Login

रहस्यमयी स्त्री ..भाग १

भूतकाळात मारून टाकलेल्या स्त्रीचे रहस्य

काय मग यंदा सविताच्या लग्नाचा विचार केलत कि नाही
होय, या वर्षी करायचं आहे पण कसं जमतंय बघूया

तुम्हाला ते कुलकर्णी माहिती आहेत का, प्रभू आळीतले श्रीखंडवाले.
हो माहिती आहेत न, काय झालं त्यांचं
त्यांचा मुलगा आहे अविनाश , मुलगा इंजिनियर आहे , स्थळ चांगलं आहे , सविताच्या बाबांना विचारून बघा काय म्हणतात , तुमचा विचार असेल तर मी कुलकर्णी काकुंसोबत बोलते.

कुलकर्ण्यांचा तो मुलगा अविनाश, नको अजिबात नको.....सविताच्या बाबांना विचारायची गरज पण नाही, आणि हो बापट ताई तुम्ही पण त्यांना आमच्या सविता बद्दल काही विचारू नका...

का हो काय झालं ???
आहो त्या मुलाला वेड्याचे झटके येतात. कसले मसले चित्र काढून बोलत बसतो त्या चित्रांसोबत.

बापटताई वधूवर मंडळ चालवायच्या, आपल्या व्यवसायाचा भाग म्हणून अनेक घरांत त्यांचं जाणं येणं असायचं , खूप लोकांच्या भेटीगाठी पण होत असायच्या. अश्यातच त्या एकदिवशी प्रवीण सहस्त्रबुद्धे ह्यांच्या घरी गेल्या . बोलता बोलता त्यांनी त्यांच्या मुलीचा म्हणजे सविताच्या लग्नाचा विषय काढला. पण बापटताईंनी जे स्थळ सुचवलं त्या बद्दल त्यांना काही जास्त माहिती नव्हती पण सहस्त्राबुधेंना संपूर्ण माहिती होती. अविनाश कुलकर्णी हे नाव ऐकताच शाश्त्र्बुद्धे काकूंनी ताबडतोब नकार कळवला. मुलाला वेड्याचे झटके येतात हे ऐकून बापटताई आश्चर्यचकित झाल्या, कारण जेव्हा त्या कुलकर्णींच्या घरी येत जात होत्या तेव्हा अविनाश एकदम नॉर्मल वाटायचा , व्यवस्थित बोलायचा ...असं कधीच जाणवलं नाही कि त्याला वेड्याचे झटके येतात. बापट ताई मुद्दाम त्या दिवसी कुलकर्णींच्या हरी गेल्या आणि त्यांनी कुलकर्णी काकूंना प्रश्न केले ...

" काकी मी वधू वर मंडळ चालवते, आजवर किमान १५-२० जोडप्यांचे लग्न लावून दिले आहेत. सर्व व्यवस्थित आहेत. पण मला हे जमतं ते फक्त लोकांचा माझ्यावर विश्वास आहे म्हणून. पण तुम्ही माझ्यापासून बरच काही लपवून ठेवलंत ....असं करायला नको होतं तुम्ही काकू "

"लपवून ठेवलं काय लपवून ठेवलं ?"
"तुमच्या अविनाश ला वेड्याचे झटके येतात , हि गोष्ट तुम्ही लपवून ठेवली "
"हे बघा बापट ताई, आमचा अविनाश एकदम नॉर्मल आहे , कोणी सांगितलं तुम्हाला अविला वेड्याचे झटके येतात, साफ चूक आहे हे , माझ्या मुलाचं नाव खराब करू नका ..प्लीज "

"माफ करा कुलकर्णी काकी, पण मी तुमच्या मुलासाठी यापुढे स्थळ सुचवू शकणार नाही , येते मी "

असं बोलून बापट ताई तिथून निघून गेल्या ...इकडे कुलकर्णी काकी दरवाजा बंद करून सोफ्यावर येऊन बसल्या आणि पदराने आपले डोळे पुसत रडत बसल्या .
अविनाश च्या चिंतेने कुलकर्णी दाम्पत्य खु चिंतीत असायचे, त्यांची हि चिंता आज वाढली नव्हती ...त्यांची चिंता अविनाश लहान असल्यापासून चालू झाली होती. खूप डॉक्टर झाले सगळं करून झालं , आयुर्वेदिक उप्चार्पण झाले ..पण काहीच निष्पन्न झालं नव्हतं.

अविनाश कुलकर्णी वय २८ वर्षे. केमिकल इंजिनियर आणि एका नावाजलेल्या कंपनीत कामाला होता . मुलगा एकदम गोरा गोमटा ...त्याला बघताच क्षणी कोणी स्थळ नाकारेल असे होऊच शकत नव्हते ..पण त्याच्या बद्दल अशी काही विचित्र माहिती मिळायची कि मुलीकडचे लोकं ताबडतोब नकार कळवायचे.
हे सत्र अविनाशला समजायला लागल्यापासूनच चालू झालं होतं.

अविनाश चा जन्म झाला आणि कुलकर्णी दांपत्य खूप आनंदी झालं. लग्नानंतर १० वर्षांनी झालेला अविनाश दोघांच्या काळजाचा तुकडाच होता. खूप लाडात आपल्या मुलाला वाढवत त्याला काय हवं नको ते सर्व ते पुरवत होते. हळू हळू अविनाश मोठा होऊ लागला ....आत्ता तर चक्क गुडघ्यावर चालायला फिरायला लागला.
एक दिवशी कुलकर्णी वहिनींनी आपल्या पतीला फोन केला ...

"आहो आज आपल्या अवीने कमालच केली "
"काय झालं ?
"आहो आज तर त्याने चक्क चित्र बनवलं "
"हा हा हा हा अरे वा...ते तसच ठेव मी ऑफिस मधून आल्यावर बघेन "

आपल्या मुलाने काढलेलं पाहिलं चित्र बघून आज तर त्यांचा आनंद गगनाला मावेना. अविनाश ने खडूने लादीवर रेखाटलेलं ते चित्र ...वेड्या वाकड्या रेषांत एका बाईचा आकार ....तिच्या समोर एक घर .
संध्याकाळी कुलकर्णी घरी आले , आल्या आल्या त्यांनी लादीवर काढलेलं ते चित्र बघितलं ...बघून आनंद झालाच पण आश्चर्य हि वाटलं ...एवढा लहान मुलगा हे असं चित्र कसं काय काढू शकतो ... त्यांना विश्वास पटेना.

संध्याकाळ झाली आणि अविला पुढ्यात घेऊन ते दोघेही झोपले. रात्री कुलकर्णींना जाग आली ...आणि बघतात तर अविनाश अंथरुणात नव्हता ....घाबरले आपल्या पत्नीला उठवलं ....."अविनाश कुठे आहे ?"
पत्नीने झोपेतच अन्त्हृनाव्र हात फिरवला..पण अविनाश नव्हता ...त्या दचकून उठल्या . अविनाश अंथरुणात नव्हता ...दोघाही ताबडतोब खाटेवरून खाली उतरले आणि खोलीत शोधायला लागले ...अविनाश बाहेरच्या खोलीत बसला होता ...लादीवर काढलेल्या चित्राकडे बघून काहीतरी बोबड्या आवाजात शब्द पुटपुटत होता ....

कुलकर्णी वहिनींनी आपल्या मुलाला उचलून कवटाळलं ....आणि पुन्हा ते येऊन खाटेवर झोपले .
दुसऱ्यादिवशी सकाळी कुलकर्णी कामावर निघून गेले , वाहिनी घरात एकट्याच आणि अविनाश पुढ्यात पडलेल्या खेळण्यां सोबत खेळत होता. झाड लोट आणि लादी धुण्याच्या कामात त्या मग्न होत्या. सर्व साफ सफाई केल्यावर अविनाशला जेवण भरवलं आणि त्यापण त्याच्या सोबत खेळत बसल्या. अवीच्या पुढ्यात पाटी आणि पेन्सिल घेऊन त्याच्या हातात पेन्सि पकडून त्या ..."अ " "ब" "क" "ड" शिकवत होत्या . कुकरची शिटी झाली म्हणून त्यांनी त्याला भिंतीला टेकवून बसवलं आणि पाटी पेन्सिल त्याच्या पुढ्यात ठेवून त्या आतमध्ये कुकरची खाली उतरवायला गेल्या. बाहेर आल्या आणि बघतात तर ...अविनाश पाटीवर एक चित्र रेखाटत होता. त्यांनी त्याला थांबवलं नाही...थोड्याच वेळात त्याने चित्र पूर्ण केलं.
आणि त्या चित्राकडे एकटक बघू लागला....
कुलकर्णी वहिनींनी त्याला उचलून पुढ्यात बसवला आणि ती पाटी हातात घेऊन बघयला लागल्या ...अविनाश ने तेच चित्र काढलं होतं जे त्याने काल लादीवर काढलं होतं .....
"एक बाईचा आकार आणि तिच्या पुढ्यात एक मोठं घर . चित्र बघून त्यांन कौतुक वाटलं .
हे असच चालत राहिलं आणि बघता बघता अविनाश शाळेत हि जायला लागला ..हे चित्र रेखाटनं चालूच होतं , खूपवेळा त्यांनी आपल्या मुलाला वेग वेगळी चित्र काढायला शिवलं पण तो नेहमी हे एकच चित्र रेखाटायचा आणि त्याच्या सोबत काहीतरी बडबडत बसायचा.
आत्ता तो हळू हळू मोठा होत गेला आणि त्याच्या ह्या सवईमुळे शाळेतल्या शिक्षिकापण त्याला समजावू लागल्या ...बघता बघता तो ५वित गेला . चित्रकला ह्या विषयात अव्वल क्रमांकावर येऊ लागला , पण त्याचं चित्र हेच असायचं ...
जस जसा तो मोठा होत गेला त्याने बनवलेल्या त्या चित्रात स्पष्टता येऊ लागली
"एक माळरान त्यावर पाठ करून बसलेली एक बाई आणि तिच्या समोर असलेलं एक भलं मोठं घर "
अविनाश रात्री बेरात्री उठून आपण काढलेल्या चित्रासोबत बडबडतो हे बघून आत्ता त्याच्या वडिलांना त्याचा राग येऊ लागला. खूपवेळा त्यांनी त्याला समजावलं हि होतं पण तो समजेना. आई वडिलांनी त्याला खूपवेळा मारझोड हि केली पण तो काही केल्या आपली सवय सोडायला तयार नव्हता. मुलगा ऐकेना ...मरायचं तरी किती म्हणून त्यांनी आत्ता अविनाश च्या ह्या सवईकडे दुर्लक्ष करणं चालू केलं.
आई वडिलांनी दुर्लक्ष पण अविनाश त्या चित्रात स्वतःला हरवून घ्यायला लागला होता.
कुलकर्णींनी आपल्या मित्राला हा प्रकार सांगितला, त्याने मानसोपचारतज्ञ कडे दाखवण्याचा सल्ला दिला. पण ते चित्र सोडलं तर अविनाश चं वागणं एकदम नॉर्मल असायचं, अभ्यासाठी तो हुशार होता , वर्गात पहिला दुसरा क्रमांक हा असायचाच ..म्हणून कुलकर्णींना जास्त चिंता वाटत नव्हती. तरीपण मित्राच्या सल्ल्याने त्यांनी अविनाशला मुंबईमध्ये मानसोपचार तज्ञांना दाखवलं ...अविनाश्चम ब्रेन मपिंग केळं गेलं, पण तो एकदम नॉर्मल असल्याचं त्यांनी सांगितलं.
खूप डॉक्टर झाले काहींनी औषधं दिली उपाय झाला नही , आयुर्वेदिक उप्चार्पण झाले ...काहीच निष्पन्न झालं नही. अविनाश आणि त्याचं चित्र दोघेही एकमेकांत गुंतले होते.
जस जसं त्याचं वय वाढत गेलं तो ते चित्र अधिक रंगवत गेला , त्या चित्रात आत्ता खुपकाही रहस्य दडल्या सारखं वाटायला लागलं होतं.

एक दिवस अविनाश कुठेतरी बाहेर गेला होता, घरात त्याचे आई वडीलच होते. त्या रात्री जे घडलं त्याने कुलकर्णी दांपत्य पार हादरूनच गेलं.
अविनाश आज पहिल्यांदाच घरातून बाहेर होता. त्याचं पेंटिंग घरातच होतं. कुलकर्णी दांपत्य संध्याकाळी जेवणं आटोपून हॉल मध्ये टी.व्ही.बघत बसले होते. टी.व्ही.बघता बघता कुलकर्णींना घरातून काहीतरी आवाज ऐकायला आला. कुलकर्णी काकींनी सोफ्यावरून रिमोट उचलला आणि आवाज एकदम कमी केला .कुलकर्णींनी काकींकडे बघितला आणि प्रश्नार्थी नजरेने पाहिलं ....
कुलकर्णी काकींनी तोंडावर बोट ठेवून त्यांना गप राहायला खुणावलं . घरात आतून कसलातरी आवाज येत होता. दोघेही उठला आणी चोर पावलांनी घरात आत गेले ...आवाज अविनाशच्या खोलीतून येत होता.
कुलकर्णींनी कोपर्यातून कपडे वाळत घालायची काठी उचलली आणि दरवाजा हळूच उघडला ... त्या खोलीत दाट अंधार होता पण काहीतरी खसपटत असल्या सारखा आवाज स्पष्ट ऐकू येत होता. दरवाजाची फळी उघडली आणि आत डोकावलं काहीच दिसेना . त्यांनी उघडलेल्या दरवाजाच्या फटीतून हात घातला आणि बाजूच्या भिंतीवर असलेल्या लाईटच्या बोर्डावर असलेलं बटन चाचपडत दाबलं . खोलीतला लाईट लागला . त्यांनी दरवाजा तसाच ठेवून ते त्या दरवाजाच्या बाजूला उभे राहून पुन्हा कान देऊन ऐकायला लागले . आवाज येतच होता. कुलकर्णींनी मोठा श्वास घेतला मनाला धीर देत त्यांनी आत जाण्यासाठी आपलं डोकं त्या दरवाजाच्या नजीक नेलं ...कुलकर्णी काकी त्यांच्या मागे मागे सरकत होत्या ...दरवाजा निम्मा उघडला आणि दोघेही आत्ता आत खोलीत येऊन उभे राहिले होते .
खोलीत नजर फिरवली ...आवाज तर येत होता पण काही दिसेना , त्यांनी आपली नजर इकडे तिकडे वळवली ..नजर शोधायला लागली काही दिसतंय का ...एवढ्यात कुक्लारणी काकी मोठ्याने किंचाळल्या आणि धावत त्या खोलीबाहेर पळून गेल्या . त्यांच्या पाठोपाठ कुल्कार्नीपण बाहेरच्या हॉल मध्ये पळून गेले .

"ए काय झालं , काय झालं तरी काय , का किंचाळलीस "
हात पाय थरथरत कुलकर्णी काकींनी सांगितलं .....
"सांगते सांगते मी तुम्ही दरवाजा बंद करा तो "

कुलकर्णी म्हणाले .."पण का काय झालं तरी काय ?"
0

🎭 Series Post

View all