पुन्हा एकदा नव्याने भाग २
परंतु त्याचे शब्द पूर्ण होण्याआधीच विधी तिथून निघाली. अर्पितला बघितल्याशिवाय काही केल्या विधीला चैन पडणार नव्हती.
विधीची दशा बघून टॅक्सीवाला बोलला,“ताई,तुमचे मिस्टर तुम्हाला लवकरच भेटतील. खूप प्रेम करता नां तुम्ही त्यांच्यावर देव सगळं ठीक करेल बघा.” काळजी नका करू.
विधीच्या तोंडून शब्द बाहेर पडले, “मिस्टर” त्याच्या शब्दाने विधीच्या दुखत्या नसेवरच हात धरला जणू अचानक टॅक्सी थांबली आणि विधी भानावर आली. टॅक्सी टॅक्सी स्टँडवर आली होती आणि त्या ठिकाणी बरेच लोक तिथे जमले होते.
विधीची नजर त्या गर्दीतून अर्पितलाच शोधत होती. तितक्यात विधीची नजर रेड शर्ट घातलेल्या त्या पाठमोऱ्या आकृतीवर पडली आणि विधी पळतच त्या दिशेने धावली आणि चिखलात पाय घसरुन पडणारच तेवढ्यात कोणीतरी विधीला हात धरून सावरले.
अर्पित हो अर्पित होता... विधीने मागे वळून त्याला घट्ट मिठीच मारली. त्यांच्याबद्दलची काळजी, त्याची तमा आज विधीच्या डोळ्यात दिसत होती. विधीच्या डोळ्यातून अखंड अश्रू वाहत होते आणि विधीची साथ द्यायलाच जणू नभ सुद्धा अखंड बरसत होते. त्याच्या मिठीत स्वतःचे दुःख जणू विधीने झोकून दिले होते. दोन देह जणू एकरूप झाले होते. नखशिखांत चिंब भिजले होते दोघे.
अंगाला भेदून जाणाऱ्या त्या पावसाच्या सरी, संपूर्ण शरीरात शिरशिरी निर्माण करणारा तो बेधुंद वारा, म्हणूनच कदाचित ती मिठी आणखी घट्ट झाली होती. त्याची ती मिठी कधी सोडूच नये असे वाटत होते विधीला.
“पहिल्या प्रेमाचा स्पर्श नवा नवा,
सहवास तुझा मला हवा हवा.
सहवास तुझा मला हवा हवा.
माझ्या दिसण्यात तू दिसे,
माझ्या हसण्यात तू हसे.
माझ्या हसण्यात तू हसे.
मनाच्या मंदिरात तू वसे,
अवती भवती तू असे”
अवती भवती तू असे”
किती प्रेमळ होता तो स्पर्श. विधीच्या पाठीवर हलकेच थोपटत अर्पित तिला शांत करण्याचा निष्फळ प्रयत्न करत होता आणि विधी अजुनही मुसमुसत होती. आजूबाजूचे सर्व लोक मात्र त्या दोघांना न्याहाळत होते.
शेवटी विधीची मिठी सोडवत आपल्या दोन्ही हातात चेहरा घेत अर्पित बोलला, “अगं वेडी आहेस का तू? एवढं काय झालं रडायला?”
आपल्या दोन्ही हातांनी त्याच्या छातीवर हलकेच मारत विधी रडतच बोलली,
“ हो आहे मी वेडी..”
“तुझी काळजी करायला.”
“तूला एक साधा फोन करून तुला कळवता आले नाही.”
“सगळे किती काळजीत होते”.
माझी काय दशा झाली होती ठाऊक आहे का तुला? एवढ्या पावसात मी तुला सैरावैरा इकडे तिकडे शोधत होते आणि तू. अर्पित तुला काही झाले असते तर मी, विधी मान खाली घालून गप्पच बसली.
विधीच्या चेहऱ्यावर ओघळणारे अश्रू पुसत अर्पितने विधीची हनुवटी धरत हळूच मान वरती केली. ती मात्र त्याच्यापासून नजर चोरली कारण त्याचा पुढचा प्रश्न ठाऊक होता विधीला आणि अर्पित बोललाच,
"तर काय?”
“बोल ना”
“विधी तू बोलत नसली तरीही तुझे हे बोलके पाणीदार डोळे खूप काही बोलतात गं.”
“एकदा त्यांना शब्दरूप देऊन तर बघ.”
“शब्दाच्या दुनियेत येऊन तर बघ”
“स्वतःसाठी म्हणून आयुष्य जगून तर बघ.”
“या रिमझिम पावसात दोन पाऊल माझ्यासोबत चालून तर बघ.”
“मी आहे ना तुझ्या सोबतीला कायमचा,अखेरपर्यंत तुला विश्वास नाही का? माझ्यावर".
अर्पितचे शब्द त्याच्या मनातील त्याच भावना प्रकट करत होते ज्या विधीच्या मनात सुद्धा होत्या. परंतु आजवर विधीने त्याला कधी व्यक्त होऊ दिले नव्हते कारण या दोघांचे नाते कोणी मान्यच केले नसते.त्याला कारणही तसेच होते.
आज मात्र विधी स्वतःला रोखू शकली नाही आणि अर्पितच्या मिठीत स्वतःला झोकून दिले. अर्पितच्या प्रश्नाला उत्तर देण्यासाठी विधी टॅक्सीच्या दिशेने हात पुढे केला आणि त्याचा हात सोडवून लगेच त्या टॅक्सीत जाऊन बसली.
अर्पित सुद्धा विधीच्या बाजुला येऊन बसला. टॅक्सी सुरू झाली आणि विधीने त्याच्याकडे दुर्लक्ष करत मान फिरवून खिडकी बाहेर बघत बसले. थंडीमुळे अंग न अंग थरथरत होते. कदाचित ते अर्पितच्या लक्षात आले असावे.
अचानक विधीच्या हाताला अर्पितच्या उबदार स्पर्शाची जाणीव झाली. विधीने आपली मान वळवली आणि डोळ्यांनीच नको असा इशारा दिला. मात्र विधीच्या हात आणखी घट्ट धरत अर्पितने दोन्ही हातांनी पकडला जणू विधीला साथ देण्याचेच त्याने वचन दिले.
विधीच्या खांद्यावर आपले डोके ठेवत त्याने तिचा हात आवळून धरला. विधीच्या चिंब देहाला होणारा अर्पितचा तो स्पर्श तिला आणखी रोमांचित करू पाहत होता पण ती सुद्धा आपल्या निर्णयावर ठाम होती.
मन आणि बुद्धी यापैकी कोण जिंकणार याची जणू पैजच लागली होती त्या दिवशी कारण विधीच मन अर्पितला काही केल्या दूर सारू शकत नव्हते. शेवटी पहिले प्रेम होते ते विधीचे.
अर्पितच्या ओल्या केसातून हात फिरवावा असे विधीला क्षणभर वाटून गेले मात्र ती पुन्हा स्थिर झाली. तो मात्र खूप जास्त आनंदी दिसत होता कारण त्याच प्रेम त्याच्या एवढ्या जवळ होतं. वर्षांपूर्वी बघितलेले त्याचे स्वप्न जे आज पूर्ण झाले होते.
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा