Login

पूर्नजन्म भाग - चार

एक स्रीची प्रेरणादायी कथा

                आरोहीने तिच्या नवर्‍यापासून वेगळ होण्याचा निर्णय घेतला. तो माणुसच इतका हैवान होता की सर्वांनी तिला हेच सुचवल. केवळ तिने तिथे आपल्या बाळासाठी नऊ महीने काढले. माहेरी बाळंतपणासाठी आली. तिला मुलगा झाला. तिच्या सासरकडचे आणि नवरा एकदाच भेटायला आले नंतर कुणीही फिरकल त्या माणसाने आरोहीला खुप त्रास दिला होता. सगळ काही तिच्या आईवडीलांच्या कानांवर पडल तेव्हा त्यांनी आरोहीला म्हटल,

" आरोही, काही झाल तरी आम्ही तुझ्यासोबत आहोत, तुझ्याबरोबर इतक घडल, इतका छळ,
त्रास तु एकटीने सहन केला पोरी तु सांगायला हव होत " , बाबा.


" काय सांगु बाबा आता तुम्हांला सगळ
संपलय आता " , अस म्हणून आरोही रडू लागली.

" ये वेडा बाई, आजपर्यंत एकटीने सहन केल सांगितल नाही आम्हांला तु, पण आरू आता तु जसा विचार करतेस सगळ संपलय वगैरे तस काही नाही " , आई.


" अग वेडे बघ देवाने तुला गोंडस बाळ दिलय
त्याच्याकडे बघुन तु तुझ आयुष्य नव्याने सुरू करू शकते. आरू अग एवढी शिकलेली तु खचुन जाऊ नको. अजिबात तिथे आम्ही तुला मरायला आणि त्रास करायला जाऊ देणार नाही.



    आरोहीला ही आईच म्हटल होत. तितक्यात तिला बाळाचा आवाज आला. त्याच्याजवळ गेली तिने त्याच क्षणी ठरवल की डीवोर्स घ्यायचा, आता घरचेही आपल्यासोबत आहेत तिथे रोज मसण्यापेक्षा या माझ्या बाळासाठी मी जगेल.
एका स्रीने ठरवल तर ती काही करू शकते.


       आरोही एकदा हाॅस्पिटलला जात असताना तिला तीची काॅलेजची मैत्रीण भेटली. तिने आरोहीला कशी आहे बाकी कस चाललय सगळ विचारल्यावर आरोहीने शर्वरीला पाहून तिला आपल्या भावना आवरण कठीण झाल. ति तिच्या गळ्यात पडून रडायला लागली. एवढी शिकलेली आणि हुशार असाणारी आरोही आज सगळ चांगल झालेल असताना का रडत आहे हेच शर्वरीला कळेना... तिने तिला रडू दिल.
मोकळ होऊ दिल आणि मग तिला घेऊन एका
हाॅटेलात गेली. तिथे तिला खाऊ पिऊ घातल.
बाहेर एका बेंचवर दोघीही बसल्या.

" आरू, आता तु मला सगळ सांग. काय झालय नक्की ? एवढी का रडत होती सगळ ठिक चालू आहे ना ? ", शर्वरी.


" आयुष्यात मनासारखा जोडीदार मिळाला तर आयुष्य जगायला छान वाटत.  आयुष्यात सगळ्यात मोठी रिस्क लग्न आहे. नशीबाने चांगला जोडीदार मीळाला तर ठीक नाही तर आयुष्याच्या शेवटपर्यंत माणसाला compromise कराव लागत.


" काय सांगु तुला ज्याच्याशी लग्न केल तो एकही दिवस माझ्याशी बायको म्हणून वागत नाही. ना त्याला माझी काळजी होती ना प्रेम.फक्त एका गोष्टीसाठी तो माझ्या जवळ यायचा रोजच त्रास द्यायचा. तो माणुस म्हणुन कधी चांगल वागत नाही. काही बोलतो शिव्या देतो, मारतोही. "
जे काही होत ते सगळ तिने आपल्या मैत्रिणीला सांगितल.


" आरू, तु आता पुढे जा, तुझ्या आयुष्याचा आणि तुझ्या बाळाचा विचार कर, ज्याला तु नको आहे पुन्हा त्याचा त्रास सहन करायला तिथे जाऊ नको... आयुष्य नव्याने सुरू कर. कधीही एकट समजु नको स्वतःला. जेव्हा आयुष्य कठीण होत ना तेव्हा स्वतःला मजबुत बनवायच आणि तु स्वतः स्ट्राँग मुलगी आहेस त्यामुळे अशी हारू नको... स्वतःचा आणि बाळाचा विचार कर"


शर्वरी तिला समजुन सांगत होती.


       शर्वरीने आरोहीला जे सांगीतल ते तीलाही पटल होत. काही महीन्यांनी बाळ मोठ झाल्यावर आरोही तिच्या नवर्‍यापासुन वेगळी होते. यात तिची वर्षे जातात पण तिला डीवोर्स मिळतो.
आरोहीला सगळ संपून गेलय अस वाटत होत,

" तेव्हा तिचे बाबा म्हटले,

" जेव्हा सगळे संपले असे वाटते तिथुन खरी सुरूवात असते. स्वतःवर विश्वास असेल ना आयुष्याची सुरूवात कधीही आणि कुठुनही करता येते "


        आरोहीचा आयुष्याकडे बघण्याचा दृष्टीकोन सकारात्मक होतो. ति पुन्हा एकदा आपल्या मुलासोबत नव्याने जगायला शिकते तिचा सगळा भुतकाळ विसरून ती पुढे जाते. तिला एका शाळेत शिक्षिकेची नोकरी लागते. आरोही तिच्या आयुष्यात खुप पुढे निघून जाते. आपल्या मुलाला खुप शिकवायच आणि मोठ बनवायच नाही तर माणुस म्हणून चांगली व्यक्ती बनवायच ठरवते.
आरोहीने स्वतः योग्य तो निर्णय तिच्या आणि तिच्या मुलाचा भवितव्याचा विचार करून घेतला तिच आयुष्य छान चालल होत. जणू तिला पुर्नजन्मच मिळाला होता तिही अश्यारितीने आयुष्य छान जगत होती.