रात पुनवेची आली भाग 5
मागील भागात आपण पाहिले की अनघा आणि वसुधा वाड्यात येतात . तिथे असलेला बंद दरवाजा त्यांच्याकडून उघडला जातो आणि सगळीकडून पाणी वाहिल्याचा आवाज यायला लागतो . आता पाहूया पुढे .
चारही बाजूंनी पाण्याचा आवाज हळूहळू वाढायला लागला .
" आई , तुम्हाला पाण्याचा आवाज येतोय का ? "
" अगं बाहेर आजुबाजूला पाण्याचे झरे आहेत . त्यांचा असेल आवाज . "
असे बोलत दोघी दरवाजातून आत आल्या आणि अचानक करररर.... असा आवाज करत दरवाजा बंद झाला .
सगळीकडे अंधार असलेल्या त्या. खोलीत फक्त एका खिडकीतून उजेड येत होता .
" दवलती , कुठं हाईस ? पाणी कुठुन आलं हित ? "
कोणीतरी घाबरून बोलत होते .
कोणीतरी घाबरून बोलत होते .
" अनघा , कोण बोलत आहे इथे ? "
वसुधा घाबरली .
वसुधा घाबरली .
" आई , थांबा मी मोबाईलची बॅटरी लावते . "
दोघी एकमेकींचे हात घट्ट धरून उभ्या होत्या .
दोघी एकमेकींचे हात घट्ट धरून उभ्या होत्या .
पायाला पाण्याचा गार स्पर्श होत होता . अनघाने बॅटरी लावली आणि तिच्या त्या उजेडात समोर ती उभी होती . संपूर्ण भिजलेली . वसुधा आणि अनघा जोरात ओरडल्या आणि त्या गडबडीत अनघाची बॅग खाली पडली .
तितक्यात धाडकन दरवाजा उघडून एक आजी आत घुसली .
" अय पोरी व्हय बाहिर . "
तिने जवळपास ओढत दोघींना बाहेर काढले .
तिने जवळपास ओढत दोघींना बाहेर काढले .
अनघाने गाळाने भरलेली बॅग घेतली .
" नयने , हित कुणाला आणायचं न्हाय सांगितलं व्हत नव्ह ! "
" आजी , मी बाहेरच ऊभी होते . "
" तुमास्नी काय दिसलं का आत ? "
आजीने विचारले .
आजीने विचारले .
इतक्यात वसंत त्यांना शोधत आला आणि त्यांनी तिथून काढता पाय घेतला . आजी मात्र दोघींकडे साशंक नजरेने दूर जाईपर्यंत पहात होती .
आजीची ती नजर अनघा विसरू शकत नव्हती .
" नयना , तू. का गेली व्हती वाड्यात . आताच्या आता पुण्याला निघ . हित थांबू नको . "
आजी प्रचंड चिडली होती .
आजी प्रचंड चिडली होती .
" आजी , तू पाहिलेस ना ? मी बाहेरच उभी होते . पण तुला कसं कळलं आम्ही वाड्यात गेलो ? "
नयना आता थोडी घाबरली होती .
नयना आता थोडी घाबरली होती .
" नयना , आग जरा मोठ्या माणसाच आईक जरा . काय काय ठिकाण चांगली नाहीत . "
" आजी लहान असल्यापासून मी हेच ऐकत आले . एक तर तो वाडा तीन चार वर्षातून दिसतो . त्यात इतका सुंदर वाडा मन आपोआप खेचले जाते तिकडे . "
" नयना , मी तुला वेळ आल्यावर सगळं सांगल पण आता न्हाय . तू उद्याच पुण्याला परत जायचं . "
आजीने विषय संपवला .
आजीने विषय संपवला .
संपूर्ण प्रवासात अनघा आणि वसुधाताई एकही शब्द बोलल्या नाहीत . आपण काय अनुभवले हे आठवूनच अंगावर भितीचा काटा उभा राहत होता .
" ताई , तुमचे घर आले . "
वसंत असे म्हणाला आणि त्या दोघी भानावर आल्या .
वसंत असे म्हणाला आणि त्या दोघी भानावर आल्या .
खर तर वसंतने देखील पाण्याचा आवाज ऐकला होता पण त्याने काहीच न विचारता दोघींना सोडले आणि निघून गेला . वसुधा ताईंनी अनघाला आत घेतले आणि पटकन दरवाजा लावला .
" अनघा , दोघी दोन बाथरूम मध्ये अंघोळ करू . मगच बोलू . " अनघाने होकार दिला .
अंघोळ करताना पायाला लागलेला चिखल साफ करताना अनघाच्या हाताला काहीतरी लागले . तिने शॉवरखाली ती वस्तू धरली आणि अनघा बघतच राहिली . एक अतिशय सुंदर पैंजण होते . तिने ते बाजूला ठेवले आणि अंघोळ करून बाहेर आली .
" आई हे बघा . "
" अनघा हे चांदीचे पैंजण आहे . कुठे सापडले ? "
" वाड्यात पळताना मी अडखळून पडले तेव्हाच हे पायात अडकले असणार . "
अनघाने अंदाज व्यक्त केला .
अनघाने अंदाज व्यक्त केला .
" अनघा , तुझ्या अशा अवस्थेत तुला मी न्यायलाच नको होते . "
" आई , ह्या सगळ्याचा आपल्या दोघींना प्रिय असलेल्या अमेयशी संबंध आहे . आपापल्या सत्य शोधावेच लागेल . "
इतक्यात वसुधाच्या फोनवर एका अनोळखी नंबर वरून मॅसेज आला .
" अनघा हे बघ ! त्या शर्मनचा मॅसेज . "
अनघाने अधीर होऊन मॅसेज पाहिला .
" आई तो भारतात पोहोचला आहे . उद्या पुण्यात येतोय तुम्हाला भेटायला . "
अनघा प्रचंड आनंदी झाली .
" अनघा , आज बाहेरच जाऊ जेवायला . "
दोघी आवरून बाहेर पडल्या .
इकडे अमेय सासरी आल्यावर त्याला सगळ्याचा विचार करायला वेळ मिळाला होता . लहान असल्यापासून त्याला स्वप्न पडत होते . तो शांतपणे सासूबाईंच्या भावाच्या बंगल्यातील वरील खोलीत बसला होता .
" दवलती हात सोड , कुणी बघलं . "
" पाटील हाय म्या . कुणाची भिती हाय ? "
" तुला नसलं पर काशीला हाय . पाटलाची बाईल न्हाय व्हायचं मला . "
" काशे , अग वाड्याची मालकीण हुणार तू . "
त्याने लाडिक आवाजात म्हटले .
त्याने लाडिक आवाजात म्हटले .
अचानक पैंजण वाजण्याचा आवाज दूर जाऊ लागला .
खोलीत एसी लावलेला असूनही अमेयला घाम फुटला . आज पहिल्यांदा त्याला दोन नावे समजली होती .
शेरगाव सोबत पहिल्यांदा काही नावे अमेयला समजली होती . यावर्षी शेरगाव मंदिर पहायला आई आणि अनघा दोघींना घेऊन जाऊया . सोबत काही चौकशी करता आली तर पाहू असे त्याने ठरवले .
म्हातारी प्रचंड बैचेन होती . पाण्याचा आवाज तिने स्पष्ट ऐकला होता .
" काशे , तुला कुणी फशिवल न्हाय माहित . पर त्याची शिक्षा समद्या गावाला भोगायला लागली . गेल्या चार पिढ्या गावात पोरगी जगत न्हाई .
जगली तरी पाण्यात बुडून मरती . कुणाला ठाव नसलेलं समद मला ठाव हाय .
माझी आई रत्ना आणि तिच्या आधीच्या पिढ्या नांदल्या . गावात फक्त आमच्या घरात पोरी जगल्या . नयना आमची पाचवी पिढी . नयनाची आई घातपात होऊन गेली आणि आता माझ्यावर सगळी जबाबदारी आली . पर हे थांबायला पायजे . "
आजी कितीतरी वेळ बडबडत होती . संध्याकाळ झाली तसे तिने देवापुढे दिवा लावला . देवघरात असलेला काळूबाईचा चांदीचा मुखवटा विलक्षण तेजाने चमकत होता .
" आई काळूबाई , समद नीट कर . "
आजीने हात जोडले .
आजीने हात जोडले .
" आई , ती बघा आपल्याला काल शेरगावमध्ये दिसलेली मुलगी . "
नयनाकडे बघून अनघा मोठ्याने ओरडली . नयना आवाज ऐकूनच थांबली .
" ताई , तुम्ही इथे राहता ? "
" हो जवळच राहतो . तू कुठे निघालीस ? "
" आम्ही पेईंग गेस्ट म्हणून राहायचो त्या आजी गेल्या . त्यांच्या मुलाने आम्हाला बाहेर काढले . आता जागा शोधतोय . "
" अनघा , आपल्या वरच्या मजल्यावर तात्पुरती सोय करायची का हिची . "
वसुधा अचानक म्हणाली .
वसुधा अचानक म्हणाली .
"आम्ही तिघी मैत्रिणी आहोत . सध्या पुरती सोय झाली तरी चालेल . नंतर शोधतो आम्ही जागा . "
शेवटी ह्या दोघी नयनाला घरी घेऊन आल्या . तिच्या मैत्रिणी येतच होत्या . नयना आत पाऊल टाकत होती आणि दूर कोणीतरी हसत होते . काळोखात .
काय होईल पुढे ?
नयना आल्यावर काय होईल ?
शर्मन काय सांगेल ?
आजी आणि नयना यांचा काय संबंध आहे सगळ्याशी ?
नयना आल्यावर काय होईल ?
शर्मन काय सांगेल ?
आजी आणि नयना यांचा काय संबंध आहे सगळ्याशी ?
वाचत रहा
रात पुनवेची आली .
अष्टपैलू 2025 स्पर्धा
©® प्रशांत कुंजीर.
रात पुनवेची आली .
अष्टपैलू 2025 स्पर्धा
©® प्रशांत कुंजीर.
सदर कथेचे लिखाण स्पर्धेसाठी चालू आहे . कथा लिहून होईल तसे भाग पोस्ट होतील .
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा