एक वेगळीच शांतता होती या जागेत. अशा कितीतरी जागांचा अभ्यास असल्याने त्याला या गोष्टीचं नवल वाटत नसे. तरीही या शांततेच्याही काही भाषा असतात हे तो जाणून होता. जाॅबवरून आल्यावर गॅलरीत बसून तो छोटी हवेली ला निरखत राही.
भक्कम काळया दगडात असलेले बांधकाम व त्यावर सागवानी लाकडात बारीक नक्षीकाम असणारी दुमजली असली तरी छोटी हवेली थेट याच्या तिसर्या मजल्यापर्यंत ऊंच होती. चौथर्यावर ऊभारलेली ही वास्तू मोठ्या हवेलीची प्रतिकृती होती. जर ही वास्तू अजून ईतक्या सुस्थितीत असेल तर नक्कीच तिची प्रतिकृती असलेली मोठी हवेली नष्ट झालीच कशी? हा प्रश्न Asi चा अधिकारी, त्याआधीही एक पुरातत्व चा विद्यार्थी या नात्याने समीरला हा प्रश्न वारंवार पडत असे. जोपर्यंत या प्रश्नाचा छडा लागत नाही तोपर्यंत तो स्वस्थ बसणार नव्हता. यासाठीच तर तो ईथे आला होता की याहीपेक्षा या वास्तूनेच आपल्या आकर्षणाने त्यास आपणाकडे खेचून आणले होते? याची उत्तरे नियतीच देणार होती. गॅलरीतून हवेली दिसत असली तरी लांबून पाहून काही होणार नव्हते हे तो जाणून होता. मागच्याबाजूला असली तरी वाॅचमॅन , ईतक्या मोठ्या लाॅनची निगा राखणारे माळीकाका,काकू हे वृद्ध जोडपे ,सफाई कर्मचारी तर दिवसातून एकदा हवेलीत चक्कर असणारा तो इसम या सर्वांना टाळून आत शिरणे केवळ अशक्य होते आणि बिल्डरकडून तशी सक्त तंबीही होती आणि त्या आशयाचा एक फलक छोटी हवेली बाहेर लावलाही होता. समीर एक अशा संधीच्या प्रतीक्षेत होता की त्यास हवेलीत प्रवेश मिळावाच पण त्यासोबतच आत असलेल्या मुळ मालकांविषयी ही त्याला गुढ आकर्षण होते. त्यांच्यासोबत बोलल्यास " बडी हवेली " विषयी खूप काही माहिती मिळणार होती. मात्र या सर्व गोष्टींचा त्यास अडथळा होता.
नेहमीच्या सवयीनं आजही काॅफीचे घोट घेत तो या वास्तूच्या निरीक्षणात गढून गेला होता. त्या संपूर्ण परिसरात असंही शुकशुकाटच असायचा. समीर व अजून एक बिऱ्हाड तेवढं रहायला आले होते. दुकानांचे ऊद्घाटन होणे बाकी होते म्हणून ती बंदच असायची. वरच्या मजल्यावर काहीतरी गडबड ऐकू येत होती. भिडस्त स्वभावाचा असल्याने लगेच वर जाणे त्याला योग्य वाटले नाही मात्र गलका वाढल्याने तो वर पळाला . लिफ्ट न घेता तो जिन्यानेच वर गेला. वर जाऊन बघतो तो काय तिथला मध्यमवयीन माणुस अत्यावस्थ झाला होता. म्हातारे आई बाप घाबरले होते व आरडाओरडा करत मदतीसाठी याचना करत होते. समीरशिवाय होतं तरी कोण ईथे? वाॅचमेन चा पत्ता नव्हता. माळी काका काकू तिथून खूप लांब होते. समीरने त्यास आधार देत लिफ्टपर्यंत आणले. त्याचे आई बाबा सोबत होतेच. लिफ्टमध्ये आत येण्यास अशाही परिस्थितीत ते खूप घाबरत होते ही बाब समीरला खूप खटकली पण त्याने काही विचारले नाही. समीरने त्याची कार काढली व त्यास हाॅस्पिटलला अॅडमिट केले. त्या माणसाचे आई बाबा हात जोडून समीरला धन्यवाद देत होते. अचानक असं काय झालं म्हणून समीरने त्यांना विचारलं पण काही सांगण्याच्या मनस्थितीत ते नव्हतेच. काही दिवसांनी त्यांनी ती सदनिका अर्ध्या किंमतीत विकल्याचे समीरला समजले. जाण्याआधी ते वृद्ध जोडपं समीरकडे आलं आणि पुन्हा एकदा त्याचे आभार मानतानाच तु पण ही जागा सोडून जावं अशी विनवणी करू लागले. खूप खोदून विचारूनही ते काही बोललेच नाही. या घटनेनंतर समीरचे या जागेविषयी असणारे कुतुहल कित्येक पटींनी वाढले. पुरातत्व विभागात अधिकारी असलेला समीर या अशा जागा, तिथल्या कल्पोकल्पित कथा यांना सरावलेला होताच म्हणून या घटनेची त्याला भिती वाटली नाही. ऊलट पुर्ण ईमारतीत तो एकटाच असल्याने त्याचे काम आणखी सोप्पे झाले होते.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा