(आधीच्या भागात ,श्रीकांतला त्याचे बाबा पगाराबद्दल विचारतात.... कारण सहा महिन्यांपासून श्रीकांतने घरी काहीही पैसे पाठवलेले नसते, आता तो विचार करतो की बाबाला काय सांगायचे)
श्रीकांत विचारात होता की आता बाबांना काय उत्तर द्यायचे तितक्यात त्याचा फोन वाजतो आणि तो हशश..... करत श्वास टाकतो आणि मनात म्हणतो... बर बाबा सुटलो एकदाचा असं म्हणत रूम मध्ये जातो ,फोनची रिंग वाजत असते ,तो फोन उचलतो फोन समीरचा असतो (समीर त्याच्या ऑफीसमध्ये काम करणारा त्याचा कलीग)
हॅलो....
हॅलो ,श्रीकांत..... काय रे, काय करतोय...
काही नाही, बाबांशी बोलत बसलो होतो ....
तुझे बाबा आले ,तू सांगितलं नाहीस ...
अरे हो दोन दिवस झालेत..तू बोल, तू फोन का केला इतक्या रात्री....
"अरे ती मेहताची फाईल तुझ्याकडे आहे ना"...
हो... का?
मला त्याच्यातली डॉक्युमेंट्स मेल करशील, मला त्याचे अपडेट काढायचे आहेत ....
नाही पण मी तुला आता ई-मेल नाही पाठवू शकत, म्हणजे मी आज लॅपटॉप घरी आणायला विसरलो....
विसरलास.... कसा विसरलास...
"श्री तुला काही टेन्शन आहे का?"
नाही रे ,काही टेन्शन वगैरे नाही ,आपण उद्या भेटू आणि मग बोलू ,चल मी ठेवतो ,बाय .....
अरे, पण श्रीकांत.....
श्रीकांत फोन कट करतो, तितक्यात....
नलू: भाऊजी आत येऊ का?
हो नलू ये ना ,माझ्याकडे काय काम काढले...
भाऊजी मला तुमचा फोन हवा होता, म्हणजे मला माझ्या गावाला आईला फोन लावायचा आहे आणि माझ्या मोबाईलमध्ये रिचार्ज नाही आहे, प्लीज तुमचा फोन घेऊ शकते का ....
का नाही असं म्हणत,नलूच्या हातात मोबाईल देतो ,
नलू रूम मधून बाहेर जाणार इतक्यात...
नलू इथेच बोल, तिकडे कुठे चाललीस...
नाही भाऊजी मी हॉलमध्ये जाऊन बोलणार होते,
कशाला इथेच बोल, (त्याचा स्वर rudely होता), नाही म्हणजे इकडे बोल पटकन आणि दे मला फोन.. नाही का, त्याच्या मनात भीती होती की माझा मोबाईल चेक तर करणार नाही आणि नलू हॉलमध्ये जाऊन खरच मोबाईल चेक करणार होती....
ठीक आहे भाऊजी करते मी इथूनच ,फोन लागतो ....
अगं आई मी नलू बोलते, माझ्या मोबाईल मध्ये रिचार्ज नव्हता म्हणून मी भाऊजी च्या मोबाईल वरून तुला फोन केलाय,
काय करत होतीस?
(पलीकडचा आवाज) काही नाही, जेवण झाली ,झोपायची तयारी करत होती, तुझं झालं का जेवण?
झालं ग आताच...
कधी येणार तू इकडे ?
एक दोन दिवसात येऊ आम्ही तिकडे, तसा फोन करेन मी तुला, चल ठेवते आता ,बाय.... म्हणत फोन ठेवला...
थँक्यू भाऊजी..
काय मग कधी निघताय परतीला?
भाऊजी तुम्हाला घाई झाली दिसतेय आम्हाला हाकलायची,,,
नाही मी तर सहज विचारलं ग..
मी जाते गुड नाईट, आता येईल तुमची राणी.. बघा वाट बघा असं चिडवत निघते रूमच्या बाहेर ...
माधवी सर्व कामे आटपून रुम मध्ये येते ...
झोपला नाहीत अजून...
नाही झोपलो, झोपतो आता...
तुम्हाला राग येणार नसेल तर एक विचारू.…?
ह... विचार, त्याच सगळं लक्ष मोबाईल मध्ये असते
मोबाईल जरा बाजूला ठेवला तर आपल्याला व्यवस्थित बोलता येईल,नाही का..
मी ऐकतोय, तू तुझं काम कर...
त्या दिवशी तुम्ही कुठे गेला होतात?
कोणत्या दिवशी?
मॉल मधून तुम्ही कुठे गेला होतात?
ते महत्वाचं नाही आहे....
आधी सांगा तरी, महत्वाचं आहे की नाही ते आपण नंतर ठरवूया...
तो माझ्या ऑफिसमध्ये समीर आहे ना त्याच्या आईला बरं नव्हतं हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं होतं, त्याच्या जवळ कोणी नव्हतं म्हणून मी गेलो होतो आणि मला सुचलच नाही तुम्हाला फोन करण्याच.... अग अचानक फोन आला आणि मी तडकाफडकी निघून गेलो, दवाखान्यात कोणीच नव्हतं ना म्हणून थांबलो होतो त्याच्या जवळ ...
मग हे सांगायचं नाही का...
तू बोलू देशील तर सांगेल ना ,मी आलो आणि तुझा प्रश्नांचा भडीमार सुरु झाला .....
सॉरी ....पण तुम्ही आता एक काम करा ना,
काय?
फोन लावा समिर भाऊजीला मी बोलते , विचारपूस करते, त्यांच्या आईची तब्येत कशी आहे ते ?
काही गरज नाहीये नाही, म्हणजे आता त्याच्या आईला बरं आहे तू काळजी करू नकोस, तू झोप...
इकडे माधावीचे आई - बाबा बोलत असतात... मनोहर राव( माधवीचे बाबा)- मंदा जावईबापू विसरले असतील का ग हुंड्याच...
काय माहिती त्यांच्या मनात काय चाललंय काही थांगपत्त लागत नाही.... ती कोण ती बया त्याच्या मागे लागलेली माझ्या पोरीचं काय होईल देव जाणे...
पोरीच्या आयुष्यात काय लिहून ठेवल आहे कोण जाणे मनोहरराव विचारात पडले, खुर्चीवर बसल्या बसल्या त्यांचा डोळा लागला...
दुसऱ्या दिवशी सकाळी,
जावईबापू आम्ही निघायचं म्हणतो....
आता दोन दिवस तर झालेत अजून राहा ना काही दिवस ....( श्रीकांत मनातल्या मनात खूप खूष होत होता) की आता सगळे जाणार....
मंदा: नाही , राहिलो असतो पण मनीष तिकडे एकटाच आहे ना म्हणून निघायचं म्हणतो, (माधवी किचनमधून) आई-बाबा हे काय, इतक्यात निघताय ,आई थांब ना ग काही दिवस ,मी एकटी काय करणार?
तू एकटी नाही आहेस बेटा श्रीपतराव आणि जावईबापू आहे तुझ्यासोबत आणि आपण घेऊन आलो आहोत ना दुसऱ्याची पोर(नलू )आपली जिम्मेदारी आहे ना मग आता निघावं लागेल ...
हो ठीक आहे...
( नेमकं एवढं माधवीच आणि आईच हे बोलणं ऐकलं नाही श्रीकांतनी )
बाबा मी तिकीट काढून आणतो, तुम्ही उदयाला निघा....
श्रीकांत मनातल्या मनात खूप खूष होतो, ऑफिसमध्ये दिवसभर खुश असतो,संध्याकाळी येताना तिकीट काढतो आणि मोना कडे जातो...
मोना दार उघडते...
आज तुला माझी आठवण आली बरी.....
मोना .... मोना ...मोना....अगदी खुश होऊन तिचा हात हातात घेऊन गोल गोल फिरतो ,आज मी खूप खुष आहे.....
काय ? एवढं काय झालं....
माझ्याकडे पाहूने आले होते ना, उद्या जाणार आहेत ते, म्हणजे आता आपल्याला रोज भेटता येणार ....…
दोघे खूप आनंदात असतात ...
घरी आई-बाबा पॅकिंग करून ठेवतात... निघायचं म्हणून आई माधवी साठी फराळ बनवून ठेवते, दोघीही दिवसभर एकमेकींसोबत वेळ घालवतात....
नलू: तु मला विसरु नकोस म्हणजे झालं....
मी तुला विसरणार का, तू तर माझी जीवाभावाची मैत्रीण आहेस, तुला अशी कशी विसरेन, तूच तर आहेस मला समजून घेणारी.... दोघींच्याही डोळ्यात पाणी येत... दोघी एकमेकींना गळाभेट करतात......
मनोहरराव: एवढ्या कमी वयात पोरीला काय काय पाहावे लागणार आहे देवच जाणे... श्रीपतराव तुम्ही आहे म्हणून आम्हाला काळजी नाही, हुंड्याचे पैसे हळूहळू जमा करून देऊ आम्ही, त्याची काही गरज नाही......
अहो पण जवाईबापू.....
त्याला समजावीण मी तुम्ही काळजी करू नका, निवांत राहा....
संध्याकाळी श्रीकांत ऑफिस मधून येतो.….. नलु दार उघडते... अरे भाऊजी..… माधवी भाऊजी आले ...माधवी पाणी घेऊन येते ,श्रीकांत टिपॉयवर बॅग ठेवून सोफ्यावर बसतो माधवी पाणी देते आणि तो बाबा.....बाबा.... आवाज देतो तोवर माधवीची आई चहा घेऊन येते सगळेजण चहा घेतात......
" बाबा ,मी तिकीट घेऊन आलोय" हे बघा... चहाचा कप बाजूला ठेवत तो बाबाला तिकीट देतो, उद्या दुपारची ट्रेन आहे तीन वाजता ची मी उद्या सुट्टी काढली आहे.....बाबा टिकीट बघतात....
" अरे हे काय? तू पाच तिकीट घेऊन आलास" बाबा तुम्ही म्हणालात न की आम्ही जातोय... अरे तिकीट फक्त तीनच पाहिजे होते म्हणजे माधवीचे आई-बाबा आणि नलु चाललेत..... मी आणि माधवी आहोत तुझ्याबरोबर....
श्रीकांतच्या हातचा कप खाली पडतो.....
"अहो काय झालं" तुम्ही इतके दचकलात का?
काही नाही .....पण बाबा तुम्ही म्हणालात ना आम्ही सगळे निघतोय मला वाटलं की तुम्ही सगळेजात आहात, श्रीकांत ला जरा धक्काच बसतो.....he is nervous...
तो त्याच्या रूममधे जातो बॅग बेडवर फेकून देतो मोबाईल फेकतो टाय "गळ्याभोवती फिरवून फिरवून सगळा राग काढतो....
श्रीकांत रात्री जेवणाच्या टेबल वर सगळे बोलत होते ,पण श्रीकांत बोलला नाही गप्प होता ,जेवण झाल्यावर सगळे टीव्ही बघत हॉल मध्ये बसले ,श्रीकांत दरवाजा उघडून बाहेर येतो, तितक्यात माधवी आवाज देते,
" अहो कुठे चाललात?"
येतो जरा पाय मोकळे करून असे म्हणून निघतो ....पाय मोकळे करण्याचा फक्त बहानाअसतो खाली जाऊन आधी मोनाला फोन करतो
हॅलो, मोना ...मोना माझ्याकडचे पावणे जाणार आहेत असं मी म्हणालो होतो ना पण ते नाही चालले ....
म्हणजे?
सगळेच नाही चालले.....
पण कोण जातंय हे काही सांगणार आहेस कि नाही....काय कोण जाते, कोण थांबतय....
( तो थोडा चिडून)
कोणी नाही ग मी ठेवतो, सकाळी बोलू.... (आता त्याला एक प्रश्नच पडला की मोनाला काय सांगायचे माधवी कोण आहे ते,) श्रीकांत वरती येतो सगळे झोपलेले असतात तोही रूम मध्ये जाऊन झोपतो दुसऱ्या दिवशी सकाळी श्रीकांत रूमच्या बाहेर येतो तेव्हा सगळे हॉलमध्ये चहा नाश्ता करत बसलेले असतात त्याला समोर एक अनोळखी चेहरा दिसतो ....
(श्रीकांत चे विचार सुरू होतात ....)
हा कोण आहे आणि आपल्या घरात काय करतो (मनातल्या मनात बोलतो).....
आता ती व्यक्ती कोण आहे, आणि बाबांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे श्रीकांत देऊ शकेल का? समीर च्या आई बद्दलही श्रीकांत खोट बोलला आता एक खोट लपवण्यासाठी श्रीकांत काय काय करतो, हे पाहू पुढच्या भागात.....
क्रमशः....
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा