मन पाऊस पाऊस

Rain And The Heartbeats
मन पाऊस पाऊस
ओंजळीत भरू किती..
जणू आभाळ झालं रितं
त्याची वाट पाहे माती..

माती गंधित गंधित..
चिडवी मध्येच हा वारा.
देह चिंब, मन चिंब..
गोड तुषार शहारा..

देह केवडा केवडा..
मृदगंध त्याला कसा..
सृष्टी मोहरे मनाची..
हिरवा निसर्ग तो जसा..

मन पाऊस पाऊस..
बरसतो आज किती..
निथळले दाह त्याचे..
जणू थेंब थेंब मोती..

थेंब चांदवा चांदवा..
अंगी गारठा भिनला..
देह शिंपला शिंपला..
जीव मोत्याचा उरला..

मन पाऊस पाऊस..

नेहाली..