राजा भुंकुन त्याचासुद्धा होकारार्थी दर्शवला.
अर्जुन -" आता मिशन कंप्लीट करायचं आहे."
चौघेही खाली आहे. संतोष गाडी चालू केला आणि त्या लोकेशनच्या दिशेनी जाऊ लागले.
अर्जुन -" संतोष दा... तिथे जाण्याच्या अगोदर पोलिस हेड क्वॉटरकडे चल ."
संतोष -" का?"
अर्जुन -" एक काम आहे."
संतोष अजुन काही प्रश्न विचारणार होता , पण त्याची नजर बघत तो टाळला. काही वेळा नंतर त्यांची गाडी पोलिस हेड क्वाटर समोर थांबली. अर्जुन खाली उतरला.
अर्जुन -" तुम्ही इथेच थांबा. मी आत जाऊन येतो."
एवढं बोलून तो गडबडीत आत गेला. संतोष , जान्हवी आणि राजा गाडीतच बसले होते. थोड्यावेळाने अर्जुन हेड
क्वाटरच्या बाहेर येऊ लागला. त्याला बघून संतोष आश्चर्याने त्याला बघू लागला. कारणही तसच होत. तो जाताना गुलाबी शर्टमध्ये गेला होता , पण येताना पांढऱ्या शर्टमध्ये आला होता.
संतोष -" तू इथे फक्त शर्ट बदलायला आला होतास?"
अर्जुन -" हो.."
संतोष मान हलवत ' काही उपयोग नाही ' अस इशारा देत गाडी चालू केला.
५ तासानंतर ते लोकेशनजवळ पोहचले. हाइवेच्या आजूबाजूला सगळीकडे जंगली झाडे होते. जान्हवी मोबाइलच्या स्क्रीनवर बघू लागली.
जान्हवी -" ही लोकेशन इथून २०० मीटर आत आहे. पण गाडी आत कसं घेऊन जाणार?"
संतोष -" आपल्याला गाडी इथेच सोडून आत जाव लागेल ."
अर्जुन -" बर.."
संतोष गाडी हाइवेच्या बाजूला थांबवला आणि सगळे खाली उतरले. चालत तिथल्याच पायवाट वरून आत जाऊ लागले. राजा काहीतरी हुंगु लागला. राजा त्याच ठिकाणी गोल फिरत होता. अर्जुन पुढे आला .
अर्जुन -" राजा.."
तो अस म्हणताच राजा एकदा भुंकला.
अर्जुन -" गो..."
त्याच आवाज ऐकताच राजा पुढे जाऊ लागला.
अर्जुन -" चला..."
राजा पुढे आणि हे तिघे त्याला पाठलाग करत होते. राजा वाट शोधत पुढे जात होता. थोड्यावेळाने ते एका मोकळ्या ठिकाणी पोहचले. तिथे एक मोठा पडीक बंगला होता. कमीत कमी ३ ऐकर मध्ये पसरलेला.... बाहेरून तर ते भुताचा बंगला वाटत होता.
जान्हवी -" हे आहे लोकेशन?"
संतोष तिच्या हातातील मोबाईलची स्क्रीनवर पाहिला.
संतोष -" हो... इथेच आहे.."
आत जाण्यासाठी एक दार त्यांना दिसली. त्यात जाण्या अगोदर संतोष सगळ्यांना थांबवला.
संतोष -" आपल्याला वेगवेगळं व्हावं लागेल. एकत्र आत गेल्यावर पकडू जाऊ शकतो. "
अर्जुन -" मग तू या दिशेनी जा. मी , राजा आणि दीदी या दिशेनी जातो. "
संतोष -" ठीक आहे. "
अर्जुन आणि जान्हवी दोघेही आत जाऊ लागले. ते जसे आत जाऊ लागले , तसे त्यांना आश्चर्य वाटू लागलं होत. बाहेरून पडीक असल तरी आतून वेगळी टेक्नॉलॉजीनी बनवलेली इन्स्ट्रुमेंट होते. एका दारातून आत गेल्यावर तिथे कित्येक लोक काम करत होते. त्यांना बघून हे दोघे एका मोठ्या बॉक्सच्या मागे लपले.
इकडे संतोषसुद्धा एका खोलीत शिरला. जिथे कोणीच नव्हतं , पण तिथे सगळी कॅमेराची स्क्रिनिंग दिसत होते. म्हणजे ती एक कंट्रोल रूमसारखी होती. त्यात त्याला जान्हवी आणि अर्जुन दोघेही दिसत होते. ते एका मोठ्या बॉक्सच्या मागे लपलेले त्याला दिसल.
असच कुणाला न दिसत जान्हवी आणि अर्जुन पुढे जात होते. असेच पुढे जात ते एका मोठ्या त्याच लॉकर मध्ये गेले ज्यात ऋचा आणि बाकीचे लोक होते. त्यात गुरुजी आणि इस्माईल सहित बाकीचे लोक सुद्धा होते.
गुरुजी -" ऋचा मॅडम बहुत ही अच्छा काम किया है. इस्माईल ये तीनो मशिन्स लोड करना है. इसीलिये तुम सबको बुलाया है."
इस्माईल -" हा गुरुजी. सब लोग यहा आ चुके है."
संतोष कॅमेरामधून या सर्वांना पाहत होता. तेंव्हा त्याची बल्ब पेटली. तो मोबाईल काढला आणि जान्हवीला मेसेज केला. मोबाईल वायब्रेट झाल्यावर जान्हवी तीच मोबाईल चेक केली. त्यात संतोषचा मेसेज होता.
संतोष -' I am in Camera room . There is nobody around me.'
जान्हवीला थोडी तसदी मिळाली. ती कमी आवाजात ती माहिती अर्जुनला सांगितली. अर्जुन वर बघू लागला , तर तिथे सी. सी. टी. वी कॅमेरा असल्याचा त्याला जाणीव झाल. अर्जुन जान्हवीला संतोषसाठी एक मेसेज सांगितला. जान्हवी ती मेसेज संतोषला पाठवली. संतोष मेसेज पाहू लागला.
जान्हवी - ' You have to divert their attention.'
संतोषला त्या लोकांची नजर दुसरीकडे घेऊन जायचं होत. काय करायचं असा विचार करत तो इकडे तिकडे बघू लागला. तर तिथे त्याला एक लाल बटन दिसल. त्यावर इमर्जन्सी अस लिहिलेलं होत. वेळ न घालवता तो ते बटन दाबला. दाबताच सगळीकडे मोठी अशी सायरन वाजू लागली आणि त्याबरोबर रेडलाईट सुद्धा लागत होती . संतोष हे बघून लगेच त्या कॅमेरा रूममधून बाहेर निघाला . हे बघून त्या मोठ्याश्या लॉकरमध्ये असलेले गुरुजी आणि बाकीचे लोक इकडे तिकडे बघू लागले.
गुरुजी -" इस्माईल ... देखना पडेगा क्या एमेर्जन्सी आ गया है."
इस्माईल -" हा ..."
गुरुजी -" चलो... "
एवढं बोलून सगळेजण त्या लॉकर रूममधून बाहेर आले. गडबडीत गुरुजी लॉकर रूम बंद करण्यास विसरला. सगळे गेल्याच पाहताच अर्जुन आणि जान्हवी बाहेर आले. जान्हवी थेट ऋचा जवळ गेली.
जान्हवी -" ऋचा मॅडम.. "
ऋचा तिला बघताच तिच्या मिठीत पडली आणि रडु लागली.
ऋचा -" जान्हवी .... तुला बघून खूप चांगलं वाटलं. राधाला हे मारून टाकले.. हे हरामी लोक.."
एवढं बोलून ती परत रडु लागली . थोडा वेळ तसच रडण्यात जाणार हे माहिती असल्याने अर्जुन ती मोठ्या अश्या तीन मशिन्स जवळ गेला आणि सोबत आणलेल्या तिनी जी. पी. एस लावला आणि परत ऋचा आणि जान्हवी जवळ आला.
अर्जुन -" ऋचा मॅडम... हे काय आहेत ?"
ऋचा तीच रडणं थांबवून सांगू लागली.
ऋचा -" हे अणुबॉम्ब पेक्षा घातक करणारा केमिकल बॉम्ब आहे. "
जान्हवी -" म्हणजे?"
ऋचा -" म्हणजे यांनी मोठा स्पोट तर होतोच . पण त्यांनी एक व्हायरस सगळीकडे पसरते आणि त्यांनी सगळ्या लोकांना इजा होते. "
जान्हवी -" मॅडम का बनवलात तुम्ही हे?"
ऋचा -" कारण ते मला म्हणाले की मी हे बनवलं की ते मला राधा कडे घेऊन जाणार. पण नंतर कळाल की राधाला हे लोक मारले. "
एवढं बोलून ती परत रडु लागली. इतक्यात संतोष त्या लॉकर रूममध्ये आला.
संतोष -" चला ... जाव लागणार."
अर्जुन -" असच..."
ते ऐकून तो गप्प झाला.
अर्जुन -" मॅडम ... ते हे तिन्ही बॉम्ब कुठे नेणार आहे?"
ऋचा -" ते माहिती नाही... पण त्यातला गुरुजी म्हणत होता की आता फक्त महाराष्ट्रच नाही तर महाराष्ट्राच्या शानेला सुद्धा हानी होणार."
अर्जुन -" महाराष्ट्राची शान म्हणजे ?"
इतक्यात संतोष म्हणाला.
संतोष -" म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज .."
अर्जुन आता विचार करू लागला.
अर्जुन -" प्रलय. मधला प्र म्हणजे दुसर तिसरं काहीच नसून प्रतापगड आहे.. म्हणजे हे तिन्ही बॉम्ब प्रताप गड , लातूर आणि यवतमाळ या ठिकाणी जाणार आहे. "
संतोष -" पण आपल्याला कसं कळणार की ते कुठ पोहचणार आहेत."
अर्जुन -" या तिन्ही बॉम्बला मी तु बनवलेला जी. पी. एस लावला आहे. "
संतोष -" गूड..."
अर्जुन -" मॅडम... या बॉम्बला बंद करण्यासाठी काहीतरी उपाय असेल ना.."
ऋचा -" नाही ... ही तिन्ही बॉम्ब मेन इलेक्ट्रिसिटी नी चालणारे आहेत..."
अर्जुन हे वाक्य काळजी पूर्वक ऐकला.
संतोष -" मला हे कळत नाहीये की तू बॉम्ब विषयी का विचारत आहेस? ... ते तर आपल्या समोरच आहेत. पोलिसांना बोलावू . ते सगळं करतील नीट."
अर्जुन -" तुला नंतर कळेल संतोष दा."
एवढं त्यांचं बोलण चालुच होत की इतक्यात एक आवाज आला.
इस्माईल -' हांड्स अप..."
सगळे जण घाबरून आवाजाच्या दिशेने पाहिले. तर तिथे इस्माईल गन त्यांच्यावर रोखून धरला होता. ते बघताच सगळे हात वर केले.
इस्माईल एका वोकी टोकी वरून म्हणाला.
इस्माईल - " गुरुजी... लॉकर रूम मे मेहमान आ चुके है."
एवढं बोलून तो परत गन सगळ्यांवर रोखून ठेवला. थोड्यावेळाने गुरुजी सहित बाकीचे साथीदार त्या रूममध्ये आले .
गुरुजी -" आ हा... मेहमान आ चुके है. इनकी तो खातिर दारी करनी पडेगी इस्माईल."
इस्माईल हसत म्हणाला.
इस्माईल - " हा गुरुजी..."
तो इशारा देताच त्याचे साथीदार त्या सर्वांच्या जवळ जाऊ लागले. इतक्यात बाहेर लाऊडस्पिकर वरून आवाज आला.
पाटील -" मुंबई पोलिस तुमको चारो ओर से घेर चुके है... अपने आप को सरेंडर करो. "
ते आवाज ऐकताच गुरुजी चकित झाला आणि त्या सोबत संतोष पण चकित झाला की पोलिसांना कोणी बोलावलं. मग त्याला लक्षात आलं की इथे येण्याच्या अगोदर अर्जुन पोलिस हेड क्वाटर ला का गेला होता ते?
गुरुजी ला काहीतरी विचार करून म्हणाला.
गुरुजी - " इस्माईल... इन बॉम्ब को चोर के रास्तेसे लेकर जा. मुझे अकेला छोड के तुम सब जाओ."
इस्माईल -" लेकीन गुरुजी आपका क्या होगा?"
गुरुजी -" तुम मेरी फिकर मत करो. मे वापस आ जाऊगा . तुम बॉम्ब को लेकर ठिकाणे पोहचो. जलदी करो."
इस्माईल ना इलाजाने म्हणाला.
इस्माईल -" ठीक हे गुरुजी ..."
त्याचे सगळे साथीदार हे तिन्ही बॉम्ब घेऊन चोर रस्त्याने बाहेर जाऊ लागले. इकडे गुरुजी एक गन या सर्वांवर रोखून धरला. बाहेरून पाटीलची सूचना चालूच होती. अर्जुन मात्र गप्प उभा होता.
ते सगळे बॉम्ब घेऊन बाहेर गेले. थोड्यावेळाने पाटील , चव्हाण सहित बाकीचे पोलिस त्या बंगल्यात शिरले. तिथे पाहतो तर गुरुजी एकटाच गन घेऊन उभा होता आणि पुढे संतोष , जान्हवी , अर्जुन आणि ऋचा हात वर करून उभे होते.
पाटील त्याची गन काढून म्हणाला.
पाटील -" हंड्स अप... "
गुरुजी त्याच्याकडे न बघताच अर्जूनकडे बघत होता. अर्जुनसुद्धा त्याला बघत होता.
पाटील - " मेने कहा हँड्स अप."
गुरुजी एकदा पाटील कडे बघितला आणि गन चालवली. त्यातून मोठा आवाज आला.
बघतो तर काय अर्जुनाच्या छातीला ती गोळी लागली होती. गोळी लागताच तो खाली पडला. त्याला सावरताना जान्हवी , संतोष त्याला धरू लागले. त्याच्या त्या पांढऱ्या शर्टवर रक्ताचे लाल दिसू लागले.
गोळी चालताच राजा गुरुजीवर चावा घेण्यासाठी उडी मारला. त्याच्या हातातील गन खाली पडली. तेवढ्यात पाटील जवळ येऊन गुरुजीवर गन रोखला.
ते बघून गुरुजी म्हणाला
गुरुजी -" तुम मुझे मार नहीं सकते . तुम्हारे हात कानुन से बंधे हुई हे इन्स्पेक्टर.."
एवढं बोलून परत तो पाटीलची गन घेण्यासाठी झटापट करू लागला. त्याची गन तो घेऊ पाहत होता. पाटील आणि त्याची झटापट होत असताना तो गनवर काहीतरी लावला. ती झटापट बघून चव्हाण पुढे आला आणि गुरुजीला धरला.
जान्हवी अर्जुनला चेक केली तर त्याचे श्वास चालत नव्हती. राजा त्याला हुगत होता
जान्हवी जोरात म्हणाली.
जान्हवी -" अंबुलेन्स ला बोलवा.."
चव्हाण गडबडीत अंबुलेन्सला फोन लावला. गुरुजीला बांधून अरेस्ट करण्यात आलं. तरीही तो हसत होता.
गुरुजी -" अब क्या करेगा ?.. बॉम्ब तो चले गये. ये बच्चा भी गया... अब क्या करेगा इन्स्पेक्टर??"
ते बघून पाटील खरच विचार करू लागला. अंबुलेन्स चे कर्मचारी आले आणि अर्जुनला घेऊन जाऊ लागले. राजा अर्जुनला हुगत त्याच्यासोबत जाऊ लागला .
**********************************
क्रमशः
ऋषिकेश मठपती
पुढील भाग लवकरच.... कसं वाटलं ते नक्की कळवा... धन्यवाद ????????????
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा