रात पुनवेची आली भाग 11
मागील भागात आपण पाहिले की सखूला दौलती झिडकारतो . काशी आणि दौलती यांचे प्रेम फुलत असतानाच पाटलांच्या घरात नर्मदा नावाची स्त्री मरण पावते . आता पाहूया पुढे .
म्हातारबा पाटील येऊन गेल्यापासून कासूबाई अस्वस्थ होती . एकीकडे माहेर पुन्हा मिळण्याची शक्यता आणि दुसरीकडे संपूर्ण गावाचा विश्वास . काय करायचे ? मोठा प्रश्न उभा राहिला होता .
आजपर्यंत कासूबाई तिच्या घराण्यातून येणाऱ्या कित्येक पिढ्यांची विद्या आणि श्रद्धा जपत होती . केवळ प्रत्येक पिढीत एका स्त्रीला माहित होणारी ही रहस्यमय विद्या आणि त्याद्वारे गावच्या अनेक संकटांचा केलेला सामना .
आपल्याला संपूर्ण गावाचा विचार करायला हवा याची जाणीव ठेवून निर्णय घेणे आवश्यक असल्याचे तिचे मन सांगत होतेच . दोन दिवस अजून विचारासाठी असल्याने कासूबाई आपल्या विचारांना लगाम घालत शेतावर निघाली .
काशी घरी येताना मनात विचारांचे काहूर माजले होते . दौलती , त्याचे पुरुषी सौंदर्य तिला भुरळ घालत होते . दुसरीकडे उलट असलेले नाते , त्यांच्या घराण्याचा असलेला इतिहास पाहून आपण पुढे जाणे योग्य नाही असेही वाटत होते .
परंतु काशी महत्वकांक्षी होती . तिला आपले आयुष्य आरामात आणि कोणत्याही विवंचना नसलेले हवे होते . दौलती त्यासाठीचा राजमार्ग होता . काशी विचारांच्या गर्तेत सापडली होती .
समोर नर्मदाचे प्रेत पडलेले असतानाही डोक्यातला विचारांचा गोंधळ थांबत नव्हता . अखेर पाटील घराण्याचा गावावर असलेला वचक पुन्हा एकदा सिद्ध झाला होता . नर्मदा बुडून मेली असेच म्हातारबा पाटील म्हणाले आणि गावकरी पुढच्या तयारीला लागले .
" नर्मदी बुडाली न्हाय आबा . " दौलती चिडला .
" दवलती पुन्यांदा हे आईकायच न्हाय आमाला . "
" पर आबा , देवळात देवीची पूजा करताय आन दुसरीकड आस? "
" आजुन तरुण रगात हाय तुमचं . ह्यो वाडा मजबूत राहायला पायजे असलं तर काय काय येळेला कानाडोळा करायला लागणार . "
दौलती जायला निघाला .
दौलती जायला निघाला .
" थांब , दवलती गड्याच्या छातीवर फकस्त लग्नाच्या बाईच्या कुकाच डाग पायजे . "
दौलती थबकला .
काशी त्याच्या मिठीत असताना तिच्या कुंकवाचा ठसा उमटलेला होता . दौलती वेगाने बाहेर पडला .
रात्र वर चढली आणि सगळे गाव सामसुम झाले . डोळ्यात बोट घातले तरी समोरचे दिसत नव्हते . दुरवर माळावर खंडोबाच्या मंदिराच्या मागे असलेल्या दुमजली वाड्यात एका खोलीत बारीक दिव्याचा उजेड लांबूनही दिसत होता . कडी वाजली आणि राधा पदर नीट करून बाहेर आली .
तिच्या सोबती असलेल्या मालूने दरवाजा उघडला आणि मागे सरकली .
" पाटील , आस इतक्या राती भेटायचं कशाला ? " राधा दिव्यातील वात नीट करत म्हणाली .
" राधे , गोरा सायेब धरण बांधणार हाय . गावकरी देवीला साकड घालणार हायत . "
" मला समद माहित हाय पाटील . कासू आक्का कउल लावणार हाय ."
" पर कासू आक्का कउल लावणार नसल तर ? "
" मंग त्यांची पोरगी पर तीच लगीन झालं असलं तरच न्हाय तर आम्ही लावतो . "
राधाने उत्तर दिले .
" मंग त्यांची पोरगी पर तीच लगीन झालं असलं तरच न्हाय तर आम्ही लावतो . "
राधाने उत्तर दिले .
" कायबी झालं तरी आमी म्हणू तसा कउल पायजे . तवा तू तयारीत रहा . "
इतकेच सांगून पाटील बाहेर पडले .
एका अनामिक संकटाची चाहूल राधाला अस्वस्थ करत होती .
" खंडूबाच्या माळावर वाट बघतो . "
दौलती मिठी सोडताना हळूच काशीच्या कानात बोलला होता .
दौलती मिठी सोडताना हळूच काशीच्या कानात बोलला होता .
नर्मदाकाकी मृत सापडली आणि दिवसभरात झालेल्या घडामोडीमुळे काशी विसरली होती . आता निवांत होताच तिला आठवले .
" वाड्यात आस झालं असताना त्यो न्हाय यायचा . " काशी स्वतःशीच म्हणाली .
" पर आला तर ? त्याचा हिरमोड व्हईल . "
दुसरे मन म्हणाले .
दुसरे मन म्हणाले .
" झाला तर मला काय त्याच ? "
तिने प्रश्न उडवून लावला .
तिने प्रश्न उडवून लावला .
डोक्यातला गोंधळ काही मिटत नव्हता . अखेर तारूण्य आणि प्रेम जिंकले . अंगावर घोंगडी घेऊन काशी हळूच बाहेर पडली .
रात्रीच्या त्या गार वाऱ्यात कितीतरी वेळ दौलती उभा होता .
" न्हाई येणार ती . किती पोरी अशा माग फिरत्यात . "
दौलती मनात विचार करत होता आणि अचानक लांब एक आकृती दिसली .
दौलती मनात विचार करत होता आणि अचानक लांब एक आकृती दिसली .
काशीने त्याला पाहिले आणि तिच्या जीवात जीव आला .
" मला वाटलं म्या आज गारठून मरणार . " दौलती हसत म्हणाला .
" मरणाची गोष्ट नग . पर मामा आपल्याला परवानगी देणार न्हाई . " काशी म्हणाली .
" काशी , धरण झाल्यावर गाव दुसरीकड जाईल . आपून पुण्यात निघून जाऊ . "
तिला जवळ घेत दौलती म्हणाला .
तिला जवळ घेत दौलती म्हणाला .
" व्हय , पर मला भ्या वाटतं . " काशी त्याला बिलगत बोलली .
" अस्स , म्या हाय नव्ह . "
केसांची बट सारत दौलती जवळ सरकला .
केसांची बट सारत दौलती जवळ सरकला .
" थांब दवलती आता नग . लगीन झाल्यावर म्या तुझीच हाय . " कितीतरी वेळ दोघे बोलत होते .
शेवटी नाईलाजाने एकमेकांचा निरोप घेऊन दोघे घराकडे निघाले .
हळूच घरात येऊन काशी खोलीत शिरली .
" कुठं गेली व्हतीस ? " झामा विचारत होती .
" आता , वाईच डोळा लागत नव्हता म्हणून अंगणात गेले व्हते . "
" आक्का खोट बोलू नग . अत्तराचा वास येतोय लुगड्याला . "
" ते व्हय ? आग मोगरा फुलला हाय अंगणात . चार फुल कुस्करली . "
" आक्का , पाटलांचा नाद सोडून दे . मला समद माहित हाय . आईला न्हाय आवडणार .
" झामा चिडली . " नग आवडू दे . म्या माझं बगल . " काशीने विषय संपवला .
" कुठं गेला व्हता र ? "
आईचा आवाज ऐकून दौलती दचकला .
" रानात गेलो व्हतो . एक काम व्हत . "
" अस्स व्हय ? आपल्या रानात चमेलीच्या कळ्या हायत?" आईने विचारले .
त्याबरोबर दौलतीने आईला सगळे खरे सांगून टाकले .
त्याबरोबर दौलतीने आईला सगळे खरे सांगून टाकले .
" आर पर आपलं नातं न्हाई . यासनी न्हाय पटायचं ." आईने समजूत काढली .
" उद्या गोऱ्या सायबाची भेट घ्यायची हाय . तुला ह्यांचा निरोप द्यायचा म्हणून वाट बघत व्हते . आगीबर नग खेळू लेकरा . " आई त्याला निरोप देऊन निघून गेली .
दौलती आणि काशी भेटून निघताना तिथून आणखी एकजण बाहेर पडले होते . पलीकडच्या गावात देवदासी असणारी सखुबाई .
दौलती तिच्या कमाईचे मोठे साधन होते . काहीही झाले तरी ह्यांनी एकत्र येऊन चालणार नाही असे ठरवून सखुबाई तिच्या गावी परत गेली .
धरण बांधायला गावकरी परवानगी देतील का ?
कासूबाई कौल लावेल का ?
सखुबाई आता काय पाऊल उचलेल ?
वाचत रहा .
रात पुनवेची आली
©® प्रशांत कुंजीर .
अष्टपैलू 2025 स्पर्धा
सदर कथेचे लिखाण चालू आहे .
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा