(आधीच्या भागात, सर्वजण बाहेर फिरायला जाण्याच ठरवतात... , श्रीकांत आधी नकार देतो पण नंतर तयार होतो)
आता पुढे........
सर्व जण तयार होऊन खाली येतात ,श्रीकांत टॅक्सी मागवतो....टॅक्सी यायला वेळ असतो , माधवी सहजच "अहो, सगळ्यात आधी आपण कुठे जायचे.....
" जाऊ या, विचार करतो मी, मी तसं पूर्ण काही पाहिलेल नाहीये ..बघतो ...टॅक्सीवाला सांगेल ना सगळ,
त्याला येऊ दे आपण त्यालाच विचारू, ठीक आहे....
इतक्यात नलु
"माधवी ड्रेस घालायला हवा होतास ना फिरायला जाताना" काय हे साडी-बिडी... टिपिकल आहेस तु.... श्रीकांत बाजूला उभा राहून ऐकत होता "काय भाऊजी, बरोबर बोलते ना मी"
अ..... हो.... बरोबरच आहे, सलवार का नाही घातला माधवी.... मी सलवार नाही हो आणले, फक्त साड्या घेऊन आली आहे.....
" जाताने पाहू आपण तुझ्यासाठी ड्रेस"
................
टॅक्सी आली.... सगळेजण टॅक्सीत बसले , आणि निघाले.....
टॅक्सीवाला:-
"कुठे जायचे दादा?"
अरे इथे फिरण्यासारखी कुठली छान ठिकाण आहे ते सांग,
म्हणजे आम्ही इथे नवीनच आहोत, आम्हाला तेवढी माहिती नाही ना,म्हणून तुला विचारतोय। ..
ठीक आहे ना दादा मी दाखवतो तुम्हाला छान छान ठिकाणे.... सगळ्यात आधी मी तुम्हाला "छोटा कश्मीर" दाखवतो...
" छोटा काश्मीर" माधवी आश्चर्यचकित झाली..
टॅक्सीवाला:-
काय हो आई बाबा तुम्हाला आवडेल का इथे जायला.... हो आमच्या काय आवडीनिवडी जिथे नेशील तिथे येऊ... माधवीची आई बोलली ....
इथून पाच किलोमीटर अंतरावर आरे कॉलनी मध्ये "छोटा कश्मीर" नावाचे एक मोठे उद्यान आहे.... तिथे अनेक प्रकारचे रंगीबिरंगी फुलझाडे आहेत... मउशीर हिरवळ आहे, नारळाचे झाडे आहेत ....मी सांगत काय बसलोय? तुम्ही स्वतःच पहा तेव्हा कळेल तुम्हाला कसं आहे ते.... आणि तुम्हाला माहिती आहे का बाबा कधी कधी तर इथे शूटिंग सुद्धा होतं.....
"छान"
बोलता-बोलता पाच किलोमीटरचे अंतर कसे गेले कळले नाही
..…..........
उद्यान च ठिकाण आलं....
उद्यान च्या पार्किंगमध्ये गाडी लावली ,सगळे उतरले... एन्ट्री च्या आधी सगळ्यांनी टपरीवर मस्त गरमागरम चहा प्यायला, श्रीकांत च्या हाताला माधवीचा चुकून धक्का लागला आणि त्याच्या पॅन्ट वर चहा सांडला....
"माधवी काय करतेस... सगळा खराब झाला माझा पॅन्ट"
अहो मी साफ करून देते ना.... सॉरी .....चुकून धक्का लागला... आपल्या साडीच्या पदराने त्याची पॅन्ट पुसू लागली....
काय सुरू आहे तुझं माधवी..... तुझी साडी नाही का खराब होणार, ते सगळं सोड ...इथे जवळच मला एक मॉल दिसल.... आपण तिथे जाऊन शॉपिंग करू, चेंज करू आणि येऊ...
बाबा मी तिकीट काढून देतो तुम्ही आतमध्ये जा ,आम्ही येतो तोपर्यंत,आई बाबा तुम्ही ही जा बाबासोबत...
" नलू तू येतेस का माझ्याबरोबर...माधवी
नाही ग माधवी तु जा भाऊजी सोबत... मी काका काकु सोबत जाते आतमध्ये.... तिने मुद्दामच नाही म्हटलं कारण कितीतरी महिन्यानंतर थोडावेळ का होईना दोघेही एकत्र राहणार होते...
दोघे मॉलमध्ये गेले ... वरच्या फ्लोअर वर जायचे म्हणून पायऱ्या जवळ गेले...मुविंग स्टेअरकेस बघून माधवी जरा गोंधळली....अहो मी हे पहिल्यांदा बघत आहे, मला भीती वाटतेय ...
काही नाही एवढ मोठं, अगं त्यावर एक पाय ठेव समोर सरकले की दुसरा ठेव मग आपण आपोआपच वर जाणार फक्त उभे राहून ,
नाही पण मला भीती वाटते....
काही नाही ग चल .... असं म्हणत त्याने माधावीचा हात पकडला आणि स्वतः एक पाय टाकत तिला खेचलं स्वतःकडे ...
दोघे एकदम जवळ आले माधवी डोळे घट्ट मिटून उभी होती, पहिला फ्लोअर आला आणि त्यांनी पुन्हा माधवीला स्वतःकडे खेचलं....
आज त्याचा तो स्पर्श वेगळाच वाटायला लागला,
खूप कमी स्पर्शीक क्षण होते तिच्याकडे....
तो भळाभळा काहीतरी बोलत होता पण हिच्या कानावर काहीच पडत नव्हतं ...ती फक्त त्याच्या डोळ्यात पहात होती ,त्या स्पर्शाने भाळून गेली होती .....
" बावरा मन देखने
चला एक सपना
बावरे से मन की देखो
बावरी हे बाते"
क्रमश:
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा