत नव्हता.

आता हैदराबाद शहरा बद्दल विहानच्या मनात एकदमच आपुलकी निर्माण झाली होती .

जड़ मनाने तो परत आला . 

            ***********

विहान परत आला व रूटीन सुरू झालं. आठवडाभर फेसबुक  उघडायलाच वेळ नव्हता.

आज फेसबुक  ओपन केलं. बर्‍याच नोटिफिकेशन  होत्या.
त्या तिची प्रोफाइल  पिक बदललेली पण सूचना होती.

त्याने क्लिक केलं.

त्यादिवशी मंदिरात पाहिलेला तिचा तो लुक होता , तिथलाच फोटो असावा बहुतेक .

ही प्रत्येक लुक मधे वेगळी कशी दिसते ? ड्रेस वेगळा असला की वेगळी ,हेयर स्टाइल बदलली की वेगळी ,अगदी कपाळावरची टिकली बदलली तरी वेगळा लुक येतो अगदी तिच्यासारखंच !

कारण बायकोत असे बदल कधीच दिसले नाहीत त्याला . तिने कहीही बदल केले तरीही बायको नेहमी एक सारखीच वाटायची त्याला . 

त्या दिवशी रात्री मेसेंजरवर
"हाय विशाखा जी नाईस प्रोफाइल पिक "

"थैंक यू!" ती ऑनलाइन आली.

"त्यादिवशी तुमच्याशी बोलायचे होते पण . . ."

"हो मला कळले ते . पण खूप मोठे सरप्राईज होते माझ्यासाठी , वर्चुअल फ्रेंड लिस्टमधल्या कुणाला प्रत्यक्ष पाहण्याचा !

"एक सांगू ? यु रेसेम्बल समवन "

"हो वाटले मला ते! , तुमच्या कवितेतली ती का?"

एक खूप हसणारा इमोजी .

विहान निरुत्तर झाला .
हो म्हणावे की नाही म्हणावे .

"तुम्ही खूप शार्प आहात . मी काय सांगणार? गुडनाईट !"

मेसेंजर बंद अन विहान ऑफलाइन !
********************************

क्रमशः 


🎭 Series Post

View all