Login

पुन्हा एकदा नव्याने भाग १

Punha Ekda Nvyane
पुन्हा एकदा नव्याने भाग १


या रिमझिम झिलमिल पाऊस धारा,
तन मन फुलवून जाती.
सहवास तुझा मधुमास फुलांचा
गंध सुखाचा हाती.

हा धुंद गार वारा,
हा कोवळा शहारा.

उजळून रंग आले,
स्वच्छंद प्रितीचे.

चिंब भिजलेले,रूप सजलेले.
बरसूनी आले रंग प्रितीचे.


आज पाऊस थांबण्याचे नावच घेत नव्हता. मुसळधार चालणाऱ्या पावसात ती तिच्या विचारात खिडकीत उभे राहून ती साश्रू नयनांनी त्या कोसळणाऱ्या पावसाचे टपटप पडणारे मोती आपल्या ओंजळीत धरत होती.

तिच्या ओंजळीत पडणाऱ्या त्या इवल्या इवल्या थेंबाशी अगदी गहिरे नाते होते तिचे. टपटप पडणारे ते टपोरे थेंब जणू धरणीच्या अंगाखांद्यावर नृत्य करीत होते आणि ती ते मनोरम्य दृश्य आपल्या डोळ्यात साठवत होती.


तितक्यात रुचिरा आली आणि तिला चल म्हणून खुणावले पण तिचे चित्त कुठे जागेवर होते. ती आपल्या स्वप्नंच्या दुनियेत हरवली होती.

रूचिराने पुन्हा आवाज दिला तशी ती भानावर आली व दोघी जायला वळल्या. रुचिरा तिला म्हणाली,

"एक विचारू विधी मॅम? नाही आज विचारतेच".

आपल्या गालावरील केसांची बट बाजूला करत ती निखळ हसली आणि रुचिराला म्हणाली,

"अगं विचार नां. त्यात काय एवढं?"

रुचिरा लगेच बोलली,

"मॅम तुम्ही तुमचा बर्थडे दोनदा का सेलिब्रेट करता? आता बघा नां! मागच्याच महिन्यात तुमचा बर्थडे, आपण तुमच्या घरी नाही का साजरा केला, मग तरीही आज या माऊली आश्रमात?" ह्या आश्रमशी काय नाते आहे तुमचे?.

तिचा प्रश्न ऐकून ती गालाताच मंद हसली व उत्तरली, “पुनर्जन्म! नव्याने जन्म झाला आहे माझा”, मात्र ती पुढे काही बोलणार तितक्यात गाडीचा हॉर्न वाजला आणि ती रुचिराला गूड नाईट बोलून निघून गेली.

रुचिराच्या एका प्रश्नाने तिच्या डोळ्यासमोर भूतकाळातील पाने पुन्हा उलटली गेली. आपली डायरी हाती घेत ती सुद्धा त्या प्रश्नाचे उत्तर रेखाटू लागली.

'दोन वर्षांपूर्वीची गोष्ट’.

मेघ दाटून आले होते. वाऱ्याने जणू जोर धरला होता. बेधुंद होऊन तो ढगांना साद घालत होता आणि काहीच क्षणात त्याला प्रतिसाद म्हणून त्यांचे जणू युद्धच सुरू झाले. संपूर्ण जगाला प्रिय असलेला,नादावणारा, खुळावणारा तो पाऊस रूपी सखा आपल्या पहिल्या वहिल्या रिमझिम, अवखळ अशा थेंबाची बरसात घेऊन धरणीवर प्रकट झाला होता.


बघता बघता संपूर्ण धरणी त्याच्या रंगात न्हाऊन निघाली. बेधुंद पावसाच्या सरी धरणीला मिठी मारत होत्या. धरणी खुश होऊन त्यांना आपल्या उरात सामावून घेत होती. त्यांच्या मिलनाने अख्खं वातावरण प्रफुल्लित झालं होतं. त्या बरसणाऱ्या धारा रिमझिम असं लयबध्द संगीत गात होत्या. त्या प्रेम रागाने भूमी मोहरुन जात होती. तिच्या अंगावर प्रेमाचे शहारे उठत होते.


आपल्या प्रेमाचा रंग ती आता चहू बाजूंनी उधळायला लागली. तिच्या प्रेमाचा तो ओला मृदुगंध सर्वत्र दरवळत होता. निसर्गाचं ते मोहक रूप अनुभवावे तेवढेच काळजाला भिडून जात होते.

विधी मात्र भर पावसात एका हाताने आपली साडी आवरत आणि दुसऱ्या हातात छत्री घेऊन त्या ओल्या चिंब रस्त्यावर सैरावैरा पळत होते. रात्रीचे दहा वाजत आले होते आणि तरीसुद्धा अर्पित अजून परतला नव्हता. हा पाऊस अचानक धोधो बरसायला लागला आणि मनात पुन्हा एकदा भीती दाटून आली.


बाबासाठी औषधं घ्यायला चार वाजल्या पासून गेलेला अर्पित नऊ वाजले तरी परतला नाही, म्हणून त्याला कॉल केलेत परंतु त्याचा काहीच प्रतिसाद मिळाला नाही. त्याचा फोन बंदच होता. मित्रांचे नंबर सुद्धा विधीला ठाऊक नव्हते म्हणून आईला सांगून विधी धडपडत त्याला शोधायला बाहेर पडली.


मनातील भावनांना आवर घालत आजवर त्याला टाळले होते. परंतु त्या दिवशी या वेड्या मनाला त्याच्या भीतीने घेरले होते. डोक्यात विचारांचं काहूर माजलं होतं आणि त्याच विचारां समवेत विधीने अर्पितला इकडून तिकडे शोधत होती.


निसर्गाच तर रुपचं पालटले होते. पाऊस थांबायचं नावच घेईना आणि विधी त्या भर पावसात कसेबसे चालत होती.


सुदैवाने मेडिकल जवळ पोहोचली तर अर्पित तिथून कधीच निघून गेला हे कळले. कशीबशी एक टॅक्सी भेटली आणि विधी त्या दिशेने पुढे निघाली जिकडे अर्पित निघाला होता.

विधीची नजर त्यालाच सर्वत्र शोधत होती आणि अचानक त्याच्या मित्राचे गॅरेज दिसले. विधी टॅक्सीतून उतरून पळतच तिकडे धावली.

विनीत त्याचा जिवलग मित्र , विधी त्याला हात जोडत बोलली,

"नमस्कार विनीत दादा”

“अर्पित”

परंतु विधीचे शब्द पूर्ण होण्याआधीच विनीत बोलला,

"वहिनी तुम्ही?”

अर्पित आता थोड्या वेळापूर्वी गेला. अचानक त्याची गाडी बंद पडली आणि पाऊस थांबायचे नाव घेत नव्हता त्यामुळे मी त्याला थांबवले होते.

“पण तुम्ही ह्या वेळेला ईथे? ”

विधीने चेहऱ्यावर जमलेले पाण्याचे थेंब पुसत त्याला उत्तर दिले,

“खूप वेळ झाला त्याचा फोन बंद होता ना त्यामुळे त्याला बघायला आले.”

तसा तो बोलला," अर्पितचा मोबाईल बंद झाला, वहिनी ऐका”