माधवीनी मनाशी ठरवलं होतं.......
मुंबई गाठायची........
ती आई-बाबांशी बोलली.... आई, मी मुंबईला जायचं ठरवलं ,मला बघायचंय श्रीकांत कुठे राहतो, काय करतो कुणावर पैसे उडवतो...... आई मला जायचं आहे.....
"एवढ्या मोठ्या शहरात कुठे जाणार"- माधवीची आईनी विचारलं.... आई मी एकटी जात नाही आहे,
तुम्ही दोघेही आणि बाबा (सासरे)आपण सगळे जातोय....
मनीष( माधवीचा भाऊ) त्याला इकडे राहू दे तो बघेल इकडचं सगळं ,मी एकदा बाबांशी (सासरे) बोलून घेते....
तुही बाबांशी बोल .....
माधवी : बाबा मी ठरवलं आपण मुंबईला जायचं....
अग पण पोरी मुंबईला जाऊन आपण काय करणार? इथे शेती आहे ,घर आहे.... शेती करू आणि दोघेजण राहू.... तिथे मुंबईत कुठे राहणार, काय करणार ,एवढे मोठे शहर आहे, आपण तिथे काय करणार ?
नाही... पण बाबा, आपण श्रीकांतला वाऱ्यावर नाही सोडू शकत, ते तिथे मज्जा करणार आणि आपण इथे सोसत राहायचं...… नाही बाबा आपण जायचं ,कोणीतरी त्याच्याशी बोललं पाहिजे, आता जर लगाम खेचली नाही तर तो खूप समोर जाईल, मी काकूंच्या भाच्या कडून पत्ता मागवते..... आपण उद्या सकाळी निघतोय ,माझे आई बाबा पण येतात आपल्या सोबत.... तिनी सोबतीला नलूला पण घेतलं .....एकाच वयाच्या असल्यामुळे मनातल्या गोष्टी बोलायला बरं होतं म्हणून, म्हणजे अशी आई म्हणाली.... ठीक आहे बेटा, तुला जस वाटते तसं ,जाऊ आपण.... दिवसभर माधवीनी पॅकिंग केली आणि रात्री लवकर जेवण करून झोपले....
..............
दुसऱ्या दिवशी माधवी लवकर उठून तयार झाली, हाताशी काही हवे म्हणून सोबत डबे घेतले, स्टेशनवर पोहोचले.... रेल्वेत माधवी खिडकी जवळ बसली.... बाजूला एका मुलाच्या बाजूला हातात छोटा टेपरेकॉर्डर होता ,त्यावरील गाणं वाजत होतं....
" मन जडले असे
घडले हे कसे
लागे जीवाला मनाला ओढ हृदयाची
तुझ्याविना सूर सुना घेशील ना
कुठला गुन्हा घडला असा सांगून जा "
गाण्याचे हे बोल कानावर आले आणि माधवीला वाटलं जणू कुणीतरी आपली जीवन गाथा गात आहे.... खिडकीजवळ बसून माधवी जीवनाचे पान उलटत होते झुळझुळ वार्याने माधवीचा डोळा कधी लागला तिलाच कळले नाही, जाग आली तेव्हा कोणाचा तरी हात खांद्यावर होता.... माधवी स्टेशन आले, आपण मुंबईला पोहोचलो .....स्टेशनवर उतरले, टॅक्सी पकडली आणि थेट श्रोकांतच्या घरी....
बेल वाजली त्यानी दार उघडलं ,दार उघडताच माधवीला बघून त्याचे तोंड उघडेचे उघडे राहिले ,डोळे मोठे विस्फारलेले जणू त्याला 408 वॅट चा झटका बसला .....
एकेरी नाव घेणारी आता अहो जाहो करायला लागली....
.............
अहो ,असं काय बघताय?
माधवी तू ...तू कशी आलीस?
एकटे नाही आले पूर्ण पलटणला घेऊन आले..... आई-बाबा या सर्व, आपल्या स्वागताला उभे आहेत हे.... माझा फोन उचलत नव्हतात तुम्ही, मला आणि बाबांना तुमची खुप खुप आठवण यायची आणि वैद्य नी पण सांगितलं बाबांना जरा फेरफटका मारून या, म्हटलं चला मुंबई ...… सोबत आई-बाबा आणि नलुला घेतलं.
सगळे असे भासवत होते की आम्हाला काही माहीत नाही त्याच्याबद्दल ....
किती मजा येईल ना आपण सर्व इथे छान सोबत राहू ,मला एकटीला त्रास झाला होता तिथे शेतावरच्या घरात, श्रीकांत चेहऱ्यावर आनंद दाखवत होता पण मनातून त्याला राग आला होता
"तुम्ही सर्व बसा, मी चहा टाकते....
तू बस ना, मी बनवतो चहा, बनवता येतो मला....
तुम्ही सर्वजण तोपर्यंत फ्रेश होऊन जा, मी रुक्मिणी मावशीला फोन करून बाजूची रूम साफ करायला लावतो .मी एकटाच असल्यामुळे ती रूम बंद राहते..(श्रीकांत अटकत अटकत बोलला) सर्वजण फ्रेश झाले....लांबचा प्रवास असल्यामुळे थोड थकल्यासारखे झाले होते...
सर्वांनी चहा घेतला..
"छान झाला, चहा...
थँक्स ..
सगळे त्याच्याशी खूप प्रेमाने वागत होते
नाही म्हणजे त्याला तस वाटायला नको म्हणून....
दुसऱ्या दिवशी रविवार असल्यामुळे सुट्टी होती, सगळ्यांनी बाहेर फिरायला जाण्याचा बेत केला, श्रीकांतला तसं विचारलं , पण तो चक्क नाही म्हणाला त्याला तसेही हे लोक इकडे आलेले आवडलेल नव्हतं..... त्याची चिडचिड सुरू झाली...
"हे बघ माधवी, एक तर तू मला न कळवता आली, सोबत सगळ्यांना घेऊन आलीस, का केलंस तू असं?
"अहो, असं काय करता आपलीच माणस आहेत ना ती,
"प्रायव्हसी नावाची काही वस्तू असते की नाही"
प्रायव्हसी?...
ती मिळेल हो....
(आज याला कुठून प्रायव्हसीच सुचलं)
ह... सटवी कडे जायचं असेल, नाही तर तिला इकडे बोलवायचं असेल.... माधवी मनातल्या मनात बोलली....
आज तुम्हाला सुट्टी आहे ना ,आपण जाऊ या बाहेर.....प्लीज, आम्हाला दाखवा तरी मुंबई.... माझ्यासाठी नाहीतर बाबांसाठी तरी चला.... ठीक आहे जाऊ....सगळेजण तयार व्हा ....सकाळच्या चहा नाश्ता होतो आणि सर्वजण बाहेर जायला तयार होतात...
क्रमश:
कथा कशी वाटली प्रतिक्रिये मध्ये नक्की कळवा
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा