Login

रहस्यमयी स्त्री भाग ४

भयपट


जोग आणि बक्षी निघून गेले, घरात कुलकर्णी दांपत्य विचारात पडले ...जोग ह्यांनी काकींना सांगितलं होतं कि प्रेग्नंसी मध्ये त्या अश्या एखाद्या ठिकाणी गेल्या होत्या कि ज्या ठिकाणी ती अमानवीय शक्ती घात लावून बसलेली.
काकींनी आठवण्याचा प्रयत्न करायला सुरवात केली ...असं कोणतं ठिकाण असावं ..तसं आत्ता त्या घटनेला किमान १५-१६ वर्ष तरी झाली होती. त्यांना फक्त आपण माहेरवाशीण झालो होतो आणि आपल्या माहेरी गावी दापोलीला गेलो होतो एवढंच माहिती होतं.

दुपारची जेवणं आटोपून कुलकर्णी काका सोफ्यावर आणि काकी लादैव्र थोडी डुलकी मारायला लकटले ...डोळे लागतात तोच दारावर बेल वाजली . काकी उठल्या आणि दरवाजा उघडला ..दारावर बक्षी आणि त्यांच्या मागे वंसत जोग उभे होते . काकींनी काकांना हाक मारली आणि दरवाजा उघडला .

काय रे बक्षी तुम्ही परत आलात, या या बसा .
कुलकर्ण्या तुझा मुलगा किती वाजेपर्यंत परत येणार आहे बोलला ...

अरे तो अलिबागला गेला आहे ना, संध्याकाळी १० च्या अगोदर काही येत नाही.
ठीक आहे , जोग साहेबांना एक प्रयोग करायचा आहे ..तुमची परवानगी हवी आहे .

प्रयोग म्हणजे ???
इथे प्रयोग करून त्या शक्तीला त्यांना एक धक्का द्यायचा आहे .

चालेल तुम्ही करू शकता प्रयोग आमची काहीच हरकत नाही.
जोग साहेबांनी आपल्या सुटकेस मधून एक कोरा कागद काढला , एक डायरी आणि एक पेन्सिल .
हे सर्व समान घेऊन ते अविनाशच्या खोलीत गेले त्यांच्या पाठोपाठ बक्षी कुलकर्णी आणि काकी पण त्या खोलीत गेले .
जोग साहेब जमिनीवर बसले ,आणि अविनाश्चम पेंटिंग समोर ठेवलं. जमिनीवर आपल्या समोर त्यांनी तो कोरा कागद अंथरला आणि पेन्सिलने एक वेडीवाकडी आकृती तयार केली.
अविनाशच्या पेंटिंग मधल्या बाईच्या चित्रावर त्यांनी भिजवलेले तांदूळ चीटकवले आणि एक सुत घेऊन त्यांनी तो सुत त्या बाईच्या पायांना चीटकवला. सुताचं दुसरं टोक त्यांनी कोऱ्या कागदावरच्या आकृतीत चीटकवलं. डोळे बंद केले आणि काहीतरी मंत्र बोलायला लागले . जोग कोणत्या भाषेत काय बोलत होते हे कोणालाच समजेना ..पण बघता बघता त्यांचा तो कागद ओला होऊन लागला ..चित्रातली बाई खाली खाली सरकायला लागली .......

इकडे कुलकर्णींच्या घरात हे सगळं घडत होतं आणि तिकडे समुद्रात अंघोळ करून बाहेर निघणाऱ्या अविनाशला विजेचा झटका लागावा असा झटका लागला आणि तो वाळूत कोसळला. वाळूवर खाली पडताच तो भानावर आला, उठून उभा राहिला इकडे तिकडे पहायला लागला ....परिसर एकदम नवीन वाटू लागला..आपण कुठे आहोत हे त्याला कळेना .
एवढंच काय आपण कोण आहोत कुठे आहोत त्याला काहीच आठवेना असं झालं. अविनाशची अशी अवस्था झाली जसं काय तो खूप वर्षांची मोठी झोप काढून जागा झाला असावा.
शरीरातलं त्राण निघून जायला लागलं डोकं दुखायला लागलं ..आकाशात डोक्यावर आलेला सूर्य आग ओकायला लागला ..आणि अश्यातच सावलीच्या दिशेने धावत धावत एका बाजूला येऊन नारळाच्या झाडाखाली येऊन बसला.
जोग साहेबांनी भिजेलेल्या कागदावर आणखी एक कागद टाकला पुन्हा त्या कागदावर नक्षी बनवली आणि पुन्हा मंत्रोच्चार करायला लागले.
तिकडे नारळाखाली बसलेल्या अविनाशच्या आजूबाजूला आत्ता अघटीत घडायला सुरवात झाली. अविनाश आपल्या हातातून निसटतोय कोणीतरी आपल्याला त्याच्यापासून बाजूला करतंय हे त्या मानवीय शक्तीच्या लक्षात आलं , पुन्हा अविनाशवर आपली पकड जमवण्या साठी ती अमानवीय शक्ती आपला जोर लावायला लागली ...अविनाश्वर तिला प्रभुत्त्व मिळवता येईना ...ती शक्ती चवताळली आणि आत्ता आक्राळ विक्राळ किंकाळ्या करायला लागली ..
समुद्राची वाळू हवेत उडवायला लागली ...अविनाशच्या आजूबाजूने त्या शक्तीने धिंगाणा घालायला सुरवात केली. हे सगळं काय आहे त्याला कळेना ..वेळ दुपारची होती आणि त्या उन्हात झाडाखाली बसलेल्या अविनाशच्या आजूबाजूला कोणीच नव्हतं.
एका क्षणात हे सगळं शांत झालं . अविनाश उठून उभा राहिला आणि दूरवर दिसणाऱ्या हॉटेलच्या दिशेने धावत सुटला....भर उन्हात घाम्घुम झालेला अविनाश धापा टाकत जीवाच्या आकांताने ओरडत ओरडत पळतच सुटला ..

तिकडे जोग मोठ्याने ओरडले ..सुटला सुटला अविनाश सुटला ...
जोग मोठमोठ्याने ओरडायला लागले आणि बक्षी कुलकर्णी आणि काकी त्यांच्याकडे उल्हासित चेहऱ्याने बघायला लागले ....

अविनाश सुटला म्हणजे त्या शक्तीच्या त्रासातून मुक्त झाला ...बक्षींनी कुल्कर्निन्चा एक हात पकडून जोराने दाबला आणि त्यांच्याकडे बघून स्मित हास्य दिलं .

वसंत जोगांनी डोळे उघडले कुल्कार्णींकडे बघितलं बक्शिंकडे बघितलं आणि मोठ्याने बोलले ...बक्षी पोरगा सुटला मोकळा झाला आज पहिल्याच प्रयोगात पोरगा मोकळा झाला ...
एवढ्यात त्यांना काहीतरी संशय आला , ते अचानक गप्प झाले, चेहऱ्यावरचे भाव बदलले ते गंभीर झाले आणि त्या खोलीत इकडे तिकडे बघायला लागले ....एका क्षणात त्यांच्या पुढ्यातला कागद त्या खोलीत अधांतरी उडायला लागला ..हवेत उडणारा तो कागद बघून कुलकर्णी , काकी आणि बक्षी घाबरले . कारण खोलीतला पंखा तर बंद होता , खिडकी पण बंद होती ..हे नक्कीच काहीतरी विचित्र होतं ..
कुलकर्णी बक्षी आणि काकी त्या खोलीतून बाहेर पळाले ...ते समजून गेले हे जे काही घडत होतं तो अमानवीय शक्तीचा खेळ होता .. बाहेरून बक्षींनी मोथायेन आवाज दिला ...

"जोग , जोग साहेब ...जोग साहेब ठीक आहात ना "
पण अविनाशच्या खोलीतून जोग साहेबांचा आवाज आला नाही ...
बक्षींनी हिंमत केली आणि ते जोग साहेबांना बघायला पुढे सरकले पाठोपाठ कुलकर्णी पण पुढे झाले ...हळूच आतमध्ये खोलीत डोकावलं , वसंत जोग लादीवर बेशुद्ध पडलेले दिसले .
जोग बेशुद्ध अवस्थेत पडलेले दिसत होते पण खोलीत जाऊन त्यांना उचलण्याची हिंमत कोणाला होईना.

बक्षी पुन्हा बाहेर आले , कुलकर्णींना बोलले ..
कुलकर्ण्या आजूबाजूला कोणी आहेत का ???
हो आहेत ना , का रे ?
हे बघ हे प्रकरण गंभीर झालं आहे , कोणाला काही समजायला नको, पण काहीच न सांगता मदतीला काही माणसं बोलव .

चालेल मी आलोच थांब , काकिंनापण त्यांनी समजावलं कोणाला काही सांगू नका इथे काय घडलं ते.
कुलकर्णी बाहेर गेले आणि शेजारच्या ३-४ लोकांना बोलावून घेऊन आले ...सगळ्यांनी मिळून जोग साहेबांना उचलून बाहेर हॉल मध्ये आणलं , पंखा लावला खिडक्या उघड्या केल्या आणि एका कापडात बर्फ गुंडाळून तो त्यांच्या चेहऱ्यावर फिरवला गेला ....ग्लासात पाणी घेऊन त्यांच्या चेहऱ्यावर शिंपडलं.

जोग शुद्धीत आले , आजूबाजूला जमलेल्या माणसांना बघून ते पण गांगरून गेले ...पण बक्षींनी त्यांना डोळ्यानेच इशारा केला .....इशार्यात त्यांनी त्यांना हे खुणावलं कि इथे काय घडलंय ते ह्या माणसांना माहिती नाही .

काय हो काय झालं साहेब ?
जग ह्यांनीपण थोडं अभिनय करत सांगितलं...चक्कर आली, शुगर चा त्रास आहे मला .

थोड्याच वेळात आलेली माणसं घरातून बाहेर गेले . सगळे लोकं बाहेर निघताच कुलकर्णींनी दरवाजा लावून घेतला . त्यांना जाणून घ्यायचं होतं नक्की काय झालं , काय प्रकार होता तो....

जोग म्हणाले हे बघा टेन्शन घ्यायचं कारण नाही , आपण त्या शक्तीला चिथावणी दिली आहे . त्या अमानवीय शकतील आपला दणका बसला आहे. पण ति अविनाशला सोडून इथे आली ..इथे मला रोखण्यासाठी आली..पण तिकडे अविनाश तिच्या हातातून निसटला हे समजताच ती पुन्हा अविनाशच्या दिशेने निघून गेली .

पण हे सगळं त्या शक्तीने कसं काय केलं ..ती कुठून आली आणि कशी काय नाहीशी झाली ?
त्या शक्तीचं द्वार ते पेंटिंग आहे . ती शक्ती त्या पेंटिंग मध्ये जगते ....

बक्षी .."वी ह्याव अचीव्ड अ लॉट टुडे , लेट्स सी अगेन "

वसंत जोग ह्यांच्या बोलण्यात एक भलताच आत्मविश्वास दिसून येत होता . कुलकर्णी त्या शक्तीने अविनाश्वर पुन्हा प्रभुत्त्व मिळवलं आहे , तुम्ही अविनाश ला समजून घ्या . आज संध्याकाळी तो येईल , त्याला हे समजलं असेलच कि आपण सगळे त्या खोलीत गेलो होतो .पण आपण तिकडे काय केळं हे त्याला माहिती नसेल कारण त्या वेळी त्या पेंटिंग मधली ती शक्ती त्याच्यासोबत होती ..

एका शब्दाने सांगू नका आपण इथे काय केलं .....मी जे काही बोललो ते लक्षात असू दे .
कुलकर्णी काकी तुमचं माहेर कुठे आहे ?
माझं माहेर दापोली ..

आपल्याला येत्या काही दिवसांतच दापोलीला जावं लागणार आहे.
दापोलीला ???? पण का ?
सगळं रहस्य दापोली मध्येच दडलं आहे काकी . काळजी करू नका .
जोग ह्यांनी आपल्या सूटकेस मधून २ तावीज काढून कुलकर्णी काका आणि काकींना दिलं ...
कुलकर्णी हे घ्या आणि हे तावीज तुम्ही दोघांनी आप आपल्या गळ्यात बांधून ठेवा . ती शक्ती तुमच्या केसाला हि धक्का लावणार नाही. निवांत रहा काळजी करू नका मी आहे .

असं बोलून बक्षी आणि जोग तिथून निघून गेले .
अलिबागला भानावर आलेला अविनाश हॉटेलात पोहोचणारच होता कि अचानक तो थांबला ..आणि झापाझाप पावम टाकत तो समुद्राच्या दिशेने वळला. त्याचं वागणं बोलणं बदललं ...भर उन्हात त्या रिकाम्या समुद्रकिनारी तो त्या वाळूत तसाच बसून राहिला .

किनाऱ्यावर नारळ पाणी विकणार्या गाडीवाल्यांचं त्याच्याकडे लक्ष गेलं ..

तो कोण रे बसलाय तिकडे उभात एकटाच ???
काय माहिती नाय रे ...च्यायला २ तास झाले असाच बसलाय येडा
चल बघू चल कोण हाय, नायतर मरायचा फुकट भरती आली तर ..

असं बोलून ते दोन नारळपाणी विकणारे अविनाशच्या जवळ गेले.....त्याच्या खांद्यावर हात ठेवला आणि बोलले ..

ए दादा , कोण रे तू ??? इथे असा काय बसलाय , उन लागत नाय काय ?
अरे ए दादा चल उठ चल..भरती येईल आत्ता अर्ध्या तासात ...चल उठ

अविनाशने त्यांच्याकडे बघितलं आणि तो तिथून उठून त्यांच्या मागे मागे किनाऱ्यावर आला....आपल्या बाईक जवळ आला .
हेल्मेट घातली आणि किक मारून बाईक काढून तिथून निघून गेला .....

क्रमशः
0

🎭 Series Post

View all