"आई , बस्स गं आता...
किती माझे लग्न लग्न करशील...
लग्न म्हणजे सर्व काही आहे का ?
माझं प्रेम नाहीये कुणावर आणि झालं तर करेंनही लग्न तेंव्हा सगळ्यात अगोदर तुलाच सांगेल."
मलयज...
एक न्यूरोसर्जन...
मेंदूच्या तंतूतंतूंशी खेळणारा
जाणीव नेणिव झंझोडणारा ...
एक हुशार मातब्बर डॉकटर!
आपल्या आईच्या सततच्या लग्नाच्या मागणीला कंटाळलेला.

त्याच्या आईचेही बरोबरच होते ,पस्तिशीच्या जवळ आलेला तो...स्वतःच्या हिंमतीने शिकलेला , तीन भावातला सगळ्यात थोरला.त्याच्या बाबांच्या व्यसनाने त्याचे आधी बालपण होरपळून निघाले आणि नंतर त्यांच्या निधनाने त्याचे तरुणपण धुळीत मिळालेले.
जबाबदारीचे आणि आयुष्याचे फटके माणसाला
चंदनासारखे झिजवतात. सुगंध सर्वत्र दरवळतो पण झीजलेल्या चंदनाची व्यथा मात्र चंदनालाच ठाऊक.आणि चंदनालाही झिजणेच आवडते.
तसाच तोही चंदनच होता.मलयज चंदनाचेच दुसरे नाव.

आईला हळूच जवळ करत मिठीत घेतलं.
तिचा चेहरा ओंजळीत घेऊन ; त्याचे डोळे जे गूढ कथ्थई रंगाचे होते ते चकाकले.आईच्या डोळ्यांत बघून स्मित हास्य करत तो तिला धीर देऊ लागला,
"आई, मी खूप खुश आहे , जर नसतो तर असा इतका यशस्वी झालो असतो का ? मलयज आहे ना मी ... थोडी झीज तर येईलच ना नशिबी. नको काळजी करू..."

एव्हाना त्याचा ड्रायव्हर सुरेश ,त्याचे सामान घेऊन तिकडे वेळेवर उभा होता.वेळेचा फार पाबंद होता मलयज.
आयुष्यात आलेल्या संकटातून त्याच्या ह्याच
सवयीने त्याला बाहेर काढले होते.

"वेळेचे पाबंद व्हा, वेळ सांभाळून घ्या ...
पुढचे सहा महिने खूप महत्वाचे आहेत.जमेल तुम्हाला , तुम्ही करू शकता ... "
आणि लगेचच मलयजने त्याच्या उजव्या हाताच्या पंजाकडे पाहिले.
बोटांनी पुन्हा तो मखमली जादुई स्पर्श पकडण्याचा प्रयत्न केला मुठीत पण ...
जो त्याला आठवला होता आज पुन्हा...
शहारले होते त्याचे अंतरंग.
... एक गोड आवाज कानात पुन्हा ऐकू येऊ लागला .
मलयज पुन्हा उत्स्फूर्त तेजीने कारकडे सरसावला.
आज पुन्हा नेहमीप्रमाणे त्याचा दिवस सुंदररीत्या सुरू झाला होता.

" Good Morning ,डॉ. मलयज ",
कारमध्ये डॉ प्रीती त्याची आधीच वाट बघत होती.
ड्रायव्हरला पाच नंबर खुणेने दाखवून त्याने गाडी डावीकडच्या हायवेने वळवायला सांगितली.

"सर,अहो we have meeting with ..."
तिला अर्ध्यातच थांबवत त्याने त्याचा टॅब तिला दिला.
"मी शिफ्ट केलेय प्लान्स सगळे , जस्ट गो थ्रू ईट...
आपण आता माझ्या जुन्या घरी जातोय."

एवढं बोलून मलयज मागे रेलून आरामात बसला.
त्याने डोळे मिटून घेतले.
जणू काहीतरी आतलं मनातलं बाहेरचं सगळं वादळ त्याच्या मनात घोंगावत होतं; ते तो स्थिर करू पाहत होता.
"... सुरेश प्लिज प्ले सेकंड ट्रॅक ...ऑफ..."
त्याचे बोलणे संपण्याच्या आधीच सुरेशने सेकंड ट्रॅक प्ले केलं... जणू सवयीचं होतं त्याला हे सगळं.

क्षणभर हलका उसासा टाकून त्याने डोळे उघडले
त्याचे कान ते गाणे ऐकायला आतुर झाले होते.
प्रीतीला एव्हाना परिस्थितीचा अंदाज आला होता.
आता बोलून काहीही उपयोग नाही हे माहिती होतं तिला. ती टॅबमधील मिटिंग्सचे शफलिंग चेक करू लागली.

गाणे त्याचे काम करू लागले होते...
संतूरच्या तारा झंकारल्या ,
आणि बासुरीची आर्त तान वातावरण मोहित करू लागली होती.

तेरा साथ है तो है जिंदगी
तेरा साथ है तो रोशनी
आ तुझे नजर मे बसा लू मै
तुझे लग ना जाये कही नजर
मेरे हमसफर , मेरे हमसफर
तेरा साथ है तो रोशनी
आ तुझे नजर मे बसा लू मै
तुझे लग ना जाये कही नजर
मेरे हमसफर , मेरे हमसफर
सुरेशने साईड मिररने मलयजकडे बघितलं.
डॉ ठीक आहेत ना ...ह्याची खात्री तो करत होता.
त्याचे असे हे वागणे परिचित होते त्याला.आता त्याचीही नजर गोठली होती.

रस्त्यावरची वर्दळ पेंगली होती. दुपारचे तीन साडे तीन वाजले असतील ; परतीचे ऊन सुरू होत होते.
मलयजच्या मनातही तो आठवणीतला प्रवास गाण्यासोबत पुढे जात होता.
जणू सारे आसमंत वाऱ्याच्या तालात ,
त्याच्या आणि तिच्या त्या एकत्र प्रवासाच्या आठवणी जगू लागले होते.

किसीं राह मे किसीं मोड पर
कही चल न देना तू छोडकर
मेरे हमसफर मेरे हमसफर
कही चल न देना तू छोडकर
मेरे हमसफर मेरे हमसफर
मला अजूनही तुझी आस आहे ...
...सखी ...मैत्री...त्याचे डोळे डबडबले. तो थरथरत्या ओठांनी पुटपुटला हळूच.
आणि दुसऱ्याच क्षणी समाधानाने हसतही होता.

सुरेशने मलयजच्या सांगण्याच्या आधीच न सांगताच कार बस स्टॉपकडे वळवली.
©®पूनम तावडे लोखंडे
गीत साभार : आनंद बक्षी
चित्र साभार : गुगल