Login

पाऊस आणि चहा

रंगत पावसाच्या सोबतीची
कोसळणारा पाऊस
अन हा मान्सून चा नजारा
पाहण्यासाठी त्याला
आखला हा पसारा.....

पडणारा पाऊस अन
सोबतीला चहाचा प्याला
दुसरे कोणी नसले तरी
हवाहवासा वाटणारा
तो क्षण सारा.....

शांत शांत परिसर
मध्येच पावसाची रिमझिम
मातीचा सुगंध अन
त्याला चहाची जोडी....

थंड थंड हवा
अन घशातून उतरणारा
चहाचा एक गरमागरम घोट
सोबतीला हवा....

चहा अन पावसाची रंगत भारी
त्याहून सुख ते काय
हे कोणा कळणार नाही......

थंडित गरम
अन गरमीत थंड
खाण्यापिण्याची
मजा कशात नाही......

आला पाऊस कि
आठवतो चहा
दोघांनाही सोबत
पाहण्याची रंगत पहा.....

पावसाने येते काचेवर
बाहेरून धुके
चहाच्या वाफेने येते
आतून ही धुके
जणू दोघे भेटत आहेत
न बोलताही होऊन मुके......