Login

रचनेत आवडलेली अर्चना

रचनेत आवडलेली अर्चना
रचनेत आवडलेली अर्चना

माझी ईरा वर वाचनाची सुरुवात झाली ती " एक उनाड वाट " मराठी कादंबरी पासून. सहज फेसबुक बघत असताना कादंबरीचा एक भाग दिसला , तो मी वाचला आणि मला खूप आवडला म्हणून मग ईरा फेसबुक पेज वाचू लागले. तेव्हापासून मला वाटत होत की या लेखिके सोबत आपली ओळख व्हावी.

माझी इच्छा ईरा चॅम्पियन ट्रॉफी २०२३ मधे भाग घेतल्याने पुर्ण झाली. ग्रुप नंबर २ मधे अर्चना नाव बघून मला खूप आनंद झाला. म्हटल चला " ईरा चॅम्पियन ट्रॉफी २०२३ निमित्ताने माझ्या आवडत्या लेखिके सोबत मैत्री करायला नक्कीच भेटेल."

खरतर मी यावर्षी पहिल्यांदा ईरा चॅम्पियन ट्रॉफी २०२३ मधे भाग घेतला. ग्रुप मधे दोन - तीन नाव सोडून सगळे नवीन दिसत होते. पहिल्या फेरीला जलदकथा तर लिहिली आता शेअर कशी करायची ? तेव्हा अर्चना ने खूप छान पद्धतीने समजून सांगितले. मला खूप मदत झाली.

अर्चना ची लिखाणाची सुरुवात दहावी पासून झाली होती. बारावी पास झाल्यावर कॉलेजमध्ये गेल्यावर कथा कादंबऱ्यांची खाण हाताला लागली आणि शोभा डे यांच्या पुस्तकांचा परिणाम की काय मी लेखिकाच बनणार हे ठरवलं. पण कालांतराने तिला अभ्यासात भर देने गरजेचं झालं.

चार-पाच वर्ष कविता सोडून काहीच लिहिलं नाही . स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरू असतांना लग्न झाल. पण कसोटी संपली नव्हती, दिवस गेले होते आणि चौथा महिना सुरू असताना मिस्टरांची नोकरी गेली. दोन महिन्यांनी दुसरी नोकरी मिळाली पण वेगळ्या शहरात जाऊन बोरवेल मशीन ची सर्विसिंग करायचं काम होत पण दुसऱ्या शहरात. मग नागपूरहून पुण्याला शिफ्टिंग केल. नागपूरला ट्रीटमेंट सुरू होती त्याच डॉक्टरांकडून पुण्याच्या घराजवळच्या एरियातल्या डॉक्टरांची माहिती मागितली. पुण्याला ट्रीटमेंट सुरू केली. या सगळ्यात एक महत्त्वाची बाब शिकायला मिळली " एकदा आपण असलेल्या परिस्थितीचा स्वीकार केला की सगळं सोपं होतं."

अर्चना आता निम सरकारी कंपनीत क्लर्क पदावर आहे. आणि त्यांना एक दहा वर्षाचा मुलगा आहे . सांसरीक जबाबदारी सांभाळून वेळात वेळ काढून लेखिका बनण्याचं आपल स्वप्न पूर्ण करत आहे.

अर्चना लिखाणाची आवड लहानपणापासूनच आहे. मॉम्सप्रेसो वर २०१६ पासून लिहित आहे. ईरा वर २०१९ पासून लिहायला सुरुवात केली. ' एक उनाड वाट ' ही प्रसिद्ध झालेली कादंबरी आहे. कविता, चारोळ्या , शेरोशायरी हे मूडनुसार लिहित असते हलकीफुलकी प्रेम कथा लिहिण्याच वेड आहे. गाण्याचा छंद आहे . नैसर्गिक निसर्गरम्य जागी फिरायला जायला खूप आवडत.


फेसबुकला "अर्चनाच्या रचना माझ्या लेखणीतून " हे पेज आहे त्यावर कधी कथा ,कविता ,छान व्हिडिओ अस टाकत असते. इंस्टाग्राम वर अरचुझ क्रिएटिव्हिटी म्हणून खूप सुंदर असा आयडी आहे. युट्युब ला अर्चना एस नावाने युट्युब चैनलआहे.

आपल्या बिझी शेड्युल मधून वेळात वेळ काढून ईरा चॅम्पियन ट्रॉफी स्पर्धेसाठी सहभाग देण्याचा प्रयत्न असतो. " मिस मॅच " ही जलद कथा खूप छान लिहिली आहे. स्टँड अप कॉमेडी मध्ये "सासूमाँचा किस्सा " हा छान कॉमेडी व्हिडिओ बनवून हसवल आहे.

अर्चना चे विचार मला खूप आवडतात. स्वतः वर खूप प्रेम करावं, आपण स्वतःला आनंदी करतो तेव्हा आपण इतरांना दुप्पटीने सुख देऊ शकतो .त्यांच्या दृष्टीने आयुष्याला सफल करण्यासाठी खूप पुस्तक वाचत असतात. " वाचाल तर वाचाल " यावर त्यांचा विश्वास आहे. समाजाला आपलं देणं आहे म्हणून सामाजिक लेख किंवा कविता लिहून समाजाला बंधू भगिनींना मार्गदर्शन करण्याचा सतत प्रयत्न करत असते.