पुढचं पाऊल....
भाग-12
(आधीच्या भागात,
गौरी शी बोलून माधवीला खूप बरं वाटतं तिला गौरीचं नवल वाटत होतं की, ही किती आत्मविश्वासी ,फाडफाड बोलणारी आहे.. आपण तर साधी दोन वाक्य ही बोलू शकत नाही, ती स्वतःशीच बोलू लागली की किती फरक असतो ना खेड्यात वाढलेल्या आणि शहरात वाढलेल्या मुलींमध्ये याच विचारात माधुरी गुंतलेली...)
आता पुढे
बसल्या बसल्या माधवीचा डोळा लागलेला असतो... माधवी...... माधवी.... ये पोरी... श्रीपतराव हाका मारतात पण माधवीचा डोळा लागलेला असतो, श्रीपतराव किचनमधे जाऊन चहा बनवतात तोवर श्रीकांत जागा होतो तो बाबांना किचनमध्ये बघतो आणि त्याचा पारा चढतो तो जोरात-
माधवी.......... माधवी ......
श्रीकांतचा आवाज तिच्या कानावर पडतो, तशीच ती ताडकन जागी होते आणि किचन मध्ये जाते,
" आवाज दिला तुम्ही?"
हे काय?, तू मस्त तिथे आरामात झोपा काढतेस आणि बाबा चहा बनवत आहेत....
पण, बाबा तुम्ही? तुम्ही चहा का बनवताय ? मी चहा आणते तुम्ही जा, असू दे गं पोरी, एवढं काही नाही त्यात आणि श्रीकांत तिच्यावर एवढा ओरडू नकोस दिवसभर काम करते ती, थकली असेल, लागला असेल डोळा त्यात काय एवढं .....पण बाबा ही असताना तुम्हाला काम करावा लागत, हे बरोबर नाही ना....काम नाही रे बाबा एवढा चहा तर मांडलाय,
चल ... तू ... चल आपण हॉलमध्ये बसू....
ते चहा घेत हॉलमध्ये बसतात ...माधवी संध्याकाळी सहज बालकणीत जाते तिला साईडच्या बाल्कनीत कोणीतरी वृद्ध बाई पुस्तक वाचत बसलेली दिसते, तिला खूप उत्सुकता होते कोण आहे बघण्याची.... ती पटकन साईडच्या फ्लॅटमध्ये जाते, दरवाजाची बेल वाजवते, वृद्ध बाई दार उघडतात....
नमस्कार ..काकू ...मी.…. माधवी... मी तुमच्या साईडच्या फ्लॅटमध्ये राहायला आले, मी आता बाल्कनीत उभे होते ना ,मला तुम्ही बाल्कनीत पुस्तक वाचताना दिसलात, मला खूप उत्सुकता झाली आणि म्हणून मी इथे आली, तुम्हाला राग तर नाही ना आला?
"नाही ग,... ये...ना..बस...... घरात कुणी दिसत नाही आहे ,तुम्ही एकट्याच असता का काकू?
"हो मी एकटीच असते", माधवी ला वाईट वाटते बिचाऱ्या काकू एकट्या असतात.... ती पटकन...
पण आता तुम्ही एकट्या नाही आहात, मी आहे तुमच्यासोबत अस म्हणत दोघीही हसतात ...
दोघीही खूप गप्पा मारतात ,...
खूप वेळ झाला माधवी दिसली नाही म्हणून श्रीकांत तिला आवाज द्यायला बाहेर निघाला ....
माधवी.... माधवी....कुठे गेली ही,अंधार होत आला ...तो दाराच्या बाहेर उभा असतानाच साईडच्या फ्लॅट चा दार उघडण्याचा आवाज येतो.... श्रीकांत पलटतो तर त्याला माधुरी दिसते....
he is shocked...
माधवी तू इथे कशी गेली होतीस,, इथे तर लॉक असत ना...
नाही लॉक नव्हता, काकू होत्या आतमध्ये,
श्रीकांत निःशब्द ....
तिच्याकडे पाहत होता,अहो मी बाल्कनीत उभी होते ना, तर त्यांच्या बालकणीत काकू पुस्तक वाचत बसल्या होत्या,त्या दिसल्या म्हणून मी त्यांच्याशी ओळख करायला गेले .....छान आहे त्या काकू, छान बोलल्या माझ्याशी ......
माधवी..are you mad?
काय बोलतेस तू, अगं तो फ्लॅट बंद आहे, तिथे कोणीच राहत नाही... ते सगळे अमेरिकेला राहतात.... तो फ्लॅट बंद आहे माधवी....
आता मात्र माधवी भांबावली.....हे कस शक्य आहे? तिथल्या काकू चक्क बोलल्या माझ्याशी.... मग हे काय बोलतायेत? (ती मनातल्या मनात)
चल घरी चल,... श्रीकांत तिचा हात ओढुन तिला घरी नेतो,अशी न विचारता कुठे जात जाऊ नकोस , कमी जास्त झालं तर कोण बघणार?
माधवी स्तब्द...... माधवीने स्वयंपाक केला जेवण झाली पण तिच्या डोक्यातून त्या काकू काही निघत नव्हत्या... रात्रभर झोप लागली नाही तिला.... विचार चक्र सुरु होते, तिला स्वस्थ बसवत नव्हत.....
सकाळी लवकर उठून सगळी कामे आटपून श्रीकांत गेल्यावर ती त्या फ्लॅटच्या साईडच्या फ्लॅटमध्ये गेली, बेल वाजवते ...समोरून दार उघडत.. दारात तिशीची बाई उभी..... कोण हवंय तुम्हाला ?
अ.... मी..साईडच्या फ्लॅट मध्ये राहते, फ्लॅट न.५मध्ये...
ओह.. हाय... या...ना...बसा...
नाही नाही मी येईल एखाद्या दिवशी आरामात, मला एक विचारायचं होतं... हा... विचाराना..…
तुमच्या साईटच्या फ्लॅटमध्ये कुणीच राहात नाही का?
नाही ते सगळे अमेरिकेला असतात ,आधी राहायचे इथे काकूच देहांत झालं तेव्हाच ते अमेरिकेला निघून गेले......
काकूच देहांत ..... तुमची हरकत नसेल तर मी आत येऊ का?
हो ,या ना..
कोण आहे ग रेवा?
आई ते फ्लॅट नंबर 5 मध्ये राहायला आल्या ना....त्या आल्या इकडे....
कोण ग?
नमस्ते काकू....
नमस्ते बेटा .....काय नाव तुझं?
माधवी... माधवी इनामदार ,इथे साईटच्या फ्लॅटमध्ये राहायला आले ..
अच्छा... आम्ही करमरकर मी शैलजा आणि ही माझी सून रेवा....
आता तुम्ही म्हणालात ना साईटच्या फ्लॅट रिकामाच आहे….
हो त्या शिंदेबाई मरण पावल्या आणि ते सगळे गेले अमेरिकेला राहायला.... माधवी डोक्यावर हात ठेवून बसते .....
तिला काही श्रीकांतच्या बोलण्यावर विश्वास नव्हता.. पण आता मात्र ती हादरली.....
ज्या घरात ती जाऊन बसली,ज्या बाईशी ती बोलली,ती हयातच नाही, या विचाराने तिला धडकी भरली, घाम फुटला....
काय झालं माधवी बेटा? काय झालं? एक ग्लास पाणी मिळेल का? हो... हो... हे घे पाणी,काय ग काय झालं....
काही नाही ,जर मी यांना सगळं सांगितलं तर हे लोक मला वेड्यात तर नाही ना काढणार? काय करू देवा सांगू? की नको सांगू ? माधवी स्वतःशीच पुटपुटली.... काय ग काय झालं?
नाही काही नाही ,येते मी काकु....
अगं थांब थांब पहिल्यांदा घरी आली आहेस, काही खाल्ल्या शिवाय जाऊ देणार नाही तुला....
नाही काकू आता नाही, येईल मी आरामात पण आता नको...
ठीक आहे, ठीक आहे,,,थांब कुंकू लावते, काकू हळद कुंकू लावतात आणि माधवी निघते....
घरातून पाय सपासपा टाकत त्या दरवाज्याच्या समोर येऊन थांबते, मान वळवते, तर काय दाराला खरच खूप लावलेलं असतं....
ती एक क्षण डोळे बंद करते, लांब श्वास घेते ...डोळे उघडते आणि धावत आपल्या घरी जाते.... आत जाते आणि दाराची कडी लावते.... तिच्या श्वास फुललेला असतो तशीच दहा मिनिट दाराला टेकून असते .......
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा