पुरुषदिन.. @विवेक चंद्रकांत
1) लग्न अगदी थाटात झाले. जेवणही अगदी अप्रतिम होते. पाठवणीच्या वेळी त्याने अगदी धिरोदत्त पणाने त्याच्या लेकीची रवानगी केली,हॉल रिकामा करून दिला, हिशोब पूर्ण केले,अगदी जवळचे नातेवाईक वगळता बाकीचे गेले त्यांनाही हसतमुखाने निरोप दिला आणि घरी येऊन शांतपणे झोपला...
थोड्यावेळाने उठून बसलेल्या आपल्या नवऱ्याच्या पाठीवर हात फिरवत ती म्हणाली.
" फुलासारख्या जपलेल्या आणि वाढवलेल्या मुलीला सासरी पाठवलं आहे. पुरुष म्हणून सगळ्यांसमोर रडता आले नाही. आता मोकळेपणाने रडा नाहीतर कित्येक रात्री अशाच झोपेशिवाय जातील. "
" फुलासारख्या जपलेल्या आणि वाढवलेल्या मुलीला सासरी पाठवलं आहे. पुरुष म्हणून सगळ्यांसमोर रडता आले नाही. आता मोकळेपणाने रडा नाहीतर कित्येक रात्री अशाच झोपेशिवाय जातील. "
आणि तो खरंच रडू लागला......
2) तो भीतीने आणि संतापाने थरथर करत होता. गावातला गुंड त्याच्या घरी येऊन त्याच्या मुलाला धमकी देऊन गेला की जे पैसे व्याजाने उचलले आहेत ते दिले नाही तर तुझा खूनच करेन.आपल्या मुलगा क्रिकेटवर सट्टा लावतो आणि त्याने कर्ज करून ठेवले आहे हे तोपर्यंत त्याला माहीतच नव्हते.
मुलाला ताडताड बोलून झाले. एक कानाखाली वाजवूनही झाली. थोड शांत झाल्यावर त्याने मुलाला विचारले.
"किती कर्ज आहे?"
"खूप जास्त आहे पप्पा. मला मरू द्या.. मी त्याच लायकीचा आहे. तुम्ही यात पडू नका. मला माझी शिक्षा भोगू द्या."
" तरी पण आकडा सांगशील? "
"खूप जास्त आहे." मुलगा खाली मान घालत म्हणाला.
" व्याज धरून पन्नास लाख "
" व्याज धरून पन्नास लाख "
" ठीक आहे ना..... आपल्या घराची किंमत असेल तेवढी."
"पप्पा. खुप वर्षे पैसे साठवून हे घर बांधले आहे तुम्ही.आताच राहायला आलोत आपण."
" तूझ्या जिवापेक्षा जास्त नाही. आणखी काही वर्षे भाड्याच्या घरात राहू. त्याची सवय आहे मला आणि तूझ्या आईला. "
3) आपल्या मुलाबद्दल काहिबाही ऐकायला येत होते पण त्याला ते खरे वाटत नव्हते. पण त्या दिवशी त्याने त्याला प्रत्यक्ष पकडले. चक्क साडी नेसून, लिपस्टिक लावून तो आरशापुढे उभा होता. त्याचा संताप संताप झाला. त्याने त्याला लाथाबुक्यांनी तुडवायला सुरुवात केली इतके की शेवटी त्याची बायको मध्ये पडली.
दिवसभर तो काहीच न सुचल्यासारखा पडून होता.संध्याकाळी त्याच्या लक्षात आले की मुलगा घरातून निघून गेला आहे. तो ताडकन उठला.त्याला पाहत गावभर फिरला. कुठंच सापडला नाही. तसे अज्ञात शंकेने त्याने गावाबाहेरच्या विहिरी, तलाव इथे तपास सुरु केला... पण कुठेच ट्रेस लागेना. मग अचानक काहीतरी सुचून तो गावाबाहेरच्या किन्नरांच्या वस्तीत गेला. तिथेच एका झोपडीत मुलगा झोपलेला होता.
त्याला उठवत आपल्या अश्रूना वाट देत तो म्हणाला..
"बेटा घरी चल... तू जसा आहेस तसा मला मान्य आहे."
त्याला उठवत आपल्या अश्रूना वाट देत तो म्हणाला..
"बेटा घरी चल... तू जसा आहेस तसा मला मान्य आहे."
©®डॉ. विवेक चंद्रकांत वैद्य. नंदुरबार.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा