Login

राधाकृष्ण मिलन पुन्हा

Our Meeting Is Same As Radhakrishna Meeting

फुलव फुलव पुन्हा
तोच निळा उत्सव
झुलव झुलवा पुन्हा
तोच झुला

रंगव रंगव पुन्हा
तोच कान्हा तीच राधा
घुमव घुमव पुन्हा
तोच रास जुना

आळव आळव पुन्हा
तोच मधुर स्वर
रस रंग पुन्हा
प्रसव प्रसव अधरावर

उठव उठव पुन्हा
लहर यमुना जळी
उत्तरेल पुन्हा
रात्र सावळी

आठव आठव पुन्हा
प्रीत दर्पण
जग पाहिल पुन्हा
राधाकृष्ण मिलन
......... योगिता मिलिंद नाखरे