Login

रहस्यमयी स्त्री भाग ५

Horror


वसंत जोग ह्यांनी केलेला प्रयोग कुलकर्णी दांपत्याच्या मनात धडकी भरून गेला होता. पण एक आशेची किरण दिसू लागली होती . वसंत जोग आपल्या मुलाला ह्या संकटातून नक्की सोडवतील आपला मुलगा नक्की आपल्याकडे परत येईल हा एक आशावाद हि जागृत झाला होता.
एव्हाना संध्याकाळचे ७ वाजले , आणखी २ एक तासात अविनाश घरी येईल आणि आपल्यावर रागावेल ह्याची त्यांना पूर्ण कल्पना होती.

आणि बघता बघता १० वाजलेच. दारावर बेल वाजली . बेलचा आवाज ऐकताच दोघांचे चेहरे चीतीत झाले . काकांनी दरवाजा उघडला आणि बाजूला झाले , अविनाश आत आला , सोफ्यावर बसून पायातले सॉक्स आणि बूट काढून तसाच सोफ्यावर मान टाकून बसला . काकींनी पाण्यचा ग्लास आणला आणि त्याला बोलल्या ..

अवि पाणी घे ..
त्याने पाण्यचा ग्लास घेतला पाणी प्यायला आणि काकांकडे बघून बोलला ..
काय कुलकर्णी काय कार्यक्रम केलात आज ???

म्हणजे , कार्यक्रम म्हणजे ?
अविनाशचा हा प्रश्न ऐकताच काकी भलत्याच चिंतीत झाल्या काकांच्या मनात पण हजार प्रश्न उभे झाले ...मनात भीती वाटायला लागली बहुतेक हा आत्ता एवढ्या रात्री आपल्या बरोबर भांडण करणार .

काकींनी सारवासारव केली ...अवि बेटा तू जेवून घे , मी वाढते जेवायला.
थांबा आमचं बोलणं अजून झालं नाही ...हम्म बोला कुलकर्णी आज काय कार्यक्रम केलात ?

कार्यक्रम कसला रे कार्यक्रम ?
हाहाहाहाहाहा हे बघा कुलकर्णी मागच्या जन्मी आम्हाला वेगळं केलं पण ह्या जन्मी ते कोणाच्या बापाला शक्य होणार नही.

वेगळं केलं, मागच्या जन्मी ..काय बोलतोस तरी काय हे ???
होय खरं तेच बोलतोय मी , दमयंतीला आणि मला कोणी वेगळं करू शकणार नाही हे लक्षात असू द्या ....भेटूया उद्या .
असं बोलून तो हात पाय धुवायला बाथरूम मध्ये गेला आणि तिथून थेट आपल्या खोलीत.
नेहमीच्या ह्या दुखण्याला कुलकर्णी दांपत्य आत्ता वैतागले होते , काय होईल ते एकदाचं होऊन जाऊ दे.....कोण हि बया दमयंती आणि काय कसलं मागच्या जन्मी आणि कसलं काय पुढच्या जन्मी देव जाणे ..

मनात सगळा गोंधळ माजला होता पण मार्ग दिसत नव्हता. त्या रात्री कुलकर्णी काका आणि काकी बाहेर हॉलमध्ये झोपले ..रात्री उशिरा पर्यंत दोघे ह्याच विषयावर बोलत होते . काय करूया ???
हा काय प्रकार आहे , जोग मार्ग काढतील का कि वेळ वाया घालवत बसतील....
असे अनेक प्रश्न आणि अनेक शंका. त्या रात्री त्यांनी ठरवलं आपण उद्या बक्षींना सांगून दापोलीला निघून जाऊया. तिकडे काही मार्ग मिळतोय का बघूया.
असं ठरवून बोलता बोलता दोघेही झोपी गेले.....

दुसऱ्या दिवशी दोघेही सकाळी लवकर उठले , अंघोळ्या आटोपल्या आणि पिशवीत आपले कपडे भरून कुलकर्णी दांपत्य दापोलीला जायला निघाले. अविनाश अजून उठला नव्हता ,काकींनी त्याचा दरवाजा ठोकला....
अवि अविनाश
३- ४ वेळा हाक मारल्या नंतर अविनाशने आपला दरवाजा उघडला...डोळे चोळत विचारलं
काय झालं , सकाळ सकाळी ..

अरे आम्ही दापोलीला चाललो आहोत , ८-१० दिवसंनी येऊ परत. शेजारच्या जोशी काकूंना तुझ्या जेवणाचं सांगितलं आहे. त्या डबे देतील तुला.

हो ठीक आहे चालेल ...
एवढं बोलून अविनाशने आपल्या खोलीचा दरवाजा बंद करून घेतला.
कुलकर्णी काका आणि काकी घराच्या खाली आले आणि तिथून रिक्षा पकडून ते बक्षींच्या घराकडे निघाले. रिक्षातून कुलकर्णी काकांनी बक्षींना फोन केला.
बक्षी ..मी कुलकर्णी
हा बोल रे ..
तू घरी आहेस का आत्ता .
हो आहे ना ...
आम्ही दोघे येतोय तुझ्या घरी आत्ता ..
हो हो चालेल या ..

थोड्याच वेळात ते दोघेही बक्षींच्या घरी पोहोचले . बक्षी शर्ट आणि लुंगीवर बसलेले.
दरवाजा उघडून दोघांना घरात बसवलं ...त्यांच्या पत्नीने पाणी आणून दिलं...काकी हॉल मधून उठून किचन मध्ये गेल्या आणि बक्षींच्या पत्नीसोबत बोलत बसल्या . इकडे हॉल मध्ये कुलकर्णींनी बक्षींना सांगितलं कि आम्ही दापोलीला जायला निघालो आहोत. त्या घरात राहून राहून खूप टेंशन व्हायला लागलंय.
तिकडे दापोलीला जाऊन गावातल्या मांत्रिकाला भेटून बघू काही उपाय निघतो का ते .
ए कुलकर्ण्या मांत्रिक बिंत्रीकाच्या लफड्यात पडू नको, हे मांत्रिक लोकं काही अभ्यास नसतो फक्त पैसे उकळत बसतील तुझ्याकडून.
मग काय करू ???

थांब एक मिनिटं
बक्षींनी आपला फोन उचलला टेबलावरून आपला चष्मा घातला आणि थेट वसंत जोग ह्यांना फोन फिरवला.
जोग साहेब ....असं असं प्रकरण आहे ..आपण त्यादिवशी कुलकर्णी ह्यांच्या घरी गेलो होतो ,,ते कुलकर्णी त्यांच्या गावी दापोलीला जायला निघाले आहेत...

कशासाठी चाललेत ते तिकडे ???
त्यांच्या मुलाच्या अविनाशच्या प्रॉब्लेम साठी ...
आत्ता कुठे आहेत ते ..?
आत्ता माझ्याच घरी आले आहेत, पण इथून ते दापोलीला जायला निघणार आहेत, साधारण तासाभरात निघतील इथून.
थांबायला सांगा , मी तुमच्या घरी पोहोचतोय.

साधारण २०-२५ मिनिटात जोग बक्षींच्या घरी पोहोचले. कुलकर्णी मी तुमच्या सोबत येऊ इच्छितो दापोलीला. मला ह्या विषयात रस आहे , हा प्रॉब्लेम म्हणजे माझ्या अभ्यासासाठी पण एक नवीन विषय आहे. हा विषय मला हाताळू द्या. खात्रीने सांगतो आपण अविनाशला ह्या सगळ्यातून बाहेर काढू.
बक्षी काय म्हणता तुम्ही आलात तर बरं होईल.
बक्षींनी आपल्या पत्नीकडे पाहिलं आणि होकारर्थी उत्तर मिलालाय्वर बक्षी कुटुंबीय पण दापोलीकडे जायला तयार झाले .
वसंत साहेबांच्या गाडीतून कुलकर्णी आणि बक्षी कुटुंबीय दापोलीकडे रवाना झाले. दापोली म्हणजे कुलकर्णी वहिनींचे माहेर.

गाडी गावात आली. कुलकर्णी काकी एकट्याच , कोणी भाऊ नाही कि बहिण नाही. गावी घर म्हणजे एक भला मोठा वाडाच होता. एवढ्या मोठ्या वाड्यात त्यांचे म्हातारे आई वडील राहायचे. भल्या मोठ्या वाड्याच्या कित्येक खोल्यांना बंद करून ठेवलेलं, कारण एवढ्या खोल्यांची झाडलोट त्यांच्या म्हातार्य आईला करणं शक्य नसे.

सार्वजण गाडीतून खाली उतरले, आप आपलं समान गाडीतून काढून वाड्यात आले. म्हातारे वडील पुढे पडवीत बसलेले..कोण आलं पाहायला उठले, मुलगी आणि जावयांना बघून भलतेच खुश झाले.
विचारपूस केली, सार्वजन आत वाड्यात गेले.थोड्या वेळाने हात पाय धुवून , कुलकर्णी वहिनींनी वाड्यातल्या ३ खोल्या उघडल्या , झाडलोट केली आणि त्या पैकी २ खोल्यांत बक्षींचे आणि जोग साहेबांचे सामान ठेवले.
एव्हाना दुपारचे ३ वाजले होते.

कुलकर्णी काकींनी आणि त्यांच्या आईने सर्वांसाठी जेवण बनवलं. सगळ्यांची जेवणं आटपली. सगळेजण निवांत वाड्याच्या अंगणात खुर्च्या टाकून बसले.

एवढा मोठा प्रशस्त वाडा बघून जोग भलतेच आश्चर्यचकित झालेले. सगळा वाडा धुंडाळून काढला त्यांनी, वाड्याचे बरेचसे फोटो खेचले...आणि वाड्यातल्या जुन्या काळातल्या भांड्यांची , तिथल्या लाकूड वश्याची , भ्भ्रून प्रशंसा करायला लागले. एवढंच काय, त्या वाड्यात असलेली ती भली मोठी तांबा पितळेची भांडी बघून ...अचूक अंदाज बांधत त्या भांड्याच्या बनावटीचं साल हि सांगत होते.

कुलकर्णी तुमचा हा वाडा म्हणजे जिवंत संग्रहालय आहे. सगळ्या वस्तू जश्याच्या तश्या.
फिरत फिरत ते वाड्याच्या मागे गेले , वाद्य्च्या मागे एक भली मोठी विहीर आणि त्या विहिरीवर एक रहाट. मागे भली मोठी नारळाची वाडी. एव्हाना संध्याकाळचे ६ वाजले आणि वाडीत अंधार दाटायला सुरवात झाली. दिवस थंडीचे असल्यामुळे अंधार लवकर दाटला.
संध्याकाळ झाली , दिवे लागणी झाली, कुलकर्णी बक्षी आणि जोग हि एवढी माणसं आपल्या घरी का आली असावीत असा प्रश्न काकींच्या आईला पडणं सहाजिक होतं.
संध्याकाळी जेवणं झाली आणि कुलकर्णी काकी वाड्याच्या मागे भांडी घासत बसल्या होत्या, पडवीतला १०० चा बल्ब आपला लाल प्रकाश फेकत होता, खरकटी भांडी धुवून जमिनीवर पडलेलं खरखट खायला गल्लीतून आलेल्या २-३ कुत्र्यांची लुडबुड चालू होती , मागे वाडीत किरर्र शांतता फक्त भांड्यांचा आवाज .. भांडी घासता घासता काकींच्या मनात अविनाशचा विषय आला, जोग ह्यांनी केलेला तो प्रयोग आणि घरात घडलेली ती अघटीत घटना आठवली , हाताखाली असलेलं भांडं घासता घासता त्यांची एक चोर नजर मागे वाडीत गेली. त्या अंधारात त्यांना कसलीतरी आकृती हलताना दिसली. त्यांनी आपलं लक्ष खाली केळं आणि पुन्हा तिकडे आपली नजर वळवली ..ह्या वेळी काहीच दिसलं नही.
राहिलेली शेवटची २-३ भांडी त्यांनी अशीच बादलीत बुचकळली आणि बाहेर काढून इतर भांड्यांसोबत टोपलीत टाकली ..हात धुवून उठणारच होत्या इतक्यात पाठीमागून त्यांच्या पाठीवर एक हात आला .

मागून पाठीवर हात पडतात त्या इतक्या घाबरल्या कि तशीच त्या पडवीतून समोर उडी मारली, पाय बादलीत अडकला आणि त्या समोर मातीत पडल्या , खूप मोठ्याने किंचाळल्या आणि त्यांनी मागे पडवीत वळून पाहिलं. पडवीत त्यांची म्हातारी आई उभी होती.

काय आई , तुला काय कळतं कि नाही ...
का गं काय झालं बाय, एवढी काय घाबरलीस ...

तुला हाक मारून पाठीवर हात ठेवायला काय झालं ..अशीच भूता सारखी आलीस आणि हात टाकलास माझ्या पाठीवर .

म्हातारी मिश्किलपणे हसली आणि म्हणाली.
भूतं , कुठं राह्य्लीत भूतं खेतं आत्ता ह्या गावात, पूर्वी होती ...

काकी पुढे पडवीत आल्या , प्लास्टिकच्या ड्रम मधून बदलीने पाणी काढून हात पाय धुवत त्यांनी विचारलं .
पूर्वी होती म्हणजे ? गावात कुणाचं भूत होतं काय.

होतं ना , इसरलीस काय..
काय विसरले मी.

आगं तू बाळंतपनाला आली व्ह्तीस ना तवा वरच्या आळीची ती शिंद्यांची स्वाती नाय मेली.
स्वाती ..कोण स्वाती ???? ती बोरगावला दिली होती ती , सदानंद शिंद्यांची मधली मुलगी.

व्ह्य व्ह्य तीच...ती
काय झालं तिचं.....?????? काकींनी प्र्श्न केला.
सांगेन ..चल तू आधी हि ह्यो भांडा कुंडा घेऊन आत चल

काकींनी ताबडतोब ती टोपली उचलली आत वाड्यात गेल्या आणि दरवाजा लावून घेतला.

क्रमशः
0

🎭 Series Post

View all