Login

राजार्जून भाग - १२

Guruji going to complete his mission . How patiil will stop him

       ते बघून पाटील खरच विचार करू लागले. अंबुलेन्सचे कर्मचारी आले आणि अर्जुनला घेऊन जाऊ लागले. राजा अर्जुनला हुगत त्याच्यासोबत जाऊ गेला .

      अर्जुन हालचाल करत नव्हता. अंबुलेन्सची मागील दार बंद झाला आणि  तिथून निघून गेली. संतोष , जान्हवी आणि ऋचा पाटीलकडे आले. 

जान्हवी -" सर... अर्जुनच श्वास थांबलेलं होत. "

ती अगदी उदासपणे म्हणत होती . पाटील अजुन विचार करत होता. 

संतोष -" सर.. काय विचार करताय?"

पाटील -" हेच की आता काय करायचं? याला तर अरेस्ट केलो. पण बॉम्ब तर गेले ."

संतोष -" सर... अर्जुन जाण्याआधी सगळी व्यवस्था करून गेला होता. तो मला म्हणाला होता की जी.पी. एस यंत्र बनव. मी तीन यंत्र तयार केलो. नंतर मला कळाल की अर्जुन ते यंत्र या तिन्ही बॉम्बला लावला आहे. म्हणजे आपल्याला त्या तिन्ही बॉम्बची लोकेशन कळेल."

पाटील -" मग ते कसं कळेल?"

संतोष -" माझ्या मोबाईलच्या स्क्रीनवर दिसेल."

पाटील -" अर्जुन नसता तर या केसच काय झालं असतं कुणास ठाऊक?"

   सगळे उदास होऊन तिथेच उभे होते. तेवढ्यात चव्हाण तिथे आला.

चव्हाण -" साहेब ... हेड क्वॉटरला जाव लागेल. 

पाटील -" हो... संतोष तू पण चल. लोकेशन तुझ्याकडे येणार आहेत."

तेवढ्यात जान्हवी पुढे येऊन म्हणाली. 

जान्हवी -" सर... मी पण येते. "

संतोष काळजीपोटी तिला म्हणतो. 

संतोष -" तू कशाला?... "

जान्हवी -" सर... ती बॉम्ब व्हायरस युक्त आहे. त्यासाठी तुम्ही मला घेऊन जावं लागेल."

ऋचा -" हा सर...हिला घेऊन जा . "

पाटील -" बर... चल तू पण."

     सगळे त्या पडीक बंगलेतून बाहेर आले. पोलीस जीपमध्ये पुढे गुरुजी आणि बाकीचे कॉन्स्टेबल होते आणि मागच्या जीपमध्ये हे सगळे होते. 

     काही तासानंतर ते हेड कॉटरला पोहचले. इतर कॉन्स्टेबल त्याला घेऊन आत गेले. बाकी सगळे कमिशनर ऑफिसला गेले. पाटील ऑफिसमध्ये पोहचताच एक सल्यूट मारला. 

कमिशनर -" गूड जॉब पाटील.. मला कळाल कि अर्जुनला गोळी लागली."

पाटील -" हो."

कमिशनर -" कसं आहे तो?"

पाटील खाली बघत होता. जान्हवी पुढे येऊन म्हणाली. 

जान्हवी -" सर... तो श्वास घेत नव्हता. "

कमिशनर त्याची टोपी काढला. 

कमिशनर -" त्याला ( गुरुजी) इथे आणलाय का?"

पाटील - " हो सर..."

कमिशनर -" मग चला मग."

     सगळे ऑफिसमधून बाहेर आले. ते चोकशी खोलीत गेले. तिथे काही कॉन्स्टेबल गुरूजीला मारत होते. तरी तो काहीच बोलत नव्हता. अर्धा तास तसच गेल्यानंतर तो काहीच बोलला नाही. शेवटी सगळे कॉन्स्टेबल थकले. ते बघून कमिशनर म्हणाले. 

कमिशनर - " ते बॉम्बच्या लोकेशन माहिती आहे ना."

पाटील -" हो सर... "

कमिशनर -" बर... याला नागपूरच्या जेलमध्ये न्या. त्या अगोदर याचे कपडे काढून चेक करा की काय आहे का? आणि त्यानंतर त्या लोकेशन्स कडे वळूयात."

पाटील - " सर..."

अस म्हणत पाटील सल्युट मारला. कमिशनर त्यांच्या ऑफिसमध्ये गेले. तशे कॉन्स्टेबल गुरुजीला चेक करू लागले.

पाटील -" संतोष लोकेशन काय आहे?"

संतोष त्याचा मोबाईल बघून म्हणाला. 

संतोष -" सर... ते लातूर , यवतमाळ आणि प्रतागडाच्या दिशेनी जात आहे. "

पाटील - " बर.. ऋचा मॅडम तुम्ही घरी जा. "

ऋचा -" पण सर..."

ती वाक्य पूर्ण करणारच होती तेवढ्यात जान्हवी म्हणाली. 

जान्हवी -" हा मॅडम... मी आहे ना यांच्यासोबत .. तुम्ही घरी जा."

ऋचा - " ठीक आहे. "

      चव्हाण पाटील जवळ येऊन म्हणाला. 

चव्हाण -" साहेब... त्याच्याकडे काहीच नाहीये. निघायचं का?"

पाटील - " हो... बसवा त्याला आणि चला. संतोष आणि जान्हवी तुम्ही माझ्या जीपमध्ये चला."

    दोघेही मान हलवत होकारार्थी दिले. काही कॉन्स्टेबल त्याला हतकडी लावून बाहेर आले. जान्हवी , पाटील , संतोष , चव्हाण आणि आणखी दोन कॉन्स्टेबल एका जीपमध्ये बसले. बाकी दोन जीपमध्ये इतर कॉन्स्टेबल आणि गुरुजी हे बसले. पाटीलची जीप आधी , मधील जीपमध्ये गुरुजी आणि इतर कॉन्स्टेबल आणि शेवटच्या जीपमध्ये बॅकअप कॉन्स्टेबल होते. हे तीन जीपमध्ये नागपूरच्या जेलच्या दिशेने नागपूरला जाऊ लागले. 

      एका मोठ्या रस्त्यावर ते जात होते. इतर कोणतेही वाहतुकीची गर्दी नव्हती आणि हे सगळे तिथून जाणार होते म्हणून इतर रस्ते देखील मोकळे केलेले होते. असेच पुढे जाताना एक मोठा रस्ता लागला. जिथे आजूबाजूला जंगली झाडे होते. जीप तिथून जात असताना अचानक त्या जंगली झाडातून गोळी चालू लागली. एक नवे , दोन नवे कित्येक बंदूक चालण्याचा आवाज येऊ लागला. जीपचे काच तुटू लागले. अश्या परिस्थितीत पुढील जीप थांबली. ते बघून मागील दोन्ही जीप थांबले. लगातार गोळीची बरसात होत होती. कुठून गोळी चालत होते तेसुद्धा कळत नव्हतं. 

      पाटील आणि चव्हाण बाहेर आले आणि गोळी ज्या दिशेतून येत होते तिथे त्यांचे बंदूक चालवू लागले. मागचे कॉन्स्टेबल ही बाहेर आले आणि गोळी चालवू लागले. गुरुजी जीपमध्ये एक मोठीशी स्माइल करत बसला होता. बाकीचे कॉन्स्टेबलही बंदूक चालवू लागले. 

     पाटील निरखून पाहिला तर तिथे खुपजण काळे कपडे घालून बंदूक चालवत होते. पाटीलला बंदूक चालवायला चान्सच मिळत नव्हता. संतोष आणि जान्हवी जीपमध्ये लपून होते. काचे आणि जीपची बाकीचे हिस्से फुटत होते. दोन कॉन्स्टेबलना गोळी लागली. पाटील कसतरी करून त्याचा मोबाईल घेतला आणि कमिशनरला फोन लावला. 

कमिशनर -" हॅलो पाटील."

पाटील गडबडीत म्हणाला.

पाटील - " सर... इथे फायरींग होत आहे."

कमिशनर त्यांच्या खुर्चीवरून उठून म्हणाले. 

कमिशनर -" काय?"

पाटील -" हो सर... माहिती नाही कसं ? पण इथे रस्त्यावर कोणीतरी आमच्यावर फायरिंग करत आहेत आणि सर दोन कॉन्स्टेबल जखमी झाले आहेत."

कमिशनर लगेच निर्णय घ्यायचा होता. म्हणून ते म्हणाले. 

कमिशनर -" पाटील... तुम्ही लगेच मागे फिरा. जवळच्या पोलिस स्टेशनला जा आणि तिथे आणखी बॅक अप घेऊन परत हेड कॉटरला या  आणि हा जखमी झालेल्यांना तिथेच हॉस्पिटलला पाठवा."

पाटील -" पण सर..."

कमिशनर -" पाटील .. आपल्याकडे वेळ नाहीये . मागे फिरा..."

पाटील -" ओके सर..."

       पाटील व्होकी टोकी ने मागच्या सगळ्यांना त्याचा आदेश कळवला. बाकीचे कॉन्स्टेबल कसतरी वाट काढून त्यांच्या जीपमध्ये बसले. गुरुजी अजुन त्याच जीपमध्ये होता. गोळीची बरसात अजुन चालुच होती. सगळे जीप रिव्हर्स घेतले. त्यांनासुद्धा माहिती नव्हतं की ते किती गतीने जात होते. रिव्हर्स घेऊन ते परत मागच्या रस्त्याला लागले.

     लवकरच ते जवळच्या पोलिस स्टेशनला पोहचले. तिथल्या इन्स्पेक्टरला आधीची सगळी माहिती देऊन तिथले कॉन्स्टेबल बॅक अप म्हणून सोबत घेतले. जखमी झालेल्या कॉन्स्टेबलना तिथूनच हॉस्पिटलला पाठवले. आता बॅकअप जास्त घेऊन ते मागे फिरू लागले. चार दुसरे जीप घेऊन ते परत मागच्या रस्त्याला लागले. गुरुजीच्या चेहऱ्यावर अजुन स्मित होती. काहीतरी गडबड आहे अस पाटीलला वाटलं  म्हणून या वेळेस गूरुजीला ते त्यांच्या जीपमध्ये बसवले .

     परत जात असताना त्यांना एक हायवे लागणार होत. त्यामुळे मागचे जीपमधले आणि पुढे पाटील सगळीकडे लक्ष देऊन होते. 

      अगदी शांत अश्या रस्त्यावर ते जात होते. इतक्यात आकाशात तीन हेलिकॉप्टर त्यांना दिसले. त्यांना आधी वाटलं कुठलेतरी डिफेन्सचे लोक असतील , त्यामुळे ते त्याला इग्नोर केले. पण जेंव्हा त्या हेलिकॉप्टर मधून गोळ्या चालू लागल्या , मग त्यांना कळाल की हे तर वेगळेच लोक आहेत. 

      पहिल्यांदा जंगलातून आणि आता हेलिकॉप्टरवरून गोळ्या चालत होत्या. परत काचा फुटू लागल्या. जीपमध्ये गुरुजी मोठिशी स्माइल करत होता. जान्हवी आणि संतोष जीपमध्ये खाली बघून बसले होते. गोळ्या वरून चालत असल्यामुळे त्यांना खूप अवघड होत होती . मागच्या  जीपमधून बाकीचे बॅक अप टीमही उतरले आणि वर गोळ्या चालवू लागले. पण त्यांच्याकडे अडवान्स बंदूक होते म्हणून पोलिसांची बाजू कमजोर पडत होती. तसे असतानाही बंदूक चालवत होते. वरून तरी गोळ्यांचे पाऊस पडत होता. 


       एवढ्यात तीन हेलिकॉप्टर पैकी एक खाली उतरू लागली . खाली उतरताच त्यातून ६ जण बाहेर आले आणि बंदूक चालवू लागले. बाकीचे दोन हेलिकॉप्टर वरूनच गोळ्या चालवत होत्या. ते ६ जण गुरुजीच्या जिपजवळ आले . पाटील गोळ्या चालवत मागे जात होते आणि चव्हाणही त्याच्यासोबत होता. जीपमध्ये फक्त जान्हवी , संतोष आणि गुरुजी राहिले होते. 

     ते ६ जण जवळ आल्यावर जीपची दार उघडली आणि जान्हवीला बाहेर ओढून काढले. जान्हवीला पडताना बघताच संतोष त्यांना मारायला गेला. पण ते बंदुकनी त्याच्या डोक्याला मारले. तो तिथेच बेशुध्द पडला. गुरूजीला बाहेर काढून ते ६ जण परत हेलिकॉप्टरकडे गेले. पाटील तरीही त्यांच्यावर गोळ्या चालवत होता. मागे माहिती नाही किती कॉन्स्टेबल जखमी झाले होते. पण पाटील गोळ्या चालवत होता. हेलिकॉप्टरमध्ये ते सगळे बसले आणि थोड्याचवेळात हेलिकॉप्टर उडू लागली. ते उडताना बघताच बाकीचे हेलिकॉप्टरमधून गोळ्या थांबल्या. वर हेलिकॉप्टर पोहचताच पाटील आणि चव्हाण जान्हवीकडे आले. 

पाटील -" मला हे कळत नाहीये की त्यांना आपलं लोकेशन कसं भेटत आहे?"

हे प्रश्न म्हणताच पाटीलचा फोन वाजला. स्क्रीनवर नंबर वेगळाच होता. 

पाटील - " हॅलो .."

गुरुजी -" क्या साहेब.मुझे एक दीन भी रख नही सके. "

पाटिलला  लगेच कळाल की हा गुरुजी आहे. हेलिकॉप्टर मधून बोलत आहे. 

पाटील -" तू बच नही सकेगा."

गुरुजी -" कूछ अलग बोलो साहेब... अभी तो तूम्हारे हाथोसे भाग आया मे.. "

पाटील रागात होता.

गुरुजी -" सोच रहे हो ना की मेरी लोकेशन मेरे लोगो को कैसे मिली?"

पाटील गप्प होता.

गुरुजी -" जरा अपनी गन देखना इन्स्पेक्टर.."

एवढं म्हणताच पाटील त्याच्या गन बघितला. त्याला एक चीप लागलेली होती. जे गुरुजी त्याच्या अड्यावर पाटीलसोबतच्या झटापटीत लावलेला होता. ते बघून पाटीलला अजुन राग आला. 

   गुरुजी हसत होता. 

गुरुजी -" थेंक यू इन्स्पेक्टर . मेरी मदत करने के लिये... और हा प्रलय आणेवाला है. "

   एवढं बोलून तो फोन कट केला आणि वरून मोबाईल खाली फेकला.

       सगळे जण स्तब्ध होते. बॉम्ब त्यांच्या लोकेशनकडे जात होती. गुरुजी फरार झाला होता. पाटील विचार करत असाच बसलेला होता. संतोष खाली बेशुध्द पडला होता . त्याला उठवत जान्हवी खाली बसलेली होती. 

**********************************

क्रमशः

ऋषिकेश मठपती

पुढील भाग लवकरच... तुम्हाला हा भाग कसा वाटला. नक्की कळवा... तर आज २५ डिसेंबर .. ख्रिसमस डे... तर सर्वांना मेरी ख्रिसमस ... धन्यवाद ????????????... आणि हा पुढे काय होईल अस वाटतय ते कमेंट करून कळवा...



   

🎭 Series Post

View all