रात पुनवेची आली भाग 18
मागील भागात आपण पाहिले दौलती आणि काशीच्या अधुऱ्या प्रेमाची गोष्ट . त्यामुळे पुढील चार पिढ्या त्याची शिक्षा भोगत आहेत . या संकटावर अमेय आणि अनघा कसे मात करतात पाहूया .
" नयना , उठ लवकर . आपल्याला आवरून जुन्या देवळात जायचं हाय . "
आजीने आवाज दिला .
नयनाने अनघाला देखील उठवले . आज देवीचा अभिषेक होऊन उत्सव सुरू होणार होता . सगळेजण आवरून तयार झाले . कित्येक वर्षांनी देशमुखांचे वंशज देवीच्या सेवेला उपस्थित होते .
देवीच्या अभिषेकानंतर सगळेजण दर्शन घेऊन निघाले .
" आजी राधा मुरळी ह्यात मदत करत होती . तिचे काय झाले असेल ? "
शर्मन म्हणाला .
शर्मन म्हणाला .
" हस्तलिखित असलेल्या पेटीत आपण शोध घ्यायला हवा . " नयना पटकन बोलून गेली .
" आजी , तुला वाचता , लिहिता येत नाही . मागच्या पिढीत ते कसे काय येत होते ? "
" माझी आई लहानपणी वारली . आईच लेकीला शिकवायची . मला शिकवायला कुणी नव्हतं . "
आजी सगळ्यांना घरी घेऊन आली . आजीने ती पेटी पुन्हा एकदा उघडली .
" तुमी बघा . तवर खायला बनवते . " आजी आत निघून गेली .
पेटीत अनेक पुड्या होत्या . त्यातील औषधी बनवायची पद्धत लिहिलेल्या चिठ्ठ्या होत्या . एकेक वस्तू अमेय जपून बाहेर काढत होता . तेव्हाच त्याला पिवळ्या रंगाच्या कापडात काहीतरी गुंडाळलेले दिसले .
अमेयने हलक्या हाताने ते बाहेर काढले . आत एक चिठ्ठी होती .
" येळकोट येळकोट जय मल्हार , आजुन किती दिस जगलं माहित न्हाय . शेरगाव पाण्यात बुडाल आन मुरळी असणारी म्या बोर्डावर नाचायला लागले . पोटाची भूक वाईट .
म्हातारबा पाटील वारल आन घरात जन्माला आलेल्या तीन पोरी पाण्यात बुडून मेल्या . एक दिस संध्याकाळी पाटलांचा थोरला ल्योक मला भेटायला आला .
" राधाबाई , देवीचा कोप झाला आमच्यावर . गावात आता राहायचं न्हाई . इथून गेलो तर आमच्या पोरी वाचत्याल . "
म्हातारबा पाटलांनी केलेल्या चुकीन घर बुडालं . पर काशी त्यांना कुठ गेल तरी सोडायची न्हाय . त्यावर उपाय शोधायला म्या जेजुरीला गेले . तिथं मला एक साधू भेटलं .
त्यांनी सांगितलं शरीराला जाळून पिंड देत न्हाय तवर आत्मा भटकत राहतोय .
म्या पुन्हा गावात आले पर पाटलांच्या घरातल कुणीच नव्हतं . झामा व्हती पर तिन यात पडणार न्हाय अस सांगितलं . तिच्या पाया पडून म्हणले पाटलांच्या घरातला कुणी आला तर त्याला ही चिठ्ठी दे . "
" म्हणजे संदुकीत असलेले काशीचे शरीर शोधायला लागणार . "
नयना असे म्हणाली आणि हवेत अचानक गार झुळूक गेल्याचा भास झाला .
नयना असे म्हणाली आणि हवेत अचानक गार झुळूक गेल्याचा भास झाला .
" हो , त्यासाठी वाड्यात जायला लागेल . "
वसुधाताई म्हणाल्या .
वसुधाताई म्हणाल्या .
नयनाची आजी त्यांचे बोलणे ऐकून आत आली .
" नयना , ही देवीची उदी बांधलेल कवच हाय . तिथं कायबी व्हईल घाबरायच न्हाई . "
" आजी , आपल्याला उद्याच संध्याकाळी जायला लागणार . "
" व्हय , आता आराम करा तुम्ही . "
सगळेजण दुपारचे जेवण करून झोपायला गेले .
सगळेजण दुपारचे जेवण करून झोपायला गेले .
खळखळ वाहणारा पाण्याचा मंजुळ आवाज ऐकू येत होता . एक लहानगी गोंडस मुलगी पाण्यात खेळत होती . अचानक पाण्याचा आकार बदलला आणि ती लहानगी नाकातोंडात पाणी जाऊ लागल्याने ओरडायला लागली .
अनघा दचकून जागी झाली . शेजारी अमेय शांत झोपला होता . भोवताली पाणी नव्हते .
अनघा दचकून जागी झाली . शेजारी अमेय शांत झोपला होता . भोवताली पाणी नव्हते .
संध्याकाळी देवीच्या आरतीचा मान शर्मनला मिळाला . त्याने मनोमन त्याची मुलगी शुद्धीवर यावी अशी प्रार्थना केली . आरती झाल्यावर सगळेजण मंदिरातून बाहेर आले . जवळपास पाच वर्षांनी धरण आटल्याने उत्सव होत असल्याने मंदिराच्या आजुबाजूला दुकाने उघडण्यात आली होती . थोडावेळ तिथे थांबून सगळेजण घरी आले .
रात्र झाली तसे धरणाच्या आतील भागात असलेल्या पाण्याचा गारवा जाणवायला लागला .
" अनघा , माझ्यामुळे तू ह्या संकटात सापडलीस . "
अमेय तिच्या केसातून हात फिरवत म्हणाला .
अमेय तिच्या केसातून हात फिरवत म्हणाला .
" अमेय , याची तुलाही कल्पना नव्हतीच . आपण एकत्रित ह्यातून मार्ग काढू . आजपर्यंत आपण एकत्रित कितीतरी संकटे झेलली आहेत . "
" अनघा ह्यावेळी प्रश्न तुझ्या आणि बाळाच्या जीवाचा आहे . तुम्हाला काही झाले तर ? "
" अमेय आपल्याला फक्त एका फसवल्या गेलेल्या प्रेमिकेला मुक्त करायचे आहे . काहीही वाईट घडणार नाही . "
दोघेही बराच वेळ बोलत होते .
दोघेही बराच वेळ बोलत होते .
पहाटे पहाटे पक्षी किलबिल करायला लागले . थोड्या वेळाने अनघा जागी झाली . अमेय शेजारी नव्हता .
" आई , अमेय तुम्हाला सांगून बाहेर गेला आहे का ? " अनघा वसुधाताईंना विचारू लागली .
" नाही , मी आताच उठले आहे . "
त्यांचे आवाज ऐकून शर्मन बाहेर आला .
त्यांचे आवाज ऐकून शर्मन बाहेर आला .
" शर्मन , अमेय घरात नाही . "
अनघा आता थोडी घाबरली होती .
अनघा आता थोडी घाबरली होती .
" असेल इथेच बाहेर . मी पाहून येतो . "
शर्मन घराच्या आसपास शोधून आला . अमेय कुठेच नव्हता.
शर्मन घराच्या आसपास शोधून आला . अमेय कुठेच नव्हता.
अमेय डोळ्यांवर उन्हे येताच जागा झाला . तो वाड्यात होता . आपण इथे कसे पोहोचलो ? तितक्यात त्याला आठवले .
" पाण्याचा आवाज ऐक . माझ्यासाठी आवाजाच्या माग ये . "
त्याच आवाजाच्या दिशेने चालत तो इथे पोहोचला होता . अनघा आणि आईची आठवण येताच अमेय जायला निघाला आणि दरवाजा बंद झाला . अमेय पुन्हा सगळीकडे शोधू लागला बाहेर पडण्याचा कोणताच मार्ग दिसत नव्हता .
शेवाळ आलेल्या त्या ओल्या भिंती , कोंदट आणि कुबट वास . अमेय आता घाबरला होता . जितका प्रयत्न करेल तितका तो चुकत होता . घाबरून अमेय पळत सुटला आणि त्याचे डोके दगडावर आपटून पुढे अंधार पसरला .
" आई चला . अमेय त्या वाड्यात असणार . "
अनघा निर्धाराने उठली .
" अनघा थांब , असच तिकड गेलो तर सगळ्यांचा जीव जाईल . " आजी म्हणाली .
" मग माझ्या नवऱ्याला मरताना बघू का आजी ? "
रागाने अनघा ओरडली .
रागाने अनघा ओरडली .
" आता कुणीच मरणार न्हाय . संध्याकाळी मी परत येते . तवर वाड्यात जाऊ नगा . काही झालं तरी . "
आजी घराबाहेर पडली आणि सगळे सुन्न होऊन बसून राहिले .
अमेय यातून वाचेल का ?
देशमुख घराण्याची चूक अनघा सुधारेल का ?
देशमुख घराण्याची चूक अनघा सुधारेल का ?
वाचत रहा .
रात पुनवेची आली .
©® प्रशांत कुंजीर .
रात पुनवेची आली .
©® प्रशांत कुंजीर .
अष्टपैलू 2025 स्पर्धा
सदर कथेचे लिखाण चालू आहे .
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा