Login

पूर्नजन्म भाग - एक

एका स्रीची प्रेरणादायी कथा

               आरोहीच्या घरी आज सगळे खुप आनंदात होते. आरोहीला सगळे चिडवत होते.
त्याला कारणही तसच होत. आज घरात सर्वात लहान असणारी आरोहीला पाहायला पाहुणे आले होते आणि तिच लग्न ठरल होत. आरोही म्हणजे दिसायला खुप सुंदर, सोंदर्याची खाणच जणु, गोरा रांग, चाफेकळीसारखे नाक, बोलके डोळे आणि गुलाबाच्या पाकळीसारख तिचे नाजुक ओठ, वेड लावणारे तिचे मूलायम केस,
कुणीही तिच्या सहज प्रेमात पडेल अस व्यक्तीमत्व होत. विक्रांत बघायला आलेला तिला पहीला मुलगा, तो ही खुप हँडसम आणि रूबाबदार होता. तो गव्हर्मेंट ऑफिसर होता. त्याला बघताक्षणीच आरोही आवडली होती आणि त्याच्या फॅमिलीलाही मग लगेच त्यांनी आपला होकारही कळवला होता.

     
           आरोही ही मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलगी होती. तिला एक मोठी बहीण आणि भाऊ
होता. तिच लहान असल्याने तिला चांगल स्थळ आणि श्रीमंत जावई मिळाल्याने तिचे बाबा तर खुप खुश होते. त्यांनाही आपल्या लहान मुलीच लग्न अश्याच सरकारी नोकरदार माणसाची करायची इच्छा होती, त्यांना तसा जावई मिळाल्याने ते खुप खुश होते. आपल्या मुलीच्या सुखासाठी सगळ छान करायची तयारी त्यांनी सुरू केली. तेही रिटायर्ड झाले होते. आरोही तर जाम खुश होती. तिला मनासारख सासर, कुठेही नाव ठेवायला जागा नव्हती. नवराही हँडसम होता. तिने त्याच्या सोबत आयुष्य जगायची खुपच स्वप्ने पाहायला सुरूवात केली होती. तिलाही विक्रांत पाहताक्षणी आवडला होता.


      आरोहीच एक स्पप्न होत तिला शिक्षक बनायच होत. शिक्षण सुरू असतानाच लगीनघाई सुरू होती. चांगल्या मुहुर्तावर आरोही आणि विक्रांतचा साखरपुडा पार पाडण्यात आला. सगळ पुढे छान होईल आणि आपल स्पप्नही आपण विक्रांतच्या मदतीने पूर्ण करू नवीन आयुष्याची आरोही स्वप्न पाहू लागली. कधीतरी तिला विक्रांत फोन करायचा. त्यावेळेस तिच्याकडे मोबाईल नव्हता. तिच्या घरी लँडलाईन फोन होता त्यावर विक्रांतने फोन केला की आरोही खुप खुश व्हायची. विक्रांतने लग्नाआधी फार वेळा नाही कधीतरी फोन करायचा. तिलाही वाटायच की याने आपल्याला लग्न ठरलय तर मला भेटाव, बोलाव, वेळ द्यावा पण तो फारस बोलत नसे. आरोही समजुन घेत होती, " विक्रांत त्यांच्यावर कामाची खुप जबाबदारी असणार एवढी मोठी पोस्ट म्हटल्यावर त्यांना वेळ मिळत नसेल " म्हणून ती स्वतःच्या मनाची समजुत घालायची.

      दोघांच्याही घरी लग्नाची तयारी सुरू होती.
विक्रांतच्या घरचे तो सरकारी नोकरीला आहे म्हणून बर्‍याच अपेक्षा आणि मागण्या करत होते.एवढी सोन्यासारखी मुलगी मिळूनही त्यांना बाकीच्या गोष्टी महत्वाच्या वाटत होत्या याच जरा आरोहीच्या घरच्यांना आश्चर्यच वाटल, तरीही
आपल्या मुलीच्या सुखाकरीता सुरेशरावांनी सगळ्या गोष्टी मान्य केल्या, तेव्हा विक्रमच्या घरचे या लग्नासाठी तयार झाले नाहीतर साखरपुडा होऊनही त्यांनी लग्न तोडायच म्हटले होते. पण सुरेशरावांनी आणि इतर त्यांच्या मित्रांनी सगळी बाजु समजुन उशजुन घेऊन मूलीच्या सुखासाठी सगळ मान्य करुने दिल.तेव्हा पाहुणे खुश झाले. विक्रांतही लग्नासाठी तयार झाला.


         हे अस झाल्यामुळे आरोही घाबरली होती की त्यांनी अश्या मागण्या केल्या तरी बाबांनी त्यांच ऐकल आणि सगळच देण्याच ठरवल तेव्हा सुरेशरावांनी " मी हे सगळ तुझ्या सुखासाठीच करतो आणि माझ ते कर्तव्य आहे तु आनंदात राहावी सुखात राहावी हेच वाटत मला " त्यांनी मुलीला खुप समजावून सांगितल तरीही हे अस आपण एवढ शिकुन अश्या गोष्टींच्या विरोधात बोलल पाहीजे म्हणून तीही विरोध करते पण घरचे काही तिच ऐकत नाही.


   
          एका मोठ्या हाॅलमध्ये आरोही आणि विक्रांतच लग्न मोठ्या थाटामाटात पार पाडत.
आपल्या बाबांनी आपल्या लग्नात यांच्या सगळ्या अपेक्षा, अटी पूर्ण केल्या, ते सांगतिल तस लग्न केल भरपूर पैसा खर्च झाला होता. हे आरोहीला खुप कसतरी वाटत होत. विचार करत होती एवढी शिकलेली आणि श्रीमंत माणसे आहेत पण विचाराने किती भिकारी आहेत.
तीला काळजी वाटत होती की, " माझ या घरात पुढे कस होईल. कस असेल माझ जीवन ?
मला विक्रांत समजुन घेतील का ? बघुया पुढे आरोहिच वैवाहीक आयुष्य कस असेल.


                                  क्रमशः

        

🎭 Series Post

View all