पुढचं पाऊल.... भाग 11

Shrikant room chya baher yeto sofyavar basto, madhavi chaha aanate to chaha gheto ani isharyani madhavila vicharnyacha prayatn karto ,madhvi dole michkaun hatvare karun," thamba ho jara" asa ishara karte...

आधीच्या भागात,

(श्रीकांत ऑफीस मधून येतानी पाच रेल्वेची तिकिट घेऊन येतो, घरी आल्यानंतर त्याला कळतं की सगळेच नाही चालले , हे ऐकून तो नर्वस होतो..
दुसऱ्या दिवशी सकाळी, त्याला हॉलमध्ये कुणीतरी अनोळखी व्यक्ती दिसते तो विचारात असतो हा कोण आहे )

श्रीकांत रुमच्या बाहेर येतो सोफ्यावर बसतो, माधवी चहा आणते तो चहा घेतो आणि इशाऱ्यानी  माधवीला विचारण्याचा प्रयत्न करतो ,माधवी डोळे मिचकावून हातवारे करून," थांबा, हो जरा "असा इशारा करते...

श्रीपतराव:- श्रीकांत याला ओळखलं का? हा तुझ्या बिल्डिंग मध्ये राहतो वरच्या फ्लोअरला....
" हो, का... असेल कधी लक्षात नाही आलं"

अरे हा आपल्या शेजारच्या काटकर काकू आहेत ना त्यांच्या भाचा आहे प्रदीप ...

हॅलो....
हॅलो .....काय मग कसा चाललाय तुमचा जॉब.?

व्यवस्थित, तू काय करतोस?

मी बँक ऑफ इंडिया मध्ये मॅनेजर आहे...

अरे वा! हे छान आहे...

तू प्रदीप ला ओळखलं नाहीस पण प्रदीप तुला आधीपासूनच ओळखतो .…श्रीकांत च्या मनात पाल चुकचुकली याला काही माहित तर नसेल ?

काय रे ,काय विचार करतोस?
काही नाही बाबा, सहजच...
आज मनोहरराव निघत आहेत ना म्हणून म्हटलं चला त्याला भेटून घ्या,  माधवीची पण ओळख होऊन जाईल, तू दिवसभर ऑफिस मध्ये असतोस ,कधी अडी-अडचणी ला कोणी ओळखीचा माणूस हवा म्हटलं चला ओळख करून घ्यावी,,कधी गरज पडली तर माधवीला पण मदत होईल, इथं सगळं नवीनच आहे  तिच्यासाठी....

सगळ्यांच्या चहा नास्ता होतो ,बोलणं होते आणि प्रदीप निघतो ,श्रीकांत नी आज सुट्टी घेतली असल्यामुळे तो आज घरीच असतो...

दुपारच्या जेवणाला सगळे डायनिंग वर बसले..
अग आई ,आज मी सगळं तुझ्या आणि बाबांच्या आवडीच जेवण बनवलं, नंतर पुन्हा भेट कधी होईल देव जाणे....

तू माझ्या आणि बाबांच्या आवडीचं काय घेऊन बसलीस आता तुला जावई बापूच्या आवडीनिवडी जपायला हव्यात ....नाही का....

माधवी स्मितहास्य करते, त्याच्या चेहऱ्यावर काही हावभाव नसतात,
आणि लवकरात लवकर आम्हाला नातवंडांशी खेळायचा सौभाग्य मिळू दे म्हणजे आम्ही डोळे मिटायला मोकळे....

आई मनीष च लग्न व्हायचं आहे म्हटलं अजून.. असं म्हणत हसते...

श्रीपतराव: हो मी म्हातारा एकटाच असतो मला कोणीतरी नको का खेळायला, दिवस जात नाही आमचा, तेही मनोहरराव आणि मंदाच्या सूराला सूर लावतात आणि सगळेजण जोरजोरात हसतात...श्रीकांत मात्र ठम्म बसलेला असतो...

सगळे जण लवकर लवकर दुपारची जेवण  करून तयार होतात, दोन वाजता घरून निघतात रेल्वे स्टेशन गाठतात, सोबत माधवी आणि श्रीकांत पण जातो ... बाबांना जास्त त्रास होतो म्हणून त्यांना घरीच ठेवतात आणि बाहेरून लॉक करतात ...

आई बाबांना ट्रेन मध्ये बसवून श्रीकांत आणि माधवी घरी येतात , श्रीकांत दार उघडतो.....तर समोर मोना बसलेली असते....

हाय..... बेबी...... I m so happy.... अखेरचे गेले सगळे पाहुणे .....असं म्हणत ती त्याला मिठी मारणार इतक्यात श्रीकांत तिला " stop mona"  तिथेच थांबवतो....

काय रे काय झालंय.... असा का react होतोस....आज तू सुट्टी काढलीस ना , म्हणून मी इकडे आले, आणि आता आपण शॉपिंग ला जाऊया.... श्रीकांत मोनाला चुप राहण्याचा इशारा करतो पण तिला काही समजत नाही शेवटी तो बाजूला सरकतो मागे माधवी उभी असते....

" ही कोण ?"तो काही बोलणार इतक्यात...
मी...मी माधवी....ह्यांची बायको

बायको ....ही बायको आहे तुझी , तू सांगितलं नाही मला..…you cheater ,तू खोट बोललास माझ्याशी.... 

मोना शांत हो.....

अहो, ही कोण?
ही.... ही.... माझ्या ऑफिसमध्ये काम करते....
मोना तू जा आता इथंन.... 
अहो तिला अस जायला का सांगताय, आपल्या घरी पाहुणी आली ना ती, बस ग मी चहा टाकते......            एक मिनिट ही दार उघडून आत कशी आली....
अगं माझ्याकडे चावी नेहमी हरवत असते ना म्हणून मी एक चावी हिच्याकडे ठेवतो ....

अच्छा ....मोनाताई.... बसा तुम्ही.... मी चहा आणते....

ईई...... मोनाताई.... excuse me...
मला तुम्ही मोनाताई म्हणू नका....discusting...
आणि मी चहा घेत नाही कॉफी किंवा ग्रीन टी घेते.…

ठीक आहे मी कॉफी आणते ....माधवी किचनमध्ये जाते.. मोना तू इथे का आलीस ?...
श्री तुझं लग्न झालं हे तू मला का नाही सांगितलं....
हे एक मिनिट ,ही तीच आहे ना ...जी मॉलमध्ये तुझ्या सोबत होती म्हणजे तू बायकोला चुलत बहीण म्हणून सांगितलं ...श्री तू चक्क खोटं बोललास...
मला तुझ्याशी बोलायचंच नाहीये... मी जाते.. goodby..... आणि ह मला फोन करायचा नाही ह..... असं म्हणत ती निघते ...

माधवी कॉफी घेऊन येते ,अरे हे काय... गेली ती..
गेली तिला काही अर्जंट काम आल...
ठीक आहे, घ्या तुम्ही कॉफी.... दोघेही कॉफी पीत बसले,  बसल्या बसल्या गप्पा सुरु झाल्या... फक्त माधवी कडून हं......सगळे होते तर घर किती भरल्यासारखं वाटायचं.... नाहीका... आता अगदी रिकाम झाल्यासारखं वाटतय....

"बाबा उठले का नाही?"
नाही उठायचे आहेत, ते उठले की त्यांना बनवून देईन मी चहा ....तुम्हाला वेळ आहे तर आपण मार्केट ला जाऊया का? मला काही वस्तू घ्यायच्या होत्या...

नाही बघू नंतर ....आज नको आज आराम करतो ...असा म्हणत  रूममध्ये  निघून जातो... माधवी थोडावेळ टीव्ही बघत बसते... बसल्या-बसल्या तिला गौरी ची आठवण होते (गौरी जी तीला मॉलमध्ये भेटलेली) ती गौरीला फोन करते...

हेलो...
हेलो... गौरीताई बोलताय ना ...
हो आपण कोण?
मी ..माधवी...त्यादिवशी मॉलमध्ये भेट झाली आपली...
ओ...हाय ...माधवी कशी आहेस?
मी बरी आहे ...
तुम्ही कशा आहात?
मी बरी आहे, तू मला नावाने हाक मार ,असे अहो जाहो करू नकोस ...

ठीक आहे..चालेल...
काय झालं  त्या दिवशी तुझ्या नवऱ्याचं? कधी आला घरी ...?
ते... खूप लांब गोष्ट आहे...भेटल्यावर सांगेन मी....            हो  हो नक्कीच ......
आणि माधवी तू स्वतःला एकटे समजू नकोस मी आहे तुझ्यासोबत .....तुला काहीही गरज पडली तर मला फोन कर निःसंकोचपणे....
  friends....?
friends.... चल आजपासून आपली मैत्री सुरू..... चल मी ठेवते आता ,मग बोलु आरामात. असं म्हणत फोन ठेवते....गौरीशी बोलून माधवीला खूप बरं वाटतं...

तिला गौरीच नवल वाटत होतं की ,ही किती छान आहे ना, अगदी आत्मविश्वाशी,फाडफाड बोलणारी ,कसं जमत हिला सगळं.... आणि आपल्याला साधी दोन वाक्यही बोलता येत नाही ...
किती फरक असतो ना खेळात वाढलेल्या आणि शहरात वाढलेल्या मुलींमध्ये ....माधवी स्वतःच्याच विचारात गुंतलेली.....

क्रमशः

🎭 Series Post

View all