Login

रहस्यमयी स्त्री भाग ६

Horror


घरात आत जाऊन काकींनी भांडी चूलघरात एका बाजूला कोपऱ्यात ठेवली. मधल्या खोलीत म्हातारी घरातल्या बाई माणसांसाठी अंथरूण टाकत होती, बक्षी वाहिनी प्रवासाने दमल्या होत्या त्या अंथरुणात पडल्या पडल्या झोपी गेल्या. बक्षी जोग कुलकर्णी आणि काकींचे वडील हि सर्व मंडळी बाहेरच्या खोलीत गावातल्या गप्पा मारत बसले होते.
काकीची आई दरवाजाच्या कोपऱ्यात बसून आपल्या कापडी पिशवीतून अडकित्ता काढून सुपाऱ्या तोडत पान बनवायच्या तयारीत होती , काकी तिच्या समोर बसल्या आणि त्यांनी आपल्या आईकडे स्वाती शिंदे चा विषय काढला.
काय गम काय झालं त्या स्वातीचं.
कोण गं स्वाती ???
आगं तू नाही का आत्ता बाहेर बोललीस त्या शिंदेंच्या स्वाती बद्दला ...
हा ती ...ती झाली व्हती ना हितं गावात .

झाली होती म्हणजे ?
आत्ता झाली व्हती म्हणजे काय तुला माहित नाय ....आगं भूत झाली व्हती ती.
"भूत " हा शब्द कानावर पडताच बाहेर बसलेल्या जोग साहेबांनी आपली खुर्ची दरवाजाजवळ सरकवली .कुलकर्णी आणि बक्षी पण बोलता बोलता थांबले .
जोग ह्यांनी काकींच्या आईना प्रश्न केला ....

काय हो आजी, ..भूता बद्दल काहीतरी बोललात न आत्ता ...
व्ह्य व्ह्य....काय नाय त्यो आमचा आपला असाच इश्य चालला व्हता ...

नाही नाही सांगा आम्हाला पण आवडेल ऐकायला.
आणि मग म्हातारीने पुढे सांगायला सुरवात केली .
गावातल्या शिंद्यांच्या मुलीचं लग्न झालं , बोरगावला दिली होती तिला, सासरकडची लोकं भरपूर शेतीवाडी बाळगून होते , पैसा लत्ता पुरेसा होता घर हि मोठं होतं, घरात गुरं ढोरं पण भरपूर ...पोरीला कसलीच कमी नव्हती .

मग पुढे काय झालं ........काकींनी प्रश्न केला.
काय व्हनार अवदसा आली ना महिना भरात परत गावात.
का ?? काय झालं ?

काय माहित नाय पन गावातली लोका बोलत व्हती ...तिचं वागनं वाईट व्हतं.
म्हणजे ???
काकींच्या आई पुढे एक एक रहस्य उलगडत गेल्या..
स्वाती शिंदे, हिचं लग्न झालं, लग्नाच्या अगोदरपासून तिचं लक्षण वाईट होतं. गावातल्या मुलांसोबत तिचं वागणं बोलणं बघून लोकांना तिची चाल रीत समजायला वेळ लागला नव्हता. काही आपसातल्या लोकांनी हि वार्ता सदानंद शिंदेंच्या कानावर घातली. मुलीने पुढे आणखी काही करून आपलं नाक कापायच्या आत त्यांनी तिचं लग्न लावून दिलं. पण बाहेर ख्याली असलेल्या स्वातीच्या वागण्यात सुधार झाला नाही. तिने सासुरवाडीतल्याच एका मुला बरोबर आपले संबंध ठेवले, दोघांमध्ये प्रेम झालं. हे प्रकरण तिच्या नवऱ्याच्या कानावर गेलं. नवऱ्याने स्वातीला जेव्हा जेव्हा समजवण्याचा प्रयत्न केला त्या त्या वेळी तिने आपल्या नवऱ्या बरोबर भांडण केलं. एकदिवस वैतागून सासरच्या लोकांनी तिला पुन्हा माहेरी हाकलून दिलं.
माहेरी आलेल्या मुलीला बघून सदानंद शिंदेंनी तिच्या सासरच्या लोकांना जाब विचारला , काही नातेवाईक जमवून त्यांना जाब हि विचारला , प्रकरण तापलं ...पण सासरच्या लोकांनी आणि बोरगाव गावातल्या काही लोकांनी सदानंद शिंदेंना समजावलं आणि सगळं सत्य त्यांच्या कानावर घातलं.
मुलीने लाज आणली, समाजात आपलं नाक कापलं ह्या टेन्शन मध्ये पुढे सदानंद शिंदे अंथरुणाला खिळलले आणि काही महिन्यातच त्यांचा मृत्यू झाला.

मग पुढे काय झालं ?? स्वातीचं पुढे काय झालं ....
काकींच्या आईने पुन्हा घ्त्नाक्र्म सांगायला सुरवात केली .

वडील जाऊन महिना उलटला असेल, एक दिवस स्वातीला गावातल्या लोकांनी बाजारबेंदेत एका मुला बरोबर बघितलं...

बाजारबेंदेत म्हणजे कुठे ???

बाजारबेंद म्हणजे दापोत गावाच्या मागे साधारण २-३ किलोमीटर अंतरावर डोंगर माथ्यावर एक माळरान होतं, ह्या माळावर पुर्विकाली एक बाजारपेठ भरायची असं लोकं म्हणतात. त्या मालावर एक जुनं इंग्रजांच्या काळातील पडीक घर आहे.

ह्या दोघांना लोकांनी त्या पडक्या घरात जाताना बघितलं, आणि हि बातमी स्वातीच्या भावाला येऊन सांगितली. स्वातीच्या भावाचं डोकं संतापलं त्याने त्याच्या काकाच्या २ पोरांना रघु शिंदे आणि लक्ष्मण शिंदेला सोबत घेतलं आणि रागाच्या भरात हे लोकं कोयते कुऱ्हाडी घेऊन बाजारबेंदेत गेले. तिकडं काय झालं माहिती नाय पण त्या दिवसा नंतर स्वाती काय गावात दिसली नाय. पोलीस आले होते चौकशी करून गेले पण काय झालं कोणालाच माहिती नाही.

हे बोलता बोलता त्या उठल्या आणि बोलल्या .....मी जरा पाण्याचा तांब्या घेऊन आले ...
म्हातारी उठून आत गेली .इकडे बक्षी कुलकर्णी आणि जोग आपआपसात काहीतरी कुजबुज करायला लागले. काकींचे वडील एव्हाना कथेच्या खाटेवर अंगावर गोदडी घेऊन झोपले होते .
थोड्याच वेळात म्हातारी पुन्हा येऊन दरवाजा जवळ बसली आणि पान बनवायला लागली.

पण मग तुम्ही ते भूत वगैरे काय बोललात ???? बक्षींनी प्रश्न केला.

व्ह्य नंतर स्वाती गावातल्या लोकांना त्या माळावर बसलेली दिसायची.म्ह्वाप लोकांनी दिसली. माणसांना बघून मोठ मोठ्याने रडायची ..आणि खेकसत धावत यायची.
सुरवातीला लोकांना वाटलं हि खरोखर स्वातीच आहे...
मग समजलं कसं काय ती खरी होती कि भूत ???? काकींनी प्रश्न केला .

खालच्या आळीतला रमेश सावंत एकदा मालावर गुरं चरायला घेऊन गेला होता...चरता चरता त्याचा बैल उधळला आणि त्या माळावरून पळत सुटला. बैलाला आवरता आवरता त्याची दमछाक उडाली, पण बैल सैरावैरा पळतच होता.इतक्यात त्याला कोणाच्या तरी हसण्याचा आवाज आला...पाळणार्या बैलाला बघून बाईच्या हसण्याचा आवाज ऐकून त्याने इकडे तिकडे नजर फिरवली, समोर गवतातून डोकं वर काढून स्वाती खिदळत होती. तिला बघतच क्षणी रमेश तिच्या जवळ गेला ....
"अरे स्वाती , बाय कुठे होतीस कुठे तू इतके दिवस ????"
असं विचारत तो पुढे गेला आणि स्वाती त्याच्या समोर त्या गवतात आत शिरली आणि जमिनीत नाहीशी झाली.
तो दचकला गवतावर काठी फिरवली पण स्वाती दिसली नाही. रमेश समजून गेला हा काहीतरी विचित्र प्रकार आहे. तो तिथून जीव घेऊन पाळायला लागला ....त्या माळावरून वाचवा वाचवा ओरडत तो गावाच्या दिशेने पळत सुटला आणि मागून माळावरून स्वातीच्या हसण्याचा एक विलाक्ष्ण आवाज त्याचा पिछा करत कानावरआपटत होता.
कसा बसा जीव वाचवून रमेश गावात आला खरा, पण महिनाभर तापाने फणफणला.

स्वातीचं भूत माळावर झालं आहे हि बातमी गावात पसरली होती. माळावर जायला काही लोकं घाबरायचे पण गावातल्या बाई माणसांना परसाकडे जाण्यासाठी कोणतीही जागा नव्हती.
गावातल्या लोकांनी रमेश सावंतच्या बोलण्यावर प्रश्न हि उभे केले, कारण बाजारबेंदेतलं माळ त्याच्याच मालकीचं होतं. गावातली लोकं त्याच्या मालावर परसासाठी जाऊ नये म्हणून त्याने हि बोंब उठवली असावी असा समज गावातल्या लोकांचा झाला ....
किती खरं किती खोटं माहिती नाही....

पण हि घटना कधीची म्हणजे किती वर्ष झाले ????

हि आमची कल्पना बाळंत व्हती ना तावाची गोष्ट.
हे शब्द ऐकताच काकींच्या मनात वीज चमकावी अशी ती घटना आठवली.
बाळंतपणा साठी आलेल्या काकीपण परसासाठी त्या माळावरच जायच्या हे त्यांच्या लक्षात आलं.
त्यांनी आपलं लक्ष कुल्कार्निंकडे फिरवलं आणि घाबरलेल्या नजरेने त्या तय्न्च्याकडे पाहायला लागल्या.
एक एक करून रहस्य उघडत चालली होती ...

बोलता बोलता म्हातारीला झडप येऊ लागली , तिने आपला बटवा दरवाजाच्या मागे टाकला आणि बोलली ...
"झोप येते मना, तुमी बसा बोलत मी झोपते "

आणि म्हातारी बक्षी वाहिनीच्या बाजूला जाऊन लकटली. कुलकर्णी काकी उठून बाहेरच्या खोलीत आल्या आणि दबक्या आवाजात बक्षींना सांगायला लागल्या ..

आहो मी जायचे त्या माळावर ....
"शू शू शू आत्ता हा विषय बोलू नका, आपण सकाळी सविस्तर बोलू यावर , मार्ग मिळाला आहे "
जोग बोलले ...

आणि जोग खुर्चीतून उठून आपल्या खोलीत निघून गेले , बक्षी आणि कुलकर्णी पण आपल्या खोलीत निघून गेले.

कोंबडा आरवला आणि खिडकीतून उठणाऱ्या निळ्या धुरा मधून आत येणारा सूर्यप्रकाश वसंत जोगांच्या डोळ्यावर पडला . जाग आली .
खिडकीतून बाहेर बघितलं एक मनमोहक असं दृश्य नजरेस पडत होतं, कोकण आपल्या सौंदर्यात न्ह्याहाळून गेला होता .
खाली पाळण्याच्या कड्या वाजत होत्या, जोग लाकडी जिना उतरून खाली आले, खाली पाळण्यावर काकींचे वडील बसले होते ...

"या या पावनं , बसा , झोप लागली का नाय रात्री "
"हो हो लागली ना, मस्त झोप लागली "

इतक्यात बक्षी पण बाहेर आले ........बक्षिंकडे बघून वसंत जोग साहेबांनी त्यांना परसाकडे जाण्याचा इशारा केला .....
होकार्राठी मान हलवून त्यांनी आजोबांना प्रश्न केला .....बाबा परसाकडे कुठं ???

हा हा , या टमरेल घ्या, पिंपात पानी ह्या बगा ..दोगाव बी जातव काय ...
हो दोघेपण चाललोय ..

हा मंग ते दोनीबी डबे घेऊन जा ...
कुठे जायचं ....?????

ह्या गल्लीतून मागे लांब दिसतुय ना त्या माळावर जा.....
बक्षींनी समोर नजर टाकली ..दूरवर एक टेकडी दिसत होती , बक्षी आणि जोग ह्यांनी टमरेल पाण्याने भरले , पायात स्लीपर घातल्या आणि त्या गल्लीतून ते मागे त्या टेकडीच्या दिशेने निघून गेले ..

थोड्या वेळाने कुलकर्णींना जाग आली, ते पण जिना उतरून खाली आले..
थोडा वेळ खुर्चीत बसले , कुलकर्णी काकी हातात चहा चा कप घेऊन आल्या .

काय हो जोग आणि बक्षी आले का खाली ??? त्यांना पण चहा आणते .
पाळण्यावर बसलेले बाबा बोलले ....
ती मानसा परसाकडं गेलीत ...

परसाकडं ???? कुठे ?
मी पाठवले त्यांना तिकडं ..त्या बाजारबेंदेत , कोन नसतो तिकडं ...येतील निवांत.

काय बाजार बेंदेत ???? कुलकर्णी काकी एकदम दचकून बोलल्या ..
काय बाबा त्यांना तिकडे कशाला पाठवलत ????

कुलकर्णी काका आणि काकी चिंतीत होऊन एकमेकांकडे बाघाय्ला लागले ...

क्रमशः
0

🎭 Series Post

View all