पुरे हा बहाणा
अ.ल.क१
जेवण झाल्यावर मागचे आवरायला नको म्हणून हातावर पाणी पडले की रोहित फोन उचलायचा आणि हॅलो हॅलो करत बाहेर जाऊन बोलायला लागायचा. बऱ्याच वेळ वाट पाहून श्वेता टेबल आवरून टाकायची.
आज जेवण झाल्यावर लग्न झालेल्या बहिणीची आठवण येताच आता कुठले बहाने म्हणत रोहित टेबल पुसायला लागला.
------------------------------------------
अ.ल.क..२
रीता --अगं उद्या लग्न झाल्यावर काय करशील? सासू ला काय सांगशील? कर बाई पोळ्या अजून तुला धड येत नाही.
अरे यार बोर नको करू, अशाने मी लग्नच नाही करणार.
हो का? मग स्वप्नील च्या आई-बाबांना कळवून देते"आम्हाला कर्तव्य नाही म्हणून",
ए आई --असं काही नाही.
मग "पुरे कर बहाणे" म्हणत सुमन ने लाटणे रीताच्या हातात दिले.
,----------------------------------------
अ.ल.क३
अहो--बँकेतून पैसे काढायचे आहे हो.
हो? मग काढ की तू, हे घे एटीएम कार्ड आणि जा.
"अहो ,असं काय करता अजून घरातली बरीच काम पडली आहेत प्लीज तुम्ही बाहेर जातच आहात तर". बॅंकेंत जायची मनात ली भिती लपवत .. शुभाने कार्ड सुरेश रावांना परत दिले.
आज एटीएम मधून पैसे काढताना शुभांगी चे डोळे भरून आले. आता 'पुरे हा बहाणा 'म्हणणाऱ्या दिवंगत सुरेश रावांची तिला खूप आठवण येत होती.
________________________
-©® प्रतिभा परांजपे

Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा