त्या दिवशी सकाळी जोग आणि बक्षी वैतागून वाड्यावर आले , वाड्यात येताच समोर बसलेल्या कुलकर्णींनी बक्षींना प्रश्न केला ..
काय बक्षी बुवा भेटला का ??? काही प्रगती ?

कुल्कार्ण्या अरे तो बुवा म्हणजे महा डांबिस माणूस निघाला, काही सांगायला तयार नाही तो.
अरे बक्षी हे लोकं असेच असतात , हे कोणाला काही सांगत नाहीत काही मदत करत नाही...हे मेले कि ह्यांच्याकडे असलेलं ज्ञान पण संपून जातं , कारण हे लोकं आपलं ज्ञान आपल्याकडेच ठेवतात .

जोग पटकन बोलले, गेला उडत तो बुवा...बघा आत्ता मी अकय करून दाखवतो. फक्त हि दमयंती कोण ते एकदा समजलं कि मग बघा ....
हाताची टिचकी वाजवत ..जोग म्हणाले हे ..हे असं सोडवतो बघा सगळं गणित.

कुलकर्णी काकींची आई बाहेर आली, कोपऱ्यातली काठी उचलून घरात शिरलेल्या कोंबड्या हुसकावल्या आणि अंगणात पाय मोकळे सोडून त्या पडवीत बसल्या.
ऑ आई दमयंती नाव ऐकलय का ??? जोग साहेबांनी प्रश्न केला .

कोण हि दमयंती , नाय बा ऐकला ह्यो नाव .
ठीक आह . बक्षी मला काय वाटतं कि आपण एकदा स्वाती शिंदेच्या घरी जाऊन बघूया काय भानगड आहे . हि दमयंती कोण आहे .

काय शिंदेंच्या घरी ..नको रे बाबा . त्या स्वातीचा भाव लय डेंजर आहे ...तिकडे नको .
मग काय करुया कुठून माहिती मिळू शकेल, नक्की हि दमयंती कोण आणि तो त्या दिवशी तिला भेटायला आलेला माणूस कोण ???

काय हो आई, त्या दिवशी जेव्हा हि घटना घडली, स्वातीला कोणा बरोबर बघितलं होतं गावातल्या लोकांनी , काही माहिती आहे का ??
होता कोन तरी, पन आपल्या गावातला नव्हता...त्याला पन संपवला बोलतात तिथं.
मग तो कोण होता ? कुठला असेल तो ?
मग तो कोण होता ? कुठला असेल तो ?
मना वाटतंय तो बोरगावचाच असंल.
जोग साहेबांच्या चेहऱ्यावर एक चमक आली,कपाळावरच्या भुवया वर झाल्या आणि तयंनी बक्षिंकडे बघितलं ...|
बक्षी चला आपण बोरगावात जाऊन येऊ ..
बोरगावात कशाला ?
चला , आपण येऊ जाऊन , स्वातीच्या घरी नाही जाता आलं ना ,आपण तिच्या सासरवाडीला जाऊन येऊ . बघूया काही माहिती मिळते का .

जोग बक्षी आणि कुलकर्णी हे सगळे जोग साहेबांच्या गाडीत बसून २- किलोमीटर वर असलेल्या बोरगावात निघून गेले .
गावात पोहोचताच त्यांनी स्वाती शिंदे नावाच्या बाईचा शोध सुरु केला . एका घराच्या बाहेर ओटीवर काही वयोवृद्ध म्हाताऱ्या बायका बसल्या होत्या. जोग साहेबांनी गाडी थांबवली , इतरांना गाडीतच बसून राहायला सांगितलं .
ते उतरले आणि त्या घराजवळ गेले ....

काय आजी बऱ्या आहात ना ????
कोन गं यो ...???? दोन तीन म्हाताऱ्या पुटपुटल्या.
नाय व्लाखला , कोन वो तुमी ????

मी दापोलीतून आलोय, वरच्या आळीतून. थोडं पाणी मिळेल काय ???
एक आजीबाई उठल्या आणि घरात जाऊन तांब्याभर गार पाणी घेऊन आल्या. तांब्यातलं पानी एकदम गार होतं , त्याला मातीचा सुवास येत होता , नक्कीच हे पानी माठातलं असावं ....
जोग साहेबांनी ३-४ घोट करता करता तांब्या भर पाणी संपवलं , शिल्लक राहिलेलं थोडं पानी चेहऱ्यावर मारून रुमालाने पुसलं . एकदम फ्रेश झाले .

आजी ह्या गावात स्वाती शिंदे चं घर कुठे आहे ?
कोन वो स्वाती शिंदे ???
दापोलीतली पोरगी ह्या गावात दिलेली ???
नाय बा , आम्हाला नाय माहिती कोन .... कोण गं स्वाती ....??? तुला माहित हाय काय कोन ???
म्हाताऱ्या एकमेकीनंना प्रश्न करत राहिल्या ...
एवढ्यात जोग साहेब बोलले ....... आजी स्वाती शिंदे जी २०-२२ वर्षांपूर्वी दापोलीत तिच्या माहेरी गेली आणि परत कधीच ह्या गावात आली नाही ...

काय गं त्या दळवींची सून ना...बापाच्या घरी गेली आनी आलीच नाय ..
कोण कोण दळवी ???तुम्ही आत्ता काहीतरी दळवी बोललात ????

तो बघा तो घर ...
माहिती मिळताच जोग साहेब ताबडतोब जाऊन गाडीत बसले आणि त्यांनी गाडी दळवींच्या घरासमोर एका बाजूला दाबून उभी केली.

जोग दळवी आणि कुलकर्णी गाडीतून उतरले, दरवाजे बंद केले . बंद झालेल्या दरवाजाच्या आवाजाने दळवींच्या घरातली मंडळी बाहेर आली...
कोणीतरी पाहुणे आले म्हणून घरातल्यांची लगबग चालू झाली....घरातील एक वरिष्ठ व्यक्ती दरवाजात उभी राहिली .... जोग कुलकर्णी आणि बक्षींनी त्यांच्याकडे बघून प्रश्न केला .....
"दळवी ना ???"
होय या या ....
चप्पल काढून तिघेजण घरात गेले , पहिल्या खोलीत ठेवलेल्या प्लास्टिकच्या खुर्चीत ते बसले , समोर ठेवलेल्या खाटेवर ती वरिष्ठ व्यक्ती बसली , वय असेल साधारण ६५-७० .
"ए पाणी आण "
हो हो आले आलेच ....घरातून आवाज आला ..
जोग साहेब भिंतीवर लावलेले फोटो बघत होते , खूप लोकांचे फोटो त्या भिंतीवर टांगलेले दिसत होते ...त्या पैकी काही लोकं अस्तित्वात असतील तर काही नसतील हि .
एक बाई पाण्याचे ग्लास घेऊन आल्या ...पानी घेऊन झालं आणि त्या वरिष्ठ व्यक्तीने प्रश्न केला ...
"मी ओळखलं नाही आपल्याला ???"
बक्षींनी उत्तर दिलं ....एक्च्युली आम्ही एक वेगळंच काम घेऊन आपल्याला भेटायला आलो आहोत.
बक्षींना बोलण्यात संकोच होत आहे हे जोग साहेबांनी ओळखलं , आणि त्यांनी विषय उचलला .
दळवी साहेब मी ...डॉ.वसंत जोग , पानोरमल थियरी मध्ये मी पी.एच.डी केली आहे.
डॉक्टर हा शब्द ऐकून ..हि व्यक्ती सुशिक्षित आणि मोठी असावी हा अंदाज लावत दळवींच्या बोलण्यातला सूर निवळला .

हा डॉक्टर बोला ना , काय काम काढलत?
दळवी साहेब , आढेवेढे न घेता सरळ विषय मांडतो. आम्ही दापोलीहून आलो आहोत .
दापोली हा शब्द ऐकताच दळवींचा चेहरा गंभीर झाला ...आवाजाचा सूर थोडा कडक झाला ..."बोला "
दळवी साहेब , हे कुलकर्णी , ह्यांच्या मुलावर भूत बाधा झाली आहे. जन्माला आल्या पासून त्या अदृश्य शक्तीने पोराच्या आयुष्याची माती करून ठेवली आहे. पोराला त्यातून बाहेर काढायचं आहे म्हणून मदतीसाठी तुमच्याकडे आलो आहोत.

मी काय मदत करणार, ठीक आहे तुम्ही बोला तुम्ही ...
दळवींच्या घरातील त्या बाई चहा घेऊन आल्या आणि तिथेच दाराच्या मागे उभ्या राहिल्या ..
जोग साहेबांनी विषय पुढे चालू केला ...
दळवी साहेब मला सांगा स्वाती शिंदे तुमच्या घरातील सून बरोबर .
होय आमचीच सून
तिचं काय झालं वगैरे सगळ्या गोष्टींची माहिती आम्ही मिळवलीच आहे , आम्हाला फक्त एक गोष्ट सांगा ....हि दमयंती कोण ? हे नाव तुम्ही ऐकलंय का ??

दरवाजाच्या मागे उभ्या असलेल्या बाई पटकन बोलल्या ...तिचं सासरचं नाव आम्ही दमयंती ठेवलं होतं , आमच्या मुलाची इच्छा होती म्हणून .
काय ??? याचा अर्थ स्वातीचं सासरचं नाव दमयंती ..
होय का ? काय झालं तुम्हाला दचकायला ????
नाही नाही काही नाही ...आणखी एक माहिती सांगा खूप मदत होईल.

हम्म विचारा ?
प्रश्न खासगी आहे तरीपण विचारतो कारण आमचा नाईलाज आहे ..
विचारा डॉक्टर संकोच बाळगू नका विचारा ...
तिचं ह्या गावात कोणाबरोबर काही प्रेमप्रकरण वगैरे ???

दळवींच्या कपाळाला आट्या पडल्या आणि एका जाड आवाजात त्यांनी उत्तर दिलं ..
ती बाई चांगल्या वळणाची नव्हती , तरीपण आमच्या मुलाने तिला सांभाळून घेतलं , पण ती सुधरली नाही आणि आपल्या मौतीने कुठेतरी मेली असेल ...माहेरी निघून गेली परत काही आली नाही . आम्हीपण तिला शोधण्याचा प्रयत्न केला नाही .

तिचं काय झालं होतं हे दळवींना माहिती होतं पण त्यांनी ते सांगितलं नाही. आणि जोग साहेबांनी विचारलं पण नाही.
पुढे दळवी बोलले ...
तुमच्या माहिती साठी सांगतो , गावातल्या प्रभाकर गायकवाडांचा मोठा मुलगा सुभाष. हिचं लफडं होतं त्याच्या बरोबर. हे दोघेपण एकाच दिवशी नाहीशे झालेत. पळून गेलेत कि कुठे मसणात गेलेत कोणालाच माहिती नाही.

जोग साहेबांनी होकारर्थी मान हलवली ...
दळवी साहेब आणखी एक शेवटची मद्द करा , दमयंतीच्या वापरातील काही एखादं जुनं कापड किंवा वस्तू मिळू शकेल का ?
कशासाठी ?
दळवी साहेब मला माझ्या अभ्य्सासाठी हवी आहे .
ओ बघा हो काही आहे का ...घरात

थोड्याच वेळात दळवींच्या घरातील त्या बाईंनी एक आरसा आणला . हा घ्या .
जोग साहेबांनी तो आरसा सोबत घेतला, धन्यवाद करून ते त्या घरातून बाहेर निघाले . निघता निघता त्यांनी प्रभाकर गायकवाडांच्या घरी भेट दिली .

सांगितलं आम्ही रत्नागिरीहून आलो आहोत.सुभाष आमचा मित्र होता कॉलेजात.त्याची आठवण म्हणून काहीतरी द्या. त्याच्या घरातील लोकांनी सुभाष चं एक शर्ट आणून दिलं .
धन्यवाद करून तिथून हि ते निघाले .
गाडीत येऊन बसले गाडी गावाबाहेर येताच ...बक्षींनी प्रश्न केला .
जोग साहेब हे सगळं कशासाठी घेतलं तुम्ही ?

बक्षी , ह्याच वस्तू आपल्याला दमयंती पर्यंत घेऊन जाणार आहेत.
ह्या वस्तू ???? ते कसं काय
कुलकर्णी बक्षी आपण आत्ता खूप जवळ येऊन पोहोचलो आहोत ...असं बोलून त्यांनी गाडीचा टेप चालू करून गाणी लावली ....गाडीचा वेग वाढवला आणि त्या मोकळ्या रस्त्यावर गाडी भरधाव वेगाने पळू लागली.
जोग साहेब आहो हळू चालवा.....काटा १०० च्या पुढे चालला आहे .....

क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा