कुलकर्णी काकींनी कुलकर्णी काकांना ताबडतोब जाऊन जोग आणि बक्षींना परत घेऊन यायला सांगितलं .
काही अपशकून घडायच्या आत तुम्ही जाऊन जरा त्या दोघांना घेऊन या
घाई घाईने पायात चप्पल घालून कुलकर्णी काका बाजारबेंदेच्या दिशेने पळत सुटले .
अरुंद पायवाट आणि पायवाटेच्या दोन्ही बाजूने गर्द झाडं झुडपं ...किर्र शांतता . कुलकर्णी घाई घाईने पावलं टाकत पुढे जात होते. त्या शांत वातावरणात बक्षी आणि जोग साहेबांचा कुठे आवाज कानावर पडतो का ते ऐकत होते.

तिकडे जोग आणि बक्षी आत्ता पर्यंत त्या मालावर पोहोचले पण होते. एक छोटा चढाव पार करून दोघेही आत्ता त्या माळरानावर उभे होते.
बक्षी हा मोकळा माळ बघून काही आठवलं का ??
नाही लक्षात आलं , काय विशेष दिसलं तुम्हाला ?
बक्षी व्यवस्थित बघा , हा मोकळा माळ आणि ते तिकडे लांब एक दगडी घर.
हो घरा सारखं काहीतरी दिसतंय खरं.

बक्षी काम ऑन फॉलोव मी
जोग साहेब पुढे चालायला लागले बक्षी त्यांच्या मागे मागे, थोडं अंतर पुढे गेले आणि जोग साहेब एका ठिकाणी येऊन उभे राहिले.
बक्षी साहेब या इकडे इथे उभे रहा ...
ओके बोला ...
आत्ता समोर बघा ..ह्या माळावर एक नजर टाका आणि आठवा , हे तुम्ही कुठे बघितलं आहे .

ओह माय गोड , जोग साहेब , हे दृश्य मी अविनाशच्या चित्रात बघितलं आहे ..
यस यु आर राईट मिस्टर बक्षी .
यस यु आर राईट मिस्टर बक्षी .
जोग...जोग... ओ बक्षी ....बक्षी मागे फिरा बक्षी ...
आपल्याला कोण हाका मारतोय म्हणून बक्षी आणि जोग मागे वळले , तर कुलकर्णी काका लांबून हात दाखवत त्या माळरानाच्या दिशेने धावत येत होते .

बक्षी काहीतरी गडबड आहे , कुलकर्णी पळत येत आहेत , काहीतरी प्रॉब्लेम असावा..चला बघूया .
बक्षी आणि जोग कुलकर्णींच्या दिशेने मागे वळले आणि पटापट चालत सरकायला लागले . कुलकर्णी धापा टाकत एव्हाना त्यांच्या जवळ आलेच होते .

काय झालं कुलकर्णी ....
दम टाकत ते बोलले .....सांगतो सांगतो ...
थोडा वेळ दम खाऊन कुलकर्णी बोलले ..बक्षी..जोग चला इथून
का काय झालं ?
आहो हाच तो बाजारबेंदेचा माळरान , आहो इथेच स्वातीचं भूत आहे .

हा हा हा हा हा हा हा हा ...कुलकर्णी , चिंता करू नका. हा तोच माळरान आहे बरोबर आहे तुमचं , चला जरा आमच्या सोबत या वर या माळावर .
त्यांनी कुलकर्णींचा हात पकडला आणि आत्ता तिघेजण पुन्हा त्या मालावर आले . जोग साहेबांनी कुलक्र्न्णींना त्याच ठिकाणी आणून उभं केलं आणि त्या मालावर नजर फिरवायला सांगितली .
कुलकर्णी समोर बघा , बघा हे दृश्य काही आठवतंय का बघा .
आहो हे कुठेतरी पहिल्या सारखं वाटतंय मला ..
आठवा कुलकर्णी ?
निट आठवतात नाही पण हा माळ ते समोरचं दगडी घर ...हा आठवलं ...आहो हे हेच चित्र अविनाश काढतो .

एकदम बरोबर कुलकर्णी, हेच चित्र अविनाश काढतो आणि अविनाश ज्या अद्भुत अमानवीय शक्तीच्या तावडीत अडकला आहे त्याचे सर्व धागेदोरे इथूनच चालू होतात ..... जोग साहेबांनी शब्दांवर जोर देऊन आत्मविश्वासाने सांगितलं .
त्यांचं हे बोलणं ऐकून आत्ता बक्षींच्या पायाखालची जमीन सरकली , कुलकर्णींच्या कपाळावर आट्या आल्या ...

ह्या माळरानावरून ...
होय ह्याच माळरानावर वावरत होतं दमयंतीचं भूत , आणि ह्याच माळरानावर हरवलेल्या अविनाशच्या मागावर तीने अविनाश्वर आपलं अधिराज्य जमवलं आहे .

कसं शक्य आहे हे , आहो जोग साहेब, जी मुलगी इथे लोकांना दिसायची तिचं नाव स्वाती शिंदे आणि तुम्ही म्हणताय ..म्हणजे अविनाश जिचं नाव घेतो ती तर दमयंती आहे ...
छे छे मला नाही वाटत असं काही असेल, जोग साहेब प्रामाणिकपणे सांगतो मला तुमचा तर्क काल्पनिक वाटतोय.

बक्षी , कोणी माझ्यावर विश्वास ठेवा अगर नका ठेवू , मी माझ्या अब्यासाच्या जोरावर हे ठामपणे सांगतो आहे....इथूनच ह्या सर्व घटनांना सुरवात झाली आहे . येत्या २-३ दिवसातच मी ह्याचा उलगडा करून दाखवतो बघा.
असं बोलून ते ताड ताड पावलं टाकत पुन्हा गावाच्या दिशेने चालत निघाले...मागून बक्षी आणि कुलकर्णी त्यांच्या मागे पळत सुटले ...
ऑ जोग जोग साहेब ऑ थांबा ...साहेब ऐका तर
ऑ जोग जोग साहेब ऑ थांबा ...साहेब ऐका तर
आणि ते सगळे घरी आले. घरी आलेल्या तिघांना बघून बक्षी आणि कुलकर्णी काकींच्या जीवात जीव आला.
एव्हाना त्यांच्या प्रातः विधीची सोय त्यांनी शेजाऱ्यांनी बांधलेल्या शौचालायत केली होती ..आप आपले विधी आटपून त्या सगळ्यांनी अन्घोल्या उरकल्या.
थोड्या वेळाने बक्षी काकींनी सगळ्यांना बाहेच्या पडवीत कांदे पोहे आणून दिले. कुलकर्णी काकींचे वडील पाळण्यावर बसले होते आणि इतर सर्वजण चटई टाकून खाली जमिनीवर बसून पोहे खात होते.
सगळेजण एकमेकांशी बोलत होते पण जोग साहेबांच्या डोक्यात काहीतरी चाललं होतं, पोहे खाता खाता ते कसला तरी खोल विचार करत होते.

त्यांनी अचानकपणे काकींच्या आईला प्रश्न केला ....आई का हो, त्या रमेश सावंतला जेव्हा ती स्वाती दिसली , त्या नंतर त्याला ताप भरला बरोबर ना .
व्हय का वो , आत्ता काय झाला ??
आई अजून एक सांगा ..मग त्याला काही भगत मांत्रिक वगैरे केला कि नाही .

मांत्रिक केला ना, गावातलाच खालच्या आळीतला झोऱ्या भगत केला. भगतानं त्या मालावर जाऊन तिचा कायतरी उपाय केला आनी हिकडं रमेश सावंत एकदम बेस झाला .
झोऱ्या भगत आत्ता गावात आहे काय
हाय ना त्याला मेल्याला काय झालंय, हाय तो खालच्या आळीला .
मला भेटायचं आहे त्याला ..
तुमाला काय काम वो त्याच्याकडं , पावनं तुमी ह्या भानगडीत पडू नका .

बक्षी तुमचे पोहे खाऊन झाले असले तर माझ्या सोबत येणार का ?
जोग साहेब तुम्ही बोला कुठे जायचं मी आहे तयार .
चला मग ...

जोग आणि बक्षी वाड्यातून बाहेर पडले आणि थेट झोऱ्या बुवाचं घर विचारत खालच्या आळीला जाऊन पोहोचले. बुवाच्या घरात जाताच जोग साहेबांना कसलातरी भास झाला. ह्या बुवानेच काहीतरी गडबड करून ठेवली आहे. अर्धवट ज्ञानाने ह्या बुवाणे एक खूप मोठी घोडचूक करून ठेवली असणार नक्कीच .
बक्षी जोग साहेबांचं बोलणं शांतपणे ऐकत होते. जोग साहेबांच्या डोक्यात जी काही गणितं जुळत होती ती योग्य कि अयोग्य हे बक्षींना माहिती नव्हतं पण त्यांचा वसंत जोग ह्यांच्या प्रबळ अभ्यासावर ठाम विश्वास होता.
थोड्या वेळाने एक लाल चड्डी मळकट बनियन आणि खांद्यावर ओळ टॉवेल घेऊन एक म्हातारा बाहेर आला. म्हाताऱ्याची कुडी एकदम सुकलेली, दोन्ही पाय वाकडे झालेले , कमरेत झुकलेला तो माणूस बाहेर येताच कडक आवाजात बोलला ..
काय वो कोन पायजे ??
झोऱ्या बुवांना भेटायला आलोय
झोऱ्या बुवांना भेटायला आलोय
बोला , मीच झोऱ्या बुवा .
जोग साहेबांनी बुवांना सांगितलं , बुवा काम आहे तुमच्याकडे , खूप लांबून आलोय.

या या आत या घरात ....असं बोलून तो म्हातारा पुन्हा मागे वळून घरात शिरला.
या बक्षी .....असं बोलून जोग पण त्याच्या मागे मागे गेले .

बक्षी आणि जोग सारवलेल्या जमिनीवर बसले , म्हातारा समोर भिंतीला टेकून बसला.
बोला काय काम आहे ??
बुवा , ह्या गावात २० एक वर्षांपूर्वी बाजारबेंदेत एका बाईचं भूत होतं .

व्हय , शिंद्यांची पोर झाली व्हती तिकडं.
बरोबर , बुवा रमेश सावंत ला ताप भरला होता एकदा, तुम्ही उपाय केला होता.
व्ह्य म्ह्याच तिला बांधून घेतली व्हती .

बांधून घेतली होती म्हणजे नक्की काय केलंत ???
तुमी कोण वो मना इचारणार , मी माझी विद्या कोनाला सांगत नाय, सांगली तर गुन येत नाय .
बुवा मी वसंत जोग , पनोरमल थेयरिचा तज्ञ आहे मी . पी.एच.डी मिळवली आहे.
ते काय असतंय ??
काही नाही, माझ्याकडे पण विद्या आहेत तुमच्या सारख्या .

हा हा हा हा तुमच्या कडं इद्द्या हायीत मंग माझ्याकडं कायला आलाव.
बुवा तुम्ही एक खूप मोठी चूक केलीत त्या बाईला बांधण्यात . बुवा तुम्ही रमेश सावंतला सोडवलात पण दुसऱ्या कुनाचा तरी जीव आडकवलात.

म्हंजी मी समाजलो नाय ..काय चूक केली मी
हे बघा बुवा, तुमच्यामुळे गावातल्या खूप लोकांना गुण आला आहे, खूप लोकांचे जीव वाचवलेत तुम्ही, भूत बाधा असो, सर्प दंश असो नाहीतर अजून काही जादू टोणा चेटूक असो..तुम्ही गावातल्या माणसांच्या मदतीला धावून आलेत.
बुवा आत्ता आमची एक मदत करा आणि सांगा , त्या दिवशी स्वातीला बांधून घेताना तुम्ही काय केलंत.

वायदा केला ..
वायदा केला , म्हणजे काय केलंत ??? बक्षींनी प्रश्न केला .
आमी करतो भूतांना वायदे , खोटे वायदे करायचे आणि झुलवतो त्यान्ला ताब्यात ठेवतू .

बुवा , ते मान्य आहे, पण काय वायदा केलात बुवा ?
हे बगा मी काय सांगायचो नाय , मी मांझी इद्द्या कुनाला सांगत नाय, गुन येत नाय .

जोग वैतागले आणि उठून उभे राहिले, चला बक्षी , इथे थांबून काही उपयोग नाही.
जोग साहेब वैतागून त्या घरातून बाहेर आले, पाठोपाठ बक्षीपण बाहेर आले ...

काय झालं जोग साहेब ?
बक्षी, ह्या म्हाताऱ्याने त्या स्वातीच्या आत्म्याला कसला तरी वायदा करून तो आत्मा आजवर भटकत ठेवला आहे.
एंड बक्षी इफ आय एम नॉट रोंग , तो आत्मा , ह्या म्हाताऱ्याने दाखवलेल्या खोट्या अपेक्षे पायी अविनाश ला झपाटून बसला आहे.

कम बक्षी..लेट्स फाईंड सम अदर वे ...
बक्षी आणि जोग तिथून वाड्यावर निघून आले.
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा