*पूजा*
बहरून आलेला मोगरा
पलीकडे उमलून आलेली चांदणजाई
दारातच पडणारा प्राजक्ताचा सडा
आणि फुललेली कमळं ठायी ठायी
माझ्या घरकुलााभोवती फेर धरून डोलणारी
आल्या गेल्याचं मन मोहवून टाकणारी
स्वतःच्या गन्धानं मन भरुन टाकणारी
माझी बाग...
त्यांच्यावर मायेने हात फिरवताना
मनीचे गुज त्यांना सांगताना
नकळत भरून येतात डोळे
माझ्यातल्या मीपणाला
आहे तसं स्वीकारत
माझ्या डोळ्यातील पाण्यानी भिजलेली माझी झाडं....
माझी झोळी मात्र नेहमीच सुगन्धाने भरतात
तीच फुले लेऊन
माझे देव माझ्याकडे बघून
हळूच हसतात....
माझी पूजा पोचते आहे त्यांच्या पर्यंत
याची जणू खात्रीच देतात!
पलीकडे उमलून आलेली चांदणजाई
दारातच पडणारा प्राजक्ताचा सडा
आणि फुललेली कमळं ठायी ठायी
माझ्या घरकुलााभोवती फेर धरून डोलणारी
आल्या गेल्याचं मन मोहवून टाकणारी
स्वतःच्या गन्धानं मन भरुन टाकणारी
माझी बाग...
त्यांच्यावर मायेने हात फिरवताना
मनीचे गुज त्यांना सांगताना
नकळत भरून येतात डोळे
माझ्यातल्या मीपणाला
आहे तसं स्वीकारत
माझ्या डोळ्यातील पाण्यानी भिजलेली माझी झाडं....
माझी झोळी मात्र नेहमीच सुगन्धाने भरतात
तीच फुले लेऊन
माझे देव माझ्याकडे बघून
हळूच हसतात....
माझी पूजा पोचते आहे त्यांच्या पर्यंत
याची जणू खात्रीच देतात!
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा