Login

रहस्य तळघरातील भाग ३ (अंतिम भाग)

रहस्य कथा
रहस्य तळघरातील भाग ३ अंतिम

एक कोटी मिळणार म्हणून सगळे खूश असतात आता काय होईल बघू


अखेर चोरीचा दिवस उजाडतो.
आपल्या तयारी नुसार सणकू गॅंग मागील भिंतीवरून उड्या मारून थोडावेळ थांबतात मग खिडकीतून आत उड्या मारतात.
नकाशा घ्या मदतीने ते सगळे तळघराच्या दरवाज्यापाशी पोचतित. सगळ्यांचे चेहरे आनंदी होतात ते काही बोलणार तोच सणकू म्हणाला,
“ श्शू. बोलू नका बाहेर आवाज जाईल.सगळे हळूहळू पुढे सरकत जा”


सगळे हळूहळू दरवाजापर्यंत पोहोचतात दरवाजा उघडायला जातात पण इतकी वर्ष जुना असलेला तो लाकडी दरवाजा आणि त्याला गंजलेल्या लोखंडाच्या पट्ट्या असलेला जुनाट दरवाजा उघडताना जोर लावावा लागत होता आणि त्यातच आवाजही होत होता. मध्ये मध्ये थांबत त्यांनी हळूहळू दरवाजा पूर्ण उघडला.

तेवढ्या श्रमाने सगळे चोर घामाने चिंब झाले कारण तिथे हवाच यायला जागा नव्हती तरीपण आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी सगळेजण दरवाजातून आत पाऊल टाकणार तोच सगळीकडे प्रचंड प्रकाश पसरला आणि सगळे घाबरले घाबरून मागे वळाले तर त्यांच्याच अंगावर टॉर्चचे उजेड पडत होते.

ते टॉर्च उजळ कुठून येतात हे कोणालाच कळलं नाही ते चुपचाप उभे राहिले तेवढ्यात जग्याला लक्षात आलं

तो म्हणाला
‘सणकु दादा त्या उजेडाच्या पलीकडे मला माणसाच्या आकृत्या दिसतात .”

ऐकल्याबरोबर सगळी घाबरले त्यांना वाटलं भूत आहे की काय पण त्याच वेळेला एक आवाज घुमला,

“ जिथे असा तिथे उभे रहा आणि हात वर करा तुम्हाला शरणा यावच लागेल.”

सणकुला कळेना येथे कोण आलं पण त्यानंतर एक माणूस त्यांच्याजवळ येऊ लागला तो जसा त्यांच्या जवळ आला तेव्हा सणकु आणि त्याच्या गॅंग ची हबेलहंडी उडाली कारण ते पोलीस इन्स्पेक्टर देशमाने होते.

ते बघून सगळेच घाबरले देशमाने नी ऑर्डर दिली.

“कदम सगळ्यांच्या हातात वेड्या टाका आणि चला घेऊन.”


सणकू काहीच बोलू शकला नाही. त्याला काही कळलंच नाही. ते आपण इथे चोरी करायला आलो आहे पोलिसांना कसं कळलं ?तरी तो काही न बोलता त्यांच्या पाठोपाठ जीपमध्ये बसला. सगळ्यांना जेलमध्ये टाकल्यावर त्यांच्यासमोर खुर्ची ओढून बसत देशमाने ने विचारलं

‘आता मला सांगा गेल्या दहा वर्षात तुम्ही कुठे कुठे दारोडा टाकला ?आणि कोणा कोणाचा खून केला?”

हे ऐकल्याबरोबर सगळ्यांचे धाबे दणाणले.सणकू म्हणाला

“आम्ही राजवाड्यातला खजिना लुटायला आलो होतो. तुम्ही तिथे खजिना लुटायला आले होते का? “

यावर एक सणसणी झापड सणकूच्या गालात पडली. तो गाल चोळत चूप बसला. तेव्हा देशमाने म्हणाले,

आम्हाला पण चोराच्या पावलाने चालावं लागलं. दहा वर्षात तुम्ही गावातच काय आजूबाजूची दहा गाव आणि शहर सगळीकडे धुमाकूळ माजवला आहे आणि तुम्ही सापडायला तयार नव्हता.”


तेव्हा सणकूने विचारलं

“आम्ही इथे येणार हे तुम्हाला कसं कळलं ?”

देशमाने म्हणाले की

“तुम्हाला काय वाटतं तुम्हीच डोक्याने वावरता. तुम्ही ज्या सोन्याकडन राजवाड्याचा नकाशा घेतला तो सोन्या दुसऱ्याकडून नसून हा बघा हा आमच्यातला कॉन्स्टेबल कदम आहे.”

त्याबरोबर सणकू खालीच बसला म्हणाला,
“ मला एकदाही शंका आली नाही.”

तेव्हा देशमाने म्हणाले की

“ आणि जो सोन्या तुझ्यासमोर आला तो हा आहे कारण तू आज पर्यंत ख-या सोन्याला कधी बघितलंच नव्हतं. याचाच फायदा आम्ही घेतला तेव्हा सणकू म्हणाला


“सर पण तिजोरीतला खजिनात आम्हाला मिळाला पाहिजे ना आमच्यामुळे ते दार उघडलं गेलं.”

तर असतात देशमाने म्हणाले,
“कदम आणि सावंत जा ती तिजोरी घेऊन या.”

तिजोरी ते घेऊन येतात आणि मग देशमानेनी विचारलं

“तुला खजिना हवाय ना कदम तीजोरी उघडा “.

कदम तिजोरी उघडतात संणकू आणि सगळे उभे राहून ते तिजोरीच्या आत काय बघतात आणि सगळे बेशुद्ध पडायचेच बाकी राहतात कारण त्याच्यात मोठ मोठाले दगड असतात बाकी काहीच नसतं.


“ तुम्हाला पकडण्यासाठी शेवटी आम्हाला ही गोष्ट करावी लागली. ज्या गोष्टीचे लालूच चोराला दाखवली तर चोर पटकन धावतील अशी लालूच आम्ही पेपरमध्ये मुद्दाम छापली. तिथल्या सीसीटीव्ही कॅमेरे किंवा सुरक्षारक्ष या सगळ्यांनी तुम्हाला ओळखलं होतं. कुणालाही संशयच नव्हता की तुम्ही चोरी करणार नाही”

सणकू म्हणाला

“आम्हीच का ?बाकीच्या डोळ्या कुठे गेल्या?”

“ तुम्हाला पकडण्यापूर्वी आम्ही बाकी सगळ्या टोळ्या तुरुंगात टाकल्यात. त्यामुळे आता तुम्ही रहा तुरुंगात.
तिथे तुम्ही तळघरातल रहस्य आणि तिजोरीतला खजिना स्वप्नात बघत बसा “.

आणि हसत देशमाने उठून बाहेर गेले
__________________________________