रात पुनवेची आली भाग 7
मागील भागात आपण पाहिले की अनघा आणि वसुधाताई शर्मनला भेटून येतात . त्याचवेळी अंजना आणि नयना परत येतात . घराच्या दारातच एक भयंकर दृश्य बघून त्या थांबतात . आता पाहूया पुढे .
स्मिता नऊवारी साडी नेसलेली , केस मोकळे सोडलेले , कपाळावर मोठे कुंकू लावलेले आणि दुसऱ्या हाताने तिने अमेयचा. गळा पकडून त्याला उचलले होते . स्वतःचा जीव वाचवण्यासाठी अमेय धडपड करत होता . दोन क्षण स्तब्ध असलेली अनघा भानावर आली .
" आई , तिच्या हाताची पकड सोडवा . अंजना तिला मागून धरून ठेव . "
असे म्हणून अनघा धावत गेली परंतु ती तिथवर पोहोचू शकली नाही .
एकाच जागी स्तब्ध झाली .
असे म्हणून अनघा धावत गेली परंतु ती तिथवर पोहोचू शकली नाही .
एकाच जागी स्तब्ध झाली .
" खबरदार अंगाला हात लावशीला तर . खांडोळी करून टाकीन तुझी . गावातल्या पोरी पुरत न्हाई तुमास्नी . जीवबा पाटील आता ही काशी तुला सोडणार न्हाय . "
तिने असे बोलून आपली पकड आणखी घट्ट केली .
इतक्यात नयनने देव्हाऱ्यातून आणलेले भस्म तिच्या अंगावर टाकले आणि अमेय धाडकन खाली कोसळला .
" अनघाताई पैंजण . "
नयन ओरडली .
नयन ओरडली .
अंजना आणि अनघा दोघींनी स्मिताच्या पायातले पैंजण काढले आणि नयनाजवळ दिले . तिने पटकन लाल कपड्यात पैंजण गुंडाळले आणि देवघरात ठेवले .
श्वास मोकळा झाल्याने अमेय थोडा सावरला होता . स्मिता बेशुद्ध होती . अंजना आणि नयना तिला उचलून आत घेऊन गेल्या .
" अनघा हा काय प्रकार आहे ? ह्या मुली कोण आहेत ? "
अमेय चिंतेत होता .
वसुधा ताईंनी त्याला थोडक्यात सगळी हकीकत सांगितली .
" आता या मुलींना बाहेर काढा . "
अमेय चिडला .
अमेय चिडला .
" अमेय, ह्या मुलीचा सगळ्याची कोणताच संबंध नव्हता केवळ आपल्या घरात आल्याने तिची अशी अवस्था झाली आहे . आता आपल्याला तिला मदत करायला हवी . "
वसुधा ताईंनी शांतपणे उत्तर दिले .
" अमेय, तू थोडा वेळ थांब . आपण हा प्रकार मुळाशी जाऊन थांबवला नाही तर आपल्या होणाऱ्या बाळाला धोका असू शकतो . "
अनघाने त्याला समजावले .
अनघाने त्याला समजावले .
मग दोघींनी शर्मन आणि त्याने सांगितलेले सत्य अमेयला सांगितले .
" आई , माझी स्वप्ने अतर्क्य आहेत असेच मला वाटायचे पण आज झालेला प्रकार बघता आपल्याला शेरगाव गाठावे लागेल . काशी आणि दौलती कोण आहेत ? त्यांच्यासोबत नक्की काय घडलं आहे ? यातच सगळी उत्तरे असणार . "
अमेय म्हणाला .
" हो , म्हणूनच आपण तिथे जाऊया . "
अनघा म्हणाली .
" पण तुम्ही कशाला ? अनघा गरोदर आहे . "
अमेय थोडा घाबरला .
अमेय थोडा घाबरला .
" अमेय आपण सगळेच याच्याशी जोडलेले आहोत . आता आपल्या काशी आणि दौलती दोघांची गोष्ट जाणून घ्यावीच लागेल . "
अनघा म्हणाली .
अमेय आणि अनघा दोघे त्यांच्या खोलीत गेले .
" माझ्या अंगावर असे कपडे कसे काय ? तुम्ही दोघी कधी आल्या ? मला काय झाले होते ? "
स्मिता गांगरली होती .
स्मिता गांगरली होती .
" स्मिता , तू वर आपल्या खोलीत गेली होतीस ? नीट आठव ." नयना म्हणाली .
" येस , मी ऑफिसमधून आले . हॉल मध्ये बसले होते आणि अचानक पैंजण वाजल्याचा आवाज यायला लागला . मला पहिल्यांदा तो भास वाटला . तितक्यात कोणीतरी रडत आल्यासारखे वाटले . आवाज वरच्या खोलीत येत होता . मी घाबरत वर गेले . दरवाजा उघडला आणि समोरच्या पलंगावर एक सुंदर पैंजण मला दिसले . उत्सुकता म्हणुन मी पैंजण हातात घेतले . "
स्मिता थांबली .
" त्यानंतर तू थेट आता इथे आहेस बरोबर ? "
नयनाच्या प्रश्नावर तिने होकारार्थी मान हलवली .
नयनाच्या प्रश्नावर तिने होकारार्थी मान हलवली .
" अंजना , स्मिता तुम्ही शहरात वाढल्या . त्यामुळे तुमचा विश्वास बसेल का माहीत नाही . पण उजेड आहे तसाच अंधार असतो . त्याप्रमाणे काळया शक्ती आसपास असतात . आता पुन्हा ते पैंजण तुला दिसणार नाही . घाबरू नकोस . मी या लोकांना घेऊन गावी जाते आहे . तुम्ही दोघी सोबत याल ? "
दोघींनी यायला होकार दिला .
सकाळी उठल्यावर अमेयने आरशात पाहिले त्याच्या गळ्यावर नखांचे व्रण दिसत होते . मुली आवरून खाली आल्या .
" दादा , कालच्या प्रकाराबद्दल सॉरी . आमची ओळखच अशी भयानक झाली . "
नयना बोलू लागली .
नयना बोलू लागली .
" खर तर मी देखील अचानक आत आलो . पण तुम्ही पोरी नखे कापत जा . "
अमेय गळ्यावर हात फिरवत म्हणाला .
" दादा , मला वाटत आपण शेरगावला जायला पाहिजे . आमच्याबद्दल ताईंनी सांगितले असलेच ना ? "
" हो , गावी जायलाच लागेल . " अमेय म्हणाला .
" अमेय , आज शर्मन येतोय संध्याकाळी . त्यालादेखील सोबत न्यावे लागणार . "
वसुधा ताईंनी आठवण करून दिली .
" हो , आमच्या सुट्ट्या ऍडजस्ट करतो आज . "
अमेय आणि अनघा म्हणाले .
" आम्ही तिघी देखील सुट्ट्या घेतो ."
नयना म्हणाली .
ठरल्याप्रमाणे संध्याकाळी शर्मन आला . आपल्या घराण्यातील दुसरा पुरुष दोघेही पहिल्यांदा बघत होते .
" हॅलो डॉक्टर अमेय . "
त्याने अभिवादन करायला हात पुढे केला .
त्याने अभिवादन करायला हात पुढे केला .
" नाइस मीटिंग यू मिस्टर शर्मन . "
अमेयने उत्तर दिले .
अमेयने उत्तर दिले .
" अमेय माझी मुलगी समुद्रात बुडाल्याने गेले दोन महिने कोमात आहे . मी अनेक प्रयत्न केले . तरीही यश येत नाही . काशी स्वप्नात म्हणाली , " आता समजल तुला बुडून मेल्याव कसं वाटतं ? "
त्यानंतर मी सगळी कागदपत्रे वाचली आणि आपल्या घराण्यातील लोकांचा शोध घेतला . त्यातील इतरांनी मला प्रतिसाद दिला नाही . पण वसुधा काकूंनी माझ्यावर विश्वास ठेवला . "
शर्मन आपुलकीने बोलत होता .
दोन दिवसांनी सगळे शेरगावला जायला निघाले . शर्मन उत्साहात होता .
अमेय खुप लहान असताना एकदाच आला होता . धरण आणि त्याच्या काठावर असलेले नवे गाव आणि जुन्या गावाच्या आठवणी सांगणारे बाबा त्याला अंधुक आठवत होते .
नयनाने पैंजण आपल्यासोबत ठेवले होते . दोन तासांच्या प्रवासानंतर गाडी धरणाच्या कडेने चालू लागली . एक छोटीशी टेकडी ओलांडली आणि समोर शेरगाव दोन किलोमीटर अशी पाटी दिसली .
अमेयने गाडी वळवली . मागे दुसरी गाडी होतीच . कित्येक दशकांपूर्वी पुसलेली वाट पुन्हा चालून काही प्रश्न सोडवायचे होते . नियती हा सगळा खेळ खेळत लांबून बघत होती .
काय असेल काशी आणि दौलती यांची गोष्ट ?
वाचत रहा .
रात पुनवेची आली .
अष्टपैलू 2025 स्पर्धा .
सदर कथेचे लिखाण चालू आहे .
रात पुनवेची आली .
अष्टपैलू 2025 स्पर्धा .
सदर कथेचे लिखाण चालू आहे .
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा