महाराणी ताराबाई
भाग ३
भाग ३
©® सौ.हेमा पाटील.
पहिल्या भागात आपण महाराणी ताराबाई यांच्याविषयी माहिती घेतली. दुसऱ्या भागात त्यांच्या आयुष्यातील महत्वाच्या घटना व त्यांचे कर्तुत्व याविषयी पाहिले. आता उत्तरार्धात ताराराणीच्या पुढील आयुष्याविषयी जाणून घेऊया.
ज्या औरंगजेबाने संभाजी महाराजांना हाल हाल करुन मारले, त्या औरंगजेबाचे मनसुबे राणी ताराबाई यांनी तडीस जाऊ दिले नाहीत. औरंगजेब परत उत्तरेकडे जाऊ शकला नाही. ज्या हिंदवी स्वराज्याला बेचिराख करण्याचे व हिंदवी स्वराज्याचे नामोनिशाण मिळवायचे मनसुबे त्याने रचले होते, त्याच हिंदवी स्वराज्याच्या मातीत त्याने अखेरचा श्वास घेतला. यास कारणीभूत असणाऱ्या अशा या थोर, पराक्रमी राणीस मानाचा मुजरा.
भोसले कुळाची लक्ष्मी, झाली रणरागिणी |
तलवारी अन् ढाली घेऊन हाती, झाली ती मर्दिनी ||
तलवारी अन् ढाली घेऊन हाती, झाली ती मर्दिनी ||
घोर पातशहा आलमगिराचा, बसला महाराष्ट्र देशी |
सोडून आपले अबलापण, झाडून आपले दुःख ||
सोडून आपले अबलापण, झाडून आपले दुःख ||
उतरली मोहित्यांच्या कुळातील कन्या, नाम तिचे सीता ||
छत्रपतींची भार्या, तारा बैसली घोड्यावरी |
हाती घेऊन शस्त्र अस्त्र, ती देशाला तारी ||
हाती घेऊन शस्त्र अस्त्र, ती देशाला तारी ||
तत्कालीन शाहीरांनी राणी ताराबाई यांच्यासाठी असे पोवाडे रचले होते.
आणि हे सत्यच होते. ताराबाई यांनी हाती शस्त्र घेऊन औरंगजेबाशी सामना केला. मराठ्यांचे धैर्य व सामर्थ्य टिकवून ठेवण्याचे काम केले. मराठ्यांच्या मनातील अस्मिता जागृत केली.
आणि हे सत्यच होते. ताराबाई यांनी हाती शस्त्र घेऊन औरंगजेबाशी सामना केला. मराठ्यांचे धैर्य व सामर्थ्य टिकवून ठेवण्याचे काम केले. मराठ्यांच्या मनातील अस्मिता जागृत केली.
छत्रपती संभाजी महाराज यांच्या अमानुषपणे केलेल्या वधामुळे सर्वसामान्य मराठा माणसे पेटून उठली. हीच माणसे स्वराज्याचे रक्षण करण्यासाठी ताराबाई यांच्या नेतृत्वाखाली मोगलांशी लढा देऊन औरंगजेबाचा कर्दनकाळ ठरली.मराठ्यांच्या इतिहासात इतके कर्तुत्व गाजवणारी एकच राणी होऊन गेली. राणी ताराबाई!
राजाराम महाराज यांच्या मृत्यूनंतर औरंगजेब या अत्यंत कावेबाज व सामर्थ्यवान सम्राटाशी लढताना राणी ताराबाई यांनी अतिशय शौर्याने व पराक्रमाने त्याला सळो की पळो करुन टाकले. औरंगजेबाने रायगड ही राजधानी जिंकून घेतली होती. राजा नाही, राजधानी नाही, पैसा नाही, शस्त्रे नाहीत,नेता नाही अशा अवस्थेत मराठ्यांना संघटित करणे व मोगली आक्रमण परतवून लावणे सोपे नव्हते. मराठ्यांच्या इतिहासातील हा अत्यंत तेजस्वी, रोमहर्षक व अद्भूत घटनांनी भरलेला कालखंड होता. अत्यंत प्रतिकूल परिस्थिती असूनही मराठ्यांनी सव्वीस वर्षे आपले मनोधैर्य,सत्व व स्वत्व टिकवून ठेवले. मराठ्यांना स्फूर्ती देऊन त्यांचा स्वाभिमान जागृत करण्यामागे महाराणी ताराबाई या होत्या. तसेच उत्तर हिंदुस्थानात मराठ्यांची सत्ता निर्माण करण्याचा पाया ताराराणीसाहेबांनी घातला हे इतिहासाला मान्य करावे लागले.
महाराणी ताराबाई यांचा जन्म शिवराज्याभिषेकाच्या दरम्यान झाला होता. माहेरी वाडवडिलांच्या पराक्रमाचा वारसा तर सासरी छत्रपती शिवाजी महाराज यांची स्नुषा होण्याचे भाग्य त्यांना लाभले. मृत्यू समयी त्यांचे वय ८६ वर्षे होते. त्यांचा मृत्यू झाला त्यावेळी मराठे पानीपतची लढाई हरले होते. म्हणजे मराठ्यांच्या उत्कर्षाचा परमोच्च बिंदू ते पराक्रमी मराठ्यांची लज्जास्पद हार असा फार मोठा चढउतार ताराराणींनी पाहिला.
संपूर्ण जगाचा इतिहास पाहिला तर ताराराणींशी तुलना करता येईल अशा स्त्रिया क्वचितच सापडतील. औरंगजेब अखेरीस असे म्हणाला,
"मराठ्यांच्या देशातील बायका इतक्या शूर, हिकमती आणि पराक्रमी असताना आपण हा मराठी मुलूख आपल्या दावणीला बांधण्याचा आशावाद बाळगून गेली सव्वीस वर्षे या भूमीतील डोंगर- दऱ्यातून, जंगलातून, रानावनातून वणवण फिरलो ही फार मोठी चूक केली."
औरंगजेबाने स्वतः असे प्रतिपादन केले यातच ताराराणी यांच्या यशाची गाथा आहे.

अशा या पराक्रमी व महत्वाकांक्षी राणीला मात्र आयुष्याच्या उत्तरार्धात गृहकलहाला सामोरे जावे लागले. त्यांचा पुत्र शिवाजी यांना पदच्युत करुन त्यांचा सावत्र पुत्र, राजसबाई यांचा पुत्र संभाजी गादीवर बसला. ताराराणीला साधारणपणे पंधरा वर्षे पन्हाळा इथे व वीस वर्षे सातारा इथे नजरकैदेत रहावे लागले. परंतु त्या नजरकैदेत असल्या तरी संभाजी राजे महत्वाच्या घडामोडींमध्ये त्यांचा सल्ला घेत असत. तसेच साताऱ्याचे शाहूराजे घरगुती व राजकीय बाबतीत त्यांचा सल्ला घेत असत.
शाहूमहाराज व संभाजी राजे यांच्यातील वाद विकोपाला गेला. आजवर एकजुटीने मोगलांच्या विरोधात लढणारी मराठ्यांची सेना आता आपापसात लढू लागली. वैयक्तिक स्वार्थ मोठा ठरला. ताराबाई सातारला रहायला आल्यावर त्यांनी पहिले एक महत्त्वाचे काम केले. शाहूराजे व संभाजी राजे यांच्यातील बेबनावामुळे मोगल व निजाम हे मराठ्यांना त्रास देत असल्याने दोघां भावांमधील वाद महाराणी येसूबाई यांच्या मदतीने मिटवण्याचा प्रयत्न केला. त्यात यश येऊन त्यांच्यामध्ये जो तह झाला त्यास वारणेचा तह असे म्हणतात.
शाहूमहाराज यांच्या पोटी पुत्ररत्न नव्हते. त्यामुळे आपला नातू रामराजे यांना गादीवर बसवावे अशी कामना ताराराणी यांनी केली. त्याप्रमाणे रामराजे गादीवर बसले. रामराजेंचा कारभार ताराराणींना पसंत पडला नाही. समजावून सांगितले तरीही रामराजे आपले वर्तन सुधारण्यास तयार नाहीत हे पाहून ताराबाईंनी त्यांना किल्ल्यावर बंधनात ठेवले. शिवाजी महाराजांच्या शिकवणीसारखा राज्यकारभार करायचा असे ताराराणींचे मत होते. ताराबाई वतनदारीच्या विरोधात होत्या. वतनदारी म्हणजे फक स्वार्थ असे त्यांचे मत होते.त्यामुळे स्वतःच्या नातवाला बंधनात ठेवण्यास त्यांनी मागेपुढे पाहिले नाही.
मराठा साम्राज्याच्या क्षितिजावर स्वयंतेजाने ८६ वर्षे तळपणाऱ्या ताऱ्याचे देहावसान दिनांक ९ डिसेंबर १७९१ रोजी झाले. साताऱ्यानजिक श्री क्षेत्र माहुली येथे त्यांची समाधी आहे.

समाप्त.
सदर लेख लिहिण्यासाठी ' परमप्रतापी पुण्यश्लोक महाराणी ताराऊसाहेब ' या श्री. अशोकराव शिंदे सरकार लिखित पुस्तकाची मदत घेतली आहे.
लिहिताना मूळ इतिहासाला धक्का लागू न देता लिहिले आहे. तरीही काही चूक घडली असल्यास ती अनवधानाने घडली असण्याची शक्यता आहे.
©® सौ.हेमा पाटील.
अष्टपैलू लेखक स्पर्धा - २०२५

Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा