रात पुनवेची आली भाग 14
मागील भागात आपण पाहिले विल्यम काशी समोर एक प्रस्ताव ठेवतो . कौल लावायच्या दिवशी पातळ नेसावे लागेल असे आई काशीला सांगते . दौलती हल्ल्यात जखमी झाला असल्याची कुणकुण कोणालाच नाही . आता पाहूया पुढे .
दौलती माळावर आला . भीमा त्याची वाट बघत उभा होता .
" पाटील , सकाळीच काय काम काढलं ? "
" दंडावर वार बघ . कुऱ्हाड तुमच्यापैकी हाय का ? "
" न्हाय पाटील , लाकड फोडायची कुऱ्हाड हाय . "
" अस्स , कोणाची माय व्याली ह्या दवलत पाटलावर वार करायला . "
" पाटील चिडून न्हाय चालणार . जाळं टाकून शिकार पुन्यांदा फसवायला पायजे . "
भीमाची युक्ती ऐकून दौलती प्रचंड आनंदी झाला .
" पाटील , सकाळीच काय काम काढलं ? "
" दंडावर वार बघ . कुऱ्हाड तुमच्यापैकी हाय का ? "
" न्हाय पाटील , लाकड फोडायची कुऱ्हाड हाय . "
" अस्स , कोणाची माय व्याली ह्या दवलत पाटलावर वार करायला . "
" पाटील चिडून न्हाय चालणार . जाळं टाकून शिकार पुन्यांदा फसवायला पायजे . "
भीमाची युक्ती ऐकून दौलती प्रचंड आनंदी झाला .
कौलाचा दिवस उजाडला आणि सगळे गाव देवीच्या मंदिराकडे निघाले . गेले आठ दिवस काशी आणि दौलती भेटले नव्हते . दौलती दिसेल म्हणून काशीचे मन थाऱ्यावर नव्हते . कासू आक्का पूजेची तयारी करत होत्या . म्हातारबा पाटील अस्वस्थ होते .
कासू आक्का सख्खी बहीण असूनही आपले ऐकत नाही याचा त्यांना कुठेतरी राग येतच होता . हळुहळू देवीच्या देवळासमोर लोक जमायला सुरुवात झाली .
कासू आक्का तयार झाल्या . गर्भ रेशमी रंगाची नऊवार , कपाळावर कुंकू , नाकात नथ . साक्षात देवीचे स्वरूप दिसणाऱ्या कासूबाई घरातून निघाल्या .
" आक्का , थांब . " म्हातारबा पाटलांनी आवाज दिला .
" दादा ,. आता नग . कौल घ्यायला जाताना कायबी बोलू नग . फक्त देवीचा कौल मनापासन ग्वाड मानून घे . "
" आक्का , कौल कायबी असला तरी म्हातारबा पाटील सांगल त्योच निर्णय हुणार ."
" दादा , माझं आईक . घरदार गोकुळ हाय तुझं . "
कासू आक्का एवढेच बोलून पुढे निघाल्या . राधा मुरळी देवळात आधीच हजर होती . म्हातारबा पाटलांचा नूर काहीतरी वेगळाच होता . काशी देवळात सगळीकडे दौलती कुठे दिसतो का पहात होती . दौलती कुठेच दिसत नव्हता .
कासू आक्का शांतपणे देवळाच्या दिशेने निघाल्या . त्यांनी पहिल्या पायरीवर असलेले लिंबू उचलले आणि त्याचे दोन भाग करून त्यातील एक भाग जीभेवर ठेवला . पुढचे पाऊल टाकायच्या आधीच संपूर्ण मंदिर त्यांच्याभोवती फिरू लागले आणि कासूबाई बेशुद्ध झाल्या .
" पाटील , आता काय करायचं ? आक्का सुदीवर यायची वाट बघायची का ? "
" गणबा आर देवी आई ताटकळत राहील नव्ह . राधे व्हय फूड आण लाव कौल . "
पाटलांनी इशारा दिला .
पाटलांनी इशारा दिला .
" पाटील , कासू आक्काची लेक काशी फुल ठिविल . "
एक पंच म्हणाले .
एक पंच म्हणाले .
" चालल , तयारी करा . इंगळ पेटवा . राधे आंघोळ करून ये . " पुजारी भराभर सूचना देत होते .
दौलती रानातून एकटाच चालत होता . मुद्दाम उशीर करून तो देवळात जायला निघाला . गावातून बाहेर पडताच माळरान लागले . रातकिडे किरकिर करत होते . सगळे गाव देवळात जमले होते . त्याच्यापासून चार हातावर एकजण चालत होता . ह्यावेळी दौलती संपलाच पाहिजे असा निर्धार करूनच पाठलाग चालू होता .
अचानक दौलती थांबला आणि गर्रकन मागे वळला .
" भाड्या , पळू नग थांब . "
दौलती ओरडला आणि समोरचा माणूस कुऱ्हाड घेऊन धावून आला . दौलती सावध असल्याने त्याने वार अडवला आणि शिट्टी. मारताच भीमा आणि त्याच्या साथीदारांनी हल्ला करणाऱ्याला पकडले .
" भीमा , ह्याला डोंगरात गुहेत लपवा . देवळात काम झालं की मग येतो ."
दौलती मागे वळूनही न बघता देवळाकडे निघाला . काशी पातळ नेसली तर ? ह्याच विचाराने बैचेन होऊन त्याची पावले वेगाने पडत होती .
राधाने कपाळावर हळदीचा मळवट भरला आणि त्यावर रुपयाच्या आकाराचे कुंकू लावले .
" खंडेराया , लाज राख . तुझ्या नावाने कुंकू लावलं तरी त्याचे धनी वेगळेच . पण माझ्या हातून पाप नको व्हायला . "
मनोमन देवाची प्रार्थना करत ती तयार होत होती . इकडे देवीच्या मुखवट्यावर कुंकू भरून सगळी तयारी काशीने पूर्ण केली . राधा इंगळावर चालत मंदिरात आली .
" शेरगावकर मंडळी हा मान कासू आक्काचा . पर आक्का सुदीत न्हाय . लावायचा का कौल . "
राधाने विचारले .
" व्हय , लावा कौल . "
गावकरी एका सुरात म्हणाले .
गावकरी एका सुरात म्हणाले .
" देवीच्या उजव्या खांद्यावरच चाफ्याच फुल पडल तर गावं सोडायच आन डावी आली तर धरण व्हायला नग . "
राधाने इशारा करताच काशीने थरथरत्या हाताने देवीच्या दोन्ही खांद्यावर फुले ठेवली .
केस मोकळे सोडलेली राधा देवीच्या मुख्य गाभाऱ्यात आली . संबळ वाजू लागला आणि देवीची आराधना सुरू झाली . अनेक बायका घुमू लागल्या . राधा देवीकडे प्रार्थना करत होती . म्हातारबा तिला इशारा करताना काशीने पाहिले . आता काय करावे ?
अचानक एक घुमणारी बाई म्हातारबा पाटलांच्या अंगावर गेली . पाटलांची नजर हटली . राधा थोडीशी बावरली असतानाच काशीने पाहिले उजवे फुल हलत होते .
काशीने गिरकी घेत पदर फिरवला आणि एकच गलका झाला . उजवा कौल उजवा कौल . वाजवणारे थांबले .
" मंडळी , देवीन कौल दिला . धरण झाल्यावर गाव सोडायचं . " राधा फुल हातात धरून ओरडली .
" पाटील , गावाचा निर्णय समद्या लोकांना सांगा . "
" न्हाय , पुन्यांदा कौल लावा . " म्हातारबा गरजले .
" देवीच्या पुढ जाऊ नका पाटील . "
पुजारी विनवू लागला . तोपर्यंत दौलती देवळात पोहोचला होता .
पुजारी विनवू लागला . तोपर्यंत दौलती देवळात पोहोचला होता .
" काशीला पातळ द्याच नव्ह ? "
एक बाई पुढे झाली .
एक बाई पुढे झाली .
" त्याची एवढी घाई नग मावशी . तिची आई तिच्या हातान पुढच्या साली पातळ देईल . "
राधा पटकन पुढे झाली आणि म्हणाली .
" आम्ही पाटील हाय गावच . कौल पुन्यांदा घ्या . "
म्हातारबा अजूनही रागात होते .
" धाकल पाटील आता तुम्ही सांगा . "
पुजारी अचानक म्हणाला .
पुजारी अचानक म्हणाला .
" आबा , पाटलांना गावच ऐकायला पायजे . देवीनं कौल दिला हाय . "
दौलती असे म्हणाला आणि देवीची पालखी जल्लोषात गावात प्रदक्षिणा घेण्यासाठी निघाली .
हल्लेखोर कोण असेल ?
दौलती वडिलांच्या विरुद्ध गेला त्याचे काय परिणाम होतील ?
वाचत रहा .
रात पुनवेची आली
©® प्रशांत कुंजीर
रात पुनवेची आली
©® प्रशांत कुंजीर
टिप काही प्रथा परंपरा कथेतील गरज म्हणून लिहिल्या आहेत .लेखक त्याचे समर्थन करत नाही .
अष्टपैलू 2025 स्पर्धा .
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा