पूर्ण प्रेम 3
"चंदन , मलयज , गंधसार किती किती नावे देता येतील त्याला...", मैत्रेयी खोलवर आठवणींच्या गर्भात शिरली होती.
त्या दिवशी पुण्यावरून अर्जंट ठाण्याला यायचं होतं तिला.
जराही विचार न करता बसमध्ये शिरली होती.बस जवळजवळ पूर्ण भरली होती. तीन चार सीट्स सोडले तर ...
जराही विचार न करता बसमध्ये शिरली होती.बस जवळजवळ पूर्ण भरली होती. तीन चार सीट्स सोडले तर ...
नितळ तेजाळणारी कांती.
कुरळे कुरळे काळेभोर केसांचा स्टेपकट.
केशरी अबोली कलरचा शिफोनचा कुर्ता आणि
त्याच रंगाची चुडीदार.
हिरव्या रंगाची सुळसुळणारी ओढणी.
लांब नाक .
बोलके पाणीदार डोळे.
आणि ईतर मुलींपेक्षा जराशी सरसच उंची
जे तिचे व्यक्तीमत्व प्रचंड आकर्षक बनवत होती.

तिला बघून कुणीही क्षणभर बघतच रहात.
तिला सवयच होती तश्या बघण्याची. बसचे सगळे प्रवासी तिच्याकडेच पाहताना दिसले तिला.
... फक्त एका खिडकीने तिला फक्त बघून आजूबाजूच्या लोकांना बघत पुन्हा खिडकीतून बाहेर नजर टाकली होती.
तिला सवयच होती तश्या बघण्याची. बसचे सगळे प्रवासी तिच्याकडेच पाहताना दिसले तिला.
... फक्त एका खिडकीने तिला फक्त बघून आजूबाजूच्या लोकांना बघत पुन्हा खिडकीतून बाहेर नजर टाकली होती.
शेजारची सीट रिकामी असणारे लगेच सावरून बसले.पण मलयज जो अजिबात विचलित झाला नाही.मैत्रेयीने त्याच्या शेजारी बॅग ठेवत त्याला विचारले , "इकडे बसू शकते का मी ?"
त्यावेळी तिच्या चेहऱ्यावर छोटी स्माईल ठेवलेली तिने...ते पाहून मलयज लगेच सावरून बसला आणि तिला लगेच जागा करून दिली.
पुन्हा त्याने बसवर एक नजर फिरवली. सगळे तिलाच न्याहळत होते.
त्यावेळी तिच्या चेहऱ्यावर छोटी स्माईल ठेवलेली तिने...ते पाहून मलयज लगेच सावरून बसला आणि तिला लगेच जागा करून दिली.
पुन्हा त्याने बसवर एक नजर फिरवली. सगळे तिलाच न्याहळत होते.
मैत्रेयीला तो जरा खडूसच वाटला कारण स्माईलच्या बदल्यात चक्क दुर्लक्ष केलेलं आणि बस बघत होता .पण ईतर नयनसुख घेणाऱ्यापेक्षा हा दगडच बरा असा विचार करत ती त्याच्या शेजारच्या सीटवर बसली. बॅगेतून walkman काढला आणि ऐकायला लागली.
बस जशी सुरू झाली तशी मैत्रेयी अस्वस्थ होऊ लागली , तिची चुळबूळ चुळबूळ वाढली.
कधी मांडीवर बॅग , बॅगेवर डोकं असं सगळं सुरू झालं.मलयजला समजलं होतं तिला बरं नाही पण संकोचत होता म्हणून गप्प होता.
कधी मांडीवर बॅग , बॅगेवर डोकं असं सगळं सुरू झालं.मलयजला समजलं होतं तिला बरं नाही पण संकोचत होता म्हणून गप्प होता.
तिची ओढणी त्या चुळबुळीत वारंवार खाली पडत होती. अक्षरशः कंटाळुन गेली होती मैत्रेयी.
वेळ जात होता तसा तिला दम लागायला सुरुवात झाली. श्वास घ्यायला त्रास व्हायला लागला.दर पंधरा मिनिटांनी तिला एक उलटी होत होती.तिच्या जवळच्या सर्व पिशव्या संपून गेल्या.
बहुधा तिच्या पोटात आता काहीच उरले नव्हते निघायला. पण अश्या अवस्थेतही ती काहीही मदत मलयज कडून घेत नव्हती.
त्याच्या लक्षात एव्हाना आले होते की हिला अस्थमा आणि मोशन सिकनेस आहे.
पण ते दोघेही त्यांचे अनोळखीपण कसोशीने जपत होते.तिचा त्रास वाढला तसा मलयजला आता ते सहन होत नव्हते आणि मैत्रेयी त्याच्याकडून कुठलीही मदत घेत नव्हती. एका स्टॉप वर धडपडत जाऊन बॉटलही घेऊन आली होती.
त्याच्याकडचे औषध देऊ केले पण तीने न बघताच
थँक्स म्हटलं.
त्याच्याकडचे औषध देऊ केले पण तीने न बघताच
थँक्स म्हटलं.
मलयजला कळलं की ती एक स्त्रीसुलभ स्वरक्षणाची पद्धत आहे म्हणून त्याने ते औषधे तशीच परत ठेवून दिली.
मी डॉकटर आहे , हे औषध घ्यावेच लागेल तुम्हाला
असा एक आश्वस्त आणि निर्वाणीचा थोडासा रागातील आवाज ऐकला मैत्रियीने.
असा एक आश्वस्त आणि निर्वाणीचा थोडासा रागातील आवाज ऐकला मैत्रियीने.
आता तर तिलाही तिच्या वेदना सहन होत नव्हत्या.
तिने त्याच्याकडे पाहिलं ...
त्याचे कथ्थई डोळे होते आणि त्यात अपारमाया.
त्यालाही ते मलूल पडलेलं सौंदर्य बघवत नव्हतं
त्याला भावली होती तिची ती आजारातही स्वतःला
सावरण्याची धमक.
पण आता जास्त झालं होतं.
साध्या दीड तासाच्या प्रवासात इतका त्रास होणे चांगले नाही.
असं म्हणत त्याने गोळी काढून तिच्या हातात दिली.
पाणी दिले.
तिने गोळी घेतली आणि पुन्हा छातीवर ओढणी घट्ट दाबून बसून राहिली.
नेहमी होतों का असा त्रास तुला?
तो तिला मुद्दाम बोलते करू लागला होता.
तो : गोळीने थोडं बरं वाटेल.
ती : हं ( न बघताच )
तो: मोशन सीकनेस आहे का ?
आता मात्र तीने केविलवाण्या नजरेने पाहिलं त्याच्याकडे की प्लिज शांत पडू द्या.

मलयजने लगेच तिचा हात हातात घेतला व तो नाडी चेक करू लागला. त्याचा स्पर्श होताच थोडी सावरली ती पण ह्यावेळी तीला त्याचे अनोळखीपण सुरक्षित वाटत होते.हवेत हळूहळू गारवा वाढत होता.ग्लानीने मैत्रेयी कधी झोपी गेली ते तिचे तिला कळले नाही.
वाऱ्याच्या झुळूक येत होत्या जात होत्या.ती शांत झोपली होती.
मलयज काळजीने तिला न्याहळत होता. राहून राहून तिची ओढणी हळूच सरकलेली तिला कळत नसे. तो ती तिला न कळू न देता सावरत होता.
त्याला माहित होते ती झोपली आहे खरी पण तिला जबरदस्त अशक्तपणा आलेला असणार आहे.

बसच्या धक्क्याने तिच्या वॉकमेनचे बटन दाबलं गेलं. आणि गाणं सुरू झालं. मलयज पटकन बंद करणार तितक्यातच तिने झोपेतच म्हटले
"राहू द्या ,मला आवडते हे , बरे वाटते."
मलयजने walkman तसाच सुरू राहू दिला .
गाढ झोपेत मैत्रयीने कधी मलयजच्या खांद्याची उशी केली ते मलयजला कळलं पण मैत्रेयी त्यास अनभिज्ञ होती आणि गोड झोपेतही.
"राहू द्या ,मला आवडते हे , बरे वाटते."
मलयजने walkman तसाच सुरू राहू दिला .
गाढ झोपेत मैत्रयीने कधी मलयजच्या खांद्याची उशी केली ते मलयजला कळलं पण मैत्रेयी त्यास अनभिज्ञ होती आणि गोड झोपेतही.
प्रवास सुरु होता , गाणं सुरू होतं ...
एक अद्वितीय प्रेम बहरत होतं...
एक अद्वितीय प्रेम बहरत होतं...
तेरा रंग साया बहार का
तेरा रूप आइना प्यार का
तुझे लग ना जाए कहीं नज़र
मेरे हमसफ़र, मेरे हमसफ़र
मेरे हमसफ़र, मेरे हमसफ़र
तेरा रूप आइना प्यार का
तुझे लग ना जाए कहीं नज़र
मेरे हमसफ़र, मेरे हमसफ़र
मेरे हमसफ़र, मेरे हमसफ़र
आपल्या खांद्यावर निर्धास्त होऊन झोपलेल्या
चेहऱ्याकडे बघताना मलयज ते गाणं जणू जगतच होता.
©®पूनम तावडे लोखंडे
गीत साभार : आनंद बक्षी
चेहऱ्याकडे बघताना मलयज ते गाणं जणू जगतच होता.
©®पूनम तावडे लोखंडे
गीत साभार : आनंद बक्षी