Login

रहस्यमयी स्त्री भाग ९

Horror
गाडीचा वेग वाढतच चालला होता, बक्षी आणि कुलकर्णी जोग साहेबांना वारंवार ओरडून ओरडून सांगत होते ..जोग साहेब गाडीचा वेग कमी करा , कमी करा ..
पण जोग ऐकायला तयार नव्हते. फक्त मोठ मोठ्याने हसत होते.
गाडीचा बेफाम झालेला वेग आत्ता बक्षी आणि कुलकर्णींच्या छातीत धडकी भरायला लागला ...दोघांच्या अंगाला घाम सुटायला लागला. कितीही सांगून जोग ऐकायला तयार नव्हते ..
एव्हाना गाडीचा वेग १३० किमी/तास पार करून गेला होता, त्या उबड खाबड रस्त्यावर आत्ता ती गाडी देवाच्या भरवश्यावरच पळत होती .काय करावं त्या दोघांना समजेना, आपसूकच कुलकर्णींचा हात आत्ता दरवाजाच्या लॉक वर गेला , तीच अवस्था बक्षींची झाली . समोर वळण आलं आणि एक भरधाव वेगाने पळणारा ट्रक अचानक समोरून आला ....जोग ह्यांच्या चेहऱ्यावर तेच आनंदाचे भाव होते...बक्षी आणि कुलकर्णी मोठ्याने ओरडले ...

जोग ....जोग ट्रक येतोय जोग ...असं बोलून दोघेही दरवाजा उघडून बाहेर उडी मारणारच होते कि जोग साहेबांनी जोराचा ब्रेक मारला गाडी रस्त्यावर घसरली चाकांचा भला मोठा आवाज झाला आणि गाडी गोल फिरून बाजूच्या शेतात जाऊन कोसळली.
एका क्षणासाठी रस्त्यावर भयाण शांतता पसरली , पण तिघेही सुखरूप होते. एक एक करून दरवाजा उघडून ते तिघेही गाडीतून बाहेर आले. बाहेर येऊन घाबरलेले ते तिघेही तिथेच शेतात बसून राहिले ...धापा टाकत आकाशाकडे बघत बसले.
कुलकर्णींच्या अंगाला घाम सुटलेला ते तर शेतात आडवेच पडले ..अंग थरथरायला लागलं होतं ..थोडा वेळ निघून गेला जोग उठले त्यांनी बक्षींना हात लावला .
बक्षी आर यु ओके ???
जास्ट शट अप जोग .....बक्षी त्यांच्यावर खेकसले .
काय झालं बक्षी , बक्षी आपण वाचलो बक्षी ....

कुलकर्णी पलीकडून मोठ्याने ओरडले .....बक्ष्या हा माणूस मनोरुग्ण आहे , ह्या मेंटल माणसाने आज आपल्याला संपवलंच होतं , देवाची कृपा म्हणून वाचलो आपण बक्षी.

व्हॉट नॉनसेन्स , कुलकर्णी साहेब मी मनोरुगण ???? मी
आहो अचानक समोरून ट्रक आला मी गाडीवर नियंत्रण ठेवून आपल्या सगळ्यांचा जीव वाचवला , आणि मलाच दोष देता //

जोग , तुम्हाला किती वेळा सांगितलं गाडी हळू चालवा हळू चालवा पण तुम्ही हासत हासत वेग वाढवतच गेलात , माहिती आहे १३० चा वेग पार केला होतात ...मरणाच्या दारात उभं केलं होतंत मला आणि कुलकर्णीला .

काय १३० चा वेग, आहो आजपर्यंत कधी ह्या वेगाने मी गाडी पळवली नाही आणि इथे कशाला असं करू ???

ते तुमचं तुम्हाला माहिती असेल ....दोघेही रागाने बोलले .

बिलीव्ह मी बक्षी, तुम्ही वेग कमी करा असं काही सांगितलच नाही मला, आणि मी हसत हसत वेग वाढवला .....व्हॉट द हेल यु आर टोकिंग ???

जोग तुमचं डोकं फिरलंय ...कुलकर्णी त्वेषाने बोलले .
बक्षी माझ्यावर विश्वास ठेवा , मला काहीच आठवत नाही , मला फक्त आपण गावातून ह्या वस्तू घेऊन निघालो ते आठवतंय आणि नंतर थेट तो समोर आलेला ट्रक ....आणि आत्ता हि वेळ ...विश्वास ठेवा बक्षी. कुलकर्णी साहेब विश्वास ठेवा माझ्यावर.

ऑ शीट ऑ शीट ..याचा अर्थ असा कि त्या शक्तीने आज माझ्यावरच माझा खेळ उलटला. बक्षी " वी ओंल आर इन ट्रबल "
धावत धावत जोग गाडी जवळ गेले . गाडीचं जास्त काही नुकसान झालं नव्हतं .
चला आपण निघूया इथून ....

पण त्या दोघांनी त्या क्षणी वसंत जोग ह्यांच्या गाडीत बसायला साफ नकार दिला.
जोग साहेबांनी त्यांना वारंवार हे पटवून दिलं कि नक्की काय घडलं खरोखर त्यांच्या लक्षात आलं नाही .
बक्षींनी कुलकर्णींना डोळ्याने इशारा केला..."होय झालं असू शकेल "
त्या तिघांनी ती गाडी तिथून कशीबशी धक्का मारून बाहेर काढली आणि थेट वाड्यावर आले .

वाड्यावर येताच जोग साहेबांनी हात पाय धुवून आपली खोली गाठली. तो आरसा आणि सुभाष चा तो शर्ट घेऊन ते खोलीत निघून गेलेले बक्षींनी पाहिलं. पाठोपाठ बक्षीपण त्यांच्या मागे गेले .
काय झालं जोग साहेब ??? गाडीत नक्की काय घडलं ???

बक्षी आपण ह्या वस्तूंचा वापर करून त्या शक्तीपर्यंत पोहोचण्या अगोदर ती आपल्या पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे. त्या अमानवीय शक्तीने ओळखलं आहे कि अविनाश पासून वेगळं करण्यासाठी तिला मीच झटका दिला होता . आज तिने आपला खेळ आपल्यावर उलटला . आपल्याला सावध राहायला हवं बक्षी . हे वाटतं तेवढं सोप्प नाही .
बट यु डोन्ट वरी .

जोग साहेबांनी टोवेल काढला कपडे घेतले आणि हातात साबण घेऊन तो लाकडी जिना उतरून खाली निघून गेले ... जाता जाता बोलले ..
बक्षी वेट हियर , मी आलोच ५ मिनिटात.

बक्षी त्यांच्या खोलीत बसून राहिले , जोग खाली निघून गेले. खोलीत बसून बक्षी जोग साहेबांच्या वस्तू न्याहाळत बसले , वर लाकडी खामाबावर टांगलेला पंखा ...
आवाज करत गर गर गर करत फिरत होता. मध्येच खिडकीतून हलकीशी झुळूक आत येत होती . पलंगावर दमयंतीचा आरसा आणि सुभाषचा शर्ट ठेवलेला दिसला.
उत्सुकता म्हणून त्यांनी आरसा उचलला आणि सहाजिकच आहे त्या आरश्यात त्यांना आपला चेहरा दिसला .
आरशात चेहरा बघताच क्षणी काहीतरी विलक्षण आकृती त्या आरश्यात चमकली आणि नाहीशी झाली . बक्षी दचकले ...मोठ्याने ओरडले ...

जोग ......जोग भूत ..भूत जोग आणि ते जीव घेऊन त्या खोलीतून धाड धाड करत ते लाकडी जिने उतरून खाली उतरून जीव घेऊन वाड्याच्या मागे पळाले . मागे विहिरीजवळ जोग अंघोळ करत बसलेले ...
धापा टाकत बक्षी त्यांना घडलेली घटना सांगायला लागले ...
बक्षींचं बोलणं ऐकताच ते चाट पडले . पटापट अंघोळ आटोपली , कपडे घातले आणि ते आपल्या खोलीत आले . खोलीत येताच त्यांनी बक्षींना बाहेर थामाब्यला सांगितलं , त्यांनी तो पलंगावर पडलेला आरसा आणि शर्ट बघितलं ..पन हात लावला नाही .
जोग साहेबांनी आपल्या सूटकेस मधून एक पांढरं फडकं काढलं त्या दोन्ही वस्तू त्या कापडात बांधल्या ...मार्कर काढला आणि त्यांनी त्या कापडावर कसलीतरी आकृती बनवली .
खुंटीला टांगलेला शर्ट चढवला , विजार घातली आपल्या सूटकेस मधून काहीतरी साहित्य पिशवीत पटापट भरलं आणि कापडात बांधलेला तो आरसा आणि शर्ट घेऊन ते लगबगीने निघाले ...

ओ जोग ..डॉक्टर कुठे निघालात डॉक्टर

बक्षी कम फास्ट, चला लवकर बक्षी वेळ घालवू नका ,कुलकर्णींना पण घ्या सोबत
पण कुठे ?? जोग साहेब

बक्षी या खाली बाजारबेंदेत जायचं आहे आपल्याला ..
काय बाजारबेंदेत ???

चला बक्षी प्रश्न विचारण्याची हि वेळ नाही ..
असं बोलून जोग साहेब भरधाव वेगाने बाजारबेंदेच्या दिशेने निघून गेले , त्यांच्या पाठोपाठ बक्षी कुलकर्णीपण पळत सुटले ..मागून काय झालं काय झालं असं ओरडत कुलकर्णी काकी , बक्षी काकी आणि आजी पण पटापट चालत चालत त्या दिशेने निघाल्या ...

धापा टाकत डॉक्टर जोग बाजारबेंदेत येऊन उभे राहिले होते . ते त्याच ठिकाणी जाऊन उभे राहिले ज्या ठिकाणी त्यांना ते अविनाशच्या चित्रातलं दृश्य दिसत होतं .
पाठोपाठ कुलकर्णी आणि बक्षीपण पोहोचले.
डॉक्टर जोग ह्यांनी एक पांढरं कापड जमिनीवर अंथरलं त्यावर कापडात बांधून आणलेला स्वातीचा आरसा आणि सुभाषचं शर्ट ठेवलं , आपल्या सोबत पिशवीत आणलेलं साहित्य त्यांनी मांडलं. मागून चालत आलेल्या कुलकर्णी काकी आणि बक्षी काकी पण एव्हाना येऊन पोहोचल्या होत्या पण आजी त्यांच्या सोबत नव्हत्या.

एव्हाना घड्याळात संध्याकाळचे ५:३०-६:०० वाजले असावेत. सूर्य अस्थाला जाण्याच्या तयारीत होता. डॉक्टर जोग ह्यांनी बाई माणसांना घरी जाण्याचा सल्ला दिला. कुलकर्णी काकी बक्षी काकींना बोलल्या
चला ताई, आपण जाऊया इथून ....
आपल्या घरात जो काही प्रयोग डॉक्टर जोग ह्यांनी केला होता तो कुलकर्णी काकींना चांगलाच लक्षात होता. इथे काहीतरी विलक्षण घडणार आहे हे त्या जाणून होत्या ,बक्षी काकींना घेऊन त्या तिथून निघून गेल्या .

इथे डॉक्टर जोग ह्यांनी आपला प्रयोग चालू केला , एखाद्या सराईत मांत्रिकाप्रमाणे डॉक्टर जोग ह्यांनी पण नारळ पिंजर हळद अगरबत्ती आणि एक काळा गोटा मांडला . लिंबू कापून चारही दिशांना फेकून दिला ...आणि एका पाठोपाठ एक मंत्र बोलायला सुरवात केली.
बक्षी आणि कुलकर्णी त्यांच्याकडे बघतच बसले , विचारात पडले ..
हा माणूस तर म्हणतो कि मी पनोरामल थियरी मध्ये पी.एच.डी केली आहे , मग हा हे सगळं काय करत बसला आहे .....

दोघांच्या मनात हाच प्रश्न रेंगाळत होता , इतक्यात जोग म्हणाले ...
बक्षी आणि कुलकर्णी तुम्ही विचार करत आहात तो बरोबर आहे कि हा पी.एच.डी माणूस हे काय करतोय ....
कुलकर्णी आणि बक्षी आत्ता जे काही इथे घडणार आहे ते बघून इथून पळून जाऊ नका,कारण जर तुम्ही माझ्या कक्षेतून बाहेर पडलात तर स्वतःचा जीव धोक्यात घालणार आहात हे लक्षात असू दे. तुम्ही आहात त्याच ठिकाणी उभे रहा...मग समोर भुतांनी नंगा नाच केला तरी चालेल घाबरून जाऊ नका , मी आहे .

डॉक्टर जोग ह्यांचं बोलणं ऐकून ते दोघेही चरकले ...पण दुसरा मार्ग नव्हता, आत्ता जे होणार होतं त्याचा सामना करायला त्यांनी मनाची तयारी केली.
डॉक्टर जोग गुडघ्यावर बसले दोन पायांच्या मध्ये नारळ ठेवला , आरसा समोर उभा केला , बाजूला शर्ट ठेवलं , सर्वत्र पिंजर गुलाल उडवायला सुरवात केली आणि मोठमोठ्याने काहीतरी मंत्र मारायला सुरवात केली ......
सूर्य अस्थाला गेला , माळावर अंधार दाटला आणि आकाशात तांबडा रंग पसरला..
माळावर वातावरण आत्ता भयाण वाटायला लागलं होतं.आणि घाबरलेल्या नजरेने बक्षी आणि कुलकर्णी आजूबाजूला बघायला लागले ...

गवताची काडीजरी हल्ली तरी त्यांच्या मनात चर्रर्र होत होती. आत्ता साधारण २० मिनिटं झाली जोग मंत्रोच्चार करत होते ..आणि अचानक त्या आरशामध्ये एक चेहरा डोकावून गेला . बक्षी मोठ्याने ओरडले ..जोग ती आली जोग हाच होता तो चेहरा ...
घाबरलेले बक्षी रडकुंडीला आले...जोग मला नाही थांबायचं इथे मला जाउदे जोग .
बक्षी मी अगोदर बजावलं होतं तुम्हाला...आणि आत्ता तर शक्यच नाही , ती शक्ती इथे आली आहे . शांत उभे रहा बक्षी चिंता करू नका .

दुसऱ्याच क्षणाला पुन्हा त्या आरशात एक चेहरा येऊन उभा राहिला...त्या अंधुक अंधुक संध्याकाळी आरशात आलेला तो चेहरा बघून सगळेच घाबरले.
डॉक्टर जोग ह्यांनी आत्ता आपली खेळी चालू केली .....

क्रमशः
0

🎭 Series Post

View all