रहस्याच्या पलीकडे... भाग - ३ (अंतिम भाग)
शाळेबाहेर उभा असलेला पांढऱ्या स्कूटरवरचा माणूस अजूनही सियाकडे बघत होता. सियाच्या अंगावर काटा आला. आरव तिच्या अगदी जवळ उभा राहून शांतपणे म्हणाला, “घाबरू नकोस. आपण आधी तुझ्या बिल्डिंगकडे जाऊ. ‘संरक्षक’ पुन्हा तिथे दिसू शकतो."
दोघंही सावधपणे निघाले. ते जात असताना स्कूटरवरचा माणूस काही अंतरावरून त्यांच्यामागे लागला. पण आरवला त्या गोष्टीची कल्पना होती. त्याने पटकन एक वळण घेत सियाला इमारतीच्या मागच्या प्रवेशद्वारातून वर नेलं, जिथे स्कूटरला येणं शक्य नव्हतं.
टेरेसवर रात्रीपेक्षा कमी अंधार होता, पण वातावरण तसंच गूढ. सिया आणि आरव दोघेही शांतपणे आजूबाजूला पाहत होते. तेव्हाच मागच्या बाजूने ओळखीचा आवाज आला,“तुम्ही दोघे इथेच येणार याची मला खात्री होती.”
तो संरक्षक होता, त्याच काळ्या टोपीत आणि शालमध्ये, पण यावेळी त्याचा चेहरा अर्धा प्रकाशात दिसत होता. सिया आणि आरव दोघेही मधोमध थांबले.
सिया पुढे म्हणाली, “तुम्ही आम्हाला सत्य सांगाल का? मला माझ्या वहीचं रहस्य कळलं… पण हा दुसरा माणूस कोण आहे? तो माझ्या मागे का लागलाय?”
संरक्षक हळूच चालत त्यांच्या जवळ आला, “आज सर्व उलगडून सांगतो. तुम्हाला हे जाणून घेण्याची वेळ आली आहे.”
संरक्षक शांतपणे बोलू लागला, “शंभर वर्षांपूर्वी ‘काळोखं व्रत’ ही एक साधी परंपरा होती. लोक निसर्गाला धन्यवाद देत. कोणत्याही जादू-टोण्याशी त्याचा संबंध नव्हता.
पण काही लोकांनी त्याच्या नावावर भीती, अफवा आणि खोटी माहिती पसरवून त्यातून फायदा मिळवण्याचा प्रयत्न केला.
त्यांना थांबवण्यासाठी काही वडिलधाऱ्यांनी एक गट तयार केला, नित्यरक्षक मंडळ. यांचं काम होतं परंपरेचं खरं स्वरूप जपणं.”
आरव श्रद्धेने ऐकत विचारला, “म्हणजे माझ्या आजोबांनी सांगितलेलं खरं होतं?”
संरक्षक मान हलवली. “हो.”
सिया हळू आवाजात म्हणाली, “आणि मी? मी या सगळ्यात का आहे?”
संरक्षक स्मितहास्य करून म्हणाला, “कारण तू लिहिलेली माहिती अत्यंत अचूक होती. तुला गावातील लोकांनी सांगितलेल्या गोष्टींमध्ये एकही चूक नव्हती. आणि जे अपूर्ण होतं, ते मी पूर्ण केलं. मंडळाने ठरवलं आहे की तुझ्यासारख्या निष्पक्ष व्यक्तीला ही सत्यकथा नोंदवू द्यावी.”
सिया अवाक झाली. मी? या परंपरेची निवडलेली व्यक्ती?
आरवने प्रश्न विचारला, “पण तो स्कूटरवाला? आणि कालची पळून गेलेली सावली?”
संरक्षक गंभीर झाला. “तो लोकांचा गट अजूनही अस्तित्वात आहे. ते परंपरेची खोटी, भीती निर्माण करणारी आवृत्ती पसरवतात. ते तुमची वही शोधत होते… कारण त्यांना त्या परंपरेचा खरा इतिहास उघड होणं नकोय.”
सियाला एकदम आठवलं, माझी वही गायब झाली होती… म्हणजे त्यांनीच घेतली होती!
संरक्षक म्हणाला, “हो, काल टेरेसवर जो पळून गेला, तो त्यांच्याच गटातील. पण आता त्यांना माहित आहे की मंडळ जागे झाले आहे. आणि ते आणखी काही करू शकत नाहीत.”
आरवने विचारलं, “मग स्कूटरवाला ?”
संरक्षक शांतपणे म्हणाला, “त्याचा मला सामना करायचा आहे. तुम्हाला नाही.”
सिया विचारात पडून म्हणाली, “तुम्ही माझ्या वहीत जे नवीन पान जोडले… ते कसं लिहिलं? ते माझ्या हस्ताक्षरातच होतं.”
संरक्षक थोडं हसला. “ते पान नवीन नाही. ते आधीच तुझ्याच वहीत होतं.”
सिया चकित झाली. “पण ते मी वाचलं नव्हतं!”
तो म्हणाला, “कारण त्या पानावर एक खास प्रकारची शाई वापरली गेली होती. ती केवळ काही परिस्थितीत दिसते, उदाहरणार्थ नैसर्गिक प्रकाश आणि टाकीच्या सावलीत. मी तुला तिथेच नेत होतो… कारण तुला त्या पानाचा उलगडा व्हायचा होता.”
सिया आश्चर्याने स्तब्ध झाली. म्हणजे ते पान आधीपासूनच होतं… फक्त मला दिसलं नव्हतं?
तेवढ्यात टेरेसच्या दरवाजाकडे पावलं ऐकू आली.
स्कूटरवाला वर आला होता.
स्कूटरवाला वर आला होता.
तो चोरट्या नजरेने म्हणाला, “तेवढा इतिहास पुरे. मला ती वही द्या.”
सिया भीतीने थरकली, पण संरक्षक पुढे आला.
“ही वही तिची आहे. आणि सत्यही.”
तो माणूस संरक्षकाकडे झेपावला, पण आरव आणि सिया दोघेही मागे हटले. संरक्षकाने त्याला थांबवण्यासाठी एक जोरदार इशारा केला, “तुमचा वेळ संपला आहे. मंडळ पुन्हा सक्रिय झालं आहे.”
तो माणूस संरक्षकाकडे झेपावला, पण आरव आणि सिया दोघेही मागे हटले. संरक्षकाने त्याला थांबवण्यासाठी एक जोरदार इशारा केला, “तुमचा वेळ संपला आहे. मंडळ पुन्हा सक्रिय झालं आहे.”
स्कूटरवाला मागे हटला. काही क्षणांनी तो रागाने खाली उतरला आणि निघून गेला. त्याला समजलं होतं की आता त्याचा गट काहीही करू शकत नाही.
सिया थोड्या वेळाने शांत झाली. मंडळाचा धोका टळला होता. संरक्षकाने त्यांच्या दोघांकडे पाहून नम्रपणे म्हटलं,
“आता तुम्ही सुरक्षित आहात. सिया… तुझं काम इथे संपलं नाही. तू जे लिहिलं आहेस, ते पुढे योग्यरित्या लोकांपर्यंत पोहोचव. ही परंपरा भीतीची नाही, ती निसर्गाच्या कृतज्ञतेची आहे.”
“आता तुम्ही सुरक्षित आहात. सिया… तुझं काम इथे संपलं नाही. तू जे लिहिलं आहेस, ते पुढे योग्यरित्या लोकांपर्यंत पोहोचव. ही परंपरा भीतीची नाही, ती निसर्गाच्या कृतज्ञतेची आहे.”
सियाच्या चेहऱ्यावर आत्मविश्वास दिसू लागला.
ती म्हणाली, “मी खात्री देऊन सांगते… सत्य मीच पुढे नेईन.”
ती म्हणाली, “मी खात्री देऊन सांगते… सत्य मीच पुढे नेईन.”
आरव हसला. “कथा तुझ्यापासून सुरू झाली होती… आणि आता योग्य शेवटी पोहोचली आहे.”
संरक्षक टेरेसच्या कोपऱ्यात उभा राहून म्हणाला,
“जेव्हा तुला पुढे माझी गरज भासेल… मी असेल.”
आणि हळूहळू अंधारात विलीन झाला.
“जेव्हा तुला पुढे माझी गरज भासेल… मी असेल.”
आणि हळूहळू अंधारात विलीन झाला.
सिया टेरेसवर उभी राहून आकाशाकडे पाहत होती.
तिच्या हातात तिची वही होती. आता पूर्ण, सत्य आणि सुरक्षित.
तिच्या हातात तिची वही होती. आता पूर्ण, सत्य आणि सुरक्षित.
त्या रात्री तिने वही उघडून शेवटचं वाक्य लिहिलं,
“भीती नव्हे… सत्य प्रकाश आणतं.”
“भीती नव्हे… सत्य प्रकाश आणतं.”
समाप्त
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा