Login

पुढचं पाऊल.... भाग 15

Reva madhvila shant karun tichya ghari jate... Shailaja: kay g reva, kuthe geli hotis... Kahi nahi aai madhavi kade gele hote.. Ka?kay zal?

पुढचं पाऊल....
भाग 15

आधीच्या भागात,

माधवी सोबत पुन्हा काहीतरी विचित्र घडतं आणि ती सैरावैरा होऊन जाते ....रेवा तिला शांत करते आणि घरी जाते, माधवी आत रूम मध्ये जाऊन शांत पडते....

आता पुढे,

रेवा माधवीला शांत करून तिच्या घरी जाते.....

शैलजा: काय ग रेवा, कुठे गेली होतीस...

काही नाही आई माधवी कडे गेले होते...
का? काय झालं ?आणि चेहरा का कसा दिसतोय?

आई माधवी सोबत ना विचित्र प्रकार घडत आहे .... विचित्र म्हणजे?

अहो त्या साईडच्या काकु, ज्या मरण पावल्या...

हं.. ती निर्मला, तिच काय आता?
त्या निर्मला काकू म्हणे हिला दिसतात, हिच्याशी बोलतात...

काय? अगं पण ती निर्मलाच आहे कशावरून ... हीनी तर कधी तिला पाहिलं पण नाही....

पाहिलं, नाही पाहिलं ते जाऊ द्या पण त्या घरात कोणीच राहत नाही मग हिला कस दिसत...
अहो थोड्यावेळापूर्वी तिने मला मेसेज करून बोलावलं... म्हणे काकू आल्या आहेत जेव्हा मी गेले तेव्हा तिथे कोणीच नव्हतं.... तिला सायक्याट्रिक कडे न्यावे लागेल....

बघा काय करायचं. तिच्या नवऱ्याशी पण  बोलावं लागेल....
ह.... बघू आई.....

….......................


समीर ऑफिस मधून निघतो... थेट मोना कडे जातो....... कारण मोना रागावून गेली तेव्हापासून तिच्याशी काही कॉन्टॅक्ट नव्हता.....

मोना.... मोना.....तो बेल वाजवतो... काही रिस्पॉन्स येत नाही...... तो दाराला थापा मारतो ....
थोड्यावेळानी मोना दार उघडते....

मोना.. डार्लिंग....

तू आज इकडे.... इथे का आलास..?..

जा ना तुझी बायको आहे ना घरी....मला तुझ्याशी बोलायचं नाही आहे....

ये मोना डार्लिंग ...सॉरी ना.. असं म्हणत तो तिला hug करतो, तिच्या गालावर किस करतो..…आणि आत जातो,
ती त्याच्या मागे मागे येते...
मोना कॉफी बनव ना गरमा-गरम, मी थकलोय आज...

ओ... हो... मी तुझा थकवा आत्ता काढू शकते चुटकीसरशी असं म्हणत ती त्याला बिलगते आणि गालावर किस करते .....तो हळूच तिला बाजूला सारून...
आता नाही ... नंतर .... असं म्हणत,
आता मला कॉफी देतेस प्लीज...

ओके dear...
श्रीकांत पाय ताणून  डोक्यावर हात ठेवून सोफ्यावर पसरतो, पाच मिनिटात मोना कॉफी आणते ..

कॉफी... गरमागरम.. कॉफी....
पाहते तर काय हा झोपलेला...
अरेच्या हा झोपला देखील ....

कोई बात नही... तोपर्यंत मी घेते ,ती कॉफी घेते आणि श्रीकांतच्या पायातले सॉक्स शूज काढून ठेवते ,गळ्यावरचा टाय बाजूला काढून ठेवते..

म्युझिक ऑन करते....

भिगे होठ तेरे.....गाणं सुरू असतं...
ती थोडा volume वाढवते...

  ★  ~कभी मेरे साथ कोई रात गुजार ~
        ~तुझे सुबह तक मै करू प्यार ~
            ~ओ वो ओ ओ ओ~★

श्रीकांत झोपलेलाच ,
मोना गाण्याचा आस्वाद घेत त्याच्या जवळ जाऊन त्याच्या गाला वरून हात फिरवते, ओठा जवळ ओठ नेते आणि समोर काही करणार ....तितक्यात श्रीकांत जागा होतो..

" हे काय करतेस?"
काही नाही, तू झोपला होतास ना तर तुझ्या जागण्याची वाट बघत होते....
तुला कॉफी सांगितली होती ना, बनवलीस का?

बनवली आणि प्यायलेसुद्धा...

एकटीच ?..तो आश्चर्याने ..
का ?
काय म्हणजे काय, तू झोपला होतास...

ओके ,तू आता आण आता.. माझं डोकं जड झालंय...

हो आणते कॉफी,... काय रे जास्त काम होत का आज ऑफिसमध्ये ...

नाही ग बॉस नी सगळा लोचा केला...
मोना कॉफी आणते, तो घेतो पटापट..

अरे.. अरे..आरामात...

हो ग,, उशीर झालाय निघतो मी
वाट पाहत असतील घरी ....

ये डार्लिंग, थांब ना रे ,असं काय करतो ....एकतर इतक्या दिवसांनी तु मला भेटतो.... इतक्या दिवसात मला फोन केलेला नाही .....ये थांब ना प्लीज...

घरी प्रॉब्लेम सुरू होता ना म्हणून मी नाही करू शकलो फोन...
sorry ग...
sorry वगैरे काही नाही, तुला खरच guilty वाटत असेल
आणि तुझं माझ्यावर प्रेम असेल तर तू आजची रात्र इथेच थांब.....घरी काय सांगायचं ,ते सांग...

done,ok......

......................

रात्रीचे नऊ वाजलेले ,माधवी आणि बाबा श्रीकांतची वाट पाहत बसले होते..
माधवीचा फोन वाजतो...
हॅलो ...
हॅलो माधवी ...अग मला थोडा उशीर होईल आज यायला..

थोडा म्हणजे? अहो नऊ वाजलेत आता अजून किती उशीर ? बाबा आणि मी जेवणासाठी थांबलो आहोत..

अगं नाही, तुम्ही जेवून घ्या ...माझी वाट बघू नका, मी ऑफिस कॅन्टीनमध्ये काहीतरी खाऊन घेईन.... आज ऑफिसमध्ये बरच काम आहे, मला पूर्ण रात्र लागू शकते...ok by... अहो पण.... ती काही बोलणार इतक्यात फोन कट होतो....
काय ग?
बाबा यांना यायला उशीर होणार आहे, आपण जेवून घेऊ...


मोना खुश होऊन, इ...... wow श्री डार्लिंग..
I m so happy....

काय खाणार तू, काय करू मी..
ऑर्डर करण्यापेक्षा बनव ना काहीतरी ..
नाही मला ते नाही जमत आणि तू असताना मला ते बनवण्यात वेळ घालवायचा नाहीये ..
ओके तू ऑर्डर कर, तुला काय मागवायचे ते बघ...

मोनाला fastfood  खूप आवडत  म्हणून ती पिझ्झा बर्गर आणि नूडल्स ऑर्डर करते.... थोड्यावेळाने ते दोघे खाऊन घेतात...
तो फ्रेश होऊन हॉलमध्ये येऊन बसतो.. मागेहुन मोना बोल्ड अँड शॉर्ट outfit घालून येते ...तो डोळे फाडून, आ करून तिच्याकडे बघतच राहतो..

हे बेबी, कशी दिसते मी ?

gorgeous.... beutiful.....

हो ना पण तुला त्याच काहीच नाही....

मग... ती त्याचा हात पकडून त्याला बेडरूममध्ये घेऊन जाते.... त्याला बेड वर पाडून, त्याला मिठी मारून ,किस करून स्वतःमध्ये गुंतवण्याचा प्रयत्न करते ..
शारीरिक जवळीकता साधते..... पुरुषांना काय तेच हव असत आणि मग नको ते घडत......

सकाळी जाग येते, तेव्हा दोघेही नको त्या अवस्थेत असतात.... दोघे ताडकन उठून एकमेकांकडे बघत स्वतःला झाकण्याचा प्रयत्न करतात...तो बेड वरून उतरतो, कपडे घालतो...... आणि काहीही न बोलता निघून जातो.....

......................

श्रीकांत घरी आल्यावर,  टीपाय वर बॅग ठेवून, सोफ्या वर पाय पासरुन बसतो....
अहो तुम्ही, कधी आलात?

आत्ताच आलो, चहा आन जरा.... मला फ्रेश होऊन निघायचय लवकर......
अहो, आत्ताच तर आलात ना तुम्ही आणि लगेच निघायच म्हणताय..... रात्रभर काम करून आलात ना तुम्ही आणि आता अजून......तिची बोलणं कापत.....

गप्प ग...... डोकं दुखवू नकोस ,एक तर रात्रभर जागा होतो मी... आता बडबड करून डोक्याला ताप आणू नकोस ....

श्रीकांत आंघोळ करून, तयार होऊन पुन्हा ऑफिसला जातो..... बिचारी माधवी डोळे झाकून विश्वास ठेवते श्रीकांतवर,  तिच्या मनात क्षणभरही शंका आली नाही त्याच्याबद्दल.....
भोळेपणाचा फायदा अजून काय?

आज माधवी, रेवा आणि गौरी स्केच काढणाऱ्याकडे जाणार होत्या .... स्केच वरून त्या निर्मला काकूच आहेत की नाही हे बघायचं होत.....

कारण  शैलजा काकू निर्मला काकुना ओळखायच्या, म्हणजे त्यांची जुनी ओळख होती जेव्हा ते तिथे राहायचे....
रेवा आणि मिलिंदच्या लग्ना पूर्वी.......

माधवीने वर्णन केलेल्या स्केच वरून त्या निर्मला काकूच आहेत की नाही, की अजून दुसरं कुणी आहे ....हे सिद्ध होणार होतं आणि जर का त्या निर्मला काकूच असतील तर मग भयंकर ......
गंभीर........

0

🎭 Series Post

View all