रात पुनवेची आली भाग 13
मागील भागात आपण पाहिले की दौलती जखमी होतो . देवीचे पातळ द्यायचा विधी कौल लावायचा त्याच दिवशी करायचे ठरते . धरण बांधण्यासाठी वेगाने हालचाली सुरु होतात . आता पाहूया पुढे .
" विल्यम , वुई वॉन्ट क्विक डिसिजन . व्हाय आर यू टेकिंग लॉट ऑफ टाईम ? "
ब्रिटिश सरकारच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पाठवलेले पत्र वाचून विल्यम चिडला .
" वन मिस्टेक अँड ऑल वर्क डिस्ट्रॉय . मला हुशारीने मार्ग काढायला पायजे . "
अनेक दशके महाराष्ट्रात राहिल्याने मराठी उत्तम बोलणारा विल्यम शांतपणे विचार करत होता .
अनेक दशके महाराष्ट्रात राहिल्याने मराठी उत्तम बोलणारा विल्यम शांतपणे विचार करत होता .
शेरगाव एकदा कह्यात आले की बाकी गावांची परवानगी फार अवघड नव्हती .
त्याने आपली विश्वासू माणसे गावात पेरली होती . काळूबाई मंदिरावर गावाची असलेली श्रद्धा बघून विल्यम थोडा चिंतेत होता . आठ दिवसांनी कौल घेतला आणि तो विरोधात गेला तर ?
त्यानंतर मग संघर्ष अटळ होता . विल्यम अत्यंत धूर्तपणे चाली आखत होता . कासूबाई अत्यंत प्रामाणिक असल्याचे त्याला माहीत होते . आता त्याची नजर होती काशी वर . वयाच्या मानाने महत्वाकांक्षी असलेली ही मुलगी आपल्या कामास येईल अशी त्याला खात्री होती .
दौलती आणि काशी यांच्या प्रेमाबद्दल कळल्यावर आपले अर्धे काम झाल्याचे त्याने ओळखले होते . त्याच्या एका विश्वासू मोलकरणी मार्फत त्याने काशीला भेटायचा निरोप पाठवला .
गोऱ्या साहेबाने आपल्याला भेटायला का बोलावले असेल ? काशी थोडी विचारात पडली . तरीही भेटून बघू असा विचार करून तिने भेटायला तयार असल्याचा निरोप दिला . दोन दिवसांनी देवराईच्या मागच्या बाजूला भेटायचे ठरले .
" सायेब लवकर बोला काय काम हाय ? "
इकडे तिकडे बघत काशी घाईने म्हणाली .
" काशी , तुला दौलती पायजे ना ? " विल्यम हसला .
" व्हय , पर ते माझं म्या बघून घील . "
" कस ? ह्या गावातली लोकं तुला तसं करू देतील ? बाहेर पळून जायचं तर पैसे लागणार . "
विल्यमचे बोलणे ऐकून काशी विचारात पडली .
विल्यमचे बोलणे ऐकून काशी विचारात पडली .
" तुझे सगळे प्रश्न मी सोडविल . मुंबईत घर , दौलतीला नोकरी आणि भरपूर पैसे . "
" ह्ये समद तुम्ही मला फुकट देणार ? "
" काशी ह्या जगात फुकट काही मिळतं नसतं . "
" काय किंमत हाय ह्या समद्याची ? "
" कौल आमच्या बाजून लागला पायजे . धरणाच्या बाजूने कौल देणारं फुल तू पाडायच ."
" काय ? असलं काम मला जमायचं न्हाय . "
" कौल आमच्या बाजून लागला पायजे . धरणाच्या बाजूने कौल देणारं फुल तू पाडायच ."
" काय ? असलं काम मला जमायचं न्हाय . "
" काशी नीट विचार कर . कौल काय पण लागला तरी सरकार थांबणार नाही . जोर जबरदस्ती केली तर गावातली माणसं मरतील . "
काशी कसेबसे विचार करून सांगते इतकेच सांगून वेगाचे घराकडे निघाली .
घराच्या बाहेर ऐकू येत असलेले आवाज ऐकून काशी जागेवर थांबली .
" कासू आक्का , काशीला देवीच पातळ द्यायला ह्योच दिस चांगला हाय . "
वयाने ज्येष्ठ असलेले पंच म्हणाले .
वयाने ज्येष्ठ असलेले पंच म्हणाले .
" तात्या , पातळ घालणारी गाव वलांडून जात न्हाय . संसार करायचा असला तरी गावातच . काशी काय म्हणती ते इचारल पायजे . "
" आक्का , पातळ कुणाला द्याच ते तुम्ही ठरवायचं . गेल्या सात पिढ्या हे चालत आलं हाय . "
अशी बरीच चर्चा करून सगळे बाहेर पडले .
अशी बरीच चर्चा करून सगळे बाहेर पडले .
चाललेली चर्चा ऐकून काशी खाडकन भानावर आली . जी गोष्ट तिला नको होती तीच समोर उभी होती .
कासू आक्का सगळे ऐकून विचारात पडल्या . काशी ह्या सगळ्यासाठी तयार होईल ? देवीच्या समोर बसून मन स्थिर करण्यासाठी कासू आक्का प्रार्थना करू लागल्या . त्यांनी आपल्या दोन्ही मुलींना हाक मारली .
" काशी , झामा हिकडं या . "
आईने कशाला बोलावले याची काशीला पूर्ण जाणीव होती .
आईने कशाला बोलावले याची काशीला पूर्ण जाणीव होती .
" काय काम हाय आई ? "
" आठ दिवसांनी देवी आईचा कौल हाय . "
" व्हय , पर आमचं त्यात काय काम ? "
" काशी , देवी आईच पातळ मोठ्या पोरीला मिळत . "
" व्हय ठाऊक हाय . "
" तू तयार हाईस नव्ह ? "
" आताच सांगायला पायजे का ? "
काशीने निर्धाराने ते शब्द उच्चारले .
" तू तयार हाईस नव्ह ? "
" आताच सांगायला पायजे का ? "
काशीने निर्धाराने ते शब्द उच्चारले .
" कौल लावायच्या आधी सांगायला लागलं . "
" बरं , म्या आता जरा खाण्याच बघते . "
काशी उत्तर टाळून निघून गेली .
" बरं , म्या आता जरा खाण्याच बघते . "
काशी उत्तर टाळून निघून गेली .
विल्यम काशीला भेटून आला . त्याला खात्री होती त्याचे काम नक्की होणार . त्याने आपल्या माणसांना सावध राहायला सांगितले . गावात काय घडते यावर बारीक नजर ठेवणे त्याच्यासाठी आवश्यक होते .
रात्रीची जेवणे झाली आणि गाव गुडूप अंधारात झोपेच्या स्वाधीन झाले . रातकिड्यांची किरकिर चालू झाली . चांदण्यात झाडे झुडपे न्हात होती . पाटलांच्या वाड्यातून एक कंदील बाहेर पडला .
कासूबाईच्या मागच्या दारातून काशी पाऊल न वाजवता निघाली . झपझप चालत होती आणि अचानक काशीने ओठ दाताखाली दाबला . पायात बाभळीचा काटा खोलवर घुसला होता .
काटा काढायला खाली वाकली तर काटा खोल घुसला होता . शेवटी काशी पायाच्या बोटांवर चालत निघाली . नेहमीच्या ठिकाणी पोचताच तिच्या तोंडातून आई गं! अशी दुखरी कळ बाहेर पडली .
दौलती धावतच तिच्याकडे आला .
" इतका मोठा काटा पायात घुसला तरी चालत आलीस व्हय ? " " तुम्ही हित वाट बघतं असताना म्या परत जाऊ ? "
" थांब , काटा काढतो . "
दौलतीने काटा काढला आणि रक्ताची धार लागली .
" थांब , काटा काढतो . "
दौलतीने काटा काढला आणि रक्ताची धार लागली .
काशीने बटवा उघडला आणि जखमेवर एक भुकटी लावली .
" पाय सुजला हाय . चल घरी जाऊ परत . "
" पर , पुढ चार दिस भेटता याचं न्हाय . "
काशीच्या डोळ्यात पाणी आले .
काशीच्या डोळ्यात पाणी आले .
दौलतीने अलगद तिच्या कमरेतून हात घातला आणि तिला उचलले . काशीने आपल्या नाजूक हातांचा विळखा त्याच्या मानेभोवती घातला .
गावापासून जवळ येताच त्याने काशीला सोडले . काळजी घेण्याची ताकीद देऊन दौलती मागे फिरला .
गावापासून जवळ येताच त्याने काशीला सोडले . काळजी घेण्याची ताकीद देऊन दौलती मागे फिरला .
काशी गुपचूप घरात येऊन झोपली . आता काटा कसा मोडला याबाबत आईला काहीतरी सांगावे लागणार होते . त्याचा विचार करता करता झोप कधी लागली तिला समजलेच नाही .
काशी विल्यमची मदत करेल का ?
कौल काय येईल ?
ह्या प्रेमात काय अडथळे येतील ?
वाचत रहा .
रात पुनवेची आली .
©® प्रशांत कुंजीर
अष्टपैलू 2025 स्पर्धा
सदर कथेचे लिखाण चालू आहे.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा