पुन्हा एकदा नव्याने भाग ४ अंतिम
विधी पडणारच तेवढ्यात अर्पितने पुन्हा एकदा तिला सावरून घेतले. ती ओरडणारच तर तिचे तोंड बंद करत आपल्या दोन्ही हातात उचलून धरत तो तिला वरती घेऊन आला आणि तिच्यावर प्रश्नाची जणू सरबत्तीच सुरू केली.
अर्पित म्हणाला, “विधी”, सांग ना काय आहे तुझ्या मनात?","तुला माहित आहे ना मी नाही जगू शकत तुझ्याशिवाय”
“बोल ना”
“विधी”,
“प्लिज”..
आता मात्र विधी त्याच्यावर जाम चिडली होती. म्हणूनच ओरडली, “गप्प बसा”, मी तुमची वहिनी आहे. आज जे घडले ते महापाप आहे. तुमचे आणि माझे हे नाते आई बाबा कधीही मान्य करणार नाही.एक विधवा आहे मी. तुझ्या आर्यन दादाची बायको. आईबाबांनी या घरात मला आसरा दिला हीच खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी, मी त्यांचा विश्वास नाही तोडू शकत.
विधीचे बोलणे ऐकायचेच नाही असे जणू मनाशीच ठरवून आला होता अर्पित मधेच थांबवत तो बोलला,
“लग्न? कोणतं लग्न?”
“विधी?”
या घराचा उंबरठा तू ओलांडण्या आधीच आर्यन दादा आपल्याला सोडून गेला. यात तुझी काय चूक होती. लग्न न करता तू आयुष्यभर दादाची विधवा बायको म्हणून राहायला तयार झाली. मात्र तरीसुद्धा जन्मभराचे हे असे आयुष्य तुझ्या वाट्याला आले.
“तुला तर हे लग्न ही मान्य नव्हतं ना?”
“अर्पित प्लीज..”
"आजही जग जेव्हा पांढऱ्या पायाची म्हणून हिणवत ना तेव्हा केवढं दुःख होतं हे माझं मलाच ठाऊक!"
लहानपणीच आईबाबांचे छत्र हरवले. मग मामांनी कसेबसे सांभाळले. वाटले होते लग्न होऊन थोडे तरी सुख वाट्याला येईल मात्र तळहातावरील मेहंदी मिटण्याआधीच त्याचा रंग उतरला. माझ्या आयुष्यात हेच जगणे आहे. आईबाबांचे मला आज जे छत्र मिळाले ते आता मी गमवू नाही शकत.
आपल्या हातातील डायरी पुढे करत तो बोलला, “आणि तुझ्या भावना, ज्या तू या डायरीत मांडून ठेवल्या”.
“माझी डायरी!!! प्लीज दे ती”, त्याच्या हातातील डायरी घेत विधी बोलली.
“नाही विधी, आज बोल”
“या वेड्या पावसाची शपथ आहे तुला”.
“तू बोल ना”
“पहिलं प्रेम आहे ना मी तुझं?”
लिहिलंय तू या डायरीत, विधी “अगं तू सुद्धा कॉलेजच्या अगदी पहिल्या दिवसापासूनच मला आवडायला लागली होती.पण माझं दुर्दैव बघ ना, तू वहिनी बनून माझ्या घरात आली. पण विधी मी खूप प्रेम करतो गं तुझ्यावर तू एकदा तरी”
त्याचे म्हणणे पूर्ण व्हायचेच होते तितक्यात विधीचे लक्ष दारात उभ्या असलेल्या आईकडे गेले. ती कसेबसे शब्द जुळवत बोलले, “अ... आई तुम्ही? आई मी आणि अर्पित”.
विधीच्या तोंडून शब्दच फुटेना तश्या आई पुढे आल्या. विधीचा आणि अर्पितचा हात एकमेकांच्या हाती देत आई बोलल्या, “विधी आणि अर्पित. तुम्ही लग्न करा”.
ते दोघेही हात सोडवत बाजूला झाले. आई बोलल्या, “विधी”, “अंग खरचं त्यादिवशी माझा आर्यन गेला त्या अपघातात.” मी तयारच नव्हते तुला घरात घ्यायला पण यांनी मला खूप समजावले आणि मुलगी म्हणून त्यांनीच तुला घरात घेतले.
ते दोघेही हात सोडवत बाजूला झाले. आई बोलल्या, “विधी”, “अंग खरचं त्यादिवशी माझा आर्यन गेला त्या अपघातात.” मी तयारच नव्हते तुला घरात घ्यायला पण यांनी मला खूप समजावले आणि मुलगी म्हणून त्यांनीच तुला घरात घेतले.
खरचं एक मुलगी बनून तू संपूर्ण परिवाराचा कधी एक भाग झाली मला समजलेच नाही. आज वर्ष झाले माझ्या आर्यनला जाऊन, पण तू त्याची जागा कधी घेतली कळेलच नाही. नावडीतीची तू आवडती कधी झाली गं माझं मलाच ठाऊक नाही. एका मुलीचे आणि सुनेचे कर्तव्य तू न चुकता पार पाडलेस.
आईचे शब्द ऐकून विधीला काय बोलू ते कळतच नव्हते. विधी फक्त स्वतःचा चेहरा हातात धरून आसवे गाळत उभी होती. मात्र आईच्या पुढच्या शब्दांनी दोघेही थक्क झाले.
आई बोलली, “विधी बाळा”, “समाजासाठी नाही परंतु आमच्यासाठी तू हे लग्न कर.” एकदा मुलगी म्हणून तू या घरात आली होती परत एकदा तुला सून म्हणून या घरात घेताना मला खूप आनंद होईल. माझी शेवटची इच्छा समजून हे लग्न करशील ना तू?
विधीला काहीच कळत नव्हते. तिने आईला जोरात मिठीच मारली. आईने दोघांना आपल्या मिठीत घेत आपला आशिर्वाद दिला. बाबांची तर काहीच हरकत नव्हती. जेमतेम आठ दिवसात लग्न झाले.
त्या दिवशी त्या पहिल्या पाऊसात विधीला पुन्हा एकदा हरवलेले सुख गवसले. आईबाबा भेटले तिचं पहिलं प्रेम अर्पित पुन्हा नव्याने भेटला. बेरंग जीवनात त्या रिमझिम पावसाने पुन्हा नवे रंग चढवले. म्हणूनच या दिवसाला पुनर्जन्म म्हणून साजरा करायला काय हरकत आहे आणि तो पण माझ्यासारख्याना आधार देणाऱ्या “माऊली विधवाश्रमात” हो विधी आणि अर्पितने निर्माण केलेला “माऊली विधवाश्रम”.
अचानक लागलेल्या गाडीच्या ब्रेकने विधी भानावर आली. अर्पित आणि आई बाबा दारात उभे राहून विधीची वाट बघत होते. हातातील डायरी बंद करून बॅगमध्ये ठेवत विधी गाडीतून उतरली. पुन्हा एकदा नव्याने पहिल्या पावसात ताजी तवानी होऊन.
पुन्हा एकदा तीच हुरहूर,
पुन्हा एकदा तीच चाहूल...
पुन्हा एकदा तीच चाहूल...
पुन्हा एकदा मनाला तुझ्याच प्रीतीची भूल,
पुन्हा एकदा नजरेचे तुला शोधण्या धावणे.
पुन्हा एकदा नजरेचे तुला शोधण्या धावणे.
पुन्हा तुझ्या भेटीसाठी आतुर होऊ पाहणे,
पुन्हा एकदा नव्याने तुला आठवावे.
पुन्हा एकदा नव्याने तुला आठवावे.
पुन्हा तुझ्या सवे बोलण्याचे बहाणे मिळावे,
पुन्हा एकदा नव्याने तुला आठवावे.
पुन्हा एकदा नव्याने तुला आठवावे.
समाप्त
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा