रात पुनवेची आली भाग 15
देवीने दिलेला कौल म्हातारबा पाटलांना मान्य नव्हता . इकडे दौलतीने हल्लेखोराला पकडले होते . कासू आक्का अजून शुद्धीवर आली नव्हती . पालखी प्रदक्षिणेला निघाली . आता पाहूया पुढे .
देवीची पालखी उचलली आणि कासू आक्का जागी झाली . काय झाले याची तिला कल्पना आली होती .
" काशी , हिकडं ये ."
काशी पळतच आईजवळ गेली .
काशी पळतच आईजवळ गेली .
" कसं वाटतंया आता ? पाणी देते थोड . "
काशी काळजीने म्हणाली तोवर झामी पाणी घेऊन आली .
काशी काळजीने म्हणाली तोवर झामी पाणी घेऊन आली .
" चला देवीच्या पालखीला . "
कासू आक्का उठली परंतु पुन्हा भोवळ आल्याने खाली बसली .
कासू आक्का उठली परंतु पुन्हा भोवळ आल्याने खाली बसली .
देवीची पालखी जाताना तिच्या डोळ्यात अश्रू होते . देवीच्या पालखीला न जाण्याची वेदना आणि भावाने फसवल्याची टोचणी . दोन्ही मुली आईला घेऊन घरी निघाल्या .
म्हातारबा पाटील नाईलाजाने पालखीसोबत चालत होते . त्यांना अजूनही काशीचे पदर उडवणे आठवून काशीनेच फुल पाडले असे वाटत होते . दौलती मिरवणूक पुढे जाऊ लागली तसा हळूच बाजूला झाला . त्याची पावले वेगाने गावाबाहेरच्या दिशेने पडू लागली .
" भीमा , भीमा हाईस नव्ह ? "
" पाटील आत या ."
आतून आवाज आला .
आतून आवाज आला .
" भीमा , कोण हाय आमच्यावर हल्ला करणारा . "
" चला दावतो , या माझ्या माग . "
मशाल हातात घेऊन भीमा गुहेत शिरला .
" चला दावतो , या माझ्या माग . "
मशाल हातात घेऊन भीमा गुहेत शिरला .
त्याने मशाल समोर धरली आणि. चेहरा बघून दौलती हादरला . त्याचाच चुलत भाऊ समोर पाहून काय करावे हेच दौलतीला समजेना .
" पाटील ह्याच काय करायचं ? "
भीमाच्या प्रश्नाने दौलती भानावर आला .
" भीमा , पाय तोडून गावाच्या बाहेर फेकून दे . "
दौलती निर्धाराने कसेबसे म्हणाला .
" दौल्या , माझं पाय मोडतो व्हय ? काशी मला पायजे व्हती . पर समदीकड तूच . राधी मला म्हणली दौलतीच्या नखाची सर न्हाय तुला . तवाच तुझी खांडोळी करायची ठरवल . "
तो बडबड करत असताना दौलती बाहेर निघून गेला . पाठोपाठ एक मोठी किंचाळी ऐकू आली .
दौलती खिन्न मनाने घरी परत आला . देवीचा कौल आता समजल्याने पुढील हालचाली करणे शक्य झाले होते . काशी सोबत संपूर्ण आयुष्य घालवायचे स्वप्न काहीही करून त्याला पूर्ण करायचे होते . वाड्यावर आल्यावर दौलती शांत बसला होता . थोड्याच दिवसात हा वाडा , गाव आणि मंदिर सगळे सोडून जावे लागणार होते .
म्हातारबा पाटील हताश होऊन वाड्यात परत आले . काशी त्यांच्या मनात एकच व्यक्ती येत होती . आपल्याला अपयश यायला तीच कारण असल्याची त्यांना खात्री झाली होती .
अखेर शेरगाव ग्रामस्थांनी ब्रिटिश सरकारच्या अधिकाऱ्यांना होकार दिला आणि धरणाचे काम करण्याचा मार्ग विना संघर्ष खुला झाला .
"पाटील आपल्याला शेकडो मजूर , बैलगाड्या आणि बरेच साहित्य लागणार . "
विल्यम दुसऱ्या दिवशी खास म्हातारबा पाटलांना भेटायला आला .
विल्यम दुसऱ्या दिवशी खास म्हातारबा पाटलांना भेटायला आला .
" ते समद मिळलं , पर मला सांगा गाव किती दिस असल . "
" अजून सहा महिने . एक टप्पा पूर्ण झाल्यावर पाणी अडवून चाचणी घ्यावी लागणार . शेरगाव पहिल्याच टप्प्यात खाली करायला लागणार . "
विल्यमने उत्तर दिले .
विल्यमने उत्तर दिले .
" दौलती , दौलती . "
वडिलांची हाक ऐकून दौलती खाली आला .
वडिलांची हाक ऐकून दौलती खाली आला .
" आबा , आमाला बोलावलं , काय काम हाय का ? "
" तुमची सोयरिक पक्की करायला जायचं उद्याच . "
म्हातारबा म्हणाले .
म्हातारबा म्हणाले .
" आमाला न इचरता ? " दौलती गुरकला .
" हा , दौलती . आमच्या म्होरं हे चालायचं न्हाय . "
" म्या तुमचाच ल्योक हाय आबा . जबरदस्ती करू नगा . "
" आर मंग तुला लगीन करायचच न्हाय का ? "
" लगीन करणार पर आमच्या पसंतीनं . "
मागे वळूनही न बघता दौलती बाहेर पडला . पलीकडच्या खोलीत सखू हसली . आता आपली योजना आता पुढे आणायची वेळ असल्याचे तिने ओळखले .
सखुने मुद्दाम हातातले पातेले खाली टाकले . म्हातारबा पाटील धावत तिथे गेले .
" हित काय करती ? आमच चोरून ऐकती व्हय ? "
" आबा , सबागती कानावर पडल . पण धाकल पाटील तसबी तयार हुणार न्हाय . "
" का न्हाय तयार व्हायचा ? आबा पाटील म्हणलं तसंच हुणार . "
" आबा तरुण वयात पिरिम जडल की माणूस कुणाचा नसतोय . "
आबा पाटलांनी रागाने सुखचे केस धरले .
आबा पाटलांनी रागाने सुखचे केस धरले .
" सखू , थोबाड फोडीन काय बाय बोलली तर . "
सखुने आपले केस सोडवले . " पाटील कोंबड झाकलं म्हणजीं तांबड फुटायचं थांबत न्हाय . ईश्वास नसल तर आज राती खालच्या डव्हाजवळ वड हाय तिथं जावा . " सखू जाता जाता म्हणाली .
म्हातारबा गुपचूप बाहेर आले . दौलती नादाला लागला अशी कोण पोरगी आहे गावात ? याचे उत्तर पाहिजे असेल तर संध्याकाळी जायला लागणार . विचारांच्या तंद्रीत पाटील वाड्यातून बाहेर पडले .
" काशी , आबा पाटलांनी मला कायतरी पाजलं . पोरी सावध रहा . "
" आई , सख्ख्या भनीला कशाला आस करील मामा . "
" काशी तुझ्यापरिस जास्त वळखते त्याला . खबरदार त्याच्या लेकाशी बोललीस तर . "
कासू आक्का चिडली .
काशीने रागाने बहिणीकडे बघितले .
" तिनं काही सांगितलं न्हाय . काशी एवढ्याशा गावात काही लपत नाही . "
काशी रागाने आत निघून गेली .
काशी रागाने आत निघून गेली .
दौलती रागात बाहेर पडला . त्याने तडक भीमाचे घर गाठले .
" पाटील सकाळीच ? "
भीमा हसला .
भीमा हसला .
" आज पाटील न्हाय बालपणीचा मैतर आलाय . "
दौलती खिन्न आवाजात म्हणाला .
" दौलती , काय झालं ? समद ठीक हाय नव्ह ? "
" हित नग रानात सांगतो . "
दोघे भीमाच्या शेतात गेले .
दोघे भीमाच्या शेतात गेले .
" भीमा मला. काशी संग लगीन करायचं हाय . "
" गावात लोकं आस उलटं नात न्हाय मानायची . "
" व्हय , म्हणूनच म्या काशीला पळून नेणार . "
" दौलती , बाहेर पडायचं म्हणजी पैका पायजे . आन काशीच काय ? ती तयार हाय का ? तरुण वयात पिरिम समद जग वाटतं . नीट इचार कर दोस्ता . "
भीमाने त्याला समजावले .
भीमाने त्याला समजावले .
" व्हय , आज राती काशीला इचारून घेतो . "
" जे करशीला ते जपून . आबा पाटलांना समजल तर काय खर न्हाय . "
" व्हय , फूड तुझी मदत लागलं . "
" त्याची चिंता सोड . आधी तुम्ही दोघ नीट इचार करा . " भीमाची भेट घेऊन दौलती निघाला .
म्हातारबा पाटलांना सगळे समजेल का ?
काशीचे उत्तर काय असेल ?
वाचत रहा
रात पुनवेची आली .
©® प्रशांत कुंजीर .
अष्टपैलू 2025 स्पर्धा
रात पुनवेची आली .
©® प्रशांत कुंजीर .
अष्टपैलू 2025 स्पर्धा
सदर कथेचे लिखाण चालू आहे .
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा