पुढचं पाऊल....
भाग 16
आधीच्या भागात आपण पाहिले
माधवी, रेवा आणि गौरी तिघेही स्केच काढणाऱ्या कडे जाणार होत्या... त्यांनी सर्व माहिती काढली होती, त्या निघण्यासाठी तयार झाल्या....
आता पुढे ,
तिघी सोबतच घरून निघणार तितक्यात बाबांनी आवाज दिला
माधवी कुठे चाललीस बेटा?
बाबा मी जरा बाहेर जाऊन येते ....
गरज नसेल तर आज नको जाऊ बेटा...
का काय झालं बाबा?...
बरं वाटत नाही आहे का...
मला थोडं अस्वस्थ वाटतं आहे ...
ठीक आहे मी आज नाही जात जाईन पुन्हा कधी तरी...
त्यांचा प्लान फिस्कटला ......
गौरी ,रेवा sorry ग, मी बाबांना सोडून नाही येऊ शकत, खरच सॉरी, आपण नंतर जाऊ या...
ठीक आहे ग, आम्ही निघतो, काळजी घे....
त्या दोघी निघतात.......
बाबा काय होतं तुम्हाला ?छातीत दुखतय का....
बाबा मी यांना फोन करते...
हेलो ...
ह...माधवी बोल
अहो... बाबांना बरं वाटत नाही आहे, त्यांच्या छातीत दुखतंय....
काय?
तुम्ही येता का लवकर...
माधवी मला खूप काम आहे .....तो जरा चिडून.....
ती आश्चर्याने
काम?....इथे बाबांना बरं नाही आहे आणि तुम्हाला कामाची पडली आहे..... ती पण थोडी चिडून.... अहो बाबांना छातीत दुखतय ,त्यांना कमीजास्त झालं तर मी काय करू, मला इथंच काहीच माहिती नाही..
माझी काम संपलं की निघतो मी....
काम संपलं की,अहो पण... ती काही बोलणार, फोन कट होतो..
आता मात्र माधवीची चिडचिड आणि धडधड दोन्ही सुरू झाले, काय करू मी काय नको अस झाल होत....
बाबा आत रूम मध्ये लेटतात, ती आत जाते...
बाबा बरं वाटतंय का तुम्हाला? मी यांना फोन केला हे येथील लवकर, दुखतय का? छातीला हात लावून का बसला आहात तुम्ही ?....बोला ना बाबा....(ती स्वतःशीच) समीर भाऊजींना फोन करू का? नाही पण त्यांचा नंबर नाही आहे माझ्याकडे.... हे देवा मी काय करू माधवी panic होते , बाबांची हळूहळू शुद्ध हरपते, बाबा बेहोश होतात ....ती पुन्हा बाबा ...बाबा काहीतरी बोला ना.... आता माधवी चे patience संपले, तिला रडायला आलं.... ती धावत धावत रेवाकडे जाते ,,काकू दार उघडतात.....
..............................
काकू बाबांना बरं वाटत नाहीये.... ते बेहोश झाले, मी काय करू नि काय नाही, मला काही समजत नाही आहे यांना फोन केला तर हे फोन उचलत नाहीत..... माधवी रडायला लागते....
माधवी शांत हो, मिलिन्द आहे घरी. तो करेल काहीतरी.....
मिलिंद काकांना काय झाले बघून ये .....मिलिंद आणि माधवी घरी जातात,
बाबा.....बाबा.. उठा नहो..
काय झालं काकांना?
माहिती नाही, त्यांच्या छातीत दुखत होत, आणि अचानक ते बेहोश झाले.....
तुम्ही काळजी नका करू, आपण यांना हॉस्पिटल ला घेऊन जाऊ..... मी गाडी काढतो आणि वाचमेन काकाला आवाज देतो..... तो गाडी काढतो ....श्रीपतरावांना हॉस्पिटल मध्ये घेऊन जातो..... मीलिंद सगळ्या फॉर्मॅलिटी पूर्ण करतो ....डॉक्टर पेशंटला आत घेऊन जातात.... बाबांना हार्ट अटॅक आलेला असतो, बाबांची प्रायमरी ट्रीटमेंट सुरू होते ....
त्यांच्या हार्ट मध्ये ब्लॉकेज आलेले असतात अशावेळी हार्ट मधल्या veins ब्लॉक होतात....
डॉक्टर : कोरोनरी अँजिओग्राफी करावी लागेल...
आणि फीस सांगतात एक ते दीड लाख रुपये ...
हे सगळं ऐकून माधवी हादरते.... श्रीकांत अजून हॉस्पिटल ला आलेला नव्हता...
डॉक्टर तुम्ही ट्रीटमेंट सुरू करा, मी पैशाची व्यवस्था करते...
नाही पण काही deposit भरावं लागेल, तुम्ही लवकरात लवकर पैशाची व्यवस्था करा त्यांची तब्येत बिघडत चालली आहे...
मिलिंद भाऊजी आता काय करायचं हे फोन उचलत नाहीयेत ,मिलिंद भाऊजी तुम्ही घरी चला माझे काही दागिने आहेत मी ते विकते ....
ठीक आहे...वहिनी
..............................
माधवी घरी जाते ,,तिच्या जवळचे सगळे दागिने घेऊन ती जवळच्या सोनारा कडे जाते..... तिथे सर्व दागिने विकते पण तिला फक्त 75 हजार रुपये मिळतात ....
ती सोनाराला: (गहिवरून) दादा थोडे जास्त मिळतील तर बघा ना, दादा मला दीड लाख रुपयांची गरज आहे, अहो दादा मी तुमचे जास्तीचे दिलेले पैसे परत करील पण मला पैसे द्या ....please दादा....
साईडला एक हँडसम, गॉगल लावलेला व्यक्ती उभा होता तो हे सगळं खूप बारकाईने बघत असतो ...
excuse me... can i help you?
ती डोळे पुसत.. नाही काही...
तेवढ्यात सोनार,....
अहो या बाईंनी दागिने विकायला आणले त्याचे 75 हजार रुपये दिले पण यांना जास्त हवेत, आता जास्त कुठून देऊ यांना, मी तर यांना ओळखतही नाही......
तो भराभर आपली laptop बॅग उघडतो, त्यातला chekbook मधून एक चेक काढून, blank चेक वर sign करतो.... तो हिच्यासमोर पकडून....
excuse me, तुम्ही हे घ्या, आणि यावर तुम्हाला हवी तेवढी रक्कम घाला...
अहो नाही, actually ना माझ्या मिस्टराकडे असतील पैसे, पण ते फोन उचलत नाही आहेत आणि माझ्या बाबांना म्हणजे माझे सासरे त्यांना heart attack आलाय, डॉक्टरांनी angiography साठी एक ते दीड लाख रुपये सांगितले आहे जोपर्यंत deposit भरणार नाही तोपर्यंत treatment सुरू होणार नाही असे म्हणतात म्हणून मी माझे दागिने विकायला आणले... माधवीला रडूच आलं.....
तो खिशातून रुमाल काढून तिच्या समोर ठेवून... हे घ्या डोळे पुसुन घ्या आणि हा चेक घेऊन जा हॉस्पिटलला....
अहो पण, मी तुम्हाला ओळखत नाही ...आणि एवढी मोठी रक्कम ...
ओळख होईल समोर ,तुम्ही आधी निघा .....
एक मिनिट मी सोडतो तुम्हाला ,कोणत्या हॉस्पिटल ला जायचे आहे..
" आशीर्वाद हार्ट हॉस्पिटल" ओके चला मी सोडतो...
तो माधवीला हॉस्पिटलमध्ये सोडतो,, डिपॉझिट जमा करतो.... डॉक्टरशी बोलतो....
excuse me, मी निघतो... तुम्ही काळजी घ्या...
पण तुमचे पैसे....
रिलॅक्स, होईल सगळं ठीक.....
..............................
बाबांची treatment सुरू होते...माधवी पुन्हा श्रीकांत ला फोन करते... पुष्कळदा फोन केल्यानंतर तो फोन उचलतो....
चिडूनच..काय आहे माधवी, का इतक्यांदा फोन करतेयस तुला सांगितलं ना मी कामात आहे...
अहो बाबांना हार्ट अटॅक आलाय....
काय?
त्यांना हॉस्पिटल मध्ये ऍडमिट केले...
मग आधी का नाही सांगितलं?
तुम्ही फोन उचलाल तर सांगेल ना....
ओके कोणत्या हॉस्पिटल मध्ये आहे.. मी तिथे येतो..
" आशीर्वाद हार्ट हॉस्पिटल",
ॲड्रेस सांग, एक मिनिट मी विचारते हॅलो तीलक रोड घाटकोपर ईस्ट ...
तासाभरानी श्रीकांत येतो
ती त्याला सगळं सांगते ,त्या अनोळखी व्यक्ती बद्दल पण सांगते ....श्रीकांत तिला धीर द्यायच सोडून तिच्यावर ओरडतो की दागिने विकायची काय गरज होती मी दिले असते ना पैसे अजून काही काही बोलतो.....
ती गप्प उभी होती ....
थोड्यावेळाने डॉक्टर येतात ,माधवी जाणार.... तर श्रीकांतच समोर होऊन...
Hello doctor.. कसे आहेत माझे बाबा?
ते आता out of denger आहेत, आणि तुम्ही पैशाची व्यवस्था लवकर केलीत, हे खूप बर झालं नाहीतर त्यांच्या जीवाचं काही बर वाईट झालं असत .....आणि त्यांना 2-3 दिवस under observation ठेवावे लागेल ,, तुम्ही formality पूर्ण करून घ्या....
श्रीकांतला थोड गिल्टी फील झालं आणि तो माधवी जवळ जाऊन...
sorry, मी तुझ्यावर ओरडलो आणि thank you तू बाबांसाठी एवढं केलं....
का, ते माझे बाबा नाही आहेत आणि मी हे तुमच्यासाठी नाही तर त्यांच्यासाठी केलं...
ओके... ओके... पण मी तुझे दागिने लवकरच परत आणून देईल आणि ते तू कुणाकडून पैसे घेतलेस तेही त्यांना परत करेल . .
ओके, आता थोडी रिलॅक्स हो...
तू जातेस का घरी, तसही दिवसभर तुझी खूप दमछाक झाली आहे तू जाऊन फ्रेश हो....
नाही आपण दोघे जाऊ या , तसही बाबा under observation मध्ये आहेत, मगाशी सिस्टर सांगून गेल्या आज रात्री कोणी नाही थांबलं तरी चालेल....
ok, मग आपण निघुया.....
दोघे एकमेकांच्या चेहर्याकडे बघून स्मितहास्य करतात......श्रीकांत माधवीचा हात हातात घेतो
आणि दोघेही निघतात......
क्रमश:
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा